|
वा मीनू, आत्ताच वाचली.. विषय आणि कविता दोन्ही छान !!!
|
जियो जेव्हा केव्हा उजाडण्याची अपरिहार्यता समोर येईल तेव्हा घ्यावा सगळा काळोख आवरून ... आणि भर वेगात निघावं , प्रकाश किरणांचा हात धरून . वाटेत लागणार्या प्रत्येक वस्तीला देऊन टाकाव्यात त्यांनी प्रदान केलेल्या प्रतिमा .. तथाकथित माणुसकीची एक एक कक्षा पार करत बाहेर पडावं वेस ओलांडून ... अन जाऊन बसावं एखाद्या दरीच्या तोंडाशी केवळ प्रतिभा मुठीत धरून ... पंचतत्त्वातल्या काव्यप्रभूतींना अभिवादन करत खोल भरून घ्यावा ... एकाच कवितेपुरता श्वास अन त्या निस्पृह मैफलीत सादर करावी आपली कुठलीही कविता खणखणीत आवाजात जसा महामृत्यूंजय मंत्र ऐकू येतो गाभार्यातून हुंकारत ... घुमत घुमत .. थेट स्पंदनात ................. ओणावलाच एखादा ढग , हललंच एखादं पान डुललं एखादं फूल , तरारलंच सभोवारचं रान हुंकारलाच वारा अन जर " जियो " म्हणालीच दरी ... तरच टाकावा निःश्वास अन वळावं माघारी तरच टाकावा निःश्वास ..... अन वळावं माघारी
|
Mankya
| |
| Thursday, June 14, 2007 - 10:36 am: |
| 
|
जियो वैभवा .. जियो ! एक एक ओळ सुंदर ! एक एक कक्षा पार करत, एकाच कवितेपुरता श्वास,ओणावलाच एखादा ढग , हललंच एखादं पान, डुललं एखादं फूल , तरारलंच सभोवारचं रान .. हे तर एकदम खास रे मित्रा ! मीनू .. लगेच कळली नाही (offcourse my limitations) , पण दोनदा तीनदा वाचल्यावर खूपच आवडली गं कविता ! मस्त हाताळला वेगळा विषय ! माणिक !
|
Psg
| |
| Thursday, June 14, 2007 - 11:08 am: |
| 
|
वा वैभव! ... .... ....
|
Rajya
| |
| Thursday, June 14, 2007 - 11:11 am: |
| 
|
अरे वैभवा, कसलं वैभव आहे तुझ्याकडे?
|
Devdattag
| |
| Thursday, June 14, 2007 - 11:22 am: |
| 
|
बॅक वॉटर्स.. पाण्याच्या दोन्हीबाजूला उंच नारळाची झाडं मान बरीच वर करावी लागतेय आणि छोटीशी कौलारु घरं कुणाचं असेल ते? पाण्याचा थोड्या थोड्या अंतराने बदलणारा रंग स्वभाव ओळ्खीचा आहे नाही आणि पाण्यात पडलेलं होडीचं प्रतिबिंब मी कुठेच का दिसत नाहीये? ----- तो निळाशार अथांग अरबी समुद्र मनात भिती आणि कुतुहल निर्माण करतोय सुर्यप्रकाशामुळे लाटांवर निर्माण झालेले असंख्य चमकणारे आरसे डोळे दिपून गेलेत अगदी.. आणि दूरवर दिसणारे ते अंधूकसे किनारे काही राहिलंय तिथेच? ----- होडीच्या मागच्या कोपर्यात बसलेला तो नाविक तो काळाकभिन्न हसरा नाविक आहे ना तो? आपलं बॅकवॉटर्स मधून समुद्रात जाणं आणि समुद्रातून बॅकवॉटर्स मध्ये येणं किती आपलं आणि किती त्याचं
|
Devdattag
| |
| Thursday, June 14, 2007 - 11:26 am: |
| 
|
दोस्त्स, कविता थोडी बदललून पोस्टली आहे.. वैभव, मीनु too good ..
|
Abhija
| |
| Thursday, June 14, 2007 - 11:58 am: |
| 
|
आपल्याला इंद्रधनुष्यातली एखादीच रंगछटा आवडत नाही, तर संपूर्ण इंद्रधनुष्यच आवडतं ना??? तुझी कविता इंद्रधनुष्यच आहे! प्रत्येक ओळीचा रंग न्यारा...आणि प्यारा...!! जियो दोस्त! :-)
|
Gobu
| |
| Thursday, June 14, 2007 - 1:33 pm: |
| 
|
मित्रहो, मी ही एक कविता केलीय... आवडली तर जरुर सान्गा ह... पहिलाच प्रयत्न आहे माझा! .... कोडं बायको अशी का वागते,मला खरच कळत नाही हे काय कोडं आहे, काही केल्या सुटत नाही... मैत्रीणीला फोनवर, "नंतर येते, घरात खुप पसारा" मला पाहुन आदेश , "डोकं दुखतय, तुम्हीच आवरा!" बायको अशी का वागते,मला खरच कळत नाही हे काय कोडं आहे, काही केल्या सुटत नाही... शेजारच्या काकुंसमोर, अघळ पघळ स्तुती त्या गेल्यावर मात्र, तासभर निन्दा नालस्ती! बायको अशी का वागते,मला खरच कळत नाही हे काय कोडं आहे, काही केल्या सुटत नाही... सासरच्या फोनला लगेच , "आताच बाहेर निघालोत आम्ही" आणि माहेरचा असेल तर, "निवान्त आहे, बोला तुम्ही!" बायको अशी का वागते,मला खरच कळत नाही हे काय कोडं आहे, काही केल्या सुटत नाही... पाहुणे जायला निघाल्यावर, "परत कधी येणार तुम्ही?" त्यानी पाठ फिरवल्यावर, "बरे झाले, कटकट गेली!" बायको अशी का वागते,मला खरच कळत नाही हे काय कोडं आहे, काही केल्या सुटत नाही... स्वैपाकाचा कन्टाळा आला की, "बाहेर जाऊ, बाहेर जाऊ" मी बनवतो सान्गितल्यावर, गालातल्या गालात हसु! बायको अशी का वागते,मला खरच कळत नाही हे काय कोडं आहे, काही केल्या सुटत नाही... माझ्याशी भांडायला, नेहमी तयार असते राणी मी कधी ओरडलो की, हिच्या डोळ्यात टचकण पाणी! बायको अशी का वागते,मला खरच कळत नाही हे काय कोडं आहे, काही केल्या सुटत नाही... हिची साताजन्माची वैरीण, समोरची वहीनी आहे ह गोड तिला टोमणे मारुन छळायची, हीची कधी जायची खोड! बायको अशी का वागते,मला खरच कळत नाही हे काय कोडं आहे, काही केल्या सुटत नाही... जवळ येऊन लाडीकपणे, "तुम्हाला काहीच कळत नाही!" मिठीत घेतल्यावर मात्र, "आता नाही! आता नाही!" बायको अशी का वागते,मला खरच कळत नाही... हे काय कोडं आहे, काही केल्या सुटत नाही... "आज खुप दमलेय मी", म्हणत जवळ माझ्या येते स्पर्श माझा झाला की, सगळं लगेच विसरुन जाते! बायको अशी का वागते,मला खरच कळत नाही हे काय कोडं आहे, काही केल्या सुटत नाही...
|
Shyamli
| |
| Thursday, June 14, 2007 - 2:09 pm: |
| 
|
एकसंध नसतो दुभंगता काळीजकल्लोळ... आपण असे तुकड्या तुकड्यात जगणारे आपण असे तुकड्यातुकड्यांसाठी मरणारे, >>>>व्वा! रे मयूर अगदि मस्त आलय मिनू, उजाडसा माळ आवडली गाभार्यातून हुंकारत ... घुमत घुमत .. थेट स्पंदनात >>>म्हणून तर निघतं ना जियो देवा, अर्धवट वाटतीये रे गोबु, छान आहे कविता
|
Athak
| |
| Thursday, June 14, 2007 - 3:26 pm: |
| 
|
गोबु , नुसता सुटलाय लेका , काय सुट्टीवर वगैरे चालला की काय
|
Zelam
| |
| Thursday, June 14, 2007 - 5:28 pm: |
| 
|
उजाडसा माळ मस्त आहे मीनू
|
जियो वैभव!! किती वेळा ही दाद दिली असेल, पण त्याचा असा अर्थ आजच जाणवला. 'उजाडण्याची अपरिहार्यता..' वा! पहिल्या ओळीपासूनच बांधून घातलं या कवितेने. कुठलाही सच्चा कलाकार हा खरंतर जात्याच अंतर्मुख असतो. त्याच्या भोवतालचं जग भासमान वाटावं इतके त्याचे मनोव्यापार जगङव्याळ असतात. आपल्या प्रतिभेशी, अभिव्यक्तीशी इमान राखणं हाच धर्म होऊन जातो. मग प्रसिद्धी, लोकप्रियता, या सगळ्यादेखील उपाधीच वाटायला लागतात. लौकिक व्यवहार सांभाळून जगताना पुन्हा पुन्हा तळमळ लागते ती त्या अंधारातून आतल्या, आपल्या प्रकाशाकडे परत जायची. एकेका अभिव्यक्तीची ‘पूर्णता’ (perfection) हा मग जीवनमरणाचाच प्रश्न होवून बसतो. आणि ती पूर्णता पडताळून बघण्यासाठी निर्लेप वातावरणात, अगदी मनाच्या गाभाऱ्यात पोचणं गरजेचं होतं. पंचतत्त्वात विलीन झालेल्या पूर्वसुरींच्या काळाला पुरून उरलेल्या कलाकृती जणू त्या प्रवासाच्या दिशादर्शक ठरतात. पुढचं सगळं जगणं त्या तिथे सार्थ किंवा निरर्थक ठरणार असतं. मग आपलेच शब्द उमटतात महामृत्युंजयासारखे.. जीवनाला आवाहन करत.. एखाद्या खोल दरीपाशी उभं राहून नामोच्चार करावा आणि प्रतिसादासारखे उमटावेत प्रतिध्वनी.. आपण आपल्याला लावलेली कसोटी.. मग ते प्रतिध्वनी ऐकताना जर आपल्याच डोळ्यांत दाटून आली अभ्रं, हललीच काळजाची एखादी पाती, दरवळलाच सुगंध एखाद्या हरवलेल्या क्षणाचा, आणि आलाच विश्वास - पुढचा श्वास घ्यायला पात्र असल्याचा, तर फिरून वळता तरी येतं जीवनाकडे. नाहीतर जाणवतं, कुठेतरी नाही नाही म्हणताना बाहेरच्या काळोखाचा ठसा उजेडावर उमटला आहे.. आणि तो पुसला जाईपर्यंत त्याच दरीच्या कुशीचा आसरा घ्यायचा आहे.. वाचायला सुरुवात केली तेव्हा वाटलं की कवी काही काळ शांततेच्या शोधात निसर्गाकडे चालला आहे.. असं लिहीलंयस. मग ‘महामृत्युंजया’चा उल्लेख आला, आणि त्यातली खोली जाणवली. मग पुन्हा नव्याने वाचली, आणि हा कळलेला अर्थ लिहील्याशिवाय रहावलं नाही.
|
Daad
| |
| Thursday, June 14, 2007 - 11:10 pm: |
| 
|
वैभव.... काहीच म्हणत नाही आता. त्यात आणि स्वातीचं वाचल्यावर तर पुढे काही काही बोलू नयेसं वाटलं. उगीच शब्दांचा कीस...
|
Meenu
| |
| Friday, June 15, 2007 - 5:00 am: |
| 
|
वैभव हल्ली तुज़्या कवितांवर काहीच न म्हणणं हीच माझी प्रतिक्रीया आहे. तुझी कविता वाचली की मी कधीच विचारात हरवुन गेलेली असते. याही कवितेला हीच प्रतिक्रीया आहे, माझं अंतर्मुख होणं हीच .. उजाडसा माळ वरच्या प्रतिक्रीयांबद्दल धन्यवाद सर्वांना .. 'कुणाच्या खांद्यावर' मी नाही पाहीलाय .. पाहीन संधी मिळाली तर
|
Jo_s
| |
| Friday, June 15, 2007 - 5:02 am: |
| 
|
मिनू : उजाड माळ आवडली वैभव : जियो मस्तच, स्वातीच रसग्रहणही छान आहे देवा : बॅक वॉटर छान झाल्ये. सुधीर
|
वैभवा, जियो, जियो, जियो!
|
दाद आसावरी सुरेख. मला स्वतःला कृष्णाचं रासरचैया पेक्षा मुरलीवाला हे रूप फार आवडतं. शब्द तर चपखल आहेतच पण लय ' लय ' छान आहे कवितेची. मीनू उजाड माळ खूप आवडली. फारच प्रभावी. विषय सुरेख आणि लिहीलीयस पण साध्या भिडणार्या शब्दांत. वैभव लावण्यप्रदेश आवडली. जियो ची कल्पना छान आहे. पण कविता वैभवची नाही वाटली.
|
Psg
| |
| Friday, June 15, 2007 - 7:10 am: |
| 
|
देवा, आता कविता छान झाली, समजतीये
|
मीनु... 'माळ' छान आहे. देवा... विषय अजूनही कवितेच्या आवाक्यात आला असं वाटत नाहीये... वैभव... 'जियो' ला 'जियो'च!!!! स्वाती... 'कुठलाही सच्चा कलाकार हा खरंतर जात्याच अंतर्मुख असतो. त्याच्या भोवतालचं जग भासमान वाटावं इतके त्याचे मनोव्यापार जगङव्याळ असतात...' मला वाटतं सच्चा कलाकार होण्यासाठी नुसतं 'अंतर्मुख'(च) असणं पुरेसं नाही. भोवतालंचं जग भासमान वाटावं अश्या लेव्हलची ती अंतर्मुखता असेल तर त्या कलाकृतीनं जगण्याच्या संवेदना प्रकट होतील काय? शेवटी अभिव्यक्तीशी इमान राखण्याचा धर्म सांभाळणे म्हणजे काय?--आपल्या भोवतालंचं जगणं आणि जगवणं कलाकृतीतून प्रकट होणं!!! म्हणूनच "वाटेत लागणार्या प्रत्येक वस्तीला देऊन टाकाव्यात त्यांनी प्रदान केलेल्या प्रतिमा" माझ्या दृष्टीने ही अंतर्मुखता वाटत नाही... कलाकृतीचा माणूसपणाशी असणारा घनिष्ट संबधच ह्या ओळीतून प्रकट होतोय!! सच्च्या कलाकाराने नुसतं 'स्वान्तसुखाय' असण्याचा हा काळ नाहीच. ओढून ताणून अंतर्मुख होऊन कलेचा जन्म होत नाही.
|
|
|