Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 09, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » निज ज्येष्ठ » काव्यधारा » कविता » Archive through July 09, 2007 « Previous Next »

Mayurlankeshwar
Friday, July 06, 2007 - 4:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा! बैरागी... सुंदर कविता!!ग्रेसचा प्रभाव दिसतोय!(?)
झाड मस्तच रे... सहज सुंदर!!!

देवा....
'तू सखे ऐसे मुक्याने बोलणे सोड आता
अन गुलाबी पाकळ्यांना दाबणे सोड आता '
खल्लास!!



Desh_ks
Friday, July 06, 2007 - 4:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झाड,
तुमचं "कुंपण" वाचून काही वेगळ्या दिशेचं सहज सुचलेलं, सहजच लिहितो आहे.
"कुंपण तसं 'सुपरफिशियल', नाही का? झाडांची मुळं किती खोलवर रुजली त्यावर कुंपणाच्या अस्तित्वाची मिजास! निदान कुंपणाच्या दोन्ही बाजूंच्या झाडांना मिळणारी ओल तरी सामाईक असायला कुंपण काय आडकाठी करणार? पण कदाचित् तीच ओल घेऊन कुंपण फोफावतंही; कुणी सांगावं"!
-सतीश


Princess
Friday, July 06, 2007 - 4:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बैरागी, सुरेख लय आहे कवितेला. वाचुन मजा आली.
देवा, अहाहा... कुंतलाचा आणि शावकाचा शेर आवडला.
झाड, सुरेख.
झाडाने करावी कुंपणावर कविता, नवलच आहे ना :-)


Sarang23
Friday, July 06, 2007 - 5:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा मीटर ची लई ओढाताण केलीस गड्या...

माझ्याच भुजंगप्रयातातील गझलेची आठवण झाली...
फक्त रदीफ नाही काफिये पण योगायोगाने सेम आहेत...


मला पाहुनी टाळणे सोड आता
जिवाला असे जाळणे सोड आता


मी याच रदीफ वर दोन वेगवेगळ्या गझला लिहिल्या होत्या...

पण प्रत्येक द्विपंक्तींतला भाव छान आहे! आवडला...


Jo_s
Friday, July 06, 2007 - 6:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बैरागी छान आहे कवीता
झाडाचं कुंपण मस्तच ,
त्यावरची सतीश यांच लिखाणही छान आहे.
देवा वाचणे "सोड आता" असं म्हणता येत नाही छानच लिहीलय हे


Bairagee
Friday, July 06, 2007 - 6:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


सर्वांचा आभारी आहे.
मयूर, ग्रेसचा प्रभाव वाटू शकतो.(बाय द वे तुझी 'कविता' फार आवडली.) कारण ह्या लावणीच्या वृत्तात (कळीदार कपूरी पान आठवत असेलच.)त्यांनी बऱ्याच रचना (वाऱ्याने हलते रान) केल्या आहेत. पण तसे काही नाही. अर्थात नकळत होणाऱ्या प्रभावाला कुणी टाळू शकत नाही. कुणाला क्वचित इंदिराबाईंचाही प्रभाव दिसू शकतो.
एका उत्तररात्री घराबाहेर पाऊस पडत असता बंद अंधाऱ्या खोलीत मानसगोचर आणि संवेदनागोचर पडसाद उमटले. त्या दोन्ही पडसादांमधील सेतू, 'कॉमन ग्राउंड' मधली ओळ आहे.
वाचकांनी लयीसोबत कवितेच्या जन्मस्थानाचा, ह्या 'कॉमन ग्राउंड'चा विचार करून कविता वाचल्यास आनंद होईल.
सारंग,
'टाळणे आणि जाळणे' वरून म. भा. चव्हाण ह्यांच्या मला अतिशय आवडणाऱ्या ओळी आठवल्या--
तुला मी टाळतो आहे तुझ्यामाझ्या भल्यासाठी
जिवाला जाळतो आहे तुझ्यामाझ्या भल्यासाठी


Vaibhav_joshi
Friday, July 06, 2007 - 7:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बैरागी अप्रतिम कविता .
लयीपेक्षा जमीनच ( common ground ) जास्त आवडली खरंतर . अर्थात लयीमुळे आणखी छान झाली आहे हे सांगणे न लगे .
म . भांच्या या मतल्याची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद .
" स्वरांची थांबली दिंडी तुझ्या दारी तुझ्यासाठी "
पण आठवलं . मज़ा आ गया .

मयूर कविता सहीच
मेघाची पाऊस पण आवडली .
बर्‍याच दिवसांनी इकडे आल्याने खजिना मिळालाय .
:-)
मृद्गंधा welcome back
:-)

झाडा , वाचायची राहून गेली . मस्त आहे . नेहेमीप्रमाणेच कंसातल्या वाक्यासकट .



Sanghamitra
Friday, July 06, 2007 - 9:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बैरागी, बाहेरी संततधार.. आत बैराग. वा!
तुम्ही कॉमन ग्राऊंड म्हणालात ते अगदी मान्य. मला स्वतःलाही याच कॉमन ग्राऊंडवर दोन कविता सुचल्या होत्या. म्हणजे ते साधर्म्य लक्षात येऊनही टाळणे (अन् जिवाला जाळणे) अवघडच तसे कवींसाठी. नाही का?
देवा सगळीच कविता (की गज़ल?) छान आहे. परिणामकारक.
झाडा तुझी कविता नेहमीप्रमाणेच interesting. डोळ्यांपुढे येणारी.


Bairagee
Friday, July 06, 2007 - 9:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संघमित्रा, 'कॉमन ग्राउंड'वरील त्या कविता वानगीदाखल दिल्यास आनंद होईल.

म्हणजे ते साधर्म्य लक्षात येऊनही टाळणे (अन् जिवाला जाळणे) अवघडच तसे कवींसाठी. नाही का?
हो म्हणण्याआधी वरील वाक्य समजावून सांगाल काय. :-)

साधर्म्य असणे वेगळी गोष्ट आहे. ते टाळायला हवे की नाही हा वेगळा मुद्दा आहे. साधर्म्य असले तरी सृजनाला स्वत:चा रंग लागायला हवा. मी इथे 'कॉमन ग्राउंड' चा उल्लेख मांडणीच्या दृष्टीने, तंत्रविचार म्हणून केला आहे. मी काही वेगळे लिहिले केले आहे, असा माझा दावा नाही.

वैभव, धन्यवाद.


Sarang23
Friday, July 06, 2007 - 10:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा!!! बैरागी म भांचा शेर खासच आवडला!!! पुर्ण गझल वाचायला मिळाली तर अजून मजा येईल... मेल केली तरी चालेल...

Devdattag
Friday, July 06, 2007 - 10:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सन्मी.. मला वाटतं ही गझल नाहिये.. प्रत्येक शेराचा वेगळा असा अर्थ लागत नाही.. लागला तरी तो पूर्ण वाटत नाही..:-)
सारंग.. पूर्णपणे सहमत तुझ्याशी


Sarang23
Friday, July 06, 2007 - 3:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कळत जायचं

स्वतःच स्वतःला छळत जायचं
खोल आरपार जळत जायचं
स्वप्नांमागून वेड्यासारखं सैरावैरा पळत जायचं
पुन्हा नव्याने स्वतःच स्वतःला कळत जायचं

सगळ्याच जखमा भरतात
खुणाच तेवढ्या मागे उरतात
कोरून कोरून मग खपल्यांनाच छळत जायचं
पुन्हा नव्याने स्वतःच स्वतःला कळत जायचं

सगळ्यांनाच फुलावं लागतं
निर्माल्यागत मरगळावं लागतं
आपण मात्र सुगंधागत आठवणींतून दर्वळत जायचं
पुन्हा नव्याने स्वतःच स्वतःला कळत जायचं

माणुसकी हा धडाच असतो फक्त
माणूस म्हणजे हव्यासाचा भक्त
परक्यांसाठी तरीही आतून तळमळत जायचं
पुन्हा नव्याने स्वतःच स्वतःला कळत जायचं

सारंग


Chinnu
Friday, July 06, 2007 - 3:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह सारंग!
स्वत:च स्वत:ला कळत जायचं, सहीच. कोरून खपल्यांना छळणे तेव्हढे पटले नाही. बाकी सुंदर!


Mrudgandha6
Saturday, July 07, 2007 - 9:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्स वैभव,चिनु,आणि सर्वांना

सारंग,
सगळ्यांनाच फुलावं लागतं
निर्माल्यागत मरगळावं लागतं
आपण मात्र सुगंधागत आठवणींतून दर्वळत जायचं
क्या बात है!!



Meghdhara
Saturday, July 07, 2007 - 11:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्वा सारंग! पणा या कवितेत एक गज़ल दिसतेय. ??

मेघा


Manogat
Monday, July 09, 2007 - 6:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग,
खुपच छान लीहीलीआहेस कविता.


Daad
Monday, July 09, 2007 - 7:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काहीतरी गोंधळ (म्हणजे माझ्याच हातून असणार, म्हणा) झालाय. माझी पोस्ट वर दिसत नाहीये काल पोस्टलेली.
बैरागी, बहुत बहुत आवडली. वैभव म्हणतोय तशी लयीत पण संयमाने ठुमकलीये. बहोत खूब! (ही कविता वाचल्यावर 'समईच्या शुभ्र कळ्या उमलवून लवते' या गाण्याने पाठ धरलीये. म्हणजे जवळ जवळ तीन दिवस आणि अजून चालू आहे डोक्यात..... आत्ता परत वाचली कविता म्हणजे परत सुरू....)
झाड, कुंपण सुरेख!
देवा, सोड आता झकास.
सारंग, कळत जायच? पुन्हा नव्याने.... हे आवडलं. कळतं पण वळत नाही म्हणतात ते याचसाठी.... पुन्हा नव्याने हेच खरं.




Swaatee_ambole
Monday, July 09, 2007 - 1:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बैरागी, ' बैराग' फार सुंदर आहे.

Vaibhav_joshi
Monday, July 09, 2007 - 7:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग

माणुसकी हा धडाच असतो फक्त
माणूस म्हणजे हव्यासाचा भक्त
परक्यांसाठी तरीही आतून तळमळत जायचं

अच्छा है . बडा अच्छा खयाल है


Menikhil
Monday, July 09, 2007 - 8:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लक्श मोत्यान्ची पखरण....तुझी एक आठवण
शुभ्र फुलान्ची ओन्जळ....विट्ठल चरणी अर्पण

रक्तचन्दनाचे लेप....विरान्गना गोन्दण
ओसण्डुन वाहणारे दवबिन्दू....पापण्यातली साठवण

दुलईत गुर्फटून बसलेली....भोकाडीची आठवण
जमदग्निची चाहुल....भाण्ड्यान्ची आपटण

आईच्या पदराचं हातपुसणं.... आनन्दाची शिम्पडण
अन तिला भण्डावुन सोडणारी.... असन्ख्य प्रश्नान्ची गोफण

पण ती सोडुन गेल्यावर.... निराशेचं कोन्दण
जीवनात प्रतिदिनी.... ह्या अश्याच नवरन्गान्ची उधळण





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators