Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 12, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » निज ज्येष्ठ » कथा कादंबरी » नवर्‍याचं घर.. » Archive through July 12, 2007 « Previous Next »

Bee
Wednesday, July 11, 2007 - 11:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लग्न झाल्यांतर आठपंधरा दिवसातच तिला डोहाळे लागले. नंदांना तशी मुले होती पण ती लग्नानंतर चार पाच वर्षानी कुठल्यातरी देवबाप्पाच्या कृपेने झालेली होती. जाऊच्या लग्नाला पाचेक वर्ष होऊनही मुलाबाळाचा काही पत्ता नव्हता. साहजिकच सासूचा अनुभवही काही खास नसणारच. घरातील स्त्रिपुरुषांनी सोडाच पण खुद्द नवर्‍यानी देखील ह्याचा अन्वय वेगळाच काहीतरी लावला. शकू माहेरहूनच आपले तोंड बुडवून अन् कुठून तरी काळे करून आली अशी आपसात चर्चा सुरू झाली. मुलाला जन्म देईपर्यंत गरीब आईवडीलांची पोर म्हणून शकूने अतोनात अन्याय सोसला. जेंव्हा सासूने तिचे कमकुवत मनगट धरून चिमुकल्या पोरासहीत फ़रफ़टत विहीरीजवळ तिला आणली तेंव्हा मात्र तिची शक्ती संपली आणि कासाविस होऊन तिने माहेरची वाट धरली. एका काखेत कपड्यांचे गाठोडे आणि दुसर्‍या काखेत थानाशी चिकटून धरलेले पोर घेत तिने माहेरचा उंबरठा ओलांडला आणि माजघरात शिरली. तशी सगळ्यांच्या चेहर्‍यावर काळजेची आठी उमटली.

मुल जसजसे मोठे होत गेले तसतसे ते बापाच्या वणावर आणि चेहर्‍यावर जात गेले. कुणातरी अमक्याच्या लग्नात शकूची गाठ तिच्या सासरकडच्या लोकांशी पडली. तिच्या पदराशी खेळत असलेले पोर पाहून सासू हरकली. म्हणाली अगदी माझ्या नऊनाथासारखच दिसतो हा. नंदा देखील डोकावून पाहू लागल्या. नवर्‍याची छाती अभिमानाने फ़ुलली. मुलाचा बाप म्हणून मीच तो कर्तबगार पुरुष असा विश्वास त्याच्या चेहर्‍यावर दिसला. जाऊबाईंना अजून पोर नव्हते म्हणून जेठानी देखील मोठ्या बाबांच्या नजरेने मुलाकडे पाहिले.मग अधूनमधून माहेरी सासरकडच्या लोकांच्या चकरा व्हायला लागल्या. मुलाला खाऊ, अगदी काही नाही तरी एखादा खणबिण शकूसाठी देखील नवरा न विसरता आणायला लागला. मुलाने बापाच्या चेहर्‍यावर निघणे आणि त्यातही पहिले मुल मुलगा म्हणून जन्माला येणे किती महत्त्वाचे असते ह्याची किंमत शकूला कळली. ह्याबाबतीत आपण खूपच भाग्यवान म्हणून तिने मनोमन देवाचे आभार मानले.

माहेरी सहा वर्ष राहून तिला घरातले सर्वच कंटाळून गेले होते. मुलाला साधा गुळाचा खडा म्हणून जेवायला दिला तर चार लोकांचे तोंड उघडून त्याचे जेवन संपेपर्यंत शकूला गिळू की खाऊ अशा नजरेने दुर्दैवाने प्रियजन बघायला लागले. तशी शकू कणखर होती. दिवस उगवत नाहीतर इथून तिथून सर्व घरदार चकाचक, सडा सारवान, स्वैपाकपाणी, धुणेभांडी सर्व काही शकूच करायची. घरातील कामे करून होत नाहीत तर मशीनवर बसून चार पैशांची तजवीज म्हणून कपडे देखील शिकायची. हे एक खूपच बरे होते की आईवडीलांनी अगदीच कॉलेजबिजेल जरी शिकवले नसले तरी शिवणकर्तनाच्या वर्गात तिला लग्नागोदर जाऊ दिले. त्यासाठीही ती देवाचे आभारच मानायची कारण बाजूच्याच घरी बसलेल्या म्हणजे नवर्‍यानी टाकून दिलेल्या निताला तेही येत नसे.

एकदा कुणीतरी शकूच्या मुलावर हात उगारला शकूने मात्र कानाडोळा केला. आता सासरकडचा आणि माहेरकडचा त्रास सहन करून लवचिकपणा येणारच ना. असे आणखी आणखी व्हायला लागले तशी शकू मान वर करून बोलायला लागली. तिचे मान वर करून बोलणे कुणी का खपवून घेणार? शेवटी घरात झाकन नसलेली शिशी जशी बिनकामाची असते तशी नवर्‍याने सोडलेली स्त्रि देखील बिनकामाची म्हणून शकूचा कुणी मानपान ठेवत नसे. शकू पुरती विटून गेली. ना धड माहेर ना सासर. कुणाची निवड करावी, कुठे रहावे, मुल कसे वाढवावे ह्याची तिला दिवसरात काळजी.

एके दिवशी तिला पत्र आले. पत्र वाचून ती अगदी गर्भगळित झाली. कारणच तसे होते. नवर्‍याने बाई ठेवली. तिने कपाळावर मारून घेतले कारण आता आपला निभाव कसा लागणार हीही एक काळजी तिला लागली. आज ना उद्या नवरा 'बायको' म्हणून आपल्याला वागवेल असा एक दिलासा तिला होता. पण आता मात्र तीही आशा उरली नाही.

अशीच एक रात्र होती. शकू चौका आटोपुन दोन घास खायला लागली तसा तिला कुणाचा तरी धक्का बसला. तिला तसे धक्केबुक्के रोजच बसत. ते नाही बसलेत तर तिला काहीतरी हरवले असे वाटायचे. तिला सासरकडचे दिवस आठवायचे. फ़क्त एकाच वर्षात तिला अनेक धक्केबुक्के लागले होते. शकूने आपल्या पुढ्यातले ताट सरकवले. काखोठीला पिशवी टांगली आणि सासरची वाट धरली. मुलाला फ़रफ़टत नेऊन तिने हक्काचा उंबरठा ओलांडला आणि माजघरातून तरातरा पाय आपटत थेट नवर्‍याच्या शेजघरात शिरली..


Bee
Wednesday, July 11, 2007 - 11:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वर 'समाप्त' म्हणून शेवटचा एक शब्द लिहायचा राहून गेला :-)

Nandini2911
Wednesday, July 11, 2007 - 12:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I really feel very sorry to write this. बी, या आधीच्याही तुझ्या कथाना मी नीगेटीव्ह कमेंट दिली होती. आता परत देत आहे. खूप वाईट कथा. तुला विषय समजलाच नाही असं मला म्हणावं लागेल. विशेशत्: ज्या वाक्यानी मला राग आला ती वाक्यं शेवटी घरात झाकन नसलेली शिशी जशी बिनकामाची असते तशी नवर्‍याने सोडलेली स्त्रि देखील बिनकामाची म्हणून शकूचा कुणी मानपान ठेवत नसे

लग्न झाल्यांतर आठपंधरा दिवसातच तिला डोहाळे लागले (???)

तिने कपाळावर मारून घेतले कारण आता आपला निभाव कसा लागणार हीही एक काळजी तिला लागली. आज ना उद्या नवरा 'बायको' म्हणून आपल्याला वागवेल असा एक दिलासा तिला होता. पण आता मात्र तीही आशा उरली नाही.

मुलाने बापाच्या चेहर्‍यावर निघणे आणि त्यातही पहिले मुल मुलगा म्हणून जन्माला येणे किती महत्त्वाचे असते ह्याची किंमत शकूला कळली. ह्याबाबतीत आपण खूपच भाग्यवान म्हणून तिने मनोमन देवाचे आभार मानले.

एक खूपच बरे होते की आईवडीलांनी अगदीच कॉलेजबिजेल जरी शिकवले नसले तरी शिवणकर्तनाच्या वर्गात तिला लग्नागोदर जाऊ दिले. त्यासाठीही ती देवाचे आभारच मानायची कारण बाजूच्याच घरी बसलेल्या म्हणजे नवर्‍यानी टाकून दिलेल्या निताला तेही येत नसे.
>>>>>
बी, तुला नक्की काय म्हणायचे आहे? एखादी स्त्री नवर्‍यचं घर सोडते ती परत जायची अपेक्षा ठेवेल का? जर सासरचे तिच्या घरी आले तर ते तिला नांदवायला का नाही घेऊन गेले? तसे माहेरचे कुणीच काही का नाही म्हणाले? अर्थात हे मला पडलेले प्रश्न आहेत. आणि मला जे वाटलं ते मी लिहिलय. आवडलं नाही तर तसं सांग.
पण लिहत रहा. थोडी का होईना प्रगती आहे हेही नसे थोडके.
एक सुचवू? तू अशा विषयावर लिही जे तुला जवळचे असतील. माहीत असतील. आणि थोडे जास्त लिही. संवाद घातलेस तर बरे होईल.





Bee
Wednesday, July 11, 2007 - 12:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदीनी, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. वाचून वाईट वगैरे अजिबात वाटले नाही..

तू माझ्या वाक्यातील उपरोध लक्षात घेतलास तर वर तू लिहिलेली वाक्यं तुला सहज पटतील..


Nandini2911
Wednesday, July 11, 2007 - 12:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, पण तो उपरोध लक्षात येत नाही आहे ना.. हीच वाक्यं तू संवादरुपाने कुणाला तरी बोलायला लावली असती आणि शकूने त्याच्यावर प्रतिक्रिया दिली असती तर तुला जे म्हणायचं आहे ते समजलं असतं

Maitreyee
Wednesday, July 11, 2007 - 1:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, काय रे हे? ही कसली गोष्ट(??)!! ना धड घटना क्रम ना कथानक. एखाद्या नवा काळ वगैरे टाईप वृत्तपत्रातली बातमी वाटेल फ़ार तर.
ते एकपानी कथांचं भूत आधी उतरव बरं डोक्यातलं! तो प्रकार हातळणं अवघड असतं अन जमलं नाही की उलट हास्यास्पद वाटतं. परिणामकारक वगैरे दूर च राहिलं. I am sure u can write muchh better than this... sorry पण असल्या प्रकारची ही तिसरी कथा पाहून राहवलं नाही!


Deshi
Wednesday, July 11, 2007 - 5:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लग्न झाल्यांतर आठपंधरा दिवसातच तिला डोहाळे लागले>>>>>>>
काय सांगता. तुम्हाला नक्की माहीतीयेना डोहाळे म्हनजे काय? ईतक्या लवकर डोहाळे लागत नसतात भाउ. (पुर्व पराक्र्म असल्याशिवाय.) अहो निदान दोन तिन महीने तरी लिहायच.

बी रागावु नका पण ही पण कथा भारीच झाली वाचायला. (वर तुम्ही म्हणायला मोकळे आम्हालाच कळली नाही म्हनुन,) जिए पेक्षा दुर्बोध (तुमचा नेहमीचा शब्द) कथा आहे ही. मला ही कळाली नाही. (अल्पमती मुळे)

ओ मॉड मायबोलीवरील कथा, कविता ची क्वॉलीटी असा एखादा बीबी उघडुन देता का.


Sahi
Wednesday, July 11, 2007 - 8:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी स्वता कथा लिहीत नाही परन्तु वाचते तुफ़ान...सो ही प्रतिक्रिया... हे जे काही लिहिले आहे ते पोस्ट करायच्या आधी वाचले होते का? शुध्धलेखनाकडे दुर्लक्श केले आहे. मराठीत नसलेले वाक्प्रचार"तोन्ड बुडवुन""काळजेची आठी " जेठ ह्याला मराठीत दीर-भावजी म्हणतात.चौका आटोपुन = स्वयपाक घरकाम
का ही कथानायिका हिन्दीमारवाडी भाषिक आहे? असल्यास कथेत हा उल्लेख अपेक्शित आहे
असो हे काही मला खटकलेले मुद्दे..बी तुम्हाला नाउमेद करायचा हेतु अजिबात नाही



Bee
Thursday, July 12, 2007 - 2:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदीनी, मैत्रेयी धन्यवाद..

देशी, तुम्हाला नक्की खात्री आहे का की लग्न झाल्यानंतर पंधरा दिवसात स्त्रिला दिवस जात नाही म्हणून? वर्तमानपत्रात एका बलाक्तारानंतर अभागी मुलीला दिवस गेल्याच्या कित्येक वार्ता मी वाचलेल्या आहेत. बघा फ़क्त एकाच बलाक्तारात ऐवढा दम असतो तर पंधरा दिवसात काय काय होऊ शकते..

सही, तुम्ही फ़ार तुफ़ान वाचता. 'तुफ़ान' हा शब्द फ़ारच छान निवडला नाही! त्यापुढची प्रतिक्रिया.. ते शुद्धलेखनाचे वाक्य.. वर नाउमेद करायचे नाही हे एक आणखी.. तुमचे इथले 'सही' हे नाव.. अहो काय हे.. तुफ़ान व्यक्तीमत्त्व दिसता तुम्ही :-)


Deepanjali
Thursday, July 12, 2007 - 2:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देशी, तुम्हाला नक्की खात्री आहे का की लग्न झाल्यानंतर पंधरा दिवसात स्त्रिला दिवस जात नाही म्हणून?
<<<<बी ,
जरा google search करून पहायचे की हे विचारण्या आधी .
मी पण हीच प्रतिक्रिया देणार होते पहिलेच वाक्य वाचून , लग्ना आधी पासून एकत्र रहात होते का couple म्हणून .
:-)

Bee
Thursday, July 12, 2007 - 2:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्ही अर्धवट का वाचता.. हे खालचे वाक्य वगळले का वाचताना...

वर्तमानपत्रात एका बलाक्तारानंतर अभागी मुलीला दिवस गेल्याच्या कित्येक वार्ता मी वाचलेल्या आहेत. बघा फ़क्त एकाच बलाक्तारात ऐवढा दम असतो तर पंधरा दिवसात काय काय होऊ शकते..


Daad
Thursday, July 12, 2007 - 3:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, तुम्ही लिहिलय ते खर्‍या अर्थाने एक कथाबीज आहे, फक्त. साधारणपणे तीन तासांचा मुव्ही पाच मिनिटांत सांगायचा झाला तर कसं सांगतो आपण? तसं झालय.
त्याला खत पाणी घालून त्याची कथा करणं आवश्यक आहे. काळाच्या ओघात, घटनांच्या ओघात बदलणारी पात्रं, त्यांचे आपापसातले संबंध, ह्या कथेचा सामाजिक संदर्भ इ. इ. अनेक गोष्टी वापरता येतील.
संवाद घालून किंवा वेगवेगळ्या घटना घालून तरी पात्रं जिवंत करणं आवश्यक आहे.
परत एकदा ठिय्या मारून बसून, ह्याच कथा बीजाची "कथा" करून दाखवाच. तुम्हाला ते जमेलच.
परत (आणि कधी कधी परत परत) लिहिणं, आणि मनापासून प्रयत्न महत्वाचे.
पुढल्या लेखनासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा.


Ajjuka
Thursday, July 12, 2007 - 3:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे बी, एक आणि पंधरा मधे काही फरक नाहीये रे. पण डोहाळे लागायला काही वेळ जावा लागतो मधे. १५-१६व्या दिवशी डोहाळे लागत असतील तर नक्कीच लग्नाआधीचे उद्योग आहेत.
बाकी परत तेच झालंय. नुसता पहिला ड्राफ्ट. नुसता विषय. कथा नाहीच.
अरे कुणी डॉक्टर्स आहेत का याला सगळी प्रोसेस नीट समजावून सांगा रे! इमेल मधे बरं का!.


Bee
Thursday, July 12, 2007 - 4:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कमाल आहे खरच.. इथे बरेच वाचक शकूच्या नंदा, जावा, सासू सारखे विचार करत आहे. म्हणून मी एक वाक्य लिहिले होते..

>>>>मुल जसजसे मोठे होत गेले तसतसे ते बापाच्या वणावर आणि चेहर्‍यावर जात गेले.

आता जर लग्नागोदरचे उद्योग असतील तर त्या मुलाचे दिसणे शकूच्या नवर्‍यासारखे कसे काय होइल. तुमच्या बघण्यात नसतील अशा केसेस पण अपवाद म्हणून तर स्विकाराल ना.. की नाही असे होऊ शकते.. एखादी स्त्रि लग्नानंतर आठ पंधरा दिवसात गरोदर राहू शकते. दिवस राहण्याची ती procedure मलाही माहिती आहे कुणाला त्यावर प्रबंध लिहिन्याची गरज नाहीये..

असो पुन्हा एकदा प्रतिक्रियांबद्दल आभार..



Sakhi_d
Thursday, July 12, 2007 - 4:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका आणि नंदिनीला अनुमोदन....

१५ दिवसात डोहाळे?? ए. ते. न.
जमल तर Dr Aniruddha Malpani, MD ह्यांची Infertility वर साईट आहे. जरा वाचा.....
www.DrMalpani.com

Mi_anu
Thursday, July 12, 2007 - 4:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी,
इथे प्रतिक्रिया देणार्‍यांचे ऑब्जेक्शन तिला कमी दिवसात गर्भ्जधारणा होण्याला नसून त्याला 'आठ्पंधरा दिवसातच तिला डोहाळे लागले' या तुम्ही वापरलेल्या शब्दरचनेला आहे. 'गर्भधारणा होणेदिवस जाणे' आणी 'डोहाळे लागणे' हे दोन वाक्यप्रचार एकमेकांशी सबन्धित असले तरी एकमेकांची रिप्लेसमेंट म्हणून वापरत नाहीत.
'डोहाळे लागणे'म्हणजेच काहीतरी खाण्याचीकरण्याची जास्त इच्छा होणे हा प्रकार दिवस गेल्यानंतर तीन महिन्याने होतो, लगेच होत नाही, म्हणून तुमच्या वाक्याला वरचे सर्व वाचक तांत्रिक ऑब्जेक्शन घेत आहेत. आपण 'आठपंधरा दिवसातच तिला दिवस गेले' असे काहीसे वाक्य लिहू शकता असे वाटते.
कथा बीज चांगले आहे पण काही लोचे जाणवतात. कथेच्या शेवटी तरातरा आपल्या घरात घुसणारी नायिका जर इतकी धीट आहे तर ती मुलात घरातून काधले जाणे मुकाट सहन का करते? आणि मुलाचे बापाशी साम्य सासरच्याना जाणवून तो आपल्याच कुटुंबाचा आहे हे ते मान्य करतात तेव्हाच घरी परत जाण्याचा हट्ट का धरत नाही?


Bee
Thursday, July 12, 2007 - 4:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनु, कथेतील नायिका ही जेंव्हा माहेरी जाते त्यावेळी ती कमकुवत असते. तिच्यात धीटपणा आलेला नसतो. नंतर वास्तव्याचे चटके जसे तिला आणखी आणखी बसत जातात तशी ती धीट होत जाते. खूपदा सहनशक्तीतून माणसाला शक्ती प्राप्त होते तशातला हा प्रकार आहे. वाढते वय, स्वानुभव ह्यातून मनुष्य परिपक़्व खंबीर होत जातो.

हीच कथा मी एखादा duplicate ID घेऊन लिहिली असती तर इथल्या वाचकांच्या प्रतिक्रिया खूप वेगळ्या असत्या.

जाऊ दे..


Ajjuka
Thursday, July 12, 2007 - 4:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

|आणि मुलाचे बापाशी साम्य सासरच्याना जाणवून तो आपल्याच कुटुंबाचा आहे हे ते मान्य करतात तेव्हाच घरी परत जाण्याचा हट्ट का धरत नाही?|
करेक्ट, आणि जेव्हा त्यांना कळते की हा त्यांचा कुलदीपकच (??) आहे तेव्हा खरंतर त्या स्वार्थी वृत्तीच्या लोकांनी तिला परत घरी नेणे हे संयुक्तिक वाटते. ते नेत नाहीत, ती जात नाही आणि मग अचानक एक जण धक्का मारतो म्हणून ती जाते... पटण्याच्या पलिकडचे आहे.

बी,
तिच्या नणदांसारखा विचार करण्यात कोणाचीही काही चूक नाही कारण प्रत्यक्ष कृतीनंतर गर्भधारणेची शंका यायलाच किमान १५ दिवस जावे लागतात. बर ही शंका फक्त त्या त्या व्यक्तीलाच येणार. घरातल्या(तेही सासरच्या नवीन घरातल्या) कोणालाही शंका यायला किमान महिना तरी जाणार. आणि त्यापुढे अनु म्हणाली तसं 'डोहाळे लागायला' २-३ महिने. आम्हा सगळ्यांच्या माहितीत लग्नानंतर पहिल्या वर्षात मूल झालेल्या आया आहेत. अगदी लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला मूल अडीच महिन्याचे असलेल्याही. त्या सगळ्याजणीही हेच सांगतील तुला.
जगभरात तरी हे असेच घडते. तुझ्या विदर्भात काही वेगळे चमत्कार होतात का?


Shyamli
Thursday, July 12, 2007 - 5:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हीच कथा मी एखादा duplicate ID घेऊन लिहिली असती तर इथल्या वाचकांच्या प्रतिक्रिया खूप वेगळ्या असत्या>> great thinking,
एखादा शेंडा-बुडखा नसलेल्या परिच्छेदाला कथा म्हणाच असं म्हणायच, बरं त्यातल्या तांत्रीक बाबि लोक समजावून सांगतायत तर हे का नाही होऊ शकत तेही पटवायची तयारी..... छान.
बाबारे अश्या गोष्टी फकत हिंदि सिनेमा,एकता कपुरच्या सिरियल(तेही आधिचा घोळ असेल तरच) आणि कल्पनेतच होऊ शकतात नाहीतर साक्षात वरुण देव किंवा सुर्याला उद्योग करावा लागेल परत एकदा.

तुझी चिकाटी वादातीत आहे.


Bee
Thursday, July 12, 2007 - 5:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझ्या विदर्भात काही वेगळे चमत्कार होतात का?>> चला विदर्भावर गाडी येऊन पोचली की आता. तर विदर्भातील बायका लग्नादोरच पाच सहा महिन्याचा pregnant होऊन सासरी गेलेल्या असतात. फ़क्त पुणे मुंबई वगैरे भागाकडच्याच मुली खूप वेळ घेतात... जरी तिकडे चवचाल प्रकरण अनेक घडतात तरी..


श्यामली पिन्क टाकल्याशिवाय रहावेलच नाही शेवटी.. तुझी पिंक टाकण्याची सवय बाकी वादातित आहे..





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators