Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 14, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » अधिक - ज्येष्ठ » काव्यधारा » कविता » Archive through June 14, 2007 « Previous Next »

Bhagya
Wednesday, June 13, 2007 - 12:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिर्‍या..... छानच. लिहित रहा.
वैभव, तुझ्यासाठी तर शब्दच थिटे आहेत.


Mankya
Wednesday, June 13, 2007 - 1:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभवा .. अरे ही तर एकली होती की तुझ्याकडून !
मस्तच उतरलिये ' लावण्यप्रदेश ' !

माणिक !


Mayurlankeshwar
Wednesday, June 13, 2007 - 7:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकसंध

एकसंध असे काहीच नसते...
आपण उगीच अट्टाहासाने जोडून धरु पाहतो
आपल्या भोवती लपेटलेल्या
तुकड्यातल्या सावल्यांचे किनारे...
उन्हाची तुटकी फुटकी लाट लुप्त झाली की
उरते फक्त एकसंध काळोखाची नितांत गाज...
उसवली जाते वीण सावल्यांची
ज्यांच्यासाठी आपण ओवू पाहतो
निखळत्या चंद्रमण्यांची तुटकी तुटकी माळ...
पण एकसंध असे काहीच नसते...

एवढेच नव्हे तर,
अश्रूंनाही पत्ता नसतो मागच्या पुढच्या अश्रूंचा,
एकदा का चेहर्‍यांच्या प्रदेशात
सुरकुत्यांची वळणे लागली की
हातातून हात सुटू लागतात आपोआप...
ज्याला आपण रस्ता म्हणतो असे आयुष्यही
थबकून थबकून तुटू लागते जागोजाग...
एकसंध असे काहीच नसते...

एकसंध नसते डोळ्यांची काच...
एकसंध नसते चेहर्‍याची जमीन...
एकसंध नसतात
शाईचे थेंब,
कवितेच्या ओळी,
संदर्भाचे धागे,
स्वप्नांचे तुकडे
रात्रभर जागे...
एकसंध नसतो दुभंगता काळीजकल्लोळ...
आपण असे तुकड्या तुकड्यात जगणारे
आपण असे तुकड्यातुकड्यांसाठी मरणारे,
आपल्या तोकड्या अभिव्यक्तीची नजर जाईल तिथपर्यंत
दिशादिशांच्या तुकड्यात व्यापून राहिलेलं
आपलं तुकड्यातलंच हे समग्र:'मी' पण.
एकसंध असे काहीच नसते...







Desh_ks
Wednesday, June 13, 2007 - 8:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा मयूर,

एखादी बंदीश असावी तशी 'डेव्हलप' होत जाते आहे ही कविता असं वाटलं.

"एकसंध नसतात
शाईचे थेंब,
कवितेच्या ओळी,
संदर्भाचे धागे,
स्वप्नांच्या तुकडे
रात्रभर जागे...
एकसंध नसतो दुभंगता काळीजकल्लोळ...
"

हे कसं गतिमान आलं आहे, आणि समेवर यावं तसं ते निष्कर्षासारख़ं विधान "एकसंध काहीच नसतं"...

मला आवडली ही कविता.

-सतीश


Meenu
Wednesday, June 13, 2007 - 8:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुरावे

क्षण सरतात,
आठवणींचे थिटे पुरावे उरतात ..
ऋतु सरतात,
बदललेली फक्त गावे उरतात ..
कुणाचे अश्रु झरतात,
तारे मोजणार्‍या, काही रात्री उरतात ..
दिवस सरतात,
अश्रु सरुन, रीते उसासे उरतात ..
दुःखाचेही मग, नुसते पुरावेच उरतात ..
क्षण जातात,
आठवणींचे थिटे पुरावे उरतात ..


Vaibhav_joshi
Wednesday, June 13, 2007 - 8:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रांनो प्रतिक्रियांसाठी धन्यवाद ..

मयूर .. एकसंध आवडली .


Meenu
Wednesday, June 13, 2007 - 8:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो मयुर, मला पण आवडली कविता आणि कल्पनाही एकसंध काहीच नसण्याची ..

Mayurlankeshwar
Wednesday, June 13, 2007 - 9:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा!केवढ्या कविता येऊन गेल्यात इथे!
बर्‍याच दिवसांनी फिरकतोय...

'उठली फुंकर, फिरली बोटे, शहारली बासरी '
वा!दाद!! बासरीचे शहारणे... विलोभनीय!!

बी...जीवसाखळीचे स्पष्टीकरण मस्तच...
मर्ढेकरांच्या कवितेसारखी रचना वाटली.

गिरी.... नुसते 'वाह!' आणि 'आह!' म्हणतो... अप्रतिम!

वैभवा... लावण्यप्रदेशात छान फिरवून आणि हरवून आणलंस!
तुला भेटलो होतो ना मी?
ह्याच ठिकाणी.. परवा परवा? :-)

मीनु..
ऋतु सरतात,
बदललेली फक्त गावे उरतात...
एकदम भिडल्या ह्या ओळी...
'क्षण सरतात' आणि 'क्षण जातात' ...सरणं आणि जाणं दोन्ही शब्दांचा क्षणांच्या प्रकृतीशी अर्थ वेगवेगळा लागतोय! हे अपेक्षित की नकळत? सुंदरच!

धन्यवाद :-)




Daad
Wednesday, June 13, 2007 - 10:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा, मयूर. एकसंध आवडली, खूपच. - शब्दकल्लोळ तरीही अनावश्यक एकही शब्द नाही, क्या बात है!
काही एकसंध नाही ही कल्पनाच मुळात वेगळी... ज
"तुकड्यातल्या सावल्यांचे किनारे...
उन्हाची तुटकी फुटकी लाट लुप्त झाली की
उरते फक्त एकसंध काळोखाची नितांत गाज... "
सुंदर!
मीनू, परत एकदा वेगळा विषय अति मोजक्या साध्या शब्दात... क्षण सरतात... क्षण जातात आवडलं.


Meenu
Wednesday, June 13, 2007 - 2:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे अपेक्षित की नकळत?>> मयुर हे नकळत .. आणि हो धन्यवाद
दाद धन्यवाद


Gargi
Wednesday, June 13, 2007 - 4:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव,बी,दाद,मयुर,मीनू
छान कविता.....मस्त! आवडल्या.


Lampan
Wednesday, June 13, 2007 - 6:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मयुर एकसंध भारी आहे

Mankya
Thursday, June 14, 2007 - 1:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मयुरा .. एकसंध आवडली !
शब्द शब्द मस्तच उतरलाय रे !

मीनू ... पूरावे खूपच आवडली !
थिटे पूरावे, रिते उसासे .. क्लास्SSS !

माणिक !


Devdattag
Thursday, June 14, 2007 - 2:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मयूर.. एकसंध आवडली!!!
वैभव.. लावण्य प्रदेशही सुरेख!!!


Meenu
Thursday, June 14, 2007 - 5:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक उजाडसा माळ ..

एक उजाडसा माळ ..
नाही झाड, नाही पान,
सारी भुई खडकाळ ..
एक उजाडसा माळ ..

माळावर येई वेडा,
ज्याला हिरवा हो ध्यास ..
माळावर होती त्याला,
पानाफुलांचे आभास ..
जरी उजाडसा माळ ..

माळावर चाले फाळ,
हसु हिरवे उमले ..
माळाकडे चालणारी,
आज कितीक पाऊले ..
सजे हिरवासा माळ ..

परी पाऊले वेड्याची,
खांद्यावरी ज्याच्या फाळ ..
आज निघाली शोधाया,
पुन्हा उजाडसा माळ ..
एक उजाडसा माळ ..


Psg
Thursday, June 14, 2007 - 7:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा मीनु, मस्त!
मयुर, 'एकसंध' वाचताना मला संदीप खरेची आठवण झाली! :-) छान लिहिली आहेस.
देवा, मला कळली नाही कविता.. :-(


Devdattag
Thursday, June 14, 2007 - 8:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>देवा, मला कळली नाही कविता..
थोडं explicit लिहायला हवं होतं नाही..:-)
कुमारकमच्या बॅक वॉटर्समधून जातांना अनेक विचार मनात आले होते..
खरंतर ललित लिहीणार होतो.. पण माझं गद्य लेखन पूर्ण कधीच होत नाही.. म्हणून सध्या कवितेच्या(??) स्वरूपात लिहीलय.. पुढे मागे लिहीन यावर ललित.. तेंव्हा लिहीन 'त्या' आरश्यांबाबत, 'त्या' घरांबाबत आणि मुख्य म्हणजे 'त्या' नावाड्याबाबत


Vaibhav_joshi
Thursday, June 14, 2007 - 9:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परी पाऊले वेड्याची,
खांद्यावरी ज्याच्या फाळ ..
आज निघाली शोधाया,
पुन्हा उजाडसा माळ ..
एक उजाडसा माळ ..

आवडलं मीनू.

हं .. देवा मलाही वाटतंय तो अनुभव लिहीण्यासाठी कवितेपेक्षा मोठा कॅनव्हास लागेलच .


Lampan
Thursday, June 14, 2007 - 9:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनु बेस्ट ... कुणाच्या खांद्यावरची ८वण झाली ..rather त्या पिक्चरचीच




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators