|
Shyamli
| |
| Monday, June 11, 2007 - 9:58 am: |
|
|
मस्त... वेगळा बाज आणि सशक्त कथाबिज अजून वाचायला आवडेल
|
Giriraj
| |
| Monday, June 11, 2007 - 10:04 am: |
|
|
कावेरीच्या नवीन प्रवासाची कथा! कावेरीचं घाबरणं; कितिही शिकली पुढे गेली तरी एका भारतिय स्त्रीचं घाबरणं वाटतं!ज्या गोष्टींचा तिने उच्चार केला नाही पण विचार नक्कीच केला असेल अश्याच बाबींबद्दलची ही भिती.. नरेनचा प्रत्यक्ष वावर कथेत तसा नसूनही तो सगळीकडे असल्यासारखंच वाटत राहतं.. आणि मायबोलीवर नाही का अगदी अनोळखी लोकांशी लोक्स अगदी आपुलकीने किंवा अगदी जिवलग असल्यासारखेच आपल्या समस्या शेअर करत.. तसंच एक अनोळखी माणसाकडे मन मोकळं करण्यात भीती वाटत नसावी लोकांना.. त्यामुळे कोण कुठला किरण आणि त्याच्याशी इतके मनमोकळे का बोलते कावेरी हा प्रश्न काहीसा धुसर होऊन जातो... अज्जुका,भरपूर लेखन केलंस तर किबोर्ड झिजून जईल अशी भीती वाटते की काय तुला? लिही ना अजून... कथा आवडली..
|
Giriraj
| |
| Monday, June 11, 2007 - 10:06 am: |
|
|
विवेकी,तुमच्या वाक्यांनी ज़बरी हसू येतं... डेप्थ काय वपु काय आणि वि.सू. काय एकेक गोष्टी आठवून हसू येत राहतं... बाकी कोण कोण आहेत तुमच्या गटात एक मास्तुरे सोडता?
|
Ajjuka
| |
| Monday, June 11, 2007 - 10:47 am: |
|
|
श्यामली, धन्स ग! गिरि, लिहिणारे मी अजून काळजी नसावी. विवेकी, धन्यवाद. वपुंचा प्रभाव माझ्यावर नाही कारण मी वपु वाचणे टाळते. पण तरी तुम्हाला तसे वाटले असू शकते. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
|
अज्जुका.. आवडली कथा.. सन्मे.. वेल सेड
|
Maasture
| |
| Monday, June 11, 2007 - 1:24 pm: |
|
|
अज्जुका, चांगली परिपक्व कथा लिहिली आहेस. पुढील लेखनासाठी शुभेच्छा. विवेकी, एरवी फक्त व्ही ऍंड सी मध्ये काड्या करणारे तुम्ही इकडे येउन माझी चौकशी करावी हे नवलच म्हणायचे. गिर्या मी कुणाच्या गटात नाही आणि तुझ्यासारखा कुणा मामा - मावश्याचा निरुद्योगी चमचाही नाही तेंव्हा माझ्या भानगडीत न पडता तू तुझे इथले बीला खिजवणे, V&C तले काही कळत नसले तरी तिथे चर्चा करणार्यांना वेड्यात काढणे वगैरे चाळे सुरू ठेव हं.
|
Asami
| |
| Monday, June 11, 2007 - 2:26 pm: |
|
|
classic ग माते. minimum संवाद ठेवत perfectly effective केलीयस in all senses. ह्याबाबतीमधे Tu ला पूर्ण अनुमोदन. straight असही ची आठवण आली.
|
Giriraj
| |
| Monday, June 11, 2007 - 2:45 pm: |
|
|
धन्यवाद! मास्तुरे..... तुझे माझ्यावरचे प्रेम (पक्षी लक्ष)पाहून मला गहिवरून की कायसेसे आले.. पुढील लेखनासाठी अनेकोत्तम आशिर्वाद!
|
Gobu
| |
| Monday, June 11, 2007 - 2:58 pm: |
|
|
अज्जुका, कथा फारच छान आहे! आणि हो, या कथेत "वपु"ची शैली जाणवते ह (हे माझे प्रामाणिक मत आहे ह, कृपया गैरसमज नको ह अजुक्कादिदी!)
|
Ajjuka
| |
| Monday, June 11, 2007 - 5:07 pm: |
|
|
देवा, मास्तुरे (??), धन्यवाद! पुत्रा... धन्यवाद रे!! हरभर्याच्या डबल शेंड्यावर... गोबु, अहो जे वाचतात वपु त्यांना आली असेल आठवण तर मी तरी काय करणार. मी फार पूर्वी निदान १०-१२ वर्षांपूर्वी थोडंफार वाचल होत आणि मला अजिबात आवडलं नव्हतं त्यामुळे मी परत कधी वपुंच्या वाट्याला जायचं धाडस केलं नाही. त्यामुळे प्रभाव नाही असं म्हणलं. वर ट्यु प्रिया तेंडुलकर बद्दल म्हणाली तर तिचा प्रभाव असणं साहजिक आहे कारण मला तिचं लिखाण फार आवडतं. बास एवढंच... तुम्हाला वपुंचा भास जाणवला असेल तर ते तुमचं मत आहे ना.. मी कशाला गैरसमज करून घेऊ.
|
बर मग आता हरभर्याच्या झाडावरून खाली आणते तुला कथेचं टायटल कसलं टुकार आहे. ते बदल गं!
|
Ajjuka
| |
| Monday, June 11, 2007 - 5:33 pm: |
|
|
ही ही ही मैत्रेयी... मी विसरलेच होते टायटलचं. आता आठवून बघते!!
|
Arch
| |
| Monday, June 11, 2007 - 5:38 pm: |
|
|
अज्जुका, तुझी लेखनशैली छान आहे. गोष्ट आवडली का किंवा पटली का हे नक्की सांगता येणार नाही. PhD student जर सुशिक्षित, जाणीवपूर्वक विचार करणार मन म्हणून धरल तर पटेल गोष्ट पण दुसरी व्यक्ति म्हणून धरली तर नाही पटत. कारण इतकी शिकली सवरलेली व्यक्ति अपरिचिताशी खाजगी गोष्टीबाबत मन इतक मोकळ करू शकेल हे पटत नाही. किंवा त्याच्या मताची इतकी पर्वा करू शकेल असही वाटत नाही. इथे उभी केलेली स्त्री ही स्वतःचा " स्व " जपणारी आहे. बस, माझे विचार लिहिले आहेत. इतर कुणाला पटावेत अशी अपेक्षा नाही. हात तिच्या! वरती लिहिल्यावर लक्षात आल. त्याच्या किरण ह्या नावावरून. तो तर नव्या आयुष्याचा किरण आहे. छान छान. छान आहे ग गोष्ट. परत एकदा, थोडक्या शब्दात लिहिलेले संवाद आवडले.
|
Apurv
| |
| Monday, June 11, 2007 - 5:44 pm: |
|
|
अज्जुका, yeah! I am very happy! बिलकूल अपेक्षा भंग झाला नाही. कथेचा शेवट अतिशय आवडला, खूपच छान. ईथे काही जणांना नायिकेचे परक्या व्यक्ती जवळ मन मोकळे करणे पटत नाही आहे, माझ्या मते ही फारच शुल्लक बाजु आहे. कथेचा जो मुख्य विषय आहे की नायिकेला स्वतःच्याच मनाची भिती आहे, तिचे मन; हा जो निर्णय तिने घेतला आहे तो स्विकारून स्वछंद पणे उर्वरीत आयुष्य जगू शकेल का? शेवटी ह्या भयातून ती मुक्त होते. बसचे रुपक एकदम समर्पक आहे. positive thinking attitude आवडला. मला भिती होती की इतर कथे प्रमाणे नायिका एकाच्या प्रेमातून दुसर्याच्या प्रेमात पडते की काय, आणि मग परत पहील्याच्या, मग कथा अतर्क्य झाली असती.
|
Hems
| |
| Monday, June 11, 2007 - 6:13 pm: |
|
|
मलाही आवडली ही कथा ... हा असा अनुभव मांडण्यासाठी वापरलेली शैली आणि रुपकं समर्पक वाटली म्हणून. मुख्य म्हणजे आधुनिकपणाचा आव न आणता लिहिली आहे म्हणून !
|
Disha013
| |
| Monday, June 11, 2007 - 6:16 pm: |
|
|
अजुक्का,सुंदर कथा! कितीही उच्चशिक्षीत,स्वावलंबी स्री असली तरिही नकोशी नाती तोडताना तिच्या मनातही असेच भयमिश्रीत विचार येत असणार. तिच्या मनातले ओझे उतरुन नवीन ती सुरुवात करते ते आवडले.
|
Ajjuka
| |
| Monday, June 11, 2007 - 6:19 pm: |
|
|
आर्च, हो काहिजणांचं आहे म्हणणं की ती असं बोलेल का अपरिचित माणसाशी ते.. माझं म्हणणं ती ज्या तुटल्या अवस्थेत आहे त्यात कदाचित बोलेलही. ५०% चान्स आहे. आणि खरंतर ती काही बोलतच नाही त्याच्याशी. फक्त घटस्फोत होणार आहे हे सांगते, वीरेंद्रचं येणं किंवा नरेनचा फोन यातून त्याला थोडंसं स्पष्ट चित्र मिळतं बाकी तिच्या मनात चाललेली खळबळ जी आपण वाचतोय ती त्याला कुठे सांगते ती. ती फक्त तिच्या चेहर्यावर उमटते कधीकधी आणि त्याला साधारण जाणवते! असो.. मी समर्थन नाहीये करत पण हे मनात धरून होते मी लिहिताना एवढंच. अजून थोडे दिवसांनी मी कथा परत वाचीन तेव्हा या गोष्टीचा तटस्थ पणाने विचार करून पाहीन. पण ते किरण नावाबद्दल मला पण तुझ्याकडूनच समजले. मी तसं काही ठरवलं नव्हतं ते अभावितपणे घडलंय. पण तरी धन्यवाद! अपूर्व, नाही हो त्या दोघांच्यात काही नातं निर्माण करण्याची कल्पनाही भयंकर होती.. म्हणजे या गोष्टीमधे. कदाचित ती नंतरची गोष्ट असेलही आणि नसेलही. तुमचे पण आभार.
|
कथा छान आहे.. आवडली...
|
Bhagya
| |
| Tuesday, June 12, 2007 - 12:59 am: |
|
|
अज्जुका, फ़ारच सुंदर! कावेरीच्या मनातली खळबळ अगदी नेमक्या तर्हेने मांडली आहे. आणि बरेचदा आपण नातेवाईकांजवळ जे बोलत नाही, ते परक्यांजवळ बोलतो. कधी कधी परक्यांना ज्या गोष्टी लक्षात येतात त्या जवळच्यांना येत नाहीत. एकदा एका पुर्ण अनोळखी इटालिअन बाईने मला रस्त्यावरून जाताना थांबवून, घरात बोलवून तिची व्यथा ऐकवली होती.
|
Daad
| |
| Tuesday, June 12, 2007 - 1:29 am: |
|
|
अज्जुका, अतिशय आवडली शैली, वेगळा विषय... कुठेही काल, आज किंवा उद्याही घडतील असे प्रसंग. नक्ष.. मध्येही पूर्णपणे अनोळखी नायकाशीच बोलतो मनातलं "तो". स्वानुभव आहे- एका ट्रेन प्रवासात कुण्या एकीने माझ्याकडे मोकळं केलय तिचं मन. आणि त्यातूनच सुचलेली नक्ष... आहे. मनाच्या, कोणत्याही क्षणी मोडेल आता, अशा अति हळव्या क्षणी माणसं काय करू शकतात, कुठे कसा आधार शोधतात, कशी व्यक्त होतात.... हा एक न संपणारा विषय आहे. तू अतिशय ताकदीने संभाळलायेस, तो. तिचं व्यक्त होण, न होणं, अंतर्मुख होणं छान टिपलं आहे. खरं सांगायचं तर मला हा "किरण" तिच्याच मनाचा खेळ वाटला. कुणी दुसरं, अगदी नरेन सुद्धा त्याला " notice " करत नाही. परत मागे वळून पहाणार्या कावेरीला किरण कुठे दिसतो बस्-स्टॉपवर? (की हा माझ्याच मनाचा खेळ?). स्वत्:च स्वत:च्या कमकुवतपणावर केलेली मात.... मला तुझी कथा अशी दिसली..... आवडली, खूप.
|
|
|