|
Meenu
| |
| Friday, June 15, 2007 - 10:10 am: |
|
|
ओढून ताणून अंतर्मुख होऊन कलेचा जन्म होत नाही. >>> स्वाती असं म्हणलीये ..? की ओढुन ताणुन अंतर्मुख होऊन कलेचा जन्म होतो ..? फार फार ती या कवितेकडे एका वेगळ्या अर्थानी बघतीये आणि तु अजुन वेगळ्या इतकाच अर्थ होऊ शकतो धन्यवाद माळ च्या प्रतिक्रीयेबद्दल ..!
|
Giriraj
| |
| Friday, June 15, 2007 - 11:20 am: |
|
|
वाहती बेटं.. कधी तीरावर विसावत तर कधी वाहवत, चालूच असते तसे जगणे.. मध्येच दुरून खुणावतात काही सुख-क्षण, वाहत्या जगण्यातली हिरवीगार बेटं जणू.. आस लागते मग अश्याच एका बेटाची, निवांत सुख-क्षणांची.. अश्याच ओढीनं निघावं झेपावत तर तेही निघतं वाहत, आपल्यापेक्षाही जास्त वेगानं... मग तिरावर विसावत पुन्हा वाहण्याचं कारणं शोधतांना पुन्हा एकदा प्रश्न पडतो, का भेटावित ही 'वाहती बेटं'? पुन्हा प्रवाहित व्हावं म्हणून तर नाही ना! गिरीराज
|
वैभवा, 'जियो' खूप आवडली. मानवी जीवनाच्या, विशेषत्: प्रतिभावान कवीच्या जीवनाच्या प्रयोजनासारख्या एका गहन विषयाला तू किती सहजगत्या आणि तरीही पूर्ण ताकदीनिशी भिडला आहेस. हे प्रयोजन नेमकं काय आहे, ते अजून शिल्लक आहे की अत्तराच्या वासासारखं उडून गेलंय हे वरचेवर तपासून पहायचं असतं. अगदी रोजच्यारोज सुद्धा. ह्या तपासणीचा हिशेब तू 'जियो' मधे माण्डला आहेस असं मला वाटलं. अशी तपासणी करायला निघाल्यावर, शेवटी काय उत्तर येणार आहे, ते अर्थातच माहिती असणार नाही. त्यामुळे जे उत्तर येइल ते स्वीकारण्याची तयारी ठेवायला हवी. स्वाती काही ईमान वगैरे म्हणाली. मला तरी वाटतं की ईमान एव्हढच की जे उत्तर येइल ते बिनतक्रार स्वीकारायचं. ही परवली नक्की झाल्यावर,मग मी ती कविता पुन्हा शेवटाकडून प्तारंभाकडे अशी वाचली आणि मला तरी ती अगदी सुसंगत वाटली. विचार करून, काही तर्क बांधून, पुन्हा संगती शोधावी, नवनवी सौन्दर्यस्थळं शोधावी अशी मनपसंत कसरत करायला लावण्यार्या कविता रोज रोज भेटत नाहीत बाबा. धन्यवाद! -बापू
|
Saurabh
| |
| Friday, June 15, 2007 - 4:09 pm: |
|
|
वाह! वैभव!! आणि स्वाती, मूळ कविते इतकंच सुंदर लिखाण!
|
Chetnaa
| |
| Saturday, June 16, 2007 - 2:51 am: |
|
|
अरे गोबु...कवी पण होत चालला आहेस..क्या बात है? मानलं बुवा..प्रचन्ड हिम्मत आहे तुझ्यात.. एक तर अशी कवीता करायाची..आअणि लिहिलीस पण इथे... बायको लाटणे घेऊन वाट बघत असेल तुझी... स्वाती तुझी प्रतीक्रिया म्हणजेच एक सुन्दर कवीता वाट्ते.. छान लिहिलयस...
|
Chetnaa
| |
| Saturday, June 16, 2007 - 2:58 am: |
|
|
वैभव,स्वातीची प्रतिक्रिया वाचल्यावर शोधुन तुझी कविता वाचली... अप्रतिम... हा एकच शब्द मनात येतोय.. आणि स्वातीने इतके सुन्दर लिहिल्यावर आणखी काय लिहिणार?
|
Sas
| |
| Saturday, June 16, 2007 - 3:09 am: |
|
|
मला "पावसा" वरची कविता हवी आहे; please कुणी द्याल का?? मला कविता एका कार्यक्रमा साठी हवी आहे. पु. ल / ग्रेस/ अनिल/ वा कुठल्याही कवींचि कविता चालेल पण कविता विरह, उदासी ई. वर नको "जोशिलि वा आनंदि" असावी, पावसाचा हर्ष व्यक्त करणारी असावी. मायबोली वरच्या कवी/कवयित्रिंची कविताही चालेल, मी कार्यक्रमात तुमचे नाव व तुमच्या शहरा च्या नावा सोबत ति वाचेन. जर तुम्हाला हरकत नसेल तर please मला तुमची पावसाची कविता पाठवा ; with your name n name of your city विषयांतरा साठी क्षमस्व.
|
Desh_ks
| |
| Saturday, June 16, 2007 - 3:49 am: |
|
|
/hitguj/messages/75/126490.html?1181061270 "Sanghamitra Tuesday, June 05, 2007 - 8:20 am:" या लिंकवरचं हे पोस्टिंग अवश्य पाहा. पावसावरची छान कविता आहे तिथे. अर्थात तुम्हाला अभिप्रेत असलेला उपयोग करण्यापूर्वी कवयित्रीशी संपर्क करालच.
|
बापू, बरेच दिवसांनी? बरं वाटलं तुम्हाला बघून. तुमचंही विश्लेषण खूप आवडलं. आणि तुम्ही ज्या 'प्रयोजना'बाबात म्हटलं आहे, खरंतर तोच माझाही मुद्दा होता. ते perfection गाठणं हेच ते प्रयोजन असा मला जाणवलेला अर्थ. मयुर, काहीतरी गडबड आहे. बहुतेक मला माझं म्हणणं नीट मांडता आलं नाही. मुळात ही सगळी खूप सहज आणि नैसर्गिक प्रक्रिया असते असं माझं मत (आणि अनुभवसुद्धा). यात 'ओढून ताणून' काही करायचा प्रश्नच उद्भवत नाही. मुळात ओढून ताणून अंतर्मुख कसं होता येईल, नाही का? मला वाटतं हा गोंधळ 'प्रतिमा' शब्दाच्या आपण लावलेल्या वेगळ्या अर्थांमुळे झालाय. तू म्हणतोयस त्या कवितेत वापरल्या जाणा-या प्रतिमा. metaphors. आणि मी म्हणत्ये ती लोकांच्या मनातील कवीची image. तिचंदेखील ओझं होतं. म्हणूनच मी 'उपाधी' शब्द वापरला. आता बघ ते सुसंगत वाटतं का. अर्थात, आपण आपल्या लागलेल्या अर्थांवरून चर्चा करतोय. खरंतर यात कवीने त्याला नक्की काय म्हणायचंय हे सांगितलं तर जास्त बरं होईल, नाही ा?
|
|
|