|
सरस्वती स्वत्:शी विचार करत बसली होती, जे केलं ते बरोबर कि चूक हा प्रश्न तिला कधीच पडला नाही. मात्र या प्रसंगाने तिच्यामधे एक जबरदस्त आत्मविश्वास मात्र तयार झाला. कुठल्याही कठीण प्रसंगाला सामोरं जायची तिची आता हिंमत होती. लक्ष्मीच्या या घरी येण्याचं गावात व्हायचा तितका गवगवा झालाच. खास करून सरस्वतीच्या शाळेमधे. सर्वानी तिला नाना तर्हेचे प्रश्न विचारले. नक्की काय घडलं याची सर्वानाच उत्सुकता लागली होती. जयाकाकू तर सर्वाना रंगवून रंगवून सांगत होत्या, "लेकीनेच असा अपमान केला आईचा. शेवटी मी तिला लेकीसरखं मोठं केलय." सरस्वती मात्र एका शब्दानेही काही बोलली नाही. "गप्प बसणं" हा तिचा स्वभाव बनत चालला होता. कुणापाशी आपलं मन मोकळं करावंसं तिला वाटतच नव्हतं. एकदा ती घरात एकटीच बसली होती. कसलंतरी पुस्तक वाचत. हातात पुस्तक असलं तर तिला कशाची शुद्ध नसायची. आपल्या अगदी जवळ कोणी येऊन बसलय याची तिला कितीतरी वेळ जाणीव झालीच नाही. जेव्हा झाली तेव्हा तो माणूस तिच्या पाठीवरून हात फ़िरवत होता. "विश्वाकाका?" ती चमकून म्हणाली. "सरस्वती..." त्याचा आवाज एकदम वेगळा वाटला. त्यानी आपले ओठ तिच्या गालावर टेकवले. शिसारीची एक लहर सरस्वतीच्या अंगातून धावत गेली. तिने स्वत्:ला पाठी खेचलं. पण तवर विश्वाकाकाने तिला धरलं होतं. त्याच्या पासून वाचणं आता शक्य नव्हतं. सरस्वती जोरात ओरडली. "दूरवर तुझा आवाज ऐकणारं कुणी नाही" काका म्हणाला. पहिल्यादा सरस्वतीला काकाची भिती वाटली. "मला जाऊ दे काका..." तिचा आवाज कापत होता. "जाऊ दे.. कुठे? तुझ्या त्या बाटग्या आईकडे की मेलेल्या बापाकडे?" काकाने तिला आपल्याकडे खेचलं आणि तिच्या मानेला तो चाटायला लागला. सरस्वतीने हात पाय झाडून प्रतिकाराला सुरुवात केली. पण काका तिच्यापेक्षा मजबूत होता. ती कसा प्रतिकार करेल हे त्याला चांगलंच माहीत होतं. तिचा फ़्रॉक त्याचे ओढायला सुरुवात केली. कित्येक ठिकाणी त्या फ़्रॉकचा शिवण उसवत चालली. सरस्वतीने काकाच्या मनगटाचा चावा घेतला. त्याने जोरात तिला थप्पड मारली. सरस्वतीच्या डोळ्यासमोर अंधारी पसरली. तिचे लांबसडक केस मोकळे सुटले. रडणारी, ओरडणारी सरस्वती आता भेसूर दिसायला लागली. पण विश्वाकाकाला आता त्याची पर्वा कुठे होती? त्याने कित्येक दिवसाचा आखलेला डाव त्याला साधायचा होता. आपल्या एका हाताने त्याने सरस्वतीचे दोन्ही हात घट्ट धरले आणि दुसर्या हाताने तिचे कपडे काढायला सुरुवात केली. दुपारचे तीन्-साडेतीन झाले असतील. जयाकाकू घरी परत आल्या. सोबत सागर समीर होतेच. घरात आल्या आल्या त्याची पावलं थबकली. अख्खं घर अस्ताव्यस्त होतं सगळं सामान इकडे तिकदे पडलं होतं. सरस्वती त्या पसार्याच्या मधोमध बसली होती. रडून रडून लालेलाल झालेली. तिच्या अंगावर एक जुना फ़ाटका गाऊन होता. "सागर, समीर तुम्ही बाहेर खेळायला जा.." जयाकाकू म्हणाली. त्याना काय आनंदात उड्या मारत गेली दोघं. सरस्वती मात्र शून्यात नजर लावून बसली होती. "काय झालं सरस्वती?" काकूनी विचारलं. सरस्वतीने बोटानेच तिला दाखवलं. तिचा फ़ाटलेला, रक्ताने भरलेला फ़्रॉक. जयाकाकू काय समजायचे ते समजुन गेल्या. पंधरा वर्षापुर्वी सरस्वती दीड वर्षाची असताना हाच प्रसंग घरात घडला होता. नव्हे, वारंवार घडत राहिला. त्यावेळेला लक्ष्मीवर कुणीच विश्वास ठेवला नाही. उलट तिच्याच चारित्र्यावर विश्वाने शिंतोडे उडवले. आणि वासुदेवाने भावाचा शब्द प्रमाण मानत तिला घराबाहेर काढलं आज त्याच लक्ष्मीची मुलगी जयाच्या समोर बसली होती. कुठल्याही औषधाने भरून न येणारा घाव घेऊन.
|
Nilima_v
| |
| Thursday, June 14, 2007 - 9:05 pm: |
|
|
Nandini ekdam bombshell taklaas.
|
Rani_2007
| |
| Thursday, June 14, 2007 - 10:39 pm: |
|
|
कथा चांगली चालू आहे...उत्सुकता वाढत आहे.
|
Zakasrao
| |
| Friday, June 15, 2007 - 4:48 am: |
|
|
नन्दिनी तु ते गाण ऐकलस ना जो वादा किया वो निभाना पडेगा. तु २ दिवसापुर्वी पुढचा भाग टाकण्याचा वादा केला होतास कुठे गेला तुझा वादा
|
Rajya
| |
| Friday, June 15, 2007 - 11:06 am: |
|
|
ओ नंदु मावशी, मी एकही भाग वाचला नाही अजुन, जोपर्यंत 'समाप्त' हा शब्द दृष्टीस नाही पडत तोपर्यंत अम्ही नाय वाचत.
|
नन्दिनी, अगं लवकर लिही ना.....किती वाट बघु...
|
जयाकाकुना कितीतरी वेळ काय बोलायचं तेच सुचत नव्हतं. हलकेच त्यानी सरस्वतीच्या केसातून हात फ़िरवला. सरस्व्तीचे गप्प राहणं त्याना जास्त खटकत होते. तिचे रडणं आरडणं आक्रस्ताळेपणा काहीही त्यानी आता सहन केलं असतं. पण सगळ्यात जास्त त्याना छळत होती ती सरस्वतीच्या डोळ्यातली मूक शांतता. बहुतेक जयाकाकु आलेल्या तिला माहीतही नव्हतं. अजूनही ती तिच्याच विश्वात होती. कितीतरी वेळ जीवघेणी शांतता अख्ख्या घरावर तशीच झाकोळुन होती. एखाद्या खोल विहीरीतून तरंग यावा तशी सरस्वती बोलली. "माझ्या आईचं या घरात अजून काय सामान आहे?" जयाकाकु चमकल्या. तिच्या प्रश्नाचा रोख त्यच्या लक्षात येईन. "माझी आई घर सोडून गेली तरी तिचं काहीतरी सामान या घरात असेलच ना.." सरस्वती अत्यंत शांतपणे म्हणाली. "काय बोलतेस तू?" जयाकाकूना काहीच समजेना. "माझ्या बापाचा या घरात काही वाटा आहे की नाही?" सरस्वतीच्या चेहर्यावरची रेष सुद्धा हलत नव्हती. "सरस्वती, तू तुझ्या आईकडे जायचा विचार करते आहेस का?" जयाकाकौच्या आवाजात भिती दाटून आली. पन लगेच दुसर्या क्षणी त्याच्या मनात विचार आला, कदाचित तिथे तिच्यावर असला प्रसंग तरी ओढवला नसता. त्याच दिवशी जर ती लक्ष्मीबरोबर गेली असती तर... "काकू... मला वेगळं व्हायचय.." सरस्वती थंडपणे म्हणाली. "काय? "हो, मी या घरात राहणार नाही. एक दिवस एक क्षण पण नाही. विश्वाकाका परत यायच्या आत मी घराबाहेर जाणार आहे. मला माझं जे काही सामान असेल ते बाजुला काढुन दे, काही सामान नसेल तर माझा या घरातला हिस्सा दे. मी हे घर सोडलय.." आपण काय ऐकतोय यावर कितीतरी वेळ जयाकाकुचा विश्वासच बसत नव्हता. "हे बघ, सरस्वती, तुझा राग समजू शकते मी. तुह्याशी कशीही वागले तरी मी पण बाईच आहे. पण बाळा, इतका आततायी निर्णय घेऊ नको. इतकी लहान मुलगी तु कुठे जाशील." "लहान? आणि मुलगी?" सरस्वती किंचित हसली. "माझ्या काकाने सगळं सांगितलं मला. हे सर्व काकु घरात झालं. यापेक्षा बाहेरचं जग बरं असेल ना? मी इथे राहणार नाही. भले रस्त्यावर जाऊन मरेन पण इथे तीळ तीळ मरण्यापेक्षा तिथे जाईन." सरस्वती म्हणाली. "अगं पण तू कुठे राहणार?" "काकू, तो वरती आहे ना परमएश्वर त्याचं मी काहीतरी नुकसान केलय, त्याची परतफ़ेड चालू आहे. तोच ठरवेल अजून मी किती सहन करायचं आणि कसं जगायचं ते. मी सगळे प्रश्न त्याच्यावर सोपवले. आता माझं काही नाही. तो म्हणेल तसंच होईल. लवकर सामान दे. काका यायची वेळ झाली. मला त्याचं तोंड बघाय्चं नाही आणि त्याहूनही जास्त त्याला माझं हे रडवेलं सुजलेलं तोंड दाखवायचं नाही. चल, सामान दे. " सरस्वती अगदी शांतपणे बोलत होती. ती एकच दुपार अचानक तिला या जगाच्या बाजारात प्रौढ करून गेली होती.
|
Ladaki
| |
| Saturday, June 16, 2007 - 10:45 am: |
|
|
नन्दिनी कथा छानपैकी उलगडतेय लवकर लवकर पुर्ण कर पेशंस नाहियेत जास्त कुणाकडे
|
तिन्हीसांजेची वेळ झाली होती. दूरवर कुठेतरी वारा वहात असावा. आकाशात एखादा चुकार उकार ढग फ़िरत होता. सुर्यमहाराज लपायला चालले होते. आकाशातली रंगपंचमी अजून चालूच होती. हे सगळं बघत सरस्वती शांतपणे बसून होती. काकूने तिला परोपरी समजावलं होतं पण सरस्वती बधली नव्हती. शेवटी जेव्हा काहीच सामान न घेता सरस्वती घर सोडून निघाली तेव्हा मात्र काकूचा नाईलाज झाला. सरस्वतीने पायाशी ठेवलेलं गाठोड्याकडे पाहिलं... तिचे कपडे, पुस्तकं एक ताट वाटी पेला आणि दोन तीन कळकटलेली पातेली. एवढाच तिचा संसार होता. कुठे जायचं कसं रहायचं काय काम करायचं काहीच तिने ठरवलं नव्हतं. एक गोष्ट मात्र तिने पक्की ठरवली होती. यापुढे जगायचं मनसोक्त जगायचं.. कुणाचीही कसलीही पर्व न करता. तिची आई तिला सोडुन गेली होती. बाबानी तिला स्वत्:ची मुलगी कधीच मानलं नव्हतं. सख्ख्या काकाने आज तिला हे दु:ख दिलं होतं. शरीरत उठणार्या वेदनापेक्षा मनावरचे ओरखडे जास्त त्रास देत होते. आज सरस्वती मेली होती.. किंवा आज सरस्वती परत जन्माला आली होती. स्वत्:च्या अस्तित्वाचा लढा तिने चालू केला होता. तिलाच तो जिंकायचा होता. गावाबाहेरच्या आदिष्टीच्या देवळात ती आज थांबणार होती. पण उद्या तिला इथून निघायला हवं होतं. या गावाह्या बाहेर जिथे तिला कुणीही ओळखलं नसतं. आजची रात्र.. उद्या तिला रत्नगिरी गाठायचं होतं. तिच्या गावापासुन कमित कमी चार तासावर रत्नागिरी होतं. जयाकाकूने तिला थोडे पैसे दिले होते. पण ते गाडीभाड्यावर खर्च करणं मूर्खपणाचे ठरलं असतं. तरीही रत्नागिरी गाठणं गरजेचं होतं. रात्र अंधारत आली होती. सरस्वतीने काकूने दिलेली दशमी खाल्ली आणि तिथेच देवळात झोपली. कशाचीही भिती न बाळगता. डोळे मिटल्यावर कुणाचातरी आश्वासक स्पर्श तिला जाणवत राहिला. कुणीतरी तिला नक्की मदत करणार होतं. कुणीतरी तिच्यासाठी या जगात होतं. ती एकटी नव्हती. कोण तरी तिच्यासाठी जगत होतं... कोण तरी. तिच्या आईवडीलापेक्षाही तिची जास्त काळजी घेणारं. कोण तरी.
|
Zakasrao
| |
| Wednesday, June 20, 2007 - 3:58 am: |
|
|
मला माहितेय ते कोण आहे?
|
Ladaki
| |
| Wednesday, June 20, 2007 - 6:06 am: |
|
|
धन्यवाद नंदिनी माझे कष्ट वाचवल्याबद्दल आणि ववीमधे मार खाण्यापासुनपण... कारण आज जर तू पुढचा भाग टाकला नसतास तर मी पुढची कथा लिहायला सुरुवात करणार असते...
|
सकाळी उठेपर्यन्त काय करायचं याचा सरस्वतीने मनाशी विचार केला होता. आता तिला रत्नागिरी फ़ुकट गाठता येणार होतं. पहाटे पहाटे ती उठली. गावापासून तीन चार किलोमीटरवर हायवे होता. तेवढं अंतर तिला चालणं गरजेचं होतं. तेही कुणाला समजून न देता. एव्हाना तिची विश्वाकाकाने शोधाशोध सुरू केली असेल. जयाकाकूला सागर समीरची शपथ होती.. ती नवर्याला काहीही बोलली नसती. पण दुसर्या कुणाला ती दिसली असती तर सरळ तिला उचलून घरी आणलं असतं. झुंजूमुंजू झाल्यावर तिने चालायला सुरुवात केली. ऊन चढायच्या आत ती हायवेवर होती. हातातलं गाठोडं तिने खाली ठेवलं. "काकूला एक पिशवी द्यायला काय धाड भरली होती. " तिने स्वत्:शी विचार केला. चाऊन चालून तहान लागली होती. घसा सुकला होता. पण आता जिथे जायचं आहे तिथे गेल्याशिवाय काहीच खायचं प्यायचं नाही तिने स्वत्:शी ठरवून टाकलं होतं. त्या विराण रस्त्यावत ती एकटीच उभी होती. बांधलेले लांबसडक केस तिने हाताने विस्कटले. खाली पडलेली लाल माती तिने चेहर्याला किंचित लावली. डोळे कालच रडून सुजलेले होते. अंगात गुलाबी रंगाचा फ़्रॉक होता. थोडी माती तिने त्याच्यावर टाकली. हाततल्या गाठोड्यातून काकूने दिलेलं ताट काढुन त्यात तिने स्वत्:चा चेहरा पाहिला. एकदम ठीक. फ़क्त डोळ्यात थोडे अश्रू हवे होते. काही केल्या ते येईचनात. तेवढ्यात तिला काहीतरी आठवलं. तिने फ़्रॉक थोडा वर उचलला. मांडीवर काकाच्या दातानी एक जखम झाली होती. अंगठ्याने ती जखम दाबली. वेदना जाणवल्या. पण डोळे कोरडेच राहिले. जवळच एका झाडाची वाळकी फ़ांदे तिथे पडली होती. ती सरस्वतीने उचलली. आणि जखमेत दाबली. दातानी तिने ओठ चावले, डोळ्यात पाणी आलं.. तेच तर तिला हवं होतं. सरस्वती हायवेवर आली. अधून मधून वाहनं जात होती. दूरवरून एक कार येताना तिला दिसली. ती रस्त्याच्या अगदी बाजूला कुणाला दिसेल न दिसेल अशा बेतात जाऊन बसली. गुडघयत डोकं घालून. कार थांबली नाही. हरकत नाही. तिला संध्याकाळपर्य्नन्त रत्नागिरी गाठायचं होतं. अजून तर दुपारपण झाली नसेल. साधारण अर्ध्यातासाने एक मारुती थांबली. आतमधे एक वयस्कर जोडपं होतं. "अगं... ए मुली.." त्या बाईन आवाज दिला. सरस्वतीने वर पाहिलं. ती रडत होती. "काय झालं...." काही नाही ते हलकेच म्हणाली. "मग इथ रस्त्यात का बसली आहेस?" "मी पैसे घरी विसरले. एष्टीवाल्याने इथेच उतरवलं." "कुथे निघालीस?" "मामाकडे.. रत्नागिरीला.." बाईच्या चेहर्यावर करुणा आली. माहातारबुवा मात्र वैतागल्यासारखे दिसत होते. बाई त्याच्याशी काहीतरी बोलल्या. "रत्नागिरीत कुठे?" "कॉलेजजजवळ...." तिच्यावर्गातल्या सुषमाचा एक नातेवाईक तिथे रहायला होता. रात्रीच तिने तो पत्ता आठवुन ठेवला होता. "चल, आम्ही सोडतो तुला..." बाई म्हणाल्या. "नको, पैसे नाहीत माझ्याकडे." "अगं मी काही एसतीवाली आहे का? आता इतक्या दुपारची एकटी कशी जाणार? चल मी सोडते." सरस्वतीच्या चेहर्यावर भिती दाटून आली होती. "आईने सांगितलय की अनोळखी माणसाबरोबर जाऊ नको. डेंजरस असतं. " "बरोबर आहे तुझ्या आईचं.. म्हणूनच म्हणते इथे एकटी उभी राहू नको. ते घाणेरडे ट्रकवाले वगैरे असतात हायवेला. चल आम्ही सोडतो. मोठ्या अविश्वसाने सरस्वती उठली. गाडीचा पाठचा दरवाजा उघडला आणि आत बसली. संध्याकाळपर्यत्न रत्नागिरी. ती गालातल्या गालात हसली. खरं तर ति कधीच गावाच्याबाहेर पडली नव्हती. पण तरीही हा सगळा परिसर तिला ओळखीचा वाटत होता. रत्नागिरीत पोचल्यावर तिला तिथे शाळाशोधायची होती.. पुढे शिकायचं होतं..... तिच्या गावात तिला परत कधीच यायचं नव्हतं. तिचा सगळा भूतकाळ जाळून ती निघाली होती. पण तरीही तिचा भूतकाळ तिच्यासोबतच येत आहे याची तिला त्यावेळेला जराही कल्पना नव्हती.
|
Jaijuee
| |
| Wednesday, June 20, 2007 - 4:34 pm: |
|
|
एवढं विदारक लिहिलच पाहिजे का? rape itself is very shattering and creepy incident! बारा - पंधरा वर्षाच्या मुलीवरचा प्रसंग किळसवाणा शहारा आणतो. तुमच्या वर्णनात तेवढी क्षमता आहे. Its a compliment to your ability and same time माझ्यासारख्या वाचकाला uncomfirtable पण वाटतं!
|
Mi_anu
| |
| Thursday, June 21, 2007 - 3:39 am: |
|
|
जबरदस्त लिहीता तुम्ही. ही सत्यकथा असू नये अशी मनाशी आशा. वपुंची ठिकरी कादंबरी आहे त्यात सोनावर सख्ख्या काकाने बलात्कार केलेला सांगितला आहे. यातली सोना पुढे वाईट मार्गाला लागते. सरस्वती सुरक्षितपणे रत्नागिरीला जायची युक्ती शोधते हे पाहून मनाला त्यातल्या त्यात बरे वाटले.
|
सरस्वती कॉलेजजवळ उतरली. इथून पुढे कुठे जायचं काहीच माहीती नव्हतं. पूर्णपणे अनोळखी शहरात ती एकटीच होती. तिने आजूबाजूला पाहिलं. प्रत्येक जण कुठे ना कुठे जात होता. सगळ्याकुठे जायचं ते माहित होतं... तिच्याशिवाय. आता काय? काल फ़क्त रत्नागिरी गाठायचं हे ठरवलं होतं. शाळेत जाणं काही कठीण होतं, मुलीसाठी दहावी पर्यन्त शिक्षण मोफ़त होतं. नववीची जुनी पुस्तकं तिच्याजवळ होती. रहाणे, कपडे आणि रओजचे जेवण हाच तिच्यापुढचा प्रश्न होता. फ़ार दिवसापूर्वी तिने पेपरात एक बातमी वाचली होती. मेंदूवर ताण देऊन तिने ती बातमी आठवली. तिला शब्दनशब्द आठवेत होता. ती सरस्वती होती!! "इथे उद्यम नगर कुठे आहे?" तिने जवळून जाणार्या एका माणसाला विचारलं. त्याने तिच्याकडे पाहिलं. एखद्या भिकार्याकडे बघावं तसं बघत तो म्हणाला. "बस मिळेल त्या बस स्टोपवरून" "पण चालत जायचं असेल तर.." "एक तास लागेल. इथून सरळ जायचं. मग मारुती मंदिरचं सर्कल लागेल तिथून उजवीकडे जा. तिथून पुढे उद्यम नगर सुरू होईल." " Thanks " तो माणूस चमकला. भिकारे पण इंग्रजी बोलतात. ति स्वत्:शी पुटपुटला. सरस्वतीने पुन्हा एकदा बस स्टोपक्डे बघितलं. चालायचं अंगत त्राण नव्हतं. पण तरी तीन रूपये वाचले असते ना..... एक बस हळू हळू येत होती.खचाल्हच भरलेली. तेवढ्यात तिला तो चेहरा दिसला. खूप ओळखीचा पण माहीत नसलेला. त्याने तिच्याक्दे पाहिलं. एक हलकंसं ओळखीचे स्मित दिलं.. पण इथे तर ती कुणालाच ओळखत नव्हती. मग हा कोण होता. तिने लक्ष देऊन त्याच्याक्डे पाहिलं. गोरा रंग, एकदम ऊंच पुरा... साधारण पंधरा सोळा वर्षाचा होता तो. पिंगट केस आणि निळॅ निळे खोल डोळे. सरस्वती फ़क्त त्याच्याकडे बघत होती. किती तरी वेळ निघून गेला. तो मुलगा बसमधे चढला. आणि पाठी वळून परत तिच्याकडे बघून हसला..... तो निघून गेला. सरस्वती तिथेच उभी होती. थिजल्यासारखी. त्याला य आधी कधी पाहिल्याचं तिला आठवत नव्हतं. पण पहिल्यादा पाहिलय असंही वाटत नव्हतं. त्याच्या डोळ्यात तिला आश्वासन दिसलं. ती मनाशी हसली. "तुझ्या मनाचे खेळ आहेत. त्याने दुसर्या कुणाला तरी ओळख दाखवली असेल." ती स्वत्:लाच मोठ्याने म्हणाली. तिने सरळ चालायला सुरुवात केली. सावित्रीबाई फ़ुले महिला आश्रमाकडे.
|
Abhijat
| |
| Friday, June 22, 2007 - 4:46 am: |
|
|
गोगटे कॉलेज, मारूती मंदिर, उद्यम नगर! नंदिनीताई, माझ्या जवळपास १७-१८ वर्षअंपूर्वीच्या सा-या आठवणी जाग्या झाल्या. तुम्ही रत्नागिरीच्या असताव काय?
|
सरस्वतीला त्या हॉस्टेलमधे आरामात प्रवेश मिळाला. गोर्याशा, बुटक्याशा नऊवारी नेसलेल्या लेलेआजी इथल्या प्रमुख होत्या. सरस्वतीने आपली सगळी कहाणी त्याना सांगितली. "हे बघ, तुला इथे रहाय्ला मिळेल. जेवणाचीही सोय होईल. पण तुझ्या शाळेसाठी किंवा अभ्यासासाठी आम्ही काहीही करु शकणार नाही. या आश्रमामधे आम्ही विणकाम, भरतकाम वगरेइ करून ही संस्था चालवतो. तुला इथे काम करावेच लागेल." "पण मला यातलं काही येत नाही. मी शिकून घेईन पण शाळेच्या व्यतिरिक्त हे काम मी करेन. माझ्या शिक्षणासाठी संस्थेने पैसे खर्च करायची गरज नाही, ते मी बघून घेईन, इथे फ़क्त मला रहायला हवे आहे." सरस्वती शांतपणे बोलत होती. लेलेआजी अगदी कौतुकाने तिचा आत्मविश्वास बघत होत्या. कितीतरी जणी यायच्या अशाच. डोळ्यात काहीतरी करायची जिद्द घेऊन. बहुतेक जणी हरवून जायच्या "दुनिया" नावाच्या या जंगलात. मागमूस सुद्धा मिळायचा नाही त्याचा. तशीच ही पण अवघी चौदा वर्षाची. आणि म्हणे माझं मी बघून घेईन. परिस्थितीचे चटके जसे बसायला लागतील तसं हा गोरा रंग पण उतरेल. या डोळ्यातली चमक पण जाईल.. सगळंच हरवेल. लेलेआजीनी सरस्वतीच्या डोक्यावरून हात फ़िरवला. "शाळा सुरू व्हायला अजून पंधरा दिवस आहेत. तवर इथे रहा, इथल्या वातावरणात राहून जर तुला अभ्यास करता येत असेल तर माझं काही म्हणणं नाही. देव तुझं भलं करो." "तो कधीच करणर नाही याची मला खात्री आहे." सरस्वती म्हणाली. "मालती.. मालती.." लेलेआजीनी हाक मारली. एक काळीकुट्ट मुलगी धावत आली. "ही सरस्वती.. आजपासून तुझ्या खोलीमधे राहील. जा गं" महिला आश्रम म्हणजे एक जुनं कौलारू घर होतं. त्यातच मोजून पाच सहा खोल्या होत्या. एका खोलीच पाच किंवा सहा जणी. "ये ना..." मालतीने सरस्वतीचा हात धरत तिला नेलं. माजघरामधे कितीतरी जणी विणकाम करत बसल्या होत्या. शिवण मशीनीचा एक सलग ताल सुरूच होता. " ही बघा, नवीन मुलगी.." कुणीही मान वर करून तिच्याक्डे पाहिलं नाही. "नमस्ते,," सरस्वती म्हणाली. शेवटी एका बाईने तिच्याकडे पाहिलं, असेल साधारण पस्तिशीची. "छ्य्या.. ही काय कामाची. लहान आहे अजून. त्या थेरडीला म्हणावं जरातरी पिकलेला माल घेत जा. मजा येत नाही.." सगळ्याजणी हसल्या. ती बाई काय बोलली सरस्वतीला समजलेच नाही, तिने मालतीकडे पाहिलं. मालतीने तिला निघायची खूण केली. खोलीमधे सुदैवाने कुणीच नव्हतं. एका कोपर्यात सरस्वतीने गाठोडं ठेवलं. "काय म्हणाल्या त्या काकू?" तिने विचारलं. "ती.. काकू नाय... रंजना आहे. इथली खूप जुनी बाई आहे. अजिबात चांगली नाय. मला आवडत नाय ती. मी काली.. म्हनुन मला सारखी चिवडत असते..." "चिडवत असते, " "काय?" "चिडवत असती.. चिवडणे म्हणजे कुस्करणे..." "बाय.. तू तर आज्जीसारखा बोलतस." "मग.. बामणाची आहे मी, तू कितवीला आहेस?" "मी नाय जात शालंत, तू जातंस?" "हो, यंदा नववीला जाईन. इथे रत्नागिरीत चांगला शाळा कुठची आहे? मला लवकरच प्रवेश घ्यायला लागेल." "मग तू काम केव्हा करनार? आणि अभ्यास..." सरस्वती हसली. "दोन्ही आरामात होऊन जाईल, आधी मला सांग इथे रोजचा कार्यक्रम काय असतो?"
|
Jaijuee
| |
| Friday, June 22, 2007 - 12:09 pm: |
|
|
लवकर! लवकर! लवकर! पुढचे भाग येऊ द्यात!
|
छान सुन्दर मस्त अगदि अप्रतिम ए नन्दिनी कथा फ़रच छान पन याच्या पेक्शा जस्त स्तुति मला करता येत नाहि आनि पुन्ह तोच प्रश्न पुढ्चा भाग कधि येनार --- आशुतोष
|
Chyayla
| |
| Monday, June 25, 2007 - 9:16 pm: |
|
|
नन्दिनी कथा छान जमली आहे, नेहमी प्रमाणे प्रत्येक एपिसोड नन्तर एक उत्सुकता लागुन रहातेय.
|
|
|