Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 19, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » निज ज्येष्ठ » काव्यधारा » झुळूक » Archive through June 19, 2007 « Previous Next »

Sanghamitra
Monday, June 18, 2007 - 6:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जरा उन्हाने कलते व्हावे,
थोडी व्हावी रिमझिम वृष्टी.
जरा उडावे हवेत अत्तर,
हिरवी व्हावी सारी सृष्टी.


Jagu
Monday, June 18, 2007 - 6:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हिरव्या हिरव्या सृष्टीमध्ये
व्हावा झर्‍यांचा खळखळाट
रानफुलांच्या संगतीमध्ये
सजावा लता वेलिंचा थाट


Giriraj
Monday, June 18, 2007 - 7:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रा,सुंदर सुरवात .. .. ..

Giriraj
Monday, June 18, 2007 - 7:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जरा मनाने कातर व्हावे
पुन्हा कुणीसे आठवून यावे
अलगद पडता थेंब भुईवर,
वलय पाहता व्हावे कष्टी






Shyamli
Monday, June 18, 2007 - 7:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जरा मनानी हलके व्हावे
थोडे वाहून, परतून यावे
मेघ जांभळा जरी आकाशी
हसून त्याही थांब म्हणावे


Devdattag
Monday, June 18, 2007 - 7:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जरा वार्‍याने प्रीयकर व्हावे
मोहरून जावी सारी सृष्टी
असे दिसावे रंग मनोहर
क्षणात अवखळ क्षणात हट्टी


Shyamli
Monday, June 18, 2007 - 7:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सख्या जरा तू वारा व्हावे
येता जाता मला छळावे
उगाच अन मग मीही रुसावे
नवे बहाणे तुला मिळावे


गि-या कुठे गेला, लिहि की पुढे
सन्मि, मस्त सुरवात ग :-)


Giriraj
Monday, June 18, 2007 - 8:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अवखळ होणे मला न ठावे
छळणे,रुसणे न माझी गावे
खोटे लटके नको बहाणे
थेंबाने मातित मिसळणे





Giriraj
Monday, June 18, 2007 - 8:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज उदास उदास लिहावेसे वाटतेय.. :-)

Sanghamitra
Monday, June 18, 2007 - 8:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


क्या बात है! मस्तच जगू,गिरी, श्यामली, देवा. गिरी तू तर माझ्या चारोळीची आठोळी करून टाकलीस. :-)

पुन्हा...
पुन्हा ओलसर झाली माती,
पुन्हा सुगंधित झाला वारा.
तुझ्यात अलगद विरघळण्याच्या,
इच्छेला मग फुटे धुमारा.


Mankya
Monday, June 18, 2007 - 8:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्या बात है दोस्तों .. सगळेच चिंब झालेत !
गिरी .. तुला काय झालं रे उदास वाटायला ? झटकून टाक बाबा ती अवस्था लवकर !

सप्तरंगाची नभी पखरण
स्पर्शतो प्रितीरंग अंतरंगालाही
वसुंधरेला हिरवे कोंदण
धुंदल्या चिंबल्या दशदिशाही !

माणिक !


R_joshi
Monday, June 18, 2007 - 9:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संघमित्रा, जगु, श्यामलि, गिरी, देवा अप्रतिम लिहिलात:-)
आज माणिक,राजा,गोबु कोठे राहिले :-(

क्षणात होतोस अवखळ वारा
क्षणात फुलविसी मोरपिसारा
असा बरससी धरेवरी या
बरसे जसा मेघ सावळा

प्रिति:-)


Desh_ks
Monday, June 18, 2007 - 10:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उन्हे कलावी, व्हावी रिमझिम,
श्वासातुन मृद्गंध भिनावा
इंद्र्धनूचे रंग हरवता
ढगाआडुनी चंद्र हसावा...



Giriraj
Monday, June 18, 2007 - 10:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरसला जो एक थेंब आरक्त तव ओठांवरी
मत्सर तयाचा अन् त्याचाच वाटे हेवा
अलगद मग ओघळत अंगांग चुंबीत तो,
असलाच क्षणभंगूर मजलाही जन्म हवा


Sanghamitra
Monday, June 18, 2007 - 10:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


सतीश, उच्च लिहीलेय.
वा गिरी!
बस आज या दोन्हीनंतर काही तोडीचे लिहीणे अवघड आहे.


Jo_s
Monday, June 18, 2007 - 11:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा इथे झुळूकांच वादळ झालय

भरून आलेल आकाश
गुढ मंद प्रकाश
हवाही स्तब्ध
कुणीतरी भारलेली
कधी कधी मन
येतना भरून
कंठ दाटून येतो
डोळे गरम होतात
भरूही पहातात
पण बरसत नाहीत
पण सारं निवळत
न बरसताच
अगदी हळू, सावकाश
तसच हे
भरून आलेल आकाश

मग
इतक्या वेळ चूप्प बसलेला
खोडसाळ वारा
ढगाना ढकलायला लागतो
हळूच येते ढगा आडून
किरणांची तान
बदलूनच जातं सारं
अगदी सारं हवामान
सारं काही पुर्ववत होतं
कसलीही खूण उरत नाही
काही क्षणां पूर्वी इथे काही घडल होतं
हेही कुणाला कळत नाही
हेही कुणाला कळत नाही....

सुधीर



Shyamli
Monday, June 18, 2007 - 11:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सतिशजी, गिरी, सुधीर एकदम मस्त...... एवढ छान वाचलं कि अजुन लिहायला सुचतं

कळू नये जगाला काही
हीच असावि वा-याची निती
गहिवरते मायेने याच्या
ओलेती सर होते रिती


Desh_ks
Monday, June 18, 2007 - 11:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थँक्स संघमित्रा,
खरं तर तुमच्याच सार्‍या कल्पना घेऊन मी चार ओळी लिहिल्या, त्या अर्थी हे मूळ लिखाणाचं एक प्रतिबिंब! अर्थात् मूळचं बिंब सुंदर आहे हे ओघानंच आलं. सुंदर लिहिलं आहे तुम्ही!

सुधीर, छान चित्र रेखाटलं आहे.
-सतीश


Giriraj
Tuesday, June 19, 2007 - 5:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उचलून घेता बाहूंमध्ये
मेघ आले जवळच वाटे
स्पर्श तयांचा गालांवरती
देहामधुनी लहरच जाते


Jo_s
Tuesday, June 19, 2007 - 5:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद श्यामली, सतीश

ओलेती सर होते रिती
आणि आकाश स्वच्छ होते
नवीन काही घडण्या फिरूनी
सारे अगदी सज्ज होते





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators