झेलम, सही कथा. अतिशय आवडली.
|
झेलम सही, पण शेवट अपेक्षितच होता मलासुद्धा.... पण एकंदर स्टाईल आवडली...
|
Zakasrao
| |
| Tuesday, June 19, 2007 - 8:06 am: |
| 
|
सहि रे! आवडली. मला वाटल होत कि ती त्याला नकार देते म्हणुन त्याने आत्महत्या केली. नंतर देवयानी हे नाव आणि तिच नरेशन आल त्यावेळी थोडा अंदाज आला शेवट कसा असेल ते पण तरीही खिळवुन ठेवण्यात यशस्वी. मस्त!
|
Bee
| |
| Tuesday, June 19, 2007 - 8:51 am: |
| 
|
झेलम, छान जमली कथा.
|
Sush
| |
| Tuesday, June 19, 2007 - 9:06 am: |
| 
|
सुन्दर कथा. प्रत्येकाच्या मनातिल भावना छान मान्डल्या आहेत. प्रत्येकाचे views वेगळे मान्डल्याने प्रत्येक पात्र clear होते. वाचताना चित्र डोळ्यापुढे उभे रहाते. खरच सुन्दर. पुढिल लेखनासाठि शुभेच्छा.
|
जबरदस्त अनुभव!..झेलम कथा जाम आवडली.
|
Daad
| |
| Tuesday, June 19, 2007 - 11:57 am: |
| 
|
झेलम, आईशप्पथ, कसली जबरदस्त शैली आहे. style आवडली. प्रत्येकाच्या दृष्टीकोनातून उलगडणारी कथा. भाषा, मांडणी दोन्ही सुरेख. लिहित रहा, छान लिहितेस.
|
Zelam
| |
| Tuesday, June 19, 2007 - 12:39 pm: |
| 
|
सगळ्यांना अगदी सगळ्यांनाच अनेक धन्यवाद. कथा वाचल्याबद्दल आणि लगेच अभिप्राय लिहिल्याबद्दल. राशोमान ची आठवण येणं अगदी स्वाभाविक आहे कारण कथा लिहिताना मला खरं तर राशोमान effect वरच लिहायची होती. नावही तेच ठेवणार होते कथेचं. पण नंतर कहाणीतली पात्रं अशी वागत गेली की काही वेगळंच रसायन तयार झालं आणि राशोमान मागे पडलं. शेवट थोडा अपेक्षीत वाटला ना? देवयानीच्या narration च्या वेळेस? एकदम कबूल. मलाही लिहीताना जाणवलं ते. पण थोडी जरी उत्कंठा टिकवण्यात मी यशस्वी ठरले असले तर प्रयत्न जरा तरी जमला म्हणायचा. या कथेतून एवढंच सांगायचं होतं की nobody is perfect . स्वभावाला gray shades असू शकतात. जसं अश्विनचं शशांकशी काही बाबतीतलं वागणं बाकी कुणालाच कळलेलं नाही. त्यामुळे तो इतरांना सर्वगुणसंपन्न वाटला तरी प्रत्यक्षात असेल असं नाही. त्याचा हाच धूर्तपणा दिसतो देवयानीशी contact करून आरतीशी in touch रहाण्याच्या वेळेस. पण त्याचबरोबर तो कविमनाचा देखील आहे त्यामुळे कुठेतरी आरती त्याला वेगळी वाटते, आवडून जाते. देवयानीलाही आरती यायला हवीय ते प्रामुख्याने तिचा एकटं जाण्याचा problem सुटावा म्हणून. पण अश्विनने आरतीला एकटं वाटू नये म्हणून तिचा वापर केलेला मात्र तिला सहन झालेला नाही. शशांकला देवयानी आवडतेच आणि तिच्याशी सूत जुळवायचा देखील विचार आहे त्याचा पण महिनाभर तिची वाट पाहूनही काहीच न झाल्याने बहुतेक त्याचा interest कमी होत असावा. अर्थात हे मला अभिप्रेत होतं. कथेतील पात्रांचा जसा स्वतःचा वेगळा दृष्टीकोन आहे तसा ती वाचणार्यांचा देखील. thanks once again . आपले बरे-वाईट प्रामाणिक अभिप्राय नेहमीच अपेक्षित आहेत.
|
झेलम, सुंदर जमली आहे गोष्ट. आणि त्यावरची तुझी टिप्पणी पण आवडली. एकाच माणसात अनेक भिन्न व्यक्तिमत्वं नांदताना दिसणं आणि रशमोन effect हे नित्याचेच अनुभव आहेत. त्यांना गोष्टीच्या साच्यात बसवायला मस्त जमलं तुला. लिहीत रहा.
|
Aditih
| |
| Tuesday, June 19, 2007 - 3:09 pm: |
| 
|
झेलम.... एकदम मस्त... खुपच आवडली कथा... आणि हो उत्कंठा टिकली गं शेवट्पर्यंत...
|
excellent!!मस्त झालीय कथा! झेलम, उत्सुकता ताणून धरण्यात यश नक्कीच आलय तुला 
|
शेवट expected होता पण मस्तं लिहिली आहेस . 
|
Fadke
| |
| Tuesday, June 19, 2007 - 5:54 pm: |
| 
|
Kathe avadli. Atopshir ahe jyast palhal nahi. Katheche nav sadharan vatate.
|
Savani
| |
| Tuesday, June 19, 2007 - 7:45 pm: |
| 
|
झेलम, खूपच छान लिहिलियेस कथा. अगदी खिळवुन ठेवलं.
|
Disha013
| |
| Tuesday, June 19, 2007 - 7:52 pm: |
| 
|
ज़ेलम,खुप छान शैलीत लिहिलस.शेवटाचा अंदाज येवुनहि मस्त वाटली.
|
Mankya
| |
| Wednesday, June 20, 2007 - 1:40 am: |
| 
|
झेलम .. क्लास्SSSS ! मनापासून आवडली ! माणिक !
|
Supermom
| |
| Wednesday, June 20, 2007 - 2:22 am: |
| 
|
मस्त जमलीय गोष्ट झेलम. लगे रहो.
|
Abhi_
| |
| Wednesday, June 20, 2007 - 5:15 am: |
| 
|
झेलम. मस्त जमलीय गोष्ट!!
|
Hems
| |
| Wednesday, June 20, 2007 - 7:09 am: |
| 
|
झेलम, छान लिहिलीस कथा .. सगळ्या पात्रांची व्यक्तिमत्वं स्वतंत्र पणे उभी राहिली आहेत तू निवडलेल्या form मुळे. कथेच्या शेवटाचा अंदाज आला होता तरी वाचत राहावंसं वाटलं !
|
Monakshi
| |
| Wednesday, June 20, 2007 - 7:18 am: |
| 
|
झेलम, just superb कथेचा twist तर खासच आहे. अशा अजून कथांसाठी All the best!!!
|