|
Daad
| |
| Thursday, July 05, 2007 - 3:18 am: |
| 
|
आईंचा जरा जोरात कण्हण्याचा आवाज ऐकून मिता भानावर आली, सजग झाली. हलकेच हाक मारून तिने रवीला उठवलं आणि जॉनला पेज केलं. काही मिनिटांतच जॉन हजर झाले. चट्-चट आईंच्या vital signs बघितल्या. आईंनी एव्हाना पूर्णपणे डोळे उघडले होते. रवी मिताचा हात घट्ट धरून नुसताच भेदरून उभा होता. आपल्या मृदू, हलक्या स्वरात जॉननी आईंना हाका मारल्या अन मग समजून घेऊन रवीला पुढे केला. एक हाताने जॉनचा एक हात घट्ट धरत रवीने आई ला हाक मारली, 'आई, आई... कसं वाटतय तुला?' आईंनी सैरभैर होऊन खोलीभर नजर फिरवली. उभ्या असलेल्या मिता, नर्सेस, डॉ. जोन आणि मग रवीवर स्थिर केली. त्यांच्या हातावर हात ठेवत त्याने परत हाक मारली, 'आई, मला ओळखलस? मी.... रवी, तुझा... रवी' रवीचा हलणारा, रुद्ध होत चाललेला स्वर ऐकून खोलीतल्या प्रत्येकाचे डोळे भरले. आईंच्या डोळ्यात ओळख दिसेना. त्या परत खोलीभर भिरभिरल्या. मिता पुढे झाली पण हाक मारण्याआधीच तिला त्यांची अनोळखी नजर भेटली. एक खोल नि:श्वास टाकून रवी वळला. जॉननी नर्सेसना सुचना दिल्या आणि त्याला भेटण्यासाठी ते त्वरेने बाहेर आले. त्यांना बघताच रवी लहान मुलासारखा त्यांच्या मिठीत कोसळून रडू लागला. 'I am orphan once again, john, ...orphan once again....' . इथे खोलीत आईंबरोबर थांबलेल्या मिताल नुसतेच त्याचे घुसमटलेले हुंदके ऐकू येत होते... तिच्याही डोळ्यांन धारा लागल्या आणि आई या सगळ्या प्रकाराकडे प्रश्नांकित नजरेने बघत होत्या. जॉन त्याला समजावत होते की sometimes brain revives memory connections later. its rare but can happen . रवी स्वत्: ब्रेन सर्जन होता. ह्या आशेचं statistics त्याला पूर्णत: ठाऊक होतं. अत्यंत निराश होऊन तो खोलीबाहेरच्या कोचावर बसून राहिला. त्याच्याशी बोलायला आलेल्या मितालाही 'हं, हू...' यापलिकडे response दिला नाही, त्याने. मिताला परत खोलीत, आईंकडे जाणं भाग होतं. थोड्या वेळाने बुधाजी, कोशी आणि नातवंडांना घेऊन मिताचे आई-पप्पा आले. आईंचा जरा डोळा लागला होता. आई-पप्पांशी आणि रवीशी बोलत मिताही बाहेरच थांबली. खोलीकडे बोट दाखवत आज्जी चा धोशा लावलेल्या वाणीला कडेवर घेऊन बुधाजी आत शिरला. त्याच्या खांद्यावरच्या वाणीला बघून मात्र आईंनी जोरात हाक मारली.... "रवी.... ये बाळा..... आईकडे ये ssss ." झेप घेऊन वाणी आज्जीच्या बाजूला जाऊन बसलीही. "ही बाबा नाही... ही वाणी आहे" असं आज्जीला समजावून देऊन तिने त्यांचा सलाईनची सुई टोचलेला पालथा हात उलथा केलाही. रवी आईंची हाक ऐकून धावत आत आला आणि दारातच चित्र होऊन थांबला.... आपल्याकडे चकित होऊन पहाणार्या आज्जीच्या हातावर वाणीचं 'इथे इथे नाच रे मोरा.... ' सुरू झालं होतं. तिच्या जोरदार 'भुर्र sss उडून जा....' ला तिचा तोल जाऊन ती पडणार असं वाटत असतानाच आई त्याच्याकडे बघून म्हणाल्या, 'रवी, अरे, आवर रे हिला... मला नाही झेपत, पडेल रे पोर, मिता कुठंय?' आईंचा आवाज ऐकून सगळेच आत आले. मिता सादळलेल्या पापण्या पुन्हा पुन्हा फडफडवीत पहात राहिली.... रवी वाणीला उचलून घेऊन नाचत सुटला होता खोलीभर, तिच्याबरोबर "भुर्र sss ..." करीत...... समाप्त
|
Sakhi_d
| |
| Thursday, July 05, 2007 - 3:45 am: |
| 
|
दाद, खरच शब्दच नाहित...... खुप खुप सुरेख.... तुझ्या पुढच्या लिखणासाठी शुभेच्छा...
|
Bhagya
| |
| Thursday, July 05, 2007 - 3:57 am: |
| 
|
दाद, सुंदर. लवकर पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद. अश्या मोठ्या posts लिहून टाकल्या की वाचायला पण छान वाटते.
|
Deemdu
| |
| Thursday, July 05, 2007 - 4:43 am: |
| 
|
.. .. .. .. ..
|
Princess
| |
| Thursday, July 05, 2007 - 4:47 am: |
| 
|
दाद, छान... अगदी मस्त लिहिलस. शेवट तर एकदम खास केलास.
|
दाद सुरेख उतरलीय गोष्ट. flow फार छान आहे कथेचा.
|
Manjud
| |
| Thursday, July 05, 2007 - 5:36 am: |
| 
|
दाद, अप्रतिम सुंदर, भाग्याशी सहमत.... बहुतेक काल तु एका बैठकीत पूर्ण केलीस गोष्त.....
|
Monakshi
| |
| Thursday, July 05, 2007 - 5:40 am: |
| 
|
दाद, खूपच छान, शेवटसुध्दा अगदी छान केलास.
|
Shyamli
| |
| Thursday, July 05, 2007 - 5:54 am: |
| 
|
काही काही नाती इतक्या वर्षांचा भिन्न वाटांवरचा प्रवास, भोगलेल्या, न भोगलेल्याचे चटके, सगळं सगळं ओलांडून कशी पल्याड उभी रहातात, एकमेकांसाठी, एकमेकांना संभाळत >>>> !!!!!!!!!!!!!!! speechless
|
Mankya
| |
| Thursday, July 05, 2007 - 9:10 am: |
| 
|
दाद ... मिता पुढे झाली पण हाक मारण्याआधीच तिला त्यांची अनोळखी नजर भेटली ... ... ... .. ! खरंय श्यामली ... आपण पण speechless!! माणिक !
|
Manogat
| |
| Thursday, July 05, 2007 - 9:13 am: |
| 
|
दाद, काय दाद द्यावी हेच सुचत नहि रे...वचतांना डोळे पाणावले..काही काही प्रसंगांना तर भरुन आल.. outstanding... grrrrrrrrrt
|
सुंदर मस्त दाद अशीच लिहित रहा.
|
Psg
| |
| Thursday, July 05, 2007 - 10:44 am: |
| 
|
किती 'गोड' शेवट! कथा कशी असेल याचा अंदाज आला होता, पण तुझे शब्द कमाल आहेत दाद! अप्रतिम वापरतेस!
|
Sush
| |
| Thursday, July 05, 2007 - 10:52 am: |
| 
|
अप्रतिम नेहेमिप्रमाणे. रविच्या मनातिल उलघाल छान उतरवलि आहे. मिताचे पात्रही सुन्दर. आइचे पात्र तर उत्क्रुष्ठ. खरच काहि लोकाना मनातिल विचार सुन्दर रित्या शब्दात उतरवता येतात. दैवी देणगीच म्हणा हवतर. दाद आपल्यालाहि अशीच देणगी लाभली आहे. ही कला उत्तरोत्तर वाढत जावो. (आणि आम्हाला अशाच सुन्दर कथा वाचायला मिळोत)
|
Jaijuee
| |
| Thursday, July 05, 2007 - 11:36 am: |
| 
|
नेहमीप्रमाणेच जबरदस्त! "सांडून गेलेल्या अत्तराला पुन्हा कुपीत भरणे" किती हवेहवेसे पण किती फोलही! सुन्दर वाक्यप्रयोग!
|
Itgirl
| |
| Thursday, July 05, 2007 - 11:59 am: |
| 
|
दाद, पुन्हा एकदा अभिनन्दन!! किति सुरेख आणि मनाला भिडणारे लिहिले आहे... तुमच्या सल्ल्यानुसार मी देवनागरी मधून लिहायचा प्रयत्न केला आहे!
|
Supermom
| |
| Thursday, July 05, 2007 - 12:16 pm: |
| 
|
दाद, तुझी स्तुती करायला शब्दच सापडत नाहीत ग. मनाला हेलावून टाकणारं लिहितेस तू.
|
Madhurag
| |
| Thursday, July 05, 2007 - 12:37 pm: |
| 
|
दाद, too good खरच शब्दच सापडत नाहियेत प्रतिक्रियेसाठी. grrrrrr8
|
Chinnu
| |
| Thursday, July 05, 2007 - 2:20 pm: |
| 
|
शलाका, तुझी ही कथा मला नक्श.. पेक्षा फार्फार आवडली.
|
अप्रतिम कथा दाद, मिता आणि आई ही पात्र न वाटता खर्याच वाटल्या. just out of curiosity ही कथा वास्तवावर बेतलि आहेस का?
|
|
|