|
Mankya
| |
| Tuesday, June 19, 2007 - 6:06 am: |
| 
|
जबरदस्त रे मित्रांनो ! गिरी .. खूपच आवडली यार ' जन्म हवा ' ! माणिक !
|
Jagu
| |
| Tuesday, June 19, 2007 - 6:59 am: |
| 
|
गिरी आज कसा मुड आहे तुझा? कालच्या रचना छानच होत्या. देव, श्यामली, संघमित्र, माणिक, प्रिती, सतिशजी, सुधिर, अरे काय सुंदर बरसताय. चालू राहू द्या.
|
Jagu
| |
| Tuesday, June 19, 2007 - 7:23 am: |
| 
|
आभाळ दाटून आल की मनही भरुन येत होताच स्पर्श सरींचा विश्वात तुझ्या धुंद होत.
|
तुझ्या येण्याने शांत डोहात आज अचानक एक तरंग उठला; जणु मृत ओंडक्याला हळुच पालवीचा नवा कोंब फ़ुटला... रुप
|
रुपाली.. मर्त्य ओंडक्याला ??? I think मृत म्हणायचय तुला
|
देवा, मर्त्य चा अर्थ पण मृत असाच असतो ना??? Atleast आत्तापर्यंत तरी मी हेच समजत होते... Plz expl...
|
मर्त्य.. जो चीरंजीव नाही, अमर नाही.. कविधावि रूप मृत.. चा अर्थ मेलेला.. कभूधावि रूप..
|
Aaftaab
| |
| Tuesday, June 19, 2007 - 9:56 am: |
| 
|
आता येतो मग येतो, फक्त आश्वासने देतो जसा येतो अवकाळी, तसा अचानक जातो आतुरते देहलता, चिम्ब भेटीसाठी एका असा पाऊस स्वच्छंदी, जसा प्रियतम सखा
|
Cool
| |
| Wednesday, June 20, 2007 - 5:51 am: |
| 
|
बरसला जो एक थेंब आरक्त तव ओठांवरी मत्सर तयाचा अन् त्याचाच वाटे हेवा अलगद मग ओघळत अंगांग चुंबीत तो, असलाच क्षणभंगूर मजलाही जन्म हवा >> वा गिरी.. गिरी परतला, बघुन आनंद झाला, अजुन येउ देत रे
|
Grace
| |
| Wednesday, June 20, 2007 - 9:39 am: |
| 
|
मित्रांनो, कुणी मला सांगु शकाल का? "यमुनेच्या तिरी काल पाहिला हरि" हि गवळण कुणी लिहिली आहे. कारण मी एका व्यक्तिस जाणतो जो असा दावा करतो कि हि त्याने लिहिली आहे.
|
Pujarins
| |
| Thursday, June 21, 2007 - 10:14 am: |
| 
|
भिवविती सान्जराणी विश्रब्ध ज्योतीचा भाव ग़गनाच्या काळाईमधे बुडलेला चांदीचा पाय
|
रुपाली चारोळी छान आहे. पण ओंडका हा म्रुतच असतो ना. आफताब, सुरेख. यावर अर्धवट उत्तर लिहीले होते. हरवले. पुजारी झेपले नाही.
|
R_joshi
| |
| Friday, June 22, 2007 - 4:26 am: |
| 
|
मुंबईत पावसाचा पत्ता नाहि,पण झुळुकेवर तर वादळी बरसात चालु आहे. गिरी 'जन्म हवा' छानच माणिक, देवा,रुप,आफताब....सगळेच उत्तम पुजारी मलाहि अर्थ नाहि कळला.जरा समजवाल
|
Pujarins
| |
| Friday, June 22, 2007 - 5:49 am: |
| 
|
ही थोडी abstract प्रकारची चारोळी म्हणावी लागेल. यात एकास एक असा अर्थ तर असतोच पण त्यापलिकडेही अनेक अर्थ ध्वनित करण्याची क्षमता असते. हा एक तसाच अल्प प्रयत्न.. संध्याकाळ दाटून आली असता..ज्योतीचा प्रकाश त्याला पूर्णांशानं पिटाळून लावू शकत नाही..एखाद्या मोकळ्या आभाळाखाली तर ज्योत विश्रब्धच होईल... चांदी नेहमीच शुध्दता आणि प्रकशाचे प्रतिक मानली गेलीय परंतू यात चांदीचा पाय असा शब्द आलाय. अंधाराच्या श्लेश्मल पडद्याचा फ़ास होत असताना..संध्याकाळचे कैदी झालेले थोडेफ़ार किरण मार्गक्रमण करताना त्या प्रकाशात चांदीचा पाय चमकतो, त्याच अस्तित्व जाणवत पण त्याचवेळी तो अंधारात बुडलेला असतो दाट अंधारात... ज्योत म्हणजे आपले मन इथे अभिप्रेत आहे..आणि चांदीचा पाय हे एक कोणताही दृश्य अवयव..पायच..दु:खाची छाया जेव्हा दाटून येते तेव्हा ज्योतीसारखच मन विखरुन जात त्याला काहीच सुचत नाही आणि प्रकाश, hope of ray , जो चांदीच्या पायाच्या रुपात प्रतिमित केलाय, तो पण निद्रिस्त नक्षत्रासारखा जडशीळ होउन फ़क्त चमकतो... शरीराचा वरचा भाग, विशेषत: मन, दु:खात बुडून गेलेलेच असते..पण "पायातले मन" अस्तित्वात असते आणि त्याचा आशावाद जागाच असतो.. पण प्रश्न असा असतो की ते या अंधारातून बाहेर येइल का?
|
R_joshi
| |
| Saturday, June 23, 2007 - 8:46 am: |
| 
|
पुजारी अर्थ कळायला अजुन थोडावेळ लागेल पण कळेल. असो झुळकेची वादळवाट हि मुबंईतल्या पावसासारखीच गायब झाली. गेले कोठे सर्वजण
|
Desh_ks
| |
| Monday, June 25, 2007 - 5:28 am: |
| 
|
पावसाची ही संततधार अखंड बरसत राही, खूप खूप वाट पाहिली, म्हणून तर नाही? वाट पाहता पाहता हे मन देखील थकून गेलं 'येतोय् की नाही कुणास ठाऊक' एकदा असं सुद्धा वाटून गेलं. पण मग असा आला बरसत आवेगानं अनिवार जीवनाशी त्याचं नातं तर शंका-कुशंकांच्या पार! -सतीश
|
Jo_s
| |
| Monday, June 25, 2007 - 5:49 am: |
| 
|
सतीश छान आहे झुळूक वादळ इथलं पडलय थंड झुळूकही झाल्ये गार यावच लागेल आता जरा शब्दांना लावून धार
|
Kalpak
| |
| Monday, June 25, 2007 - 6:02 am: |
| 
|
सगळेच पुजारी काय म्हणतात ते मला कधीच का कळत नाही? 
|
Shyamli
| |
| Monday, June 25, 2007 - 11:36 am: |
| 
|
मौन म्हणते थांब आता शब्द तुझे झाले पुरे बोलणे त्याचे खरे कि थांबणे माझे खरे?
|
मानतो मी शब्द माझे बोलती नाही पुरे पण सांग सखे त्यांच्याविना का अर्थही तुजला उरे
|
|
|