Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 27, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » निज ज्येष्ठ » काव्यधारा » झुळूक » Archive through June 27, 2007 « Previous Next »

Lopamudraa
Monday, June 25, 2007 - 12:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शब्द मनाशी भांडले
की पाना पानात सांडतात
त्यावरले दोन हळवे थेंब
पुसून ती रांगोळी..
विस्कटत ओळी
पुसट होत जातात
पुन्हा मनाचे पान कोरे होते
म्हणत... ....
जाउदे या शब्दांपेक्षा
मौन व्रतच बरे होते






Aaftaab
Monday, June 25, 2007 - 12:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिसलीस तू, हसलीस तू
कलीजात या, घुसलीस तू
कडकडकडाट चमकलीस तू
भिजलीस तू, भिनलीस तू



Devdattag
Monday, June 25, 2007 - 12:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैशाली बरेच दिवसांनी..:-)
छान आहे..:-)


Pujarins
Monday, June 25, 2007 - 12:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कल्पक, :-)
श्यामली, मस्त कल्पना

विहरताना उंच नभी
कशी यावी प्रार्थना कानी?
देव्हार्‍यात दिव्यापाशी
मातीस आठवे ओवी



Shyamli
Monday, June 25, 2007 - 12:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थांबणे माझे क्षणांचे
अर्थांचे झरती झरे
उमगले काही मला
इतुकेही आहे ना पुरे?

धन्यवाद पुजारी, वै, देवा आने दो






Lopamudraa
Monday, June 25, 2007 - 12:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा मस्त आहे
हो खुप दिवसांनी!
श्यामले एकदम जोरात आहेस सध्या, खुप छान


Lopamudraa
Monday, June 25, 2007 - 1:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सायंकाळच्या किरणांसारखे
शब्द आक्रसुन घेतात अर्थ
सारी भावना वितळत जाते
मौनाच्या अंधारात...
अन कविता होते व्यर्थ!



रात्रीच्या जगात उरतात
जसे निस्तेज आकार..
तसे शब्दांचे अर्थहिन आकार
नुसतेच कागदावर साकार
तेव्हा वाट पहावीच लागते
उजाडायची...!!!



Shyamli
Monday, June 25, 2007 - 1:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किनारा हवाय म्हणुन
गर्जतच आला होतास
अंगण दिलं होतं मी
कुंपण तोडून गेला होतास

Sanghamitra
Tuesday, June 26, 2007 - 3:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


लोपा खूप दिवसांनी आणि रांगोळी सुबक. उजाडायची वाट अप्रतीम.
आफताब तुझी आश्वासने आवडली होती खूप. (लिहायचे राहून गेले). ही पण बरीय. :-)
श्यामले किनारा एकदम सुनामी स्टाईल.
आणि मौन मस्त आहे बर्का.
त्यावरून सुचलेले हे काहीतरी नवीनच :-)

असह्य होत जातोय तुझ्या मौनाचा आक्रोश.
तुझ्या नितळ डोळ्यातला विखारी रोष.
बाकी काय उरते एकदा भावनाच मेल्या तर?
यापेक्षा सरळ आयुष्याच्या वाटण्याच केल्या तर?


Giriraj
Tuesday, June 26, 2007 - 5:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मौन आहेच दोघांत तर असू दे तसेच
जुळल्या तारांचे स्वर मात्र झंकारू दे असेच
तू म्हणतेस,'आयुष्याच्या वाटण्या केल्यात तर?'
एकमेकांत गुंतलेले कुठे जातिल मग स्वर?



R_joshi
Tuesday, June 26, 2007 - 5:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सतिश,देवा,जो,श्यामली,लोपा,आफताब, संघमित्रा अरे असेच जोरात बरसत राहा:-)
ब-याच दिवसांनी झुळुकेचा गारवा अनुभवते आहे. माणिक,राजा,गोब्बु राहिले कोठे?


Sanghamitra
Tuesday, June 26, 2007 - 5:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोडवायला गेले तर आणखीच गुंतले एकमेकांत.
अजून कशी इतकी ओढ शिल्लक आहे त्या स्वरांत?
पण रंगेल का पुन्हा मैफल, पुन्हा झंकारले तर?
तुझ्या स्वरांत माझे आणि माझ्यांमधे तुझे स्वर.


R_joshi
Tuesday, June 26, 2007 - 5:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिरी सुरेख:-)

आयुष्याच्या वाटणीमध्ये
माझ अस काय उरणार
तुच आयुष्य माझ
मग मी कसा जगणार

प्रिति:-)

मौनाची श्रृंखला
आज तिने तोडली
शब्दांनी नव्हे
डोळ्यांनी ती बोलली
शब्दांचे अपुरेपण
माझ्यासारखेच वाटले
नकळत तिच्या नयनी
जेव्हा अश्रु दोन दाटले
विरह तिच्या नयनातला
मौनाहुन गर्द दाटला
तिच्या नकळतच
नयनमेघ बरसला

प्रिति:-)


Giriraj
Tuesday, June 26, 2007 - 7:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे असे राहुदे असेच स्वर गुंतुनी
बळजोरीने ते जातिल उगा भंगूनी
स्वर असो नसो पण गाऊ जीवन्-राग
घे हातांमध्ये हात असे गुंफुनी!






Giriraj
Tuesday, June 26, 2007 - 7:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पहिल्या ओळींत रॉय किणीकरांचे बोट सोडावेसे वाटलेच नाही! :-)

Lopamudraa
Tuesday, June 26, 2007 - 8:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा great...!!!
मौनाचे व्रत घेतले की सगळ्यांनी.
संघमित्रा छाने खुप सुंदर आणि धन्यवाद!!!
गिरि लगे रहो R जोशी धन्यवाद


Abhijat
Tuesday, June 26, 2007 - 8:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अशाच शांत मौनकाळी, फुले शब्दांची झाली
अबोलीच्या त्या फुलांनी धरती सजून गेली


Jo_s
Tuesday, June 26, 2007 - 9:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा श्यामली, लोपा, गिरी, मित्रा, प्रिती सगळेच छान

अबोल्यावर लिहीता लिहीता
लेखणीच बोलू लागली
अन ज्याच्या साठी लिहीत होती
त्याची मान डोलू लागली
सुधीर


Manogat
Tuesday, June 26, 2007 - 2:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शब्दांचा अबोला असला तरी,
प्रेमाचे धागे जोडुन ठेव,
जुनाट जरी असेल, तरी या नात्यातला,
हा एक भाव जपुन ठेव.


Manogat
Wednesday, June 27, 2007 - 1:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्रुष्ण धवल रंग तुझा,
मोहक लुभावणा,
का करीशी या रुपाचा,
यशोदेला गार्हाणा.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators