Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 06, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » निज ज्येष्ठ » काव्यधारा » कविता » Archive through July 06, 2007 « Previous Next »

Shyamli
Wednesday, July 04, 2007 - 1:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असा पडावा पाऊस
जशी सखी जीवा भावा
गुपिताच्या कानगोष्टी
दिलखुलास कराव्या >>आवडली ग कविता, इथे तर पडतच नाही पाउस आणि पडला तर एकदम वादळ घेउन येतो :-(


Meghdhara
Wednesday, July 04, 2007 - 2:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली भा पो गं.

जगभरात रुतू बदलतायत तर.. तुझाकडेही धो धो पाऊस पडेल..आणि इथेही.. :-)

मेघा


Mankya
Thursday, July 05, 2007 - 1:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेघा .. मस्तच गं !
असा पडावा पाऊस
फक्त पाऊस पाऊस
रितं होऊन धारात
कण कण व्यक्त व्हावा.. क्या बात !
आवडली कविता !

माणिक !


Daad
Thursday, July 05, 2007 - 6:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओय होय मेघा, कसली लय आहे.....
असा पडावा पाऊस!
'चिंब चिंब भिजवून
भरे ओढ काठोकाठ...'
आणि 'सैरभरत्या स्वप्नांनी
रसरसावे गर्भात....'
आणि 'रितं होऊन धारात
कण कण व्यक्त व्हावा..'
आणि.....
मजा आया! जियो!



Lopamudraa
Thursday, July 05, 2007 - 7:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असा पडावा पाऊस
जशी अखंड कविता
जराजरासा निवावा
उरी पेटला वणवा
>>.. आ हा हा.. काय छान लिहिलय..

Mrudgandha6
Thursday, July 05, 2007 - 9:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


मुसळधार

असा मुसळधार पाऊस
गेल्या कित्येक वर्षांत
मी नव्हताच पाहिलेला..
जणू आभाळ फ़ाटल्यागत
धो धो वाहिलेला..
मला याचं काहीच कळत नाही..
उध्वस्त मनांचं याला
काहीच कसं वाटत नाही?
एव्ह्ढं दु:ख पाहून याचं
काळीज कसं फ़ाटत नाही..?
की काळीज फ़ाटतं म्हणूनच
त्याच्या डोळ्यांतलं पाणी आटत नाही..??


Mankya
Thursday, July 05, 2007 - 9:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृ .... की काळीज फ़ाटतं म्हणूनच
त्याच्या डोळ्यांतलं पाणी आटत नाही..?? ... आह !
हळव केलस तू तर !

माणिक !


Princess
Thursday, July 05, 2007 - 9:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेघधारा, अहा मस्त कविता...तुझ्या नावातच पाऊस आहे, दिल्लीला पावसाची काय गरज, तूच जरा बाहेर फेरफटका मारुन येत जा :-)
मृ, काळीज कसे फाटत नाही... जबरदस्त


Mrudgandha6
Thursday, July 05, 2007 - 10:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


धन्स.. princess , माणिक,:-)
मेघा.. सुरेख आहे पाऊस




Bairagee
Thursday, July 05, 2007 - 10:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


वाजला किती पाऊस |
बदलता कूस |
जरा डोळ्यांनी ||

मधुनीच विजेचा लोळ |
स्मरणकल्लोळ |
रोमरोमांत ||

अंगणी उभा प्राजक्त |
गंधआरक्त |
देठ श्वासांचे ||

पाण्यात पडावे फूल |
तशी चाहूल |
पापण्यांना ये||

थेंबांत तेवतो दिवा |
तशा जाणिवा|
जाणिवांपैल||

बाहेरी संततधार |
गात मल्हार |
आत बैराग ||
....................

बैरागी



Mrudgandha6
Thursday, July 05, 2007 - 10:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा.. बैरागी

वाजला किती पाऊस |
बदलता कूस |
जरा डोळ्यांनी || ..

कवितेची ओळन ओळ सुरेख आहे





Hems
Thursday, July 05, 2007 - 10:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेघा, कविता छान .. सुरुवातीचं कडवं खूप आवडलं.

बैरागी, खास! अतिशय सुरेख उतरलीय कविता!


Zaad
Thursday, July 05, 2007 - 11:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुंपण

तुझ्या कुंपणाला काटे नाहीत.
एकदा आपण बोलत थांबलेलो,
बाहेर मी,
मध्ये कुंपण,
पलिकडे तू.
बोलता बोलता क्षणभर
मी विसरूनच गेलो
मध्ये कुंपण असल्याचं.
माझं मलाच समजलं म्हणून बरं...
'कुंपणाला काटे असलेच पाहिजेत गं...'
असं तुला बजावून निघालो तेव्हा
बराच वेळ मनातून हा प्रश्न
झटकून टाकायचा प्रयत्न करीत होतो,
(मुळात कुंपण हवंच कशाला?)


Meghdhara
Thursday, July 05, 2007 - 12:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्रुद.. आपण आपलं असं समाधान करायचं.. नी त्याला संवेदनशीलता देऊ करायची.

बैरागी श्रीमंत! पाण्यात पडावे फूल.. व्वा सुंदरच.

मेघा


Sarang23
Thursday, July 05, 2007 - 1:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा! एक से एक कविता! मजा आली...

Chinnu
Thursday, July 05, 2007 - 2:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बैरागी मस्त वाटलं वाचून. झाडा प्रश्न रास्त आहे! MG, welcome back!

Chinnu
Thursday, July 05, 2007 - 2:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेघधारा.. रिती झाले मी तुझ्या धारांत, तू व्यक्त झालीस कवितेत, मी राहून गेले तशीच! :-)
कविता आवडली.


Devdattag
Friday, July 06, 2007 - 3:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भई वाह.. क्या बात है.. सहीच..:-)

सोड आता..
तू उगीच्या कारणाने लाजणे सोड आता
अन तुझ्या त्या लाजण्याने जाळणे सोड आता

व्याध बघ घायाळ झाला पाहूनी शावका ह्या
तू मृगाच्या पावलाने चालणे सोड आता

रोज मी समजावितोही भाबड्या ह्या मनाला
'रे मना तू कुंतला त्या गुंतणे सोड आता'

तू सखे ऐसे मुक्याने बोलणे सोड आता
अन गुलाबी पाकळ्यांना दाबणे सोड आता

बोललो काही चुकीचे? पण मला बोलली ती
'हे असे वेड्याप्रमाणे वागणे सोड आता'
-देवदत्त

btw सोड आता हा रदीफ, वाचल्यासारखा आठवतोय.. बहुदा वैभवचीच एक गज़ल अस्सवि


Mankya
Friday, July 06, 2007 - 4:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बैरागी .. पाण्यात पडावे फूल .. सुंSSSSSदर !
देवा .. मुक्याने ( श्लेष अपेक्षित आहे का ईथे तूला ? ) ... क्या बात है !

माणिक !


Desh_ks
Friday, July 06, 2007 - 4:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बैरागी,
लय छान आहे तुमच्या कवितेला.

"बाहेरी संततधार |
गात मल्हार |
आत बैराग ||"

वा! खूप छान. विशेषच आवडलं हे कडवं.

-सतीश





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators