|
Pulasti
| |
| Thursday, July 12, 2007 - 1:33 am: |
| 
|
विजेचा शेर - श्यामलीने सांगितलाय तसाच अर्थ आहे. जरा सपाटच वाटतोय नाही तो शेर? -- पुलस्ति.
|
Pulasti
| |
| Thursday, July 12, 2007 - 1:41 am: |
| 
|
"कंठशोष" जगती चिवट अजूनी, हा काय दोष त्यांचा? जाळून बाल्य करता का रक्तशोष त्यांचा? का व्यर्थ फडफडावे? चिमटीत गुदमरावे? सुरवंट रेंगणारे विणतीच कोष त्यांचा! कळती तुम्हास सार्या खाणाखुणा इशारे ऐकू कसा न येई मग कंठशोष त्यांचा? समजून कोण घेते कोणास आज येथे माझ्यावरी तरीही आहेच रोष त्यांचा! सवयीनुसार त्यांनी संकल्प सोडले अन सवयीनुसार चालू हा मंत्रघोष त्यांचा! -- पुलस्ति.
|
पुलस्ती.. 'कळेना' गज़ल आवडली.. कंठषोश मध्ये शेवटचा शेर लगेच स्पष्ट होत नाही.. ४ थ्या शेरात पहिली ओळ समजून कोण घेते कोणास आज येथे अर्थ स्पष्ट की "इथे कोणीच कोणास समजून घेत नाही", असं म्हंटल्यावर दुसर्या ओळीतला तरिही खटकतो.. पहिले तिन शेर छानच..
|
Daad
| |
| Thursday, July 12, 2007 - 11:29 pm: |
| 
|
पुलस्ती, दोन्ही गज़ला आवडेश! चंद्रमौळी आणि 'वाचले खोडले शेर' आवडले. मानस- जगण्याला काय हवे छानय. चिन्नू म्हणतेय तसं कमी शब्दात छानच जमतय तुम्हाला. पण मला शेवटला शेर कुछ कळ्या नई! तसंच लयीत बसवण्यासाठी सुट्ट्या च्या ऐवजी सुट्या, आणी मधला दीर्घ णी?
|
Manas6
| |
| Friday, July 13, 2007 - 5:39 pm: |
| 
|
चिन्नु, दाद, शेवटचा शेर- अवहेलण्यात आलेल्या स्त्रीची वेदना..मग ती कुणीही असो..सावत्र मुलगी..विधवा सून..मोलकरीण....तिला साधे जेवण सुद्धा आनंदाने दिल्या जात नाही.."घ्या गिळा एकदाचे",असे म्हटल्या जाते..नाही का? गझल लेखनाच्या प्रचलीत नियमांप्रमाणे णी हा दीर्घ आणि उ ह मुद्दामच र्हस्व काढल आहे..
|
|
|