|
सरस्वती त्याच्याकडे बघत होती. धावता धावता ती कधी या बागेत आली तेच तिला समजले नाही. आगीतून सुटून फ़ुफ़ाट्यात आल्यासारखं तिला वाटत होतं. तो मात्र शांत उभा होता. "बस." त्याने तिला सांगितली. तिने इकडे तिकडे पाहिलं. अंधार पसरला होता. कुठे बसायचं तेच तिला समजेना. तो दोन पावलं पुढे आला. तिच्या खांद्यावर त्याने हात ठेवला. तो तिच्यापासून अक्षरश्: श्वासाच्या अंतरावर उभा होता. अंधारात त्याचा चेहरा वेगळा होता. पहिल्यादा कुठल्याही तरुणाचा स्पर्श तिला होत होता. मुलायम, गरम आणि तरीही आश्वासक, एखाद्या बापाने आपल्या मुलाला धरावं तसं. त्याने तिला खाली बसवलं. त्याचा हात खिडकारून तिथून पळावंसं तिला वाटत होतं. पण पळून जाणार कुठे? आश्रमात रंजना तिची वाट बघत होती. मागच्याच आठवड्यात एका मुलीने रंजनाने काय का केलं हे सरस्वतीला सांगितलं होतं. रेहानने तिच्या हातात एक कप दिला. "कॉफ़ी.." तो म्हणाला. सरस्वतीने कपकडे पाहिलं. बिगर दूधाचा चहा प्यायची तिला सवय होती. आयुष्यात पहिल्यादा ती कॉफ़ी प्यायली. ती कडवट चव खूप छान वाटली. पहिल्या घोटानंततर पण ती चव जीभेवर रेंगाळत राहिली. तो शांत बसून होता. " Thanks " ती म्हणाली. "का पळत होती?" त्याने विचारलं. कुठलं कारण द्यावं याचाच ती विचार करत होती. पण अचानक तिच्या नकळत ती बोलून गेली. "रंजना..." "काय?" त्याला काहीच समजलं नाही. सरस्वतीने त्याच्याकडे परत पाहिलं. त्याचे निळे डोळे एखाद्या डोहासारखे वाटत होते. शांत तरी खोल. हळू हळू सरस्वतीने त्याला सर्व सांगितलं. अगदी आईच्या दुसर्या लग्नापासून. त्याच्या कपाळावर एक आठी पडली. "कसब्यामधे? उस्मान चिंचण्कर? मला माहित पाहिजे. नाहीतर घरी कुणाला माहित असेलच." तो म्हणाला. परत ती संतापाची लाट तिच्या नसानसामधून उठली. ती काहीच बोलली नाही. "जाने दो," तोच पुढे म्हणाला. "फ़िलहाल आपण तुझा इथला प्रॉब्लेम निपटूया. " तिने त्याच्याकडे पाहिलं. "म्हणजे?" "ये रन्जना टाईप लोग हमेशा मिलंगे. सबसे भागोगे? माझ्या हॉस्टेलवर पण असले नमुने असतात. I Know how to deal with them.." "मला नाही समजलं..." ती म्हणाली. त्याच्या चेहर्यावर एक मिश्किल स्मित होतं. "किसी को बताना मत." "काय?" तो हलकेच तिच्याजवळ आला. सरस्वतीच्या ःऋदयाचा ठोका चुकला. त्याने आपले ओठ तिच्या कानाजवळ नेले. तो हलकेच पुटपुटला. तिच्याशिवाय दुसरं कुणी ऐकणार नाही अशा बेताने. जरी आता ते दोघेच तिथे होती तरीही. त्याचा उष्ण निष्वस तिच्या गालावर आला. तो काय म्हणाला याकडे तिचं लक्ष नव्हतं. त्याने तिच्याकडे हसत पाहिलं. एक दोन सेकंदामधे रेहान काय म्हणाला हे तिला समजलं... कित्येक आठवड्यानंतर सरस्वती खळखळून हसली. "तू वेडा आहेस." हसण्याचा पहिला भर ओसरल्यावर ती म्हणाली. "सगळे म्हणतात." "इतक्या रात्री इथे काय करतोस?" त्याने वर बोट दाखवलं. तिने वर पाहिलं. "देवाकडे जातो?" "नही.. तारे बघत होतो. पण विसरून गेलो होतो. खुदाची चांदनी तर इथे धरतीवर आली आहे," ती काहीच बोलली नाही. "आज अमावस आहे. खूप तारे दिसतात. तू बघणार?" त्याच्याकडे एक छोटीशी दुर्बीण होती. त्यालाच तारे काय पण बाकीचीही बरीच माहिती होती. गप्पा मारायची हौस होती. सरस्वती आणि रेहान दोघे जण रात्रभर बोलत होते. विषयाचं बंधन नव्हतं. त्याने त्याच्याविषयी बरंच सांगितलं. झुंजुमुंजू व्हायाच्यावेळेस सरस्वती आश्रमात आली. तिला आता कुणाचीच काळजी नव्हती. तिला हवा तसा मित्र तिला मिळाला होता. रेहान.. तिचा एकमेव आणि खरा मित्र.
|
Sahi
| |
| Monday, July 02, 2007 - 3:28 pm: |
| 
|
After reading the posts I think it looks like Saraswati is suffring from Schizophrenia .....I am not trying to guess the end though. Nandini Keep writing...
|
hey now the story begins keep it up Nandini !!
|
Preetib
| |
| Monday, July 02, 2007 - 6:30 pm: |
| 
|
we r waiting for next posts eagerly . gr8 nandini
|
Daad
| |
| Monday, July 02, 2007 - 10:42 pm: |
| 
|
नंदिनी, बेफाम चाललीये कथा. almost addictive आहे तुझी कथा, style .... हं..... मग पुढे काय झालं?
|
नंदिनी,अशी मधेच थांबु नकोस........ हं..... मग पुढे काय झालं? लवकर लिही.....
|
Radha_t
| |
| Thursday, July 05, 2007 - 6:21 am: |
| 
|
great !! लवकर पुढच येवू दे
|
दूरवरून सरस्वती चालत येत असताना रेहानला दिसली. त्याने हातातली सिगरेट विझवली. तिला बिल्कुल आवडत नाही हे त्याला चांगलंच माहीत झालं होतं. तिला चालत येताना बघून त्याला हसू आलं. इतकीशी ही मुलगी सगळ्या जगाचं ओझं स्वत्:च्या खांद्यावर असल्यासारखी असायची. एक महत्वाची गोष्ट विसरली होती. ती अजून लहान होती. सगळं जग बघितल्यासारखं तिला वाटत होतं. पण अजून तिनं जग पाहिलंच कुठ होतं. त्याच्याइतकं तर नक्कीच नाही. "तू कायम इतक्या लवकर का येतोस?" तिने आल्या आल्या विचारलं. रोज संध्याकाळी तिची शाळा संपली की ती या आमराईत यायची. तो तर तिथेच असायचा. "तू येताना दिसावं म्हणून.." तो म्हणाला. "काहीपण बोलू नको. आज शाळेत मला भूगोलाचा खूप अभ्यास दिला आहे." ती बसत म्हणाली. त्याने तिच्या हातात एक magazine दिलं. "अरे. रोहित कपूरची मुलाखत." ती जवळ जवळ ओरडली. मुखपृष्ठावर देखण्या रोहितचा एक फोटो होता. "सरस्वती, मला अजून कळत नाही. तुला हा इतका का आवडतो. If you ask me, I hate this guy. He is worthless. तुला आवडतो म्हणून आणि घरात कुणी हे वाचत नाहि म्हणून घेऊन आलो." "काय त्रास आहे रेहान तुला? मला खूप आवडतो तो. तुला चांगले काही आवडतच नाही का?" तिने वैतागून त्याला विचारलं. "का नाही? तू आवडतेस ना. आणि तू चांगली आहेस ना." त्याने विचारलं. "रेहान, तुमच्या हॉस्टेलमधे तुम्हाला असं मजेशेर बोलायला शिकवतात का रे?" "नाही, तिथे आम्हाला घरापासून लांब कसं रहायचं ते शिकवतात." "कमीत कमी तुला घर तरी आहे. मी तर कशापासून लांब आहे हेही मला माहीत नाही." ती दूरवर बघत म्हणाली. ही तिची सवय झाली होती. स्वत्:शी बोलल्यासारखी बोलायची. रेहानने तिच्या खांद्यावर हात ठेवला. "सरस्वती.. मी उद्या जातोय." तिने वळून त्याच्याकडे पाहिलं. "परत केव्हा येशील?" तिने विचारलं. तिचे डोळे म्हणाले "परत येशील ना?" "येईनच." त्याचे डोळे म्हणाले. "पुढच्या महिन्यात किंवा ईदला येईन." तो म्हणाला. "काळजी घे." ती म्हणाली. "माझी आठवण ठेव." तिचे डोळे म्हणाले. "तुला विसरणं कसं शक्य आहे?" त्याचे निळे डोळे हलकेच म्हणाले. "तू पण" तो म्हणाला. ती काहीच बोलली नाही. काही बोलायची गरज उरली नाही. तो उद्या मुंबईला जाणार हे माहीत होतं. पण तरीही तो जाऊ नये असं वाटत होतं. कितीतरी गोष्टी त्याला सांगायच्या होत्या. कितीतरी गोष्टी त्याला विचारायच्या होत्या. अजून त्याना भेटून महिना पण झाला नव्हता. किती काय बोलायचं होतं. पण तो तिला सोडुन चालला होता. सगळ्यासारखंच. येणार्या एकटेपाणाच्या कल्पनेने सरस्वतीच्या डोळ्यात एक टपोरा अश्रू आला. "अरे.. तु रडते?" त्याने हसण्याचा प्रयत्न केला. " You are such a brave girl. " "रेहान..." ती पुढे काहीच म्हणाली नाही. सगळ्या भावना त्या शब्दात साठून राहिल्या. सूर्य मावळला होता आणि अंधार पसरायला लागला होता. पश्चिमेकडे लाल केशरी रंगाचं ताट कुणीतरी उधळल्यासारखं वाटत होतं. आमराई शांत होती. नुकताच आंब्याला मोहर धरू लागला होता. सगळी झाडं नव्या बाळंतीणीसारखी दिसत होती. सरस्वतीच्या मूळच्या गोर्या रंगावर एक सावळी छटा चढली होती. काळ्या डोळ्यातलं तेज अजून तसंच होतं. रेहान तिच्याकडे पाहत होता. आजचाच दिवस. उद्या सकाळी तो जाणार. सरस्वतीने रेहानकडे पाहिलं. त्याची नजर ढळली नाही. अंधराचे साम्राज्य हात पाय पसरत होतं. "परत असेच भेटू ना आपण?" तिने त्याला विचरलं. त्याच्या पापण्या लवल्या. "अगर अल्लाहने चाहा तो जरूर..." तो उठून उभा राहिला. त्याच्या त्या एका वाक्याने सरस्वती भानावर आली. त्या क्षणाची जादू तिथेच संपली. निदान तिच्यापुरती तरी
|
it's a nice episode !!
|
"काय सांगतेस काय? मग त्याने तुला प्रोपोज केलं?" पल्लवी डोळे विस्फ़ारून सरस्वतीकडे बघत होती. "तुझ्या डोक्यावर ना अति टीव्ही पाहुन परिणाम झालाय. प्रपोज वगैरे काय? मित्र आहे तो.." सरस्वती पुस्तकात डोके घालत म्हणाली. गेले महिनाभर सरस्व्ती अभ्यासाला का येत नाही याचं कारण रेहान नावाचा मुलगा असेल असं पल्लवीला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. "पण मग तू रोज त्याला भेटत का होती?" तिने परत विचारलं. गप्पा मारायला इतका चांगला विषय मिळाल्यावर आता तिचं लक्ष अभ्यासात लागणं शक्यच नव्हतं. "कारण... " या प्रश्नाचं उत्तर देताना सरस्वती अडखळली.. कितीही सांगितलं असतं तरी पल्लवीसारख्या मठ्ठाच्या डोक्यात प्रकाश पडला नसता. "कारण तुमचे अफ़ेअर आहे... बरोबर?" पल्लवीने हातातलं पुस्तक बाजुला ठेवलं. काही झालं तरी आता तिला ही लव्हस्टोरी ऐकायचीच होती. "पल्लवी. प्लीज. परीक्षा दोन महिन्यावर आहे. प्रीलिम्स लागल्या आहेत. अशावेळेला मला असलं काही करायला वेळ मिळेल का?" सरस्वती ख्रोखर वैतागली होती. "हे बघ, तुला सांगायचं नसेल तर नको सांगू... पण खोटं बोलू नकोस." "काय खोटं बोलले आहे मी? जर मी तुला रेहानविषयी सांगितलं नसतं तर तुला कसं समजलं असतं. मी काहीही कारण दिलं असतं ना... पण मी तुला सांगितलं तीच माझी चूक झाली.." सरस्वती जवळ जवळ ओरडली. तिचा असा चढलेला आवाज पल्लवीने पहिल्यादा ऐकला. ती घाबरली. "हे बघ, पल्लवी. मला या गोष्टीत इंटरेस्ट नाही. त्यातून रेहान मुसलमान आहे. आणि मला ही लोक आवडत नाही. का.. ते विचारू नकोस. मी रेहानबरोबर बोलत होते कारण तो एक चांगला मुलगा आहे. यापुढे हे नातं मला न्यायचं नाही. सध्या मझ्या दोन वेळच्या जेवणाची मला चिंता आहे. लेलेआजीचं जर काही झालं तर मला आश्रम सोडावा लागेल. मी त्या काळजीत आहे, प्लीज हा विषय यापुढे नको." ती एकदम शांत आवाजात म्हणाली. "सॉरी, चुकलं माझं. " पल्लवी म्हणाली. "ठीक आहे. चल गणितं सोडव," सरस्वती काही झालंच नाही या अविर्भावात बोलली. पुढच्या महिन्यात येतो, असं म्हणालेला रेहान तीन महिने झाले तरी आला नाही. अर्थात सरस्वतीचं त्याच्याकडे जास्त ल क्ष नव्हतं. तिचे पेपर चांगले गेले होते. दहावीचा टप्पा संपल्यावर पुढे काय हा प्रश्न तिला भेडसावत होता. त्यातच लेलेआजीनंतर आश्रम बंद होणार असल्याची अफ़वा उठत होती. तिला आता पैसे कमावणं गरजेचं होतं. कुठेही कसलंही काम तिला हवं होतं. तिला एकटीला जगता येण्यासारखं. आणि काहीच जमलं नसतं तर गावाकडे जाण्यचा पर्याय होता. पण काकाकडे नव्हे तर आईकडे. तिने नक्कीच पैसे दिले असते. आई असण्याची किंमत म्हणून का होईना.... विचाराच्या या जाळात ती गुंतली होती. प्रश्न खूप होते. मार्ग दिसत नव्हता.
|
सरस्वतीने मोठे सरकडे मदत मागितली. "अगं, तुला कोण नोकरी देणार? अजून दहावी पण धड नाही झाली." ते म्हणाले. "सर, प्लीज, बघा ना... कुठेही. मला कॉम्पुटर पण वापरता येतो. टाईपिंग मी शाळेत केलंच आहे. कसलाही जॉब चालेल. महिन्याला पाचशे मिळाले तरी खूप होतील मला." ती म्हणाली. "बघतो.. शाळा चालू असेल तवर एकदा येउन जा." ते म्हणाले. शाळा पंधरा दिवसात बंद झाली असती. आता तिलाच काहीतरी करायला हवं होतं. पण ती वयाने लहान होती. कसलाच अनुभव नव्हता. कुणीही तिला काम दिलं नसतं. त्या दिवशी ती अशीच रस्त्यावरून येत होती. नेहमीप्रमाणेच खाली मान घालून. खूप ओळखीच्या आवाजने तिला हाक मारली. "सरस्वती..." तिने वळून पाहिलं. रेहान उभा होता. "हाय.. कसा आहेस?" तिच्या चेहर्यावर स्मित पसरलं. "कुठे गायब झाली? पेपर कसे गेले?" त्याने विचारलं. "मी कुठेही गायब झालेली नाही. उलट तूच गायब झाला. आणि पेपर मस्त गेले." ती हसत म्हणाली. "आणि इतक्या दुपारी सुनसान रस्त्यावर कशाला एकटी फ़िरते? डर नही लगता?" त्याने तिला चिडवलं. "भिती? कुणाची? इथे माझ्याशिवाय दुसरं कुणी नसेल हे माहिती आहे मला." "आणि मी काय इथे भूत आहे?" तो म्हणाला. सगळ्या चिंता विसरून ती खळखळून हसली. कितीतरी दिवसानी. तो अनिमिष नजरेने तिच्याकडे बघत होता. "काय झालं?" तिने विचारलं. "तू हसली की मला माझ्या अम्मीची याद येते. तीपण अशीच हसायची." हसता हसता सरस्वती थांबली. "ओह, सॉरी" ती म्हणाली. "सॉरी काय त्यात?" क्षण दोन अणासाठी सरस्वती काहीच बोलली नाही. रेहानची अम्मी तो दहा वर्षाचा असताना वारली होती. त्याने तिला केव्हाच सांगितलं होतं. "चल घरी जाऊ.." तो म्हणाला. "काय?" "अरे, काय म्हणून ओरडते कशाला? माझ्या घरी जाऊ.. कॉफ़ी चहा घेऊ. इथे उन्हात उभं राहून काय करणार.. चल.." "नाही रेहान, मी नाही येत तुझ्या घरी. तुझ्या घरचे काय म्हणतील?" " Listen Madam , माझे खूप फ़्रेंड्स घरी येतात. कुणी काही म्हणत नाही. चल.." "नको.. मला काम आहे थोडं. पुन्हा केव्हातरी... मी निघते आता.. पुन्हा भेटू.." एवढं बोलून ती पटकन निघाली सुद्धा. तो रस्त्यवर तिथेच उभा राहिला. काहीच न समजल्यासारखा. ती पटापट निघाली. एकदासुद्धा तिने पाठी वळून पाहिलं नाही. रेहानच्या घरी जाणं ही कल्पनाच तिला सहन होत नव्हती. चालता चालता तिचं मन धावायला लागलं. रेहान तिचा फ़क्त मित्र होता. पण तिला रेहानचा धर्म आवदत नव्हता. जेव्हा ती रेहानशी बोलायची तेव्हा तो खूप जवळचा मित्र वाटायचा. पण जेव्हा तो नसायचा तेव्हा वाटायचं की का मी त्याच्याशी बोलते. एक वेगळंच द्वंद्व तिच्या मनात चालू होतं. कुणालाही त्याची खबर नव्हती. रेहानलासुद्धा.
|
Chaffa
| |
| Tuesday, July 10, 2007 - 6:42 am: |
| 
|
नंदिनी मस्त आहे कादंबरी जमा करुन ठेवतोय.
|
Itgirl
| |
| Wednesday, July 11, 2007 - 6:18 am: |
| 
|
अरे!! पुढे नाही सरकली अजुन कथा? लवकर येउ देत ना नंदिनी please , उत्सुकता वाढली आहे...मस्तच लिहिले आहे!!
|
Rajankul
| |
| Wednesday, July 11, 2007 - 3:32 pm: |
| 
|
कितीही सांगितलं असतं तरी पल्लवीसारख्या मठ्ठाच्या डोक्यात प्रकाश पडला नसता.>>. if know this then why you wrote to "that" another katha,leave it. and write your next episode.
|
सरस्वती आश्रमात तांदूळ निवडत बसली होती. पण मनात मात्र तिच्या वेगळेच विचार चालू होते. तिला नोकरी हवी होती. पैशाशिवाय कॉलेज अशक्य होतं. कुठूनतरी मदत वगैरे मिळाली असती. पण ती किती दिवस पुरली असती? "बाय, काय करतस? सडे तांदूळ फ़ेकतस.." मालती जवळ जवळ ओरडली. सरस्वतीने मान वर करून पाहिलं. "अगं.. लक्षातच आलं नाही माझ्या.. " ती ओशाळून म्हणाली. "कोनाचा विचार करत होती?" मालती म्हणाली. "नोकरीचा... मला दहावीचा रीझल्ट व्हायच्या आत काहीतरी केलं पाहिजे. लेलेआजीनी पण मदत करते असं सांगितलय. आपल्या आश्रमाचे ट्रस्टी आहेत ना.. ते पण बघतो म्हणाले. मोठे सर पण मदत करणार आहेत." सरस्वती आपल्याच तंद्रीत म्हणाली. "तुझ्या वर्गात नाय विचारलस.." "पल्लवीच्या बाबाना सांगितलय. पण ते बॅंकेत आहेत. त्यामुळे काही विषेश मदत करणार नाहीत." "तू त्या रेहानला का नाही विचारत?" "त्याला? तो काय करेल?" नकळत सरस्वतीच्या कपाळावर एक आठी उठली. "का नाय.. त्याच्या घरचा इतका आंब्याचा धंदा आहे. तो ठेवेल ना कामावर तुला.." "त्याच्या हाताखाली काम करण्यापेक्षा मी उपाशी मरेन." सरस्वती उसळून म्हणाली. "चिडतस कशापायी? मित्र ना तुझा.. मग मदत नको कराक..." "हे बघ मालती. तो जरी माझा मित्र असला तरी मला त्याची मदत नको. त्याच्या घरात काम तर बिल्कुल नको.. " मालती काही न बोलता तांदूळ निवदत बसली. त्या दिवशी सरस्वतीने रेहानला रस्त्यावर अर्धवट सोडलं होतं. त्यानंतर ती त्याला भेटली नव्हती. किंबहुना मुद्दामून ती त्याला भेटणं टाळायची. एप्रिल मधलं ऊन जीवला अक्षरश्: जाळत होतं. पण तरीही शाळा बंद व्हायच्या आत एकदा ती मोठे सराना भेटायला गेली. "मला तुझं कौतुक वाटतं... पण तुझा अनुभव पाहता तुला काम मिळणं कठीण आहे..." "सर प्लीज...." "ऐकून घे.. मी माझ्या ओळखीच्या बर्याच लोकाशी बोललो आहे. दोघेजण तुला भेटतील असे म्हणाले आहेत. एक म्हणजे..तुला ते आंबेवाले सय्यद माहीत असतील... ते म्हणाले की.." म्हणजे रेहानचा मामा..... "आणि दुसरं कोण?" "किती गं तू अधीर? दुसरे ते जाधव म्हणुन आहेत. त्याचं एक दैनिक निघतं. त्याना कॉम्पुटरवर काम करणारी मुलगी हवी आहे." "सर या जाधवाचा मला पत्ता द्या मी भेटते त्याना.." "पण सय्यद पगार चांगला देईल. आता सीझन चालू आहे..त्यामुळे.." "नको सर.. मी जधवाना भेटून घेते.. निघू सर.." "हो, आणि जाताना तुला शाळेत मिळालेली सगळी सर्टीफ़िकेट्स वगैरे घेऊन जा.. " "ओके. सर.. भेटु पुन्हा.. Enjoy your vacation " सरस्वती निघाली. ती दरवाज्यात पोचली. तेवढ्यात मोठे सर म्हणाले. "सरस्वती. मीच तुला ईंग्लिश शिकवलं आहे म्हणून... नाहीतर तुझं बोलणं ऐकून कोणी म्हणणार नाही. की तू मराठी शाळेत शिकली.." "सर, शिक्षणाचा आणि शाळेचा संबंध नाहीतरी असतो कुठे? मी सध्या या जग नावाच्या शाळेत शिकतय. खूपच इंटरेस्टिंग शिकतेय..." " All The Best " "बाय सर... "
|
Arc
| |
| Thursday, July 12, 2007 - 5:49 am: |
| 
|
आता boring वाटु लागले आहे.कथानक रेंगाळत चालले आहे.
|
किती वाट बघायची............ boring होत आहे....दोन महीने झाले आता कादंबरी सुरु होउन....
|
Ana_meera
| |
| Thursday, July 12, 2007 - 12:14 pm: |
| 
|
सहमत. नंदिनी उत्सुकतेचे रबर ताणून ताणून तुट्ले आता. please पूर्ण करुनच post केलेत तर जास्त आवडेल. कथा अर्थात चांगलीच आहे म्हणून लिहीले. राग मानु नये.
|
लोकहो, मी तुमची माफ़ी मागते. वास्तविक इतके दिवस न लिहीणे हा माझा स्वभव नाही. मात्र गेले काही दिवस मला रोज रात्री ताप चढत आहे. त्यामुळे रोज "उद्या लिहू" हे प्रकरण चालू आहे. काल मी लिहिण्याचा प्रयत्न केला.. पण मनासारखे जमले नाही. कृपया मला थोडा अवधी द्यावा ही विनंती.. पूर्ण करून पोस्ट करणे शक्य नाही. पण कथानक मात्र आता जंप मारेल याची खात्री... खूप झालं सरस्वतीचं नोकरी शोधणं आणि रडणं.. आता सगळे छान चान romantic scene
|
Itgirl
| |
| Thursday, July 12, 2007 - 1:47 pm: |
| 
|
लवकर बरी हो बर आणि लिहि मग.. सगळेच वाट बघत आहेत
|
|
|