|
Bairagee
| |
| Saturday, June 16, 2007 - 10:00 pm: |
| 
|
नटणे, विस्कटणे चांगले आहे वैभव. गझल आवडली.
|
गज़ल :- तुझ्यामुळे प्रकार :- मुसलसल मीटर :- लगालगागा लगालगागा लगालगा विषय :- चावून चोथा झालेला ... रोमान्स काफ़िये :- चावून चोथा झालेले बहाणे,प्रमाणे,गाणे वगैरे आव्हान :- " तुझ्यामुळे " हा रदीफ़ स्वतःस आवडलेले काही :- " सुरेल होतो तुझ्याप्रमाणे , तुझ्यामुळे " हा एकच शेर मग पोस्ट करण्याचे प्रयोजन ? :- कार्यशाळा झाल्यापासून इकडे वर्दळ कमी आहे , ह्या निमित्ताने चर्चा व्हावी किंवा पुढच्या गज़ल याव्यात . तुझ्यामुळे... अजून देहात एक गाणे तुझ्यामुळे जिवंत श्वासातले तराणे तुझ्यामुळे हळूच मी गुणगुणून बघतो मला पुन्हा सुरेल होतो तुझ्याप्रमाणे .. तुझ्यामुळे उगाच का घालतात सारे शपथ तुझी मला खरे वाटती बहाणे तुझ्यामुळे निघून गेला तुझ्यासवे पारिजातही ऋतू बिचारे उदासवाणे तुझ्यामुळे तशा कुठे राहिल्यात खाणाखुणा तरी तरी न संदर्भ ते पुराणे तुझ्यामुळे खरोखरी भाव शून्य होता तुझ्याकडे ... तुझ्याकडे चालले न नाणे .. तुझ्यामुळे
|
वैभव छान झालीय. तुझ्यामुळे हा रदीफ भारदस्त आहे. दुसरा शेर (तुझ्याप्रमाणेच) मला आवडला खूप. तिसर्या शेरातल्या दोन्ही मिसर्यांचा परस्परसंबंध कळला नाही. बाकीचे शेर ठीकठाक मतल्यासकट. ही गझल स्वरबद्ध केली तर ऐकायला छान वाटेल त्यातल्या गेयता आणि लयीमुळे. एक शंका आहे. ही गझल गैर मुसलसल नाही? प्रेयसी हा एकच विषय आहे ना इथे?
|
सन्मी ... तिस-या शेरात " तुझी शपथ घालून मला लोक जगवण्याचा प्रयत्न करतात . खरेतर हे त्यांचे बहाणे असतात हे मलाही कळत असतं पण तुझं नाव आल्याने मी काही करू शकत नाही आणि तसंही तुझ्यामुळे बहाणे खरे वाटण्याची सवय झाली आहेच " असा श्लेष होता . तसाच श्लेष " भाव शून्य " आणि " खाणाखुणा " वर आहे . ठीकठाक म्हणालीस हे ही खूपच झालं खरंतर . ही गज़ल अशीच लिहून पडून होती . तिच्याकडे वळणंही होत नव्हतं . म्हटलं जरा कानपिचक्या मिळाल्या की जमेल . स्वरबध्द? माहीत नाही . इतर कुठे दाखवण्याइतकी " तयार " मुळीच वाटत नाहीये मला तरी . एक विषय असला तर मुसलसल गज़ल असते .
|
Mankya
| |
| Monday, June 18, 2007 - 6:44 am: |
| 
|
वैभवा .. मस्त रे मित्रा ! मतला .. जिवंत श्वास .. आवडलं ! सुरेल .. अप्रतिम उतरलाय अन खूपच आवडला .. तुझ्याप्रमाणे ! शेवटचा शेर नाही पोहोचला पूर्णपणे ! माणिक !
|
वैभव... चांगली जमली असं म्हणायला हरकत नाही. पण तुझ्या इतर गझलेतील 'नशा' ह्या गझलेत नाही... कुठे तरी काही तरी मिसींग होतंय हे निश्चित! अजून देहात एक गाणे तुझ्यामुळे जिवंत श्वासातले तराणे तुझ्यामुळे वा!! मतलाच सर्वात जास्त आवडला! हळूच मी गुणगुणून बघतो मला पुन्हा सुरेल होतो तुझ्याप्रमाणे .. तुझ्यामुळे चांगलाय... उगाच का घालतात सारे शपथ तुझी मला खरे वाटती बहाणे तुझ्यामुळे 'तुझी शपथ घालून मला लोक जगवण्याचा प्रयत्न करतात'... हे 'जगवणं' Hidden त्यामुळे पहिल्यांदा शेर समजला नाही. निघून गेला तुझ्यासवे पारिजातही ऋतू बिचारे उदासवाणे तुझ्यामुळे ऐकायला छान आहे.पण नाविण्य नाही. तशा कुठे राहिल्यात खाणाखुणा तरी तरी न संदर्भ ते पुराणे तुझ्यामुळे ह्म्म्म्म... खरोखरी भाव शून्य होता तुझ्याकडे ... तुझ्याकडे चालले न नाणे .. तुझ्यामुळे बराच प्रयत्न चालू आहे...पण अजून माझ्यापर्यंत पोहोचत नाहीये.
|
Shyamli
| |
| Monday, June 18, 2007 - 8:15 am: |
| 
|
खरोखरी भाव शून्य होता तुझ्याकडे ... तुझ्याकडे चालले न नाणे .. तुझ्यामुळे >>> म्हणजे काय रे कळत नाहिये
|
वैभव, मयूर म्हणतो तसं जगवणं hidden असल्यामुळं कळलं नव्हतं. बाकी तू म्हणतोस ते श्लेष आले होते माझ्या लक्षात. आणि अरे मग तयार कर की तिला. मी स्वरबद्ध म्हणाले ती मीटर चांगलाय आणि रदीफाच्या वजनामुळे जी मजा येतेय त्यासाठी. मुसलसल. वोके वोके. मी उलटे समजत होते. मुसलसल म्हणजे (विषयांची) सरमिसळ असलेले शेर असे काहीसे (उगीचच) डोक्यात बसले होते खरे.
|
Chinnu
| |
| Tuesday, June 19, 2007 - 12:51 am: |
| 
|
व्वाह! ... ... ...
|
मला पारिजाताचा आणि शेवटचा शेर वगळता आवडली गज़ल. विशेषतः प्रत्येक सानी मिसर्यात ' तुझ्यामुळे'च्या ज्या वेगवेगळ्या अर्थच्छटा आल्यात त्या खूप आवडल्या. ( त्या नसत्या तर मग इतका चांगला रदीफ़ वाया गेला असता, हो ना?) ' पारिजात निघून गेला' ही शब्दरचना खटकली. शेवटचा शेरही अजून चांगला व्हायला हवा होता. उदा : ' खरोखरी' भरीचा वाटतो.
|
Chinnu
| |
| Tuesday, June 19, 2007 - 8:33 pm: |
| 
|
स्वाती, मलाही आधी पारिजाताचे निघून जाणे खटकले. पण पहा 'तुझ्यामुळे'- तू नसल्यामुळे, पारिजाताचा बहर निघून गेला, असं वाचून पाहिले. मग आवडला शेर.
|
सर्वांचेच आभार ... आधीच म्हटल्याप्रमाणे ही रचना माझ्या मनासारखी बिल्कूल उतरलेली नाही . आता ह्या निमित्ताने परत तिच्याकडे वळणं झालंच तर पुन्हा पोस्ट करेनच . मयूर , स्वाती खरोखरी भाव शून्य होता तुझ्याकडे ह्या मिसर्यात मी भाव शून्य आणि भावशून्य ह्या रंगछटांमुळे आकर्षिलो गेलो . तू भावशून्य होतीस किंवा तुझ्यालेखी माझ्या कुठल्याच गोष्टीला भाव नव्हता त्यामुळेच , केवळ तुझ्या त्या प्रवृत्तीमुळेच माझं नाणं फक्त तुझ्याकडे चाललं नाही otherwise बाजारात त्याला चांगलीच किंमत होती असं म्हणावसं वाटलं . स्वाती , खरोखरी च्या जागी " कशासही भाव शून्य होता " वगैरे तकलादू शब्द घालता आले असते . पण भाव म्हणजे किंमत आणि भावना हे दोन्ही शब्द खरे असण्यावर सगळं अवलंबून असतं. खरी किंमत आणि खर्या भावना . म्हणून खरोखरी लिहीलं . तरीही विचार करतो . तुझ्यासवे पारिजात म्हणा किंवा तीच पारिजात होती म्हणा एकूण एकच असे वाटले . पारिजात physically निघून जाणार नाही हे अभिप्रेतच होते . असो . पुन्हा एकदा आभार
|
Bairagee
| |
| Tuesday, June 19, 2007 - 9:46 pm: |
| 
|
वैभव, अजून देहात एक गाणे तुझ्यामुळे जिवंत श्वासातले तराणे तुझ्यामुळे हळूच मी गुणगुणून बघतो मला पुन्हा सुरेल होतो तुझ्याप्रमाणे .. तुझ्यामुळे निघून गेला तुझ्यासवे पारिजातही ऋतू बिचारे उदासवाणे तुझ्यामुळे वैभव, हे तिन्ही शेर आवडले. सहजसुंदर झाले आहेत. 'हळूच मी गुणगुणून बघतो मला पुन्हा', हा मिसरा फारच मस्त. मयूर, नुसते नावीन्य असून चालत नाही. शेरीयत, गझलीयतही हवी. आणि तसे ह्या जगात फारसे नावीन्य नाही, असे माझे मत. आपल्यालाच नेहमीच्या साध्या गोष्टींकडे अवाक होऊन बघायला हवे. बाकी संदर्भ खुलत नाही. मक्ता धूसर आणि ओढून-ताणून आल्यासारखा. अर्थात, असे मला वाटते.
|
Sarang23
| |
| Monday, June 25, 2007 - 4:35 am: |
| 
|
तिसरा शेर आवडला!
|
Aaftaab
| |
| Wednesday, June 27, 2007 - 8:31 am: |
| 
|
एक गज़ल पोस्टत आहे. तुमचे भलेबुरे अभिप्राय वाचायला आवडतील. तुझी आठवण... (मात्रावृत्त, मुसलसल, ".. अत नाही") तुझी आठवण अशी, विस्मरत नाही तुला विसरलो कधी? आठवत नाही! (ग़ालिबची मुआफ़ी मांगून..) दिले वचन स्वप्नात भेटण्याचे तू.. का डोळ्याला डोळा लागत नाही? तुझ्यामुळे मी वेडा, प्रसिद्ध झालो असा कोण जो मला ओळखत नाही? जर्जर पाने, भासे धूसर शाई तुझी प्रेमपत्रे मी वाचत नाही अबोला तुझा तुला मुबारक वेडे इथे कैफ़ियत माझी संपत नाही ''तुझ्याविना हे जगणे अशक्य आहे..'' 'उशीर' झाला, आता सांगत नाही! - रवि (आफ़ताब)
|
आफताब खास आहे गज़ल. मतल्यातली गम्मत आवडली. गालिबची माफी मागितल्यामुळे तो शेर सोडून देत आहे. तो छान आहेच. वेडा ठीक पण परिणाम साधायला उपयोगी. प्रेमपत्रेचा शेर प्रभावी आहे. कल्पना नवी नसली तरी कमी शब्दांत डोळ्यासमोर उभा रहातो प्रेमपत्रं वाचताना डोळे भरून येणारा आशिक़. कैफियत संपत नाही हे काळजापर्यंत जातेय न जातेय तोच उशीर झाला येतेय. वा! शेरांच्या योग्य क्रमामुळे चढता परिणाम होतोय आणि मक्ता व्यवस्थित क्लायमॅक्स साधतो. छानच!
|
आफताब गज़ल चांगली आहे.. मतला अजून चांगला निभावता आला असता.. मतल्याच्या अर्थात गडबड वाटते कैफ़ियत संपत नाही एकटा वाचल्यास जास्त परिणामकारक नाही पण मक्त्याने परिणाम येतो. सन्मे.. प्रेमपत्रात मला डोळे भरून येणार्या आशिकापेक्षा एक वृद्ध माणूस (ज्याची प्रीय व्यक्ती त्याला कधीच सोडून गेली आहे) जास्त जाणवला ( जर्जर पाने, धूसर शाई)
|
Manas6
| |
| Thursday, June 28, 2007 - 9:34 am: |
| 
|
..पुन्हा सांग ना! कसे भेटले, युग-तॄष्णा नि अधीर पाणी- पुन्हा सांग ना खूप भावली, हॄदयाला ही प्रेम-कहाणी- पुन्हा सांग ना कुठून होत्या, सोबत छाया, विरहाच्या ते, दिसले नाही; परतीच्या वाटेवर होते नयनी पाणी- पुन्हा सांग ना हवा ही खबर,आणत राहो; ऐकत राहो, मी ही आणिक, सरेल आता, पानगळीची ऋतु-विराणी- पुन्हा सांग ना समय-समुद्रा! बोललास तू, ऐकले परि, कळले नाही; अल्लड होते, ज्वानीच्या दरियातील पाणी- पुन्हा सांग ना आज म्हणे, येणार घरी ती! काय सांगता, आणि त्यावर, खिशात माझ्या, आज निघाली, बरीच नाणी?-पुन्हा सांग ना पुलाखालच्या, वस्तीमधुनी, भोळी स्वप्ने बरळत होती, "दारिद्र्याची, पुढे म्हणे, नसणार निशाणी-पुन्हा सांग ना" -मानस६ ह्यातील पहिले चार शेर हे पाकिस्तान मधील प्रसिद्ध शायर अमजद इस्लाम अमजद ह्यांच्या एका गज़लेतील शेरांचा भावानुवाद आहेत.
|
मानस केवळ आ व ड ली. लिहीत रहा.
|
Asm
| |
| Tuesday, July 03, 2007 - 6:10 am: |
| 
|
क्षनात बदलतो आसमन्त मी अजुनी तसाच आहे ना आनन्द ना खन्त मी अजुनी तसाच आहे हे काय?.. आल्यापावली लगेच जायला निघालीस ये कधी निवान्त मी अजुनी तसाच आहे जानिवा बोथतुन गेल्या मी इतुके सोसले......... किती समीप आला अन्त मी अजुनी तसाच आहे मी जानतो तत्वज्ञान फ़क्त चतकोर भाकरीचे.. मज कलला ना वेदान्त मी अजुनी तसाच आहे
|
|
|