Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 04, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » निज ज्येष्ठ » काव्यधारा » कविता » Archive through July 04, 2007 « Previous Next »

Mayurlankeshwar
Friday, June 29, 2007 - 4:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कवितेशिवाय...

आपण 'आपण' नसावे,
शाई 'शाई' नसावी,
शब्द 'शब्द' नसावेत...
कागद 'कागद' असलाच तरी
नसाव्यात सरळ रेषा सक्तीच्या
आणि पुसटश्याही समासाचे
दडपण नसावे
आपल्या आभाळ-माखल्या
निरागस कोरेपणावर...

पायांखालच्या मातीचा
श्वासांना स्पर्श होताच
विरघळून जायलाच हव्यात
डोळ्यांवर लादलेल्या
आपल्याच 'मी'पणाच्या धूसर पापण्या...
हे असं जगण्यातलं नितळ आणि
अगदी पहिलंवहिलं 'माणूस'पण
एकदातरी काळजाच्या त्वचेवर पांघरून
आपण उगवून यायला हवे
मातीतून... आभाळून..!!

कोर्‍या कागदावर मग
उमटो अथवा न उमटो एखादी कविता...
पण एकदातरी स्वत:ला जगवून घ्यावे
कवितेशिवाय कविता होऊन...!

-मयूर




Sanghamitra
Friday, June 29, 2007 - 4:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


वैभव सीझन परिणामकारक.
सुमॉ तोडलंस गं बाई! दोन्ही कविता उत्तम. :-)
मयूर कल्पना आणि भाषा दोन्ही दमदार आहेत! व्हायला हवं खरं असं.


Desh_ks
Friday, June 29, 2007 - 5:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव,
"सीझन" आवडली.
-सतीश


Psg
Friday, June 29, 2007 - 7:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा सुमॉ. मस्त. कवितेला नाव दे

मयूर ह्म्म!


Desh_ks
Friday, June 29, 2007 - 11:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

यंदाही; 'नेमेचि येतो' म्हणतात तो हाच का, असं वाटावं असा वेड्यासारखा पाऊस झाला गेले काही दिवस. अशा पावसातही पहाटे पहाटे एक कोकीळ ओरडताना ऐकला आणि बर्‍याच वर्षांपूर्वी नेमक्या याच प्रसंगावर लिहिलेली कविता आठवली. ती पुढे देत आहे…

“वेडा कोकीळ”

बरसून गेलं आभाळातून घनघोर अनावर पाणी,
तरीही खुळा गातोच आहे, तीच जुनी वसंताची गाणी

"बदललाय् ऋतू", सभोती सांगताहेत सार्‍या खुणा,
याच्या मनात अजूनही ऋतुराज कालचा पाहुणा,
कसं याला भान यावं, कसं जागं करावं कुणी?
हा आपला गातोच आहे, तीच जुनी वसंताची गाणी

भिजून भिजून गेली सारी कोवळिक नव्या बहराची,
दमून भागून खाली झुकली ताजी पानं फुलं कालची,
याचे पंख मात्र नाही भिजवू शकलं तेच पाणी,
हा खुळा गातोच आहे, तीच जुनी वसंताची गाणी

उद्या येईल शिशिर, जातील सुकून गळून ही कोवळी पानं,
तेव्हां तरी कळेल का याला वसंताचं निघून जाणं?
तेव्हां तरी कोमेजेल का याची बेभान आनंदी वाणी?
की हा असा गातच राहणार, तीच जुनी वसंताची गाणी?

वनात येतात जातात ऋतू,
म्हणून का कुठे मनातलेही बदलतात?
कोसळत्या पावसातही म्हणूनच कोकीळ
वसंताची गाणी गातात
विसरून आजचा पाऊस,
घेऊन काही उद्याच्या आशा,
काही कालच्या आठवणी,
हा असाच गात राहणार
सदा सतेज वसंताची गाणी

-सतीश


Zelam
Friday, June 29, 2007 - 12:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा सतीश, क्या बात है!

Priyasathi
Friday, June 29, 2007 - 12:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hisjja khdhuUNvbJDKDSD
GUGDBB BU NFHA hf jhbf hfa sdhb f fhsa

Swaatee_ambole
Friday, June 29, 2007 - 1:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा मयूर! सुंदर आहे ' कवितेशिवाय'.

Sarang23
Friday, June 29, 2007 - 2:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा मयूर.. आवडली रे कवितेशिवाय कविता!

Supermom
Friday, June 29, 2007 - 2:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्यांचे आभार. कविता आवडल्या म्हणून बरं वाटलं.
खरंतर इथे इतके दमदार लिहिणारे आहेत की कवितांच्या बी बी वर सहसा मी फ़क्त वाचनाचा आनंद घ्यायला येते. आपली धाव कथांपर्यंतच ठीक आहे, कविता हा आपल्या लेखनाचा प्रांतच नाही असं नेहेमीच मला वाटत आलंय.
पण आता यापुढे निदान प्रयत्न करीन.


Princess
Friday, June 29, 2007 - 3:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुमॉ, मला दुसरी कविता खुप आवडली.
मयुर, कवितेशिवाय सुरेख
सतिशजी, वेडा कोकिळ खुप खुप आवडली.


Shyamli
Sunday, July 01, 2007 - 6:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एवढीच तिची ओळख
एवढीच तिची जात. >>>>सुमॉ, हि कविता आवडली ! इथेहि लिहित जा ग :-)

मयूर, नसाव्यात सरळ रेषा सक्तीच्या
आणि पुसटश्याही समासाचे
दडपण नसावे
आपल्या आभाळ-माखल्या
निरागस कोरेपणावर... >>> आवडलं

Lopamudraa
Sunday, July 01, 2007 - 1:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुपरमाॅम दुसरी कविता खुप खुप छाने.. मस्त अगदी!!!
मयुर कविते शिवाय छाने!!!


Princess
Monday, July 02, 2007 - 5:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


अवनीची कहाणी


हो तसा उशीरच झालाय यावेळीही,
तुझ्या सारखीच अधीर झालेय मिलना साठी मीही...
प्राण डोळ्यात आलेय, यावेळी तरी लवकर ये जरा...
तुझ्या मिलनाची मात्र विचित्रच झालीये तर्‍हा...
आजकाल तु येतोस तोच रोरावत अन घोंगावत
फाडुन टाकतो माझ्या अंगावर असेल नसेल ते सगळे काही
घुसळतो, कुस्करतो... आणि जातो निघुनही...
राजा असा का वेडा झालयेस,
शरिरासाठी एवढा का हपापलायेस...
बाप आहेस तु आणि लेकरांच्या जीवावर उठलायेस...
तुला आठवतं...
पूर्वी तू कसा हळुवार यायचास, मला मिठीत घ्यायचास
माझ्यासाठी हिरवी साडी अन
लेकरांसाठी मखमाली झाडी देउन जायचास...
राजा त्या हळुवार प्रणयाची शपथ आहे तुला...
गाउ दे आनंदाने पुन्हा लेकराना "आला पाउस आला"

प्रिन्सेस




Princess
Monday, July 02, 2007 - 5:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वरुणाचे मनोगत

ऐकुन अवनीची कहाणी
वरुणाच्या डोळ्यात दाटले पाणी
पण तो पुन्हा रोरावला, पुन्हा घोंगावला
अन जोरात कडाडला
हो हो झालोय मी विकृत
बायकोवर बलात्कार करतो अन
लेकरांचा जीव घेतो
पण एकदातरी सांग राणी
मला शांत करण्यासाठी काय केलय लेकरानी...
ईंद्राकडे आठ महिने राबतो,
तुमच्या साठी सुखाचा पाऊस मागुन आणतो
सगळे काही देउनही पोरे नाही समाधानी
मीच दिलेले वृक्ष तोडतात, करतात हानी
आता मात्र लेकराना सांग
असेच वागलात तर वाढतच जाणार बापाचा राग.

एवढे बोलुन वरुणराजा ढासळला
त्या रात्री पुन्हा कोसळ कोसळ कोसळला...

प्रिन्सेस


Mrudgandha6
Tuesday, July 03, 2007 - 2:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ahaaaaaaaaaaahaaaaaaaaaaaaaa apratim aahet kavitaa

khup chhaan vaaTale ithe yeun baryaach diwasaani.gadabadit aahe.nivaant bhetuch

Daad
Tuesday, July 03, 2007 - 10:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मयूर, छानच आहे, 'कवितेशिवाय'.
'कागद 'कागद' असलाच तरी.....'
अतिशय अतिशय आवडली.

सतीश, तुझा वेडा कोकीळ पटला अगदी.... दिसतातही अचानक असे आजूबाजूला!




Princess
Wednesday, July 04, 2007 - 4:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृ, welcome back बेडीत अडकल्याचे कळले, खरे का? अभिनंदन :-). भेटत राहा.

Manogat
Wednesday, July 04, 2007 - 7:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभाळात घेतली झेप
सारुन दुर नात्यांना
एकांतात आज ही मन रडत
आठवुन त्यांना

प्रश्ननांचे काहुर
मलाच सतावतात
मिळवल भरपुर काही हरवुन
मग मलाच सांगतात

दोळ्याच्या कडेला भावनांचे पुर थांबवत
का जात आहे पुढे
का नाही परतत पुन्हा त्या
जुन्या वाटांन कडे

एकट समोरी जाव
अस जग नाही
आपल्यांना सोडुन
दुरवर कुठे घर मीळत नाहि
दुरवर कुठे घर मीळत नाहि


Meghdhara
Wednesday, July 04, 2007 - 1:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


मयूर हं!
तुझी मेल वाचता आली नाही. सेव केलेय आता बघते. इतक्यातच नागपूर पाव्हणे यातून मोकळी झालेय.

तिथे आपल्या मुंबईत पावसाने पाणी झालं असलं ना तरी इथे दिल्लीत ही अवस्था आहे..

असा पडावा पाऊस..

असा पडावा पाऊस
जशी अखंड कविता
जराजरासा निवावा
उरी पेटला वणवा

असा पडावा पाऊस
जशी मैतराची भेट
चिंब चिंब भिजवून
भरे ओढ काठोकाठ

असा पडावा पाऊस
जशी सखी जीवा भावा
गुपिताच्या कानगोष्टी
दिलखुलास कराव्या

असा पडावा पाऊस
व्हावे मेघांनी बेभान
सैरभरत्या स्वप्नांनी
रसरसावे गर्भात

असा पडावा पाऊस
फक्त पाऊस पाऊस
रितं होऊन धारात
कण कण व्यक्त व्हावा..

मेघा






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators