Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 11, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » निज ज्येष्ठ » काव्यधारा » कविता » Archive through July 11, 2007 « Previous Next »

Paragkan
Tuesday, July 10, 2007 - 1:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

bairagi aani sarang: khaas re !

Mankya
Tuesday, July 10, 2007 - 9:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंगा ... कळत जायच ' आवडली रे मित्रा ! शेवटच कडव खासच !


दोलायमान

एका आधीच ठरलेल्या क्षणी
विरामावस्थेतून गतिकडे वाटचाल
सुरूवात स्वैर पण निरागस गतिप्रवेशाने
प्रत्येक हालचाल लक्ष वेधणारी कौतुकास्पद
अन बेसावध क्षणी जाणीवांच्या कक्षेत प्रवेश
यापुढे प्रत्येक दोलनाचा अर्थ नव्याने उमगतो
हालचाल तीच पण तीचे वेगवेगळे अर्थही नवीनच
हे नाविन्यही लगेच संपणारं .. क्षणभंगूर
चौकटीच्या जगात गतीचं सहर्ष ( ? ) स्वागत
ईथून पुढे प्रत्येक हेलकाव्याची फक्त पुनरावृत्ती
सगळ्या गोष्टीत तरीही एक निश्चित अनिश्चितितता
कधी एखादे चुंबकीय आकर्षण लांघून जाते वेगमर्यादा
तेही काही काळच देतं अनियमित हिंदोळ्यांचं सुख
शिल्लक राहतात फक्त त्याबरोबर अनुभवलेले आवेग
ईच्छा नसतानाही झुलायचं अपरीहर्यतेच्या प्रत्येक क्षणासोबत
मग आनंद झाल्यावर ती स्वच्छंद भरारी नाही
अन अतीव दुःखानंतर हवाहवासा पुर्णविरामही .. नाहीच
सगळी आवर्तनही अधुरीच .. पुर्णत्वाची प्रचितीही अपूर्ण
मात्र जाणारा अन येणारा प्रत्येक क्षण फक्त ' गतिशी " प्रामाणिक

एका आधीच ठरलेल्या क्षणी
दोलकाचा मग पून्हा प्रवास विरामावस्थेकडे
बहूतेक पुन्हा गतिकडील प्रवासासाठी !


माणिक !


Varunamrut
Tuesday, July 10, 2007 - 1:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार. मी वरुण. मला तुमच्यामध्ये सामिल करून घ्याल?

Varunamrut
Tuesday, July 10, 2007 - 1:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अपूर्णतेचा शाप तरीही
मी स्वप्न बघण टाळत नाही.
म्हणून श्रीमन्त महाली जातानाही
स्वप्न माझी गरीब झोपडी टाळत नाही


Bairagee
Tuesday, July 10, 2007 - 1:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणिक कविता फार आवडली. कवितेचा गाभा भावात्मकतेपेक्षा बोधात्मक आहे. दोलकाच्या प्रतीकाभोवती कवितेची आवर्तनशील प्रतिमासृष्टी सुसंगतपणे उद्भूत झाली आहे.

दाद, स्वाती धन्यवाद.



Swaatee_ambole
Tuesday, July 10, 2007 - 1:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणिक, ' दोलायमान' ने विचारात पाडलं. छानच लिहीलंयस.

Chinnu
Tuesday, July 10, 2007 - 2:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणिक, सहर्ष वरची कोपरखळी आवडली. बैरागी आणि स्वाती, दोघांना अनुमोदन.

Sarang23
Tuesday, July 10, 2007 - 2:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मित्रांनो...

माणिक... तुझी ही एक अप्रतीम रचना आहे! खूप आवडली ही शैली...
मला या सगळ्यातून कुठेतरी एक सुक्ष्म पण तिक्ष्ण अशी खळबळ जाणवली...
आणि दोलकाच्या आणि गतीच्या नात्यातील ती गती म्हणजे अभिसारीकेच्या चोरट्या पावलांतील पैंजणांची न होणारी छूम छूम वाटते...!
भाव तर उत्कट आहेतच पण मांडणी विशेष आवडली!

अनेक शुभेच्छा!!!


Ravisha
Tuesday, July 10, 2007 - 2:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वरुण, चांगली आहे सुरुवात keep it up

Mankya
Wednesday, July 11, 2007 - 1:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे बाप रेSSS .. खूप मोठे लोक प्रतिक्रिया देवून गेले की !
बैरागी, चिन्नू, सारंग,स्वाती ... मनःपुर्वक धन्यवाद मित्रांनो !
स्वाती .. ' विचारात पाडलं ' म्हणजे काही राहिलंय का कवितेत ? सूचना असतील तर सांग गं नक्की ( ईथे किंवा मेलवर कसही ) !

माणिक !


Swaatee_ambole
Wednesday, July 11, 2007 - 3:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छे छे. ' विचारात पाडलं' हे ' अंतर्मुख केलं' या अर्थी, प्रशंसा म्हणून म्हटलं होतं.

Devdattag
Wednesday, July 11, 2007 - 3:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणिक.. कविता आवडली रे..:-)

Mankya
Wednesday, July 11, 2007 - 3:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हुश्श्SS .. स्वाती, मला वाटलं घोटाळा झाला कि काय ( नेहमीप्रमाणे माझ्याकडून ) !
देवा .. Thanks re !!

माणिक !


Mayurlankeshwar
Wednesday, July 11, 2007 - 3:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहा! माणिक!! विषय तसा क्लिष्ट पण शैली सोपी... आवडली रे कविता!!

Jo_s
Wednesday, July 11, 2007 - 4:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्या बात है, माणीक तू फारच छन लिहिलयस, परवाची झुळूक आणी आता हे दोलायमान. सुंदर
सुधीर


Mayurlankeshwar
Wednesday, July 11, 2007 - 5:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज्जी...

आज्जी... मी काय लिहू तुझ्याबद्दल?
मी कसं काय आवरू माझं सडलेलं समकालीनत्व?
मी रमू कोणत्या भूतकाळाच्या पिंपळफांदीवर
जेव्हा जमलाय माझ्या घरादारावर
बोन्सायछाप सावल्यांचा व्यवहारी गोतावळा?
आज्जी... कशी कशी वाचू मी
तुझ्या हयातभर विखुरलेली सुरकुत्यांची लिपी?

आज्जी... मी काय लिहू तुझ्याबद्दल?
तुझ्या स्त्री-तत्वावर
इतक्याजणांनी पांढर्‍याचं काळं केलं...
मी कुठून शोधून आणू
कोरडावलेल्या पिढ्यांना शेवटपर्यंत मायेनं पोसणारे
तुझ्या गर्भातले नैसर्गिक चिवट रंग?
आज्जी... माझ्या अंगावर शिंतोडली
जाणारी ही डिजीटल असाह्यता...
मी कसे काय रेखाटू तुझ्या मातीचे चित्र?
जात्यावर भरडलेल्या तुझ्या व्यथांचे गात्र?

आज्जी... ह्या अपरिहार्य
वर्तमानी श्वासांची कात टाकून कसा काय पांघरू मी
माझ्या घराच्या कोनाड्यातून ठिबकणारा
तुझा एकाकी वास?
लिहून लिहून किती काय लिहू मी तुझ्याबद्दल आज्जे?
माझ्या पांढरपेशी फुफ्फुसाला वर्ज्य ठरवला गेलेला
तुझ्यातल्या जन्मदत्त करूणेचा घनघोर महारकालवा...
कसे काय घोंघावेल तुझ्या माणूसपणाचे महाकाव्य
पुसटसेही माझ्या नसानसांच्या गल्लीबोळातून??

हा माझ्या कानात गुंजतोय
कसला हायटेक कल्लोळ?
ही माझ्या पिढीची आम्हीच ओढवलेली मुस्कटदाबी,
आज्जी... माझ्या कातडीवर पसरलेलं
हे उच्चभ्रूपण सोलवटून मी कसे काय ऐकू
तुझ्या पान्हाळ ओवीओवींतलं दुधाळ संगीत??

-मयूर


Daad
Wednesday, July 11, 2007 - 5:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणिक, मयूर म्हणतोय तसा विषय क्लिष्ट पण हाताळणी छानय.
मयूर... speechless . अतिशय सुंदर.



Daad
Wednesday, July 11, 2007 - 5:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे वयंच म्हणे वेडं...
काल परवापर्यंत याच खिडकीत उभं राहून
नव्हता का बघितला पाऊस?
मग आजच कशी चिंब झाल्ये
आत असूनसुद्धा?

पाऊस....
नक्की कुठे पडतोय?

-शलाका


Shyamli
Wednesday, July 11, 2007 - 6:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्वा!!
नक्की कुठे पडतोय?????

माणिक, फारच मस्त, आवडली कविता!
मयूर....

Mankya
Wednesday, July 11, 2007 - 6:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद दोस्त्स ... धन्यवाद !

मयुरा .. .. .. .. !
दाद .. सुरेख, आवडली !

माणिक !





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators