|
Sas
| |
| Tuesday, June 26, 2007 - 5:41 pm: |
| 
|
ईथे एकापेक्षा एक सुंदर कविता आहेत, माझ्या कविता इथे ठेवण तुम्हाला किती रुचेल माहित नाही, तरिही माझा प्रयत्न इथे Post केलाय; आशा आहे सार्यांना आवडेल. 1. उन्हाळा धकधकणारा सुर्य पोळणारी किरण रणरणती दुपार लख्ख दिवस प्रकाशमय संध्याकाळ घश्याला कोरड अंगाला घाम सोबत नको नकोसे वाटणारे काम लांब दिवस, दिर्घ रात्री वड्या, कुर्रडया, पापड, लोणाची वाळवण, साठवण, मागच्या उन्हाळ्यात उकाडा कमी की जास्त याची आठवण Cold Drink, Soft Drink, थंडाई, सरबत Ice-cream, कुल्फी, बर्फाचा गोळा, पंखा, AC जिवाला हवा गारवा आणी थंड हवा आंब्याचा रस, कैरीच पन्ह, गोड आंबट चिंचा पर्वणीच असतो की उन्हाळा, पण तरीही, वेध लागतात त्याचे, जो पारखा होणार असतो नभा आणी शमविणार असतो तृष्णेची व्यथा स्वच्छ आकाश काळवंडुन जात ज्याला पोटात जपल ते आता परख होणार म्हणुन रडु लागत, आकाशाच दु:ख नभांतुन कोसळु लागत घनांच हे ओथंबण आपल्या मनाला भावत आणी आला पाऊस आला मन गाऊ लागत ...संप्रदा 2007 Jun 19 2. आधुनिक प्रेम Love @ 1st site, Childhood Friend, Common Friend, ओळख वा Internet Site अश्या कुठल्यातरी मार्गे प्रेम "दिल Exchange" होत आणी प्रेम होत, मग प्रेम म्हणजे हातात हात, गोड मिठ्या प्रेम SMS, प्रेम Emails आणी मोबाईलवर तासंतास गप्पा प्रेम म्हणजे Dating, बागेत फिरण, Shopping ला जाण, Movie बघत Pocorn खाण, Cold Drink पीण, रात्र रात्र Chatting करण, Webcam मधुन एकमेकांना बघण प्रेम म्हणजे एकमेकांसाठी Suprise Gift घेण, कधी कधी कारण नसतांनाही एकमेकांना Treat देण प्रेम म्हणजे Long Drive, Hoteling, Picnic, सोबत रहाण आणी Suddenly Maariage Decision वा Break-Up होण प्रेम म्हणजे मग संसार, Break-Up झाला असेल तर Patch-Up करण वा दुसर्या कुणात तरी Interrest येण; खरच Globalize जगात दुर्मिळ होत चाललय पुराने जमाने का Classic प्रेम मीळण ...संप्रदा 2007 Jun 05
|
स्वस्ती, गार्गी पाऊस सही. श्यामली, बापू दोन्ही समुद्रकविता उत्तम आहेत. सारंग जवाब नही. अप्रतिम उतरलीय रांगोळी. सास उन्हाळा आवडला.
|
सीझन साला ! लोकांना ना कधी , कुठे , काय बोलावं समजतच नाही चांगला बसलो होतो , पावसावर कविता लिहीत मळभ , सरी , झिम्माड वगैरे किती मस्त मस्त शब्द सुचत होते , आली ही कामवाली बाई बडबड करत .... झोपडी , भिंत , छोटं बाळ ... हा काय असल्या गोष्टी बोलायचा सीझन आहे ? साला ! लोकांना ना कधी , कुठे , काय बोलावं समजतच नाही
|
Psg
| |
| Wednesday, June 27, 2007 - 9:07 am: |
| 
|
ओह! ह्म्म्म ... ...
|
Sarang23
| |
| Wednesday, June 27, 2007 - 9:13 am: |
| 
|
सगळ्यांचे मनापासून आभार... बापू, श्यामलीची कविता वाचायच्या आधी तुमची कविता वाचली. दोन्ही केवळ अप्रतीम वाटल्या! पण तुमच्या कवितेतून अजूनही काही डोकावतय असं राहून राहून वाटतय... विचार करतो आहे. वैभव... दुःखी केलस... आणि अंतर्मुखही... Sas , उन्हाळा छान आहे...
|
वैभव, अप्रतिम.
|
सारंग रांगोळी छान... वैभव सीझन वास्तव आहे...
|
Mankya
| |
| Wednesday, June 27, 2007 - 11:15 am: |
| 
|
वैभवा .. .. .. ..! माणिक !
|
Supermom
| |
| Wednesday, June 27, 2007 - 3:26 pm: |
| 
|
घराच्या मध्यावर उभी, विचारात हरवलेली मी. भंगलेला विश्वास, तुटलेलं मन गोळा करू पाहणारी मी. मोठाच प्रश्न पडलाय मला.... खूप दिवसांपासून जपलेली मखमली सुरावट बेसूर झाल्याचं दुखः मोठं, की जन्मांतरापासून सोबत असलेली.. वेदना नव्याने जगण्याचं सुख मोठं?
|
वैभव.. अप्रतिम.. .. .. .. सुपर्मॉम.. आवडली कविता
|
Rajankul
| |
| Thursday, June 28, 2007 - 5:50 am: |
| 
|
साला याला कविता का म्हणायचा? सुपर्मोम सुपर आहे तुमची कविता.
|
Cool
| |
| Thursday, June 28, 2007 - 6:11 am: |
| 
|
वैभव, टोचली रे तुझी कविता 
|
Daad
| |
| Thursday, June 28, 2007 - 6:35 am: |
| 
|
वैभव, सीझन्- खुपणार आता सारखी, तुझ्या इतर कवितांसारखीच छळवादी! सुमॉ, क्या बात है!
|
सूपरमॉम, सुरेख. पण पहिल्या चार ओळी नसत्याच तर कदाचित जास्त परिणामकारक झाली असती असं मला वाटतंय.
|
सारंग, मी श्यामलीच्या कवितेंत फारसे बदल केले नाहीत. समुद्र आणि वादळ हे शब्द काढले आणि त्या दोन्ही संकल्पना थोड्या अधिक सूचक पद्धतीनं मांडल्या फक्त. आशयाच्या बाबतीत जराशीच मोकळीक घेतली. म्हणजे काय की मला जे जाणवलं ते मी स्पष्टपणे नोंदवून मोकळा झालो. [निष्फळता आणि स्खलनशीलता वगैरे]. वाचकाने एकाहून अधिक निष्कर्ष काढण्याची सोय श्यामलीने [कदाचित मुद्दामहून] ठेवली होती, ती मी काढून टाकली असं मला आत्ता वाटतंय. पण मी तिच्या कवितेची मोडतोड केली तेंव्हा अर्थातच ही गोष्ट माझ्या लक्षांत आली नव्हती. एकाहून अधिक अर्थ किंवा निष्कर्ष निघू शकणं ही बाब नेहमीच जास्त कलात्मक मानली जाते. त्या दृष्टीने माझा खटाटोप थोडासा डावा ठरावा. हेही मला आत्ता सुचतंय. आणि असंही वाटतंय की मी जरा फाजील उत्साह दाखवला. थोडा अधिक विचार केला असता तर कदचित मी ह्या फंदात पडलोहि नसतो पण त्या वेळी सुरसुरी आली खरी. तुला नेमकं काय खटकलं किंवा तुला कशामुळे बुचकळायला झालं हे मला कळलेलं नाही. तुझ्या कॉमेंटमुळे मी जरा बारकाइने विचार केला, तेंव्हा जे मला जाणवलं, ते वर लिहलंय. -बापू.
|
सुपरमॉम, वेदना नव्याने जगण्याचं सुख... वा क्या बात है! -बापू
|
Mankya
| |
| Friday, June 29, 2007 - 2:00 am: |
| 
|
सुमॉ ... मस्त ! वेदना नव्याने जगण्याचं सुख... वाह ! माणिक !
|
Supermom
| |
| Friday, June 29, 2007 - 2:11 am: |
| 
|
अगदी लहान असल्यापासून ओठातले बोबडे बोल स्पष्ट व्हायला लागल्याबरोबरच एक सावली... सतत सोबत करणारी 'मुलीच्या जातीनं...' पापण्यांतली इंद्रधनुष्यी स्वप्नं मुठीतलं चांदणं... घट्ट पकडून ठेवायच्या आधीच पुन्हा ती सावली 'मुलीच्या जातीनं.....' आज ते सारंच गेलंय निसटून हातातल्या वाळूसारखं. खूप दूरच्या प्रवासाला निघताना गळ्यातलं मंगळसूत्र नि कपाळीचं कुंकू..... एवढीच तिची ओळख एवढीच तिची जात.
|
वा!सुपर Mom ... एकदम सुपर्ब अवघ्या स्त्रीपणाचा सारांश असल्यासारखी अशी कविता खूप दिवसांनी वाचली... आणि हो... राहवलं नाही म्हणून सांगतो... अतिशयोक्ती नव्हे, पण तस्लिमा नसरीनच्या कवितेची आठवण प्रकर्षाने झाली...
|
Mankya
| |
| Friday, June 29, 2007 - 3:32 am: |
| 
|
सुमॉ ... वाSSSS ! पापण्यांतली इंद्रधनुष्यी स्वप्नं मुठीतलं चांदणं... वाह ! मस्त उतरलिये ! माणिक !
|
|
|