Mankya
| |
| Thursday, June 14, 2007 - 1:55 am: |
|
|
स्वाती .. कथानक छान रंगवलस, वातावरण निर्मिती उत्तम ! मनापासून आवडली ! त्यातही काही भावनीक पदर मस्त गोवलेस. " ताईच्या जगण्यालातरी काय अर्थ आहे आता? खरंतर बाबासुद्धा .. कोणाचा खून जरी केला तरी कसा काय महागात पडेल आपल्याला?? " किती टोकाचे विचार मांडलेस तेही वास्तविकतेला धरून. " मरेपर्यंत जगणं, जस मरेपर्यंत फाशी फाशी पेक्षा जगणं ही शिक्षाच मोठी खाशी ! " पुढच्या कथेची वाट पाहतोय .. असाच एखादा निराळा विषय घेऊन येशील ! माणिक !
|
Arch
| |
| Thursday, June 14, 2007 - 2:36 am: |
|
|
स्वाती, आवडली मला ही कथा. मनुष्य किती स्वार्थी असतो आणि स्वतःवर जेंव्हा संकट येत तेंव्हा त्याचे विचार कसे असू शकतात हे साध्या शब्दात फ़ार छान उमटवल आहेस.
|
Daad
| |
| Thursday, June 14, 2007 - 2:42 am: |
|
|
स्वाती. अति अति सरळ सोप्पी भाषा आणि मांडणी. मृत्यूने कोपर्यात घेरल्यावर सर्वसामान्यांच्या आतले आतले- म्हटले तर स्वार्थी म्हटले तर साहजिक विचार किती छान व्यक्तं केलेयस. काही नाही तरी आपला नायक स्वत:ला वाचतो त्या मोजक्या वेळात. आयुष्यात कुठे आहोत आपण, जमा किती... याचे त्याचे विचार इतक्या साध्या रोजच्या भाषेत लिहिलेयस... व्वा. तुझ्या कवितांसारखीच विचार करायला लावणारी ही कथा... सहजासहजी पाठ सोडत नाही.
|
सगळ्या प्रतिक्रियांच्या शेवटी स्वातीताईनीच, तिला ही कथा का लिहावीशी वाटली, त्या मागची तिच्या मनातली जाणीव काय होती(कथेत ती पूर्ण उतरली असली तरी वेगळ्या भाषेत, तिच्या शैलीत) हे लिहिलं तर किती बरं होईल
|
Rajya
| |
| Thursday, June 14, 2007 - 4:18 am: |
|
|
स्वाती, कथा आवडली. वपुंनी या विषयावर विनोदी ढंगात बर्याच कथा लिहिल्या आहेत, त्यामुळे कथा नवीन अशी वाटली नाही. पण एक नक्की अपेक्षाभंग नक्कीच झाला नाही. कथेला कुठेही बाधा न आणणारा एक प्रश्न. कार मेंटेन करणारा माणुस घरखर्च भागवु शकत नाही? जर पगार पुरत नसेल तर, सुमीत कार कशी मेंटेन करतो? एक भा. प्र.
|
Jayavi
| |
| Thursday, June 14, 2007 - 4:24 am: |
|
|
स्वाती कथेच्या दालनातलं पहिलं पाऊल आहे का गं..... अप्रतिम झालीये कथा! खरंच जेव्हा आपल्यावर सगळं सोडून जायची वेळ येते.....नुसता विचार जरी केला तरी जीव कासावीस होतो गं.......आणि किती स्वार्थी होतो त्यावेळी. खूप छान उतरवले आहेत टॊकाचे विचार. मस्तच
|
Psg
| |
| Thursday, June 14, 2007 - 4:50 am: |
|
|
छान आहे गोष्ट स्वाती
|
Manjud
| |
| Thursday, June 14, 2007 - 5:38 am: |
|
|
मला आवडली गोष्ट. माकडिणीच्या गोष्टीची आठवण झाली. हौदातले पाणी गळ्यापर्यंत आल्यावर ती आपल्या पिल्लाला पायाखाली घेउन आपला जीव वाचवू पाहते. परंतू पाणी कमी व्हायला लागल्यावर लगेच ती त्याला छातीशी कवटाळते. आपल्यालाही मृत्युचे असे intimation मिळाले तर ह्याच पद्धतीने आपल्या मनात असेच विचार येतील ना... फारच छान गोष्ट!!
|
सही. पार्श्वभूमी नवीन नाहीये पण लिहीण्याची स्टाईल अगदी ओरिजिनल. आणि तुझ्या भाषेच्या सफाईबद्दल नव्यानं बोलायची गरजच नाहीये. शेवट संदिग्ध असूनही एक पॉझिटिव्ह फील येतो संपल्यावर. खूप मजा आली वाचताना.
|
Abhija
| |
| Thursday, June 14, 2007 - 6:40 am: |
|
|
वल्लाह! क्या खुशबू!! उत्तम संकल्पनेच्या दो-यात मानवी मनाच्या उत्कट स्पंदनांची फुले बेहद नज़ाकतसे ओवून माळलेला हा गजरा ग़ज़बकी खुशबू देऊन गेला भैय्या! शुक्रिया!!
|
Bee
| |
| Thursday, June 14, 2007 - 6:59 am: |
|
|
राज्या, तुला हे माहिती आहे ना दिल्लीवाल्यांच्या घरात खायला नसेना पण अंगणात मात्र गाडी हवी :-) स्वाती, मलाही अमेय सारखच विचारावस वाटतय.. कथा नीट जमली आहे.
|
R_joshi
| |
| Thursday, June 14, 2007 - 7:24 am: |
|
|
स्वाती कथानक छानच रंगवलस. आपण कधी मरणर हे जर प्रत्येकाला कळल असत तर जीवन किती भीतिदायक झाल असत.
|
स्वाती, सहीच जमलीय! हल्ली एकदम promising लेखिका पुढे येतायत एकेक
|
अभिप्रायासाठी सर्वांची मनापासून आभारी आहे. राज्या, सुमीतच्या पगारात घरखर्च भागेलही; कथेत उल्लेख आलाय तो हार्टपेशंट असलेल्या आईची औषधं, इन्स्टिट्यूटमधे असलेल्या बहिणीचा खर्च आणि घरखर्च - हे सगळं भागवता येण्याचा. ह्यातला बराचसा खर्च वडिलांच्या बळावर चालत असल्यामुळे त्याला कार मेन्टेन करणं शक्य असावं. मुंबईबाहेर बहुतांशी शहरात स्वतःचं वाहन ( निदान दुचाकी) ही चैन नव्हे, गरजच असते. शिवाय कार कदाचित वडिलांची असू शकते. मृत्यू हा विषय त्यातल्या गूढ भयरम्यतेमुळे कलाकारांना नेहेमीच जवळचा वाटत आलेला आहे. तेव्हा त्या विषयावरचं लेखन वाचताना ' दुसर्या कशासारखंतरी' वाटणं अतीशय स्वाभाविक आहे. सौरभ, तुम्ही उल्लेख केलेला सिनेमा(?) मला माहीत नाही, परंतु पहायला नक्की आवडेल. अमेय आणि बी, महाभारतातली यक्षप्रश्नांची गोष्ट तुम्ही वाचली असेल. ' जगातलं सर्वात मोठं आश्चर्य कोणतं?' या यक्षाच्या प्रश्नावर युधिष्ठिर असं उत्तर देतो की ' आपल्या अवतीभवती सतत मृत्यू दिसत असतानासुद्धा जणू आपल्याला तो येणारच नाहीये अश्या समजूतीत माणसं वावरत असतात हे ते आश्चर्य'. हे वाचल्यापासून मनात घर करून राहिलं होतं. जवळच्या काही व्यक्तींच्या मृत्यूनंतर त्यांची अखेरच्या काळातली वागणूक आठवताना त्यांना याची पूर्वसूचना मिळाली असावी की काय असं वाटण्यासारखे काही अनुभव गाठीशी होते. मग कधीतरी फाशीगेटच्या कैद्याची अखेरची रात्र कशी जात असेल असा प्रश्न पडला होता. तेव्हा ही ' थीम' गेली बरीच वर्षं डोक्यात होतीच. त्याला ' चेहरा' सापडलेला नव्हता. तो परवा वैभवच्या ' हितशत्रू' गज़लमधले पुढील शेर वाचताना सापडला असावा असं आता मागे बघताना वाटतंय. काहीच कधी उल्लेखनीय ना घडले आयुष्य अश्या घटनांनी नटले आहे चाहूल तुझी प्रियतमेपरी रे मृत्यो येण्याआधी पाऊल उमटले आहे यातल्या पहिल्या शेरातल्या त्या ' नटले आहे'ने असं काही छळलं, की बहुधा तोच ही कथा लिहायला तत्कालिक ' ट्रिगर' ठरला असावा. मग तो सुमीत, त्याचं व्यक्तिमत्व माझ्या डोळ्यासमोर तंतोतंत उभं राहिलं. हे आवर्जून सांगण्यामागे दोन उद्देश, १. वैभवचं श्रेय त्याला देणं, आणि २. एक चांगली कलाकृती अश्या कितीतरी creative processes ना चालना देणारी कशी होते त्यातली गंमत तुमच्याबरोबर शेअर करणं. जाता जाता.. या कथेतला सुमीत त्याच्या वयामुळे आणि स्वभावामुळे insignificant आहे हे खरं, पण एका मोठ्या scale वर विचार केला तर तसं significant काय असतं? कुसुमाग्रजांच्या शब्दांत ' मातीवर चढणे एक नवा थर अंती..' हेच शेवटी सत्य ना?
|
Supermom
| |
| Thursday, June 14, 2007 - 4:22 pm: |
|
|
स्वाती,गोष्ट तर खूप आवडलीच पण वरचं लिखाणही भावून गेलं. अशीच छान छान लिहीत रहा. मला तुझ्या कविताही विलक्षण आवडतात.
|
मस्त. खरच खूप आवडली.
|
ग्रेट!दुसरा शब्दच नाही...स्वाती विषय , मांडणी सगळच आवडल.
|
Upas
| |
| Thursday, June 14, 2007 - 8:57 pm: |
|
|
स्वाती छान.. तुला ही कथा कशी स्फुरली ते सांगितलस हे बरं केलस..
|
Daad
| |
| Thursday, June 14, 2007 - 10:56 pm: |
|
|
हे, शाब्बास! कथा तर उत्तमच पण तुझी टिप्पणी सरसच, एकदम. वैभवच्या कविता, गज़ला, आणि तुझं सगळंच लिखाण जरा छळवादीच ;) (तरीही लिहित रहा ही विनंती....)
|
Zakasrao
| |
| Friday, June 15, 2007 - 4:25 am: |
|
|
स्वाती आवडली गोष्ट. छान जमलिय. ह्याच विषयावरच एक नाटक मी खुप दिवसांपुर्वी दुरदर्शन वर पाहिल होत. त्याच नाव "संकेत" पण त्यातील कन्सेप्ट वेगळी होती. त्यात त्याला ज्यावेळी मृत्यु भेटायला येतो त्यावेळी तो माझ्याऐवजी ह्याला ने त्याला ने अस त्याला सुचवत राहतो असच काहिस होत आणि तो मृत्यु त्याच्या इच्छेनुसार बदली खेळाडु नेतो. ते खुप वेगळ होत कथे पेक्षा पण त्याची आठवण झाली. त्यातील कलाकर मला काहिच आठवत नाहिये कारण मी त्यावेळी शाळेत जायच्या वयात होतो.
|