Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 12, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » अधिक - ज्येष्ठ » काव्यधारा » कविता » Archive through June 12, 2007 « Previous Next »

Devdattag
Monday, June 11, 2007 - 12:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भई वाह..:-).. .. ..

Zelam
Monday, June 11, 2007 - 2:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जयू, हेम्स, बी, श्यामली मनपूर्वक धन्यवाद. :-)

Jayavi
Monday, June 11, 2007 - 2:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे क्या रे गिरी.....आज तो सुनतेईच नही....!! एकदम एकसे बढकर एक फ़रमा रहे हो.....!! "शीतल" चांदण्याचा प्रभाव का रे.... :-)

Asami
Monday, June 11, 2007 - 5:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़ुकट गेलास रे गिर्या तू

Hems
Monday, June 11, 2007 - 6:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिरी SSSSS! का sss य रे?
जयू , अगदी अगदी !!


Mankya
Tuesday, June 12, 2007 - 1:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिरी .. क्या बात यार ! नितांत सुंदर !

माणिक !


Daad
Tuesday, June 12, 2007 - 3:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किती, काय काय छान घडून गेलंय इथे.... नुसतीच चाळली आहेत काही पानं....
खूप दिवसां (महिन्यां)पूर्वी लिहिलेली ही एक कविता. माझ्यामते अर्धवट आहे. पण काहीकेल्या पूर्णं होत नाहीये. तेव्हा आहे तशीच देते-

आसावरी

पुसे सावळा कोण राग आळवू सखी सावरी
उत्तर झाली राधा होऊन अधोमुख बावरी

बसली राधा घेऊन ओली गौर पाऊले वरी
उठला हिरवा काटा, वठल्या शुष्क कदंबा उरी

उठली फुंकर, फिरली बोटे, शहारली बासरी
सुरस्तंभित नभ, लहरे यमुना होऊन आसावरी

-- शलाका


Shyamli
Tuesday, June 12, 2007 - 4:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शलाका .............सावरी,बाबरीया शब्दांची मजाच काहि निराळिये :-)
उठली फुंकर, फिरली बोटे, शहारली बासरी >>हाSSय एकदम सुर्रेख

देवा, सुधीर ,धन्यवाद :-)

बिच्चारा गि-या, बरा सापडलास सगळ्यांच्या तावडीत, उगी उगी हं :P

Bee
Tuesday, June 12, 2007 - 4:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जीवसाखळी..

जिवांनीच जिवावर उदार होत होत
किती जीव जगतात ह्या जगात!
अभेद्य जीवसाखळीची ही रचना
कुठे चुकली तर नाही ना, देवा?

रक्ताच्या थारोळ्यात म्लान झालेले पंख
किती सुंदर होते त्यांचे इंद्रधनु रंग!
मानेपासून चिरलेला इवलासा कंठ
सरस्वतीचे सूर पेरत होता निळाईत!

मुक्या जनावरांचा आक्रोशही नाही
इतके धारदार.. जलद झाले पाते,
दिसत नाही अमानुष डोळ्यांना
करुणेने तुडुंब भरलेले त्यांचे जग..

बंद काचेच्या, श्रांत प्रयोगशाळेत
रात्री - अपरात्री, कित्येक वर्षानुवर्षे
चालतात एकेक अजब प्रयोग न्यारे
कधी ह्या तर, कधी त्या जीवावर...

चौर्‍यांशी लक्ष योनीतून मुक्त होऊन
अखेरीज जन्माला येतो मानवजीव श्रेष्ठ,
नव्यानी कधी ओवलीस ही साखळी
तर काढून टाक हा एकच जीव फ़क्त..


Satyajit_m
Tuesday, June 12, 2007 - 4:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Girya jhakkas ... !!!

Mankya
Tuesday, June 12, 2007 - 4:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद .. पुन्हा शब्दांची जादू घेऊन आलीस तर !
ओली गौर पाऊले .. किती सुरेख .. हळूवार अगदी !
शहारली बासरी .. वाचूनच शहारा येतो !

बी .. झेपली नाही यार !

माणिक !


Bee
Tuesday, June 12, 2007 - 5:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणिक, 'जिवो जीवस्य जीवनम्' ही झाली ईश्वरानी निर्माण केलेली साखळी. ह्या साखळीत मनुष्य देखील आला. पण जीवन जगायचे म्हणून त्यानी केलेली निवड ही अमानुष.. क्रुर झाली आहे.

परवा 'शाकाहार' ह्या विषयावर काही documentary बघायला मिळते का म्हणून मी www.youtube.com पालथे घातले. त्यावेळी 'कत्तल' ह्या विषयावरची एक Documentary हाताशी लागली. ती मनात घर करून गेली. 'जीवसाखळी' ह्यावरून स्फ़ुरली. पण ही झाली भावनिक कवी कल्पना, ती करून का मनुष्य बदलणार आहे..

कविता हवी तर पुन्हा एकदा वाच. कदाचित कळेल. नाहीच कळली तर माझी अभिव्यक्ती तोकडी... थिटी..


Vaibhav_joshi
Tuesday, June 12, 2007 - 6:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिरी ... मस्त रे .
शलाका ...
पुसे सावळा कोण राग आळवू सखी सावरी

मस्त कन्सेप्ट आहे . पण वाटली अर्धवट हे खरं .


Bee
Tuesday, June 12, 2007 - 7:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिरिराज, कविता छान श्रुंगार रसाला पोचली आहे.. खूप दिवसानंतर अशी कविता वाचण्याचा योग आला. झुळुकही तसेच..

Vaibhav_joshi
Tuesday, June 12, 2007 - 11:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लावण्यप्रदेश

आज तुझ्या वाटेवर फिरुनी
मुश्किल झाले तुला शोधणे
चिरपरिचितश्या वळणांवरती
लागत गेली नवीन वळणे

कसा कुठे प्रारंभ करावा
पदोपदी पेरलास चकवा
तुला भेटलो होतो ना मी?
ह्याच ठिकाणी.. परवा परवा?

नवीन वाटे पठार आणिक
नवीन करवंदाची जाळी
तश्यात देशी मिश्किल , अस्फुट
दिशाभूल करणारी हाळी

परि एका वळणावर मजला
खुणावणारे डोळे दिसले
अन मग तुजप्रत पोचायाचे
सारे सारे मार्ग गवसले

आज तुझ्या वाटेवर फिरुनी
तुला नव्याने शोधत गेलो
गूढ तुझ्या लावण्यप्रदेशी
तुला शोधता ... हरवत गेलो


Swaatee_ambole
Tuesday, June 12, 2007 - 1:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शलाका, मला इथेच संपलेली ( सोडून दिलेली?) आवडली उलट. यापुढे शब्दांचं काम संपतं, नाही का? :-)

वैभव, लावण्यप्रदेश सुंदर. ' तुला शोधता हरवत गेलो..' :-)


Jayavi
Tuesday, June 12, 2007 - 1:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव... लावण्यप्रदेश..... तुझा हा concept मनापासून आवडला :-)

Zelam
Tuesday, June 12, 2007 - 5:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद - मलाही स्वातीसारखंच वाटतं :-).
वैभव जोशी - कविता अतिशय आवडली


Ameyadeshpande
Tuesday, June 12, 2007 - 6:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्तंय वैभव :-) .. ..

Daad
Wednesday, June 13, 2007 - 12:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks श्यामली, माणिक, वैभव, स्वाती, झेलम. मला ही कविता अर्धवट संपलेली नसून अर्ध्यावर सुरू झाल्यासारखी वाटते. ही अशी का उतरलीये, माझं मलाच कळलेलं नाही. गम्मत आहे नाही?

ओहो! वैभव! चकवा खरा.... मस्तच आहे concept . अतिशय अतिशय संयमाने उठलीये कविता.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators