|
Jaijuee
| |
| Saturday, June 16, 2007 - 2:08 pm: |
| 
|
"अगं रडतेस काय अशी बच्चा? Angioplastyच आहे ना? महिन्याभरात बरा होतो की नाही बघ!" ईश्वरी - किती शान्त राहू शकतात पप्पापण? मला नाही जमणार असं वादळाच्या कुशीतही विजयगीत गायला! लहानपणापासूनच माझं नि माझ्या पप्पांच गुळपीठ होतं. दादा नेहमीच म्हणायचा ईशूच पपांची जास्त लाडकी आहे! कसलीही आनंदाची गोष्ट, मैत्रिणींमधले रुसवे फ़ुगवे, काँलेजच्या हकिकती मी पप्पांनाच आधी येऊन सांगत असे. पप्पांनीच मला सायकल चालवायला शिकवली होती नि तेच आले होते इंजिनिअरिंग काँलेजला सोडायला. आई नको नको म्हणत असतना पप्पांनीच आपल्यासाठी मोटरसायकल आणून दिली होती. मेकच्या अखिलेशचा आपल्याशी बोलण्याचा पहिला प्रयत्न ते अगदी त्याने प्रपोज करणं, सगळं सगळं आपण पप्पांशीच शेअर केले होते. आणि असे आपले लाडके पप्पा आजरी? छे ! आत्ताच तर कुठे काँलेज संपून नोकरी सुरु झालीये पुण्यातल्या नावजलेल्या मल्टिनँशनलमध्ये सन्गणक तंत्रज्ञ म्हणून. अखिलेशशी लग्नही ह्या डिसेंबरात होणारं आहे. आणि त्यात काय हे मध्येच? कित्ती कित्ती मज्जा करायची होती पप्पांबरोबर? आत्ताच तर रिटायर झाले ना पप्पा! आपण आणि दादाने झक्कास प्लान ठरवलेला की येत्या समरमध्ये आपण आणि आई - पप्पांना दादाकडे घेऊन जायचे नि लग्नाआधी एकत्र धमाल करायची ! काही तरी व्हायला हवं. दादालाही बोलावून घ्यावं का USहून ? तसा अक्की आहेच की सोबत. माझे पप्पा बरे होण्यासाठी मीच काही तरी करते! क्रमश:
|
Jaijuee
| |
| Saturday, June 16, 2007 - 4:02 pm: |
| 
|
अखिलेश - कोणी काही का म्हणेना? मी ईश्वरीशीच लग्न करणार आहे. एवढा जबर धक्का बसलाय तिला. मला खात्री आहे माझं प्रेम नक्कीच तिला ह्या सगळ्यातून बाहेर काढेल. काँलेजमध्ये बाईकवरून शिरताना ईशूला पाहिले नि एकदम क्लिक झाली. पण आम्ही पडलो तूप मीठ वरण भात! ती कोका कोला सारखी रसरशीतपणे जगणारी तर आम्ही ठन्डे लिंबूसरबत, आपण बरं की आपलं काम बरं types! ह्या भन्नाटच्या खिजगणतीत तरी येऊ की नाही हाच प्रश्न! ईशू इतर मुलींसारखी नाहीच, एकदम राँकेट काम. तिच्या आजूबाजूला घुटमळताना तिनेच हटकलं आपल्याला. हळू हळू ओळख वाढत गेली नी ईशू माझ्या मनात आणि घरातही विरघळत गेली. तिचा स्वभावच एकदम मोकळा, फुकटचं लाजणं नाही. आगाऊ नखरे नाहीत. कुठचही काम एकदा ठरवलं की सगळे निर्णय घेऊन काम करून मोकळीदेखिल! आमच्या घरालाही तिच्या उत्साहाने भिजवून टाकलं की तिने. जेवढा स्वत:च्या पप्पांवर जीव जडलेला, तेवढीच मझ्या आई बाबांशीही नाळ जुळलेली. उगाच का त्यांचा माझ्या ह्या निर्णयाला पाठिंबा आहे! लग्न ठरल्यावर सगळे "अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा शोभून दिसतो हो!" म्हणत होते आणि आता तीच दुनियाँ तिला वेडसर म्हणते, म्हणे ना का! मी समजू शकतो तिची अवस्था. माझ्या जीवाभावाच्या व्यक्तीचं असं काही झालं तर ते दु:ख मी कसं जिरवलं असतं? त्यादिवशी किती रडत होती ती? "माझ्यामुळेच झालय हे सगळं, मीच दोषी आहे रे!" थरथरत होती. तिच्या देहबोलीतूनच तिचं तुटलेपणं जाणवतं होतं. माझ्या ह्या तुटलेल्या तार्याचं मीच आत्ता आभाळ झालो नाही तर बाकीचे अशनी म्हणून हिणवतील ना तिला? मी माझ्या विचारांवर ठाम आहे. तिच्यासोबतच आयुष्य फुलवण्याचं वचन दिलयं मी स्वत:ला! तिला तिच्या दु:खात होरपळत एकटं सोडून मी जाऊच शकत नाही! ठरल्या दिवशी, ठरल्या मुहुर्तावरच लग्न होईल आमचे. क्रमश:
|
Sneha21
| |
| Sunday, June 17, 2007 - 6:36 am: |
| 
|
जाईजुई, फ़ारच छान सुरुवात ज़्हाली आहे आता पुढ्ची पोस्ट कधी?
|
Zakasrao
| |
| Monday, June 18, 2007 - 6:09 am: |
| 
|
माझ्या ह्या तुटलेल्या तार्याचं मीच आत्ता आभाळ झालो नाही तर बाकीचे अशनी म्हणून हिणवतील ना तिला>>>> मला नाही जमणार असं वादळाच्या कुशीतही विजयगीत गायला>>>>> मान गये यार! ताकद आहे तुमच्या लेखणीत. पुढचे भाग टाका लवकर.
|
Interesting! जाईजुई तुमची भाषा, विषय आणि वेग सगळं छान आहे. लिहीत रहा.
|
Swa_26
| |
| Monday, June 18, 2007 - 9:17 am: |
| 
|
जाईजुई, खरंच खूप छान शैली आहे तुमची... keep it up !!!
|
Jaijuee
| |
| Monday, June 18, 2007 - 4:31 pm: |
| 
|
आई - काय पाप केलय मी की मला अशी शिक्षा मिळावी? ह्या जगात किती जणांना हृदयविकार होतात, अगदी २ -३ झटके येऊनही माणसं त्यांच्या मुला-बाळांचे भरले संसार पाहून, नातवंडं खेळवून जातात. ईशूच्या पप्पांना ही संधीच नाकारली दैवाने! आयुष्यभर कष्ट केले आणि आता त्या कष्टांची फ़ळं चाखायची वेळ आली तेंव्हा कर्माचे उलटे फासे...! मुलांवर भारी जीव, त्यांचं शिक्षण, आजारपणं सगळं काही समरसून केले ह्यांनी! दादाला परदेशात चांगली संधी मिळली तेंव्हा म्हणाले "रतन, आपल्या पिलांची झेप आपल्या अवकाशाबहेर पोहोचली गं! आपल्याकडे देण्यासारखं होतं ते सगळं आपण दिलं आणि आपल्या मुलांनी त्याचं सोनं केलं. आता माझ्या बच्चाचं लग्न लागलं की माझ्या सुखाचा पेला भरला" अहो, तुमच्या सुखाचा पेला आज पुरेपूर भरणार आहे. पण ते पहायला तुम्ही कुठे आहात? का भरवसा ठेवला आपण त्या डॉक्टरवर? माझे भाऊ म्हणाले पुण्यात या, तिथे सेकंड ओपिनीअन घेऊ. दादानेही विचरलं की तिकडेच USला करू या का उपचार? ईशूचा मात्र हट्ट, पप्पांसाठी आपण मुम्बईचे ख्यातनाम हार्टस्पेश्यालिस्ट करू. तुम्ही तुमच्या लेकीचा हट्ट पूर्ण केलात. त्या डॉक्टरांनी आपल्या बच्चाची तुमच्यावरची आंधळी माया पाहिली आणि माझ्या लेकाच्या अकाऊंटमधली माया पाहिली. गरज नसताना, तुमचं हृदय ताण सहन करू शकत नाही हे रिपोर्टमधून कळत असूनही, तुम्हाला बायपास करायाला सांगितली. एवढा मोठा तज्ञ, त्याच्यापेक्षा का आपल्याला कळतयं? असं म्हणून विश्वास ठेवला, तिथेच घात झाला हो! आपण जी सच्चेपणाची मूल्यं आयुष्यभर जपली आपल्या मुलांमध्ये रुजवली, ती त्या डॉक्टरने केव्हाच विकायला काढली आहेत हे कुठे ठावूक होतं? ऑपरेशन टेबलवरच तुम्ही आमची साथ सोडून गेलात. त्या मेल्या डॉक्टराला त्याची फी मिळाली पण माझी मात्र सारी पुंजी लुटली गेली. गेली तीस वर्षं विश्वासाने ज्याच्यासोबतीने डोळे मिटून चालले, त्यालाच आज नजर अधू झाल्यावर हिरावून नेलं माझ्यापासून? एवढी वर्षं श्रद्धेने पुजलेला वड शेवटी कामी आलाच नाही, माझा सत्यवान कधी गेला ते मला कळलंच नाही. माझी हळवी पोरं सहन नाही करू शकली हे! तिचे पप्पा गेल्याचं कळलं तेंव्हा वेडीपिशी झाली. आणि कारण कळलं तेंव्हा अगदी आकसून गेली. आपल्या हट्टामूळेच पप्पा गेले असं पक्कं घेतलयं तिच्या मनाने. कधी तासंतास एकटक पहातं रहायची, तर कधी मीच पप्पांना मारले म्हणून स्वत:ला मारतं सुटायची. मी हट्ट केला नसता तर अजूनही पप्पा इथे असते म्हणत रडायची. वर्षभरापूर्वी छातीतल्या एका छोट्या कळीपासून सुरू झालेल्या उलाढालींनंतर आजपर्यन्त काय काय होऊन गेलय! कोणाला न ओळखणारी माझी पोरं आत्ता तिच्या अखिलेशला ओळख दाखवतेय. अखिलेश आणि त्याच्या घरचे मात्र मोठ्या मनाचे! मी आणि दादाने त्यांना कळवलं की ईशूच्या जबाबदारीतून आम्ही अखिलेशला मोकळं करत आहोत. अखिलेशने आणि त्यांनी मानलच नाही ते! आखिलेश गेलं वर्षभर येत राहिला. समईसारखा सौम्यपणे तिच्या आजूबाजूला वावरत राहिला. आम्हा सगळ्यांपसून दूर गेलेली बच्चू थोडीतरी माणसात येतेय आता. तिचा आत्मविश्वास परत आलाय त्याच्या प्रेमामुळे. एकदा वाटायचं करू देत की ह्याला लग्न! लग्न झाल्यानंतर त्याला काही झालं असतं तर संभाळलचं असतं ना माझ्या लेकीने? आणि माझ्या पश्चात कोण पाहीलं हिच्याकडे? पण मग स्वार्थीपणाची बोच लागून रहायची नि आपण अखिलेशच्या घरी कळवायचो कि त्याला पाठवू नका, हे लग्न मोडलय असं समजा! शेवटी त्यांनी स्वच्छ शब्दात कळवलं की लग्न ठरल्याप्रमाणे, ठरल्या वेळीच म्हणजे आजच होणार! क्रमश:
|
अस्मिता, मस्तचं आहे गं........... कुठे आहेस? waiting for next post
|
Jaijuee
| |
| Wednesday, June 20, 2007 - 2:41 pm: |
| 
|
"तदेव लग्नं, सुखिनं तदेव, ताराबलं, चंद्रबलं तदेव..., शुभमंगल सावधान!" ईश्वरीची आई तिच्या शेजारीच ऊभी होती. लग्नाचे सारे विधी दादाने यथासांग पार पाडले. कार्यात सगळ्यांनाच राहून राहून पप्पांची आठवण येत होती. ईशू रिसेप्शनसाठी कपडे बदलायला गेली एवढ्यात दादाचा मोबाईल वाजला. काही क्षण बोलल्यानंतर तो अखिलेशजवळ गेला. त्याच्या डोळ्यातही तोच प्रश्न "तिला आत्ता सांगयचं? की उगाच खपल्या काढल्या जातील? " बातमी त्यालाही कळलीच होती. हॉलमध्ये ज्यांना माहिती होती त्यांच्यात देखिल कूजबूज सुरू झाली. शेवटी अखिलेशने तिला सांगायचं ठरवलं. "ईशू, ऐकतेस का? ते प्रथितयश डॉक्टर ऑपरेशन थिएटरमध्येच ऑपरेशन करता करता हार्ट अटॅकने वारले" ईशूने शांतपणे ऐकलं आणि म्हणाली, "That's my wedding gift!" आणि ती स्टेजवर जाण्यासाठी वळली! समाप्त
|
Manutai
| |
| Thursday, June 21, 2007 - 7:24 am: |
| 
|
वाईट शेवट... वाईट शेवट... कुणाचा म्रुत्यु कुणास समाधान देणारा कसा नायिका खलनायिका वाटत आहे.
|
Jaijuee
| |
| Thursday, June 21, 2007 - 9:30 am: |
| 
|
कोणीतरी पैश्यांसाठी तिच्यापासून तिचे बाबा हिरावून घेतले नाहीत का? खरं तरं मेडिकल प्रोफेशनमध्ये एकाद्याला असं फसवून पैसे उकळण्याचे प्रमाण बरचं आहे. कोणाचं मूल जातं तर कोणाचा बाप. ज्याचं जळतं त्यालाच कळतं ! एक सामान्य माणूस काय करू शकतो ह्या विरुद्ध? त्या मुलीला वेड लागलं ह्या फसवणुकीने पण तिने स्वत: क्रूरपणे डॉक्टरला मारलं नाही! लग्न ह्या आयुष्यातल्या सगळ्यात आनंदाच्या प्रसंगी तिचे बाबा तिच्याजवळ नाहीत, हा तिच्यावरचा अन्याय नाही का? लग्नाच्या दिवशी डॉक्टर हार्ट अटॅकने जावा अशी इच्छा काही तिने व्यक्त केली नाही आहे. खरे तर डॉक्टरच्या मृत्यूमध्ये ती स्वत:चा सूड शोधत नाहिये, पण ज्या प्रकारे आणि ज्यावेळी ही घटना घडली त्यातून नियतीने डॉक्टरच्या कर्माचं फळ त्याच्या पदरी घातलं. ईश्वरीची भावना फक्त आपल्याला न्याय मिळाल्याची आहे. मंडळी, प्रतिक्रीयांबद्दल आभार. पहिलाच प्रयत्न असल्याने चु. भु. द्या. घ्या.! जेंव्हा दाद किंवा सुमॉ एवढ्या क्षमतेने लिहिता येईल तेंव्हा खरं!
|
Arc
| |
| Thursday, June 21, 2007 - 10:09 am: |
| 
|
सुरवात छान आहे.शेवट मात्र काहीतरीच वाटतो.जर तीचि भावना जाइ म्हणते तशि आहे,तर ती मुळीच नीट पोहचत नाही.
|
Zakasrao
| |
| Thursday, June 21, 2007 - 11:44 am: |
| 
|
जाइ जुइ छान लिहिलित पण शेवट जरा गुंडाळल्यासारखा वाटला म्हणुन वरती अशा प्रतिक्रिया आल्या. जर त्या डॉ. ची प्रतिमा थोडी अजुन रंगवली असती तर कदाचित असे वाटले नसते. पहिला प्रयत्न असुनहि पुर्वार्ध खुप छान लिहिला आहे तुम्ही. लिहित रहा.
|
Jaijuee
| |
| Thursday, June 21, 2007 - 12:02 pm: |
| 
|
शेवट छोटासाच लिहिला कारण तो कोणा एकाच्या भावनांवर लिहायचा नव्हता फ़क्त तिची विखारी प्रतिक्रीया लक्षात रहावी अशी इच्छा होती आणि डॉ. बद्दल खोलात गेले नाही कारण मग खर्या एखाद्या डॉ.शी साम्यस्थळ सापडून माफ़ी वै. मागावी लागली असती. पण ह्या सुचनांचा पुढच्या लेखनात नक्की वापर करेन.
|
Preetib
| |
| Thursday, June 21, 2007 - 5:13 pm: |
| 
|
Khup chan goshta aahe he..
|
तो डॉक्टर नैसर्गिक कारणाने, ते ही शस्त्रक्रिया करताना (almost ' वीरमरणच!!) मरण्यापेक्षा अश्याच एखाद्या केसमधे पकडला गेला / त्यामुळे मेला असता तर तिच्या प्रतिक्रियेलाही जरा ' काव्यात्म न्याय' मिळाला असता का?
|
Daad
| |
| Thursday, June 21, 2007 - 11:51 pm: |
| 
|
जाईजुई, तुझ्या लेखणीत सामर्थ्य आहे. माझ्या किंवा कुणाच्याच सामर्थ्याचा विचार नको. एक, एक प्रसंग, माणसं ह्यांची गुंफण घालण्याची जाण आहे. म्हणूनच सुरूवात, मध्य छान वाटला. पण.... कथा शेवटाला नेण्यासाठी थोड पेशन्स हवा होता गं. राग मानू नकोस. शिजेपर्यंत धीर धरवतो... निवेपर्यंत नाही म्हणतात ना, तस्सं. मला वाटतय की कथेला फुलण्यासाठी, त्यातली इशू आमच्यापर्यंत पूर्णत: पोचण्यासाठी जो फुलोरा हवा होता, तिथेच तू बांध घातलास. स्वत्:ला न बांधता लिही. अमुक एक इतकीच लांबी हवी वगैरे बंधनं पहिल्या लिहिण्यात नको. स्वस्थपणे लिहून मग स्वस्थपणे वाच. तुझं तुलाच कुठे काटायचं, कुठे अजून वहावायचं ते कळेल. पण लिहिण्यात बंध आणु नकोस. तुझी शैली छान आहे तेव्हा लिहीत रहा, मन सोडून लिहि आणि मगच त्याकडे अलिप्ततेनं बघ... (परत एकदा सांगते, राग मानू नकोस)
|
Bee
| |
| Friday, June 22, 2007 - 5:19 am: |
| 
|
जाईजुई, पहिला प्रयत्न खूप चांगला आहे. कथेची शैली, आकृतीबंध ह्यात कुठेच कमी नाही पडली. फ़क्त डॉक्टरांचा घोटाळा शेवटपर्यंत लक्षात येत नाही म्हणून शेवट असा कसा झाला असे वाटते.. पण शीर्षकाला मात्र साजेसा.. अखिलेशचे पात्र खूप आवडले..
|
जाईजुई, छानंय गोष्ट. तुझ्या मनात खरंच कोणीतरी प्रथितयश डॉक्टर होता असं दिसंतय. शेवट जरा wishful thinking category तला झालाय खरा. पण मला काही odd नाही वाटला. तू दिलेस ते स्पष्टीकरणही पटले. हे पूर्णपणे ते पात्र लेखकासमोर कसे व्यक्त होतेय त्यावर अवलंबून आहे. लिहीत रहा.
|
Jaijuee
| |
| Friday, June 22, 2007 - 9:44 am: |
| 
|
धन्यवाद! आणि "दाद" राग कशाला येईल? प्रतिक्रीयांचा ज्यांना राग येतो अशांनी आरसा पहाणं देखिल सोडावं! नाही का? अजित, माझा पहिला वाचक पण हेच म्हणाला की आधी लिही, पुन्हा वाच आणि मग पोस्ट कर. पुढच्यावेळी हे निश्चितच!
|
|
|