|
" जियो " च्या प्रतिक्रियांबद्दल सर्वांचेच मनःपूर्वक आभार . स्वाती ... तुझ्या रसग्रहणाबद्दल मी काय बोलणार . बर्याच वेळा तुझं रसग्रहण वाचून कळतं की " अरे आपण असं लिहीलंय होय "
मयूर ... स्वाती म्हणतेय त्या प्रमाणे प्रतिमा शब्दावर घोळ झालेला दिसतोय . मला प्रतिमा म्हणजे उपाधी हेच अपेक्षित होतं . बेसिकली अध्येमध्येच whims ने माणसाला एकदम एकटं व्हावंसं वाटतं आणि आपली worth आपल्या डोळ्यात काय आहे हे शोधावसं वाटतं . तेव्हाचा क्षण टिपण्याचा प्रयत्न केला आहे . आणि बाहेर म्हणजे गावाबाहेर, वस्त्या दूर टाकत जाता जाता तो उलट्कसा आत आत जातो ह्याचं मला नवल वाटलं आणि मग ही कविता लिहीली गेली . बाकी सच्चा कलाकार वगैरे फार मोठे शब्द आहेत . सध्या तो बाजूलाच ठेवूयात . ओढून ताणून कलाकार होता येत किंवा नाही हे , जे कलाकार आहेत तेच सांगू शकतील . त्या वाक्याचा सूर काही आवडला नाही . पण ठीक . बापू .. खूप बरं वाटलं तुम्हांला इथे बघून . विश्लेषण तर नेहेमीप्रमाणे सुंदर केलंच आहे , आता तुमची कविता येऊ द्या शेवटी तुमच्या विश्लेषणातलं एक वाक्य खरं .. " उत्तर काही येवो पण स्वतःला प्रश्न विचारायची व उत्तर स्वीकारायची तयारी हवी " hmmmmmm
|
Shyamli
| |
| Sunday, June 17, 2007 - 11:42 am: |
| 
|
दिनेशदानी माझ्या आकाश या कवितेवर अश्या वेळी समुद्र काय म्हणेल किंवा समुद्राचे काय विचार असतील अशी फर्माईश केली होती. नुकताच इथे 'गोनु' येउन आमच्या इथल्या शांत समुद्रालाही जरासं हलवून गेला माझा हा एक प्रयत्न, अजून कोणी लिहिणार असलात तर नक्कि लिहा, समुद्र तसा माझ्यावर परिणाम होऊ देत नाहीच मी वादळांचा, कित्येक येतात आणि जातात , पण कधीतरी येतच तुझ्यासारखं एखादं वादळ , जे माझ्या अथांगतेला भेदत; बेभान,बेफाम,सगळं पणाला लावून माझ्यात सामावून जाणारं, मग काही वेळासाठी कळत नाही जगाला, कोण मी आणि कोण तू, तुझ्यातला आवेग निवल्यावर तू तुझ्या वाटेनं आणि मी.......... जिथे होतो तिथेच, थोडासा शांत थोडासा अस्वस्थ,थोडा उध्वस्त काही वेळासाठी का होईना, होतो परिणाम माझ्यावरही! श्यामली!
|
Dineshvs
| |
| Sunday, June 17, 2007 - 5:28 pm: |
| 
|
आभार श्यामली. अजुनही लिहु शकशील. रोजच बघत असशील सागर. काय योगायोग आहे बघ. केनयामधली काहि वर्षे सोडली, तर माझे सगळे आयुष्य समुद्राच्या काठी, म्हणजे निदान समुद्राच्या काठच्या गावी गेलय. माझे सगळे जॉब्जही समुद्राच्या काठीच होते. खुप रुपं बघितली त्याची. पण शब्दात नाही पकडता येत मला. म्हणुन तुला सुचवलं.
|
Mankya
| |
| Monday, June 18, 2007 - 12:53 am: |
| 
|
श्यामली .. अखेर कैद केलस तर त्या अथांगतेला शब्दात ! आवडली गं ! माणिक !
|
Jo_s
| |
| Monday, June 18, 2007 - 3:44 am: |
| 
|
व्वा,श्यामली छान जमलाय समुद्र, तू तुझ्या वाटेनं आणि मी.......... अप्रतीम सुधीर
|
स्वाती... मला वाटतेय 'प्रतिमा' ह्या शब्दाच्या दोघांना मानवलेल्या वेगवेगळ्या अर्थामुळे सूर फिस्कटला... अर्थात माझी वेव्हलेंग्थ तुझ्या स्पष्टीकरणाशी जुळली नाही हा माझाच दोष! धन्यवाद वैभवा... तुला नेमकं काय अभिप्रेत होतं ते सांगितलं आहेसच... ओढून ताणून कलाकार होता येत किंवा नाही हे , जे कलाकार आहेत तेच सांगू शकतील 'ओढून ताणून अंतर्मुख होऊन कलेचा जन्म होत नाही' असं म्हटले होते मी. अर्थात मी इतकं possessive विधान करायला नको होतं... बाकी वाक्याचा सूर नकळतेपणाने चुकल्याबद्दल क्षमस्व आणि धन्यवाद पुन्हा एकदा जियो!!
|
श्यामले असा 'समुद्र' आवडला 'काही वेळासाठी का होईना, होतो परिणाम माझ्यावरही! ' वा!! 'परिणाम' शब्दाचा 'परिणाम' अथांग!!!
|
श्यामली.. छान आहे समुद्र..
|
Psg
| |
| Monday, June 18, 2007 - 4:39 am: |
| 
|
वा श्यामली, मस्त कविता..
|
मृदंग चुंबनांनी चिंब झाले अमृताचा थेंब झाले घेता वेढून सखया कंच हिरवा कोंब झाले.. हुरहुरली पंढरीही वाजता मनी मृदंग लाजू-मोहरून आले रुख्मिणी अन पांडुरंग.
|
Mankya
| |
| Monday, June 18, 2007 - 6:11 am: |
| 
|
वाह ...! पहिल्या चार ओळींना दाद शब्दांनी देताच येणार नाही मला ! कंच हिरावा कोंब .. कसल सही वाटतय वाचायला, पून्हा पून्हा वाचतोय ! सुमतीताई .. खूप दिवसांनी आलात पण Entry एकदम जबरदस्त ! माणिक !
|
श्यामली मस्त झालाय गोनूशी संवाद. अशीच एक खूप पूर्वी केलेली कविता आठवली. पूर्ण आठवली तर टाकेन इथे. सुमती क्या बात है! धडाकेबाज पुनरागमन! लिहीत रहा.
|
श्यामली .. आधी म्हटल्याप्रमाणे मस्त उतरलीये कविता . ताई ... मला दोन वेगवेगळ्या कविता वाटल्या . पण विचार करतो . नाहीतर फोन आहेच .
मयूर ... दोनदा " जियो " म्हणालास .. विषय मिटला
|
Shyamli
| |
| Monday, June 18, 2007 - 8:10 am: |
| 
|
धन्यवाद दोस्तहो पोस्ट करणार नव्हतेच, सगळच पकडता नाही आलय,पण गुरुंचा आदेश आणि दिनेशदांनी सुचवल म्हणून लिहिली होती मग ती पोचवायला हवी म्हणून पोस्ट केली. सन्मि, कर ना पोस्ट तुझी कविता,एकावेळी एका विषयावरच्या वेगळ्या वेगळ्या लोकांच्या कविता वाचायला मजा येते
|
Ashwini
| |
| Monday, June 18, 2007 - 11:06 am: |
| 
|
हे माझं वरातीमागून घोडं झालय, पण असो. वैभव, जियो बद्दल सगळ्यांचं म्हणून झालच आहे. मी पण 'मम' म्हणते. श्यामली, छान जमली आहे.
|
भुईभोर पुसून गेलेच ना तळपायावरचे अक्षांश, रेखांश...! विझून गेलाच ना पायखुणांच्या वादळाचा, सारांश...! पुन्हा पुन्हा बजावलं होतं तुला इतकाही जीव जडू नये जमिनीच्या आभाळग्रस्त तुकड्यावर! ज्याची पाळमुळं पोहोचतात विषुववृत्ताला वळसा घालून माणसांच्या काळजापर्यंत... लसलसत्या हिरव्या कोंबांचा असा अट्टाहास आता पुरे! आभाळ बरसल्याचा खोटा ओलसर आभास आता पुरे! हे दु:ख पुन्हा उगवून येण्याआधी घनघोर, आता आपण होऊयात भुईभोर...भुईभोर...!
|
Ashwini
| |
| Monday, June 18, 2007 - 3:27 pm: |
| 
|
हाती येत नाही तो चंद्र आपला नव्हे पण वेड्या मनाला कधी कळेल का हे? आपला मार्ग क्रमत असतात पृथ्वी, सूर्य आणि तारे खुळ्या मनाला मात्र वाटते चंन्द्राभोवतीच फिरतात सारे माझा सूर्य, माझे आकाश माझ्या चंद्रात सामावलेले हे कुठले गुरूत्वाकर्षण, भौतिकाचे नियम इथे हरले
|
Peshawa
| |
| Tuesday, June 19, 2007 - 12:08 am: |
| 
|
तो म्हणला बघ काही शब्द पुंजके ती म्हणे अरे हे तर नक्ष्त्र .... शतकातून एकदाच उगवणारे तो म्हणे शब्दांच्या निव्वळ सुया ती म्हणे वेडा की खुळा माणसातील दगडाला ह्या फ़ोडतील मायेचा पान्हा! तो म्हणे काही सुचत नाही ती म्हणे ही कल्पनाही सहज कुणाला सुचत नाही! तो म्हणे मि चाचपडतोय शब्दावर ती म्हणे पेटी नाहि रे राजा (नाहितर) तुझ्या बोटातील तान, धुंदि चढवेल रागांवर! तो म्हणे अग दगड आहे मी नुस्ता ती म्हणे अरे तुझ्या मुळेच येतात फ़ळाला श्रद्धा! तो म्हणे मौनातच जातो कसा ती म्हणे त्याचाही अर्थ भुरळ घालील मना! तो म्हणे डोळ्यातच तुझ्या नक्षत्र आहे ति म्हणे नक्षत्र वैगेरे कही नाही असली तर तुझ्याच कवितेची धुळ आहे!
|
Daad
| |
| Tuesday, June 19, 2007 - 12:59 am: |
| 
|
श्यामली- तुझा समुद्र वेढून गेला. तू, तुझ्या वाटेनं आणि मी.... वाचली मग मी उरलेली कविता पण मी अजून तिथेच आहे. सुंदर. सुमतीताई, दोन्ही कडवी आणि त्यातला ताल बेदम आहे, विशेषत: पहिल्यातला. कंच हिरवा कोंब्- दाद द्यायला शब्द नाहीत. आज परत वाचली, अजूनतरी वेगवेगळी वाटतायेत. तुमच्या शब्दात समजून घ्यायला आवडेल, खरच. मयूर, भुईभोर मला पहिल्या वाचनत झेपलेली नाही. पण पुन्हा पुन्हा वाचून बघते.... न कळल्यास तुम्ही मदत कराल अशी आशा आहे. मला त्यातला भुईभोर हा शब्द आवडला. अश्विनी, तुझा चंद्र आवडला, बाई. पेशवे, चकवा आहे या तुमच्या कवितेत. मजा आली.
|
Bee
| |
| Tuesday, June 19, 2007 - 1:51 am: |
| 
|
सुमती, छान आहे कविता. पेशवे, प्रतिक्रीया लांबते आहे माझी. ही कविता अर्ध्यावर बदलली का.. की मलाच तसे वाटते आहे. प्रियकर, प्रेयसी आणि मधे कविता... कवितेवरची कविता की प्रेमावरची कविता!!! दोन्ही गोष्टी सहज व्यक्त होतात.. आणि एक खास म्हणजे ऐरवी प्रेयसीवरच्याच कविता अति प्रमाणात वाचायला मिळतात. ही प्रियकरावरची कविता म्हणून वेगळी वाटली.. आणि लक्षात राहीन. असली तर तुझ्याच कवितेची धुळ आहे! >> हेही एकदम मस्तच!!!
|
|
|