Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 13, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » अधिक - ज्येष्ठ » काव्यधारा » झुळूक » Archive through June 13, 2007 « Previous Next »

Rajya
Tuesday, June 12, 2007 - 12:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संघमित्रा,

मी तोच विचार केला, पण काही सुचेना म्हणुन बदल केला नाही.
'प्रियतमा' त्याला उद्देशुन म्हणु शकतो का? नेहमी 'प्रियतमा' हा स्त्रीलिंगी रुपात वापरला जातो.

तु, ती चारोळी बदल करुन परत लिही ना, म्हणजे थोडं clear होईल.


Sanghamitra
Tuesday, June 12, 2007 - 12:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राज्या अरे भेटण्या त्या जिवलगचे कसे जिवलगा झाले तसे प्रियतमचे प्रियतमा होऊ शकते की. :-)
प्रियतमाला चा शॉर्टफॉर्म आहे तो.
हे बघ.

कापलेल्या आभाळाची
सरीतेला नाही तमा
ती निघाली बेधुंद
भेटण्या त्या प्रियतमा


दोस्त्स पुढची माझी शेवटची झुळूक. भेटू उद्या. पण तुम्ही थांबू नका :-)


Sanghamitra
Tuesday, June 12, 2007 - 12:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बघता बघता झाले मोठे,
वार्‍यावरती निघे तरंगत.
नदीकाठच्या गाण्याला त्या,
खळाळत्या पाण्याची संगत.


Bee
Wednesday, June 13, 2007 - 1:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राज्या सुरेख लिहितोस रे..

आभाळ कापले! संघमित्र छान!!!!


Mankya
Wednesday, June 13, 2007 - 2:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संघमित्रा .. ग्रेटच !
राज्या, जया .. धन्स !

सरीतेला मिलनासाठी
घुसमटताना पाहिलं
कापलेलं आभाळही मग
धुमसत सरीतेतून वाहिलं !

माणिक !


Rajya
Wednesday, June 13, 2007 - 4:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अट्टहास मीलनाचा
नाही गेला व्यर्थ
कापलेल्या आभाळाचेही, तेव्हा
झाले जीवन सार्थ


R_joshi
Wednesday, June 13, 2007 - 4:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राजा... खुपच छान:-)अप्रतिम लिहिलस.

Jagu
Wednesday, June 13, 2007 - 9:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खुप दिवसांनी आज आले. खुपच छान जुगलबंदी चालू आहे.

कापलेल्या आभाळाला
आक्रोश अनावर झाला
गर्जनांनी त्याच्या
अश्रूंचा बांध फोडला.


Giriraj
Wednesday, June 13, 2007 - 9:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आभाळ कापायला निघालेऽऽ,
मेघांनी जायचं कुठे?
मेघ नसतिल बागडायला,
थेंबांनी खेळायचं कुठे?


गिरीराज


Rajya
Wednesday, June 13, 2007 - 9:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेघांनी साथ सोडली
आभाळही हरपले
मातीच्या कुशीत तेव्हा
अनाथ थेंब झेपावले


Rajya
Wednesday, June 13, 2007 - 9:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थेंब एक अनाथ
त्या मेघास ना कळाला,
मृदगंध होऊनी सार्‍या
विश्वास तो मिळाला


R_joshi
Wednesday, June 13, 2007 - 9:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दु:ख तुझे पाहुन
आभाळहि रडले
बघ आज कसे ते
वेड्यासारखे बरसले

प्रिति:-)


R_joshi
Wednesday, June 13, 2007 - 9:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झेपावलेल्या थेंबांना
आधार मातीचा मिळतो
ओला सुवास मातीचा
अधिकच तेव्हा सुखावतो

प्रिति:-)


R_joshi
Wednesday, June 13, 2007 - 9:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नादमय पाऊस
तसा कधी बरसला नाही
तुला घेऊन गेल्यावर
मागे तो फिरला नाही

प्रिति:-)


R_joshi
Wednesday, June 13, 2007 - 10:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कातरलेल्या आभाळाची
आसव आज बरसली
तृप्त करूनी धरतिला
सार्थ जीवनी झाली

प्रिति:-)


Rajya
Wednesday, June 13, 2007 - 10:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिती मस्तच!! बरसो रे.. .. :-)

Mankya
Wednesday, June 13, 2007 - 10:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झाकाळलेलं आकाश
विरान सुन्या राती
कुशीत घेऊन आसवांना
झाली चिंब चिंब माती !

माणिक !


Rupali_rahul
Wednesday, June 13, 2007 - 10:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरेरे काल खुप काही मिसलं मी... काल इथे खरच दिग्गजांच्य झुळुका आल्या आणि त्यात वहावत जाणं मिसल रे मी... नशीब Archieves ची सोय आहे...

आभाळ कापुन आल्यावर
थेंब अनाथ झाला
त्याच्या आसवांचा बांध फ़ुटुन
धरतीच्या कुशीत विसावला...

रुप


Rajya
Wednesday, June 13, 2007 - 10:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चुकुन एक थेंब
सागरा कडे वळला
शिंपल्यात लपुन
मनसोक्त रडला!!


Giriraj
Wednesday, June 13, 2007 - 10:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज कुठे हरवले दिग्गज?
मित्रा,वैभव,शामली,जया,मिनू,देवा कुठे आहात?





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators