Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 26, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » निज ज्येष्ठ » काव्यधारा » कविता » Archive through June 26, 2007 « Previous Next »

Psg
Tuesday, June 19, 2007 - 5:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्विनी मस्त :-)

पेशवा- क्या बात है! खूपच छान. इतकं सहज कधीपासून लिहायला लागलास तू? :-)


Bee
Tuesday, June 19, 2007 - 5:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्विनी, पहिले कडवे आवडले.

Asami
Tuesday, June 19, 2007 - 3:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नक्षत्र वैगेरे कही नाही
असली तर तुझ्याच कवितेची धुळ आहे!
जया you scored with last line

Ja_wadekar
Wednesday, June 20, 2007 - 3:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शामली, समुद्र छानच आहे. खुप आवडली.

Swasti
Thursday, June 21, 2007 - 3:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाऊस चालु झाला आहे ... जरा mood बदलण्यासाठी ....



काल पहिला पाऊस पडला
आणि तुझी आठवण झाली

" मला मुंबईचा पाऊस खूप आवडतो .."
माझं बोलणं ऐकुन तु कसे डोळे विस्फ़रायचास
" आणखी कितीशा ठिकाणचा पाऊस बघितला आहेस ?"
खांदे उडवत मोठ्या टेचात विचारायचास .
" आणि मुंबईच्या पावसात आवडण्यासारख आहे काय ,
तुंबलेली गटारं , traffic jam
आणि चालताना सारखा चिखलात पाय "
" अरे साचलेल्या नाही , रिमझिमणार्‍या पाण्याकडे पहावं
traffic jam मध्ये अडकलास तर ढगांवरुन तरंगत जावं "
" वेड लागलय तुला , तुझ्याशी बोलण्यात अर्थ नाही "
काल सौमित्रच्या कविता चाळल्या आणि तुझी आठवण झाली

" अग , काळजी घे आता ", मला विनाकारण ओरडायचास
पाऊस सुरु झाल्यावर तु स्व:तालाही किती जपायचास
कधी म्हणायचास ," तुझ्यासारख वागण जमत नाही "
तुझ्या पाऊस अनुभवायच्या कल्पना मला पटत नाही
मुसळधार पावसात भिजुन मग थंडीत कुडकुडायचं
मुळात पावसात बाहेरच कशाला पडायचं
खिडकीत बसुन वाफाळणारी कॉफ़ी पिण्यासारख दुसरं सुख नाही
काल कोणा दोघांना मनसोक्त भिजत फिरताना पाहिलं आणि तुझी आठवण झाली


इथे मुंबईसारखा पाऊस नाही
तु चिडवणार्‍या सुरात कळवलसं
झिरझिरणार्‍या बर्फ़ाच आवर्जून कौतुक केलसं
कोणाला असा तर कोणाला तसा निसर्ग वेडा करील
म्हणुनच मला पहिल्या पावसाच कवतिक ,
तर तुला snow fall च thrill
हिरवीकंच , ओलीचिंब
सळसळणारी झाडं मला भावतात
खिडकीवर टपटपत सुर धरणारे
पावसाचे थेंब मनाला नादवतात
तुझ्या फोटोतलं थंडगार , पांढरं , निपचित पडलेलं सौन्दर्य तितकस रुचल नाही
काल मातीचा सुगंध आसमंतात दरवळला आणि तुझी आठवण झाली

स्वस्ति जुन २००७



Gargi
Thursday, June 21, 2007 - 4:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


करुन गेला अवखळ वारा
निळसावळं शुभ्र नभाला

कृष्णकाया, घट सावरता
घन दाटलेल्या मेघमाला

मोहविते ओलेती माती
गंधभारल्या देह मनाला

धारा, गारा, पागोळ्यातून
आला पाउस, पाउस आला


Mankya
Friday, June 22, 2007 - 1:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गार्गी .. मस्तच !
गंधभारल्या देह मनाला .. वाह !

माणिक !


Daad
Friday, June 22, 2007 - 2:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गार्गी, वा! आला पाऊस, पाऊस आला.
गंधबारल्या देह्-मनाला, क्या बात है!


Pkarandikar50
Sunday, June 24, 2007 - 3:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली,
'समुद्र' छानच आहे. जी गोष्ट फार आवडते, तीचंच अनुकरण करावसं वाटतं, ह्या न्यायाने मी तुझी कविता [अगदी] थोड्याशा वेगळ्या शब्दात मांडण्याचा एक वेडा वाकडा प्रयत्न करणार आहे. प्लिज रागवायचं नाही.

थोडीशी खळखळ किंवा ओरखडा साधा,
एव्हढाच काय तो आघात तुझ्या झपाट्याचा.
असा मनस्वीपणा क्वचितच कोणी करू धजे.
बेभान, बेफाम, बेफिकिर, बेपर्वा......
ध्यास फक्त काय तो सायुजाचा
कसं कळावं कुणा? कोण तू, मी कोण?
अनादिचा आदि, अनंताचा अंत?
आवेगाचं ओसरणं, अपरिहार्यच...
मग तू तुझ्या वाटेने, मी इथेच.
थोडासा फिस्कटलेला, थोडासा अस्वस्थ..
एव्हढच काय ते, आणि तेही काही क्षणच.
बाकी जिथे होतो, जसा होतो,
तसाच, तिथेच.
पण म्हणून का तू,निष्फळ?
आणि मी अस्खलनीय?

पुन्हा एकदा क्षमा मागतो पण ह्या सुंदर कवितेचं रसग्रहण याच पद्धतीनं करण्याचा मोह नाही आवरला.

बापू





Mankya
Monday, June 25, 2007 - 2:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापू ... केवळ ..... !!
अनादिचा आदि, अनंताचा अंत .. अप्रतिम !

माणिक !


Sarang23
Monday, June 25, 2007 - 6:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

        रांगोळी

आता तिच्या दारापुढे फक्त ठिपके दिसतात
तो प्रत्येक ठिपका तिचा एक बुलंद श्वास असेल बहुदा…
त्याच ठिपक्यांना जगण्याचा एक भाग मानायची ती
ठिपक्यांना सांधणाऱ्या रेषांतून निरागस डोकावायची ती
त्यात भरलेल्या रंगांमधून चंचल अल्लड बागडायची ती
रांगोळीवर ओसंडून वाहणाऱ्या चमकीगत चमकायची ती
नाना कळांनी ती असं रांगोळीभर जगून जायची
यापेक्षा काय मोठं असेल रांगोळीचं देणं?
त्या रांगोळीवर चूकून एकदाच पाय पडला होता
पुढे काय झालं कुणास ठाऊक?
रंग फिकटले, धुसर झाले, पार दिसेनासे झाले
रेषा फक्त निळसर नंतर काळ्या काळ्या झाल्या
नंतर केंव्हा झुळकेसरशी वारा तिला घेऊन गेला
आता अंगण सारवणं तर दूरच,
पाचोळाही अधून मधून वाराच साफ करून जातो
माझ्या डोळ्यांतही आता अजब अंधता उतरलीये
रांगोळी प्रथम दिसते मग रांगोळीत ती दिसते
ती हसल्यासारखं वाटताच पुन्हा रंग धुरकटतात
रेषाही क्षणात विरून जातात.
आणि मग उदास उसासे ऐकू येतात शहरभर
कानठाळ्या बसाव्यात असे ते प्रतिध्वनीत होतात
हृदयभर व्यापून रहातात, खोल खोल रुतत जातात
ठिपक्यांनाच श्वास मानायची ती बहुदा…
आता तिच्या दारापुढे फक्त ठिपके दिसतात.


सारंग


Shyamli
Monday, June 25, 2007 - 6:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापू रागावायच काय त्यात :-)

माझ्याच कवितेला वेगळ्या दृष्टीकोनातून दाखवलत तुम्ही मला, उलट आभारच मानले पाहिजेत मी तुमचे

सारंग ,रांगोळी आवडली
नाना कळांनी ती असं रांगोळीभर जगून जायची
यापेक्षा काय मोठं असेल रांगोळीचं देणं?>>> वा!!!



Mankya
Monday, June 25, 2007 - 6:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंगा ... कविता वाचून झाल्यावर ठिपकेच दिसले दोस्त ! थेट आत उतरली रे !
रेषा फक्त निळसर नंतर काळ्या काळ्या झाल्या .. अगदी तंतोतंत !
आता कुठलीही रांगोळी पाहिली तर हेच आठवेल बघ !
खूप आवडली ' रांगोळी ' !!

माणिक !


Vaibhav_joshi
Monday, June 25, 2007 - 6:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पेशवा ... तुमची कविता आवडली

बापू ... सही आहे . welcome back

सारंग ... रांगोळी आवडली .
माझ्या डोळ्यांतही आता अजब अंधता उतरलीये
रांगोळी प्रथम दिसते मग रांगोळीत ती दिसते

सही आहे


Jo_s
Monday, June 25, 2007 - 6:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग
शहारा आला रांगोळी वाचताना
सुंदर


Swaatee_ambole
Monday, June 25, 2007 - 2:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग, रांगोळी सुंदर आहे.

Daad
Monday, June 25, 2007 - 11:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग, रांगोळी छान उतरलीये.

Zelam
Tuesday, June 26, 2007 - 2:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग, रांगोळी खूप आवडली

Devdattag
Tuesday, June 26, 2007 - 2:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग, रांगोळी सुरेख रे.

Pkarandikar50
Tuesday, June 26, 2007 - 4:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग,
रांगोळी खूप आवडली.
बापू





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators