|
Gobu
| |
| Tuesday, June 12, 2007 - 10:26 am: |
|
|
मित्रहो, किशोरचे "कोई हमदम न रहा" हे गाणे ऐकले आणि प्रचन्ड कासावीस झालो... मनाला चटका लावुन गेले हे गीत... तेव्हापासुन हे कथानक मनात घर करुन होते जे सुचले ते लिहीत गेलो पहिलाच प्रयत्न आहे तेव्हा गोड मानुन घ्या आवडल तर जरुर लिहा आणि हो, नाही आवडल तर मात्र नक्की कळवा!
|
Sakhi_d
| |
| Tuesday, June 12, 2007 - 10:37 am: |
|
|
>>तेव्हापासुन हे कथानक मनात घर करुन होते>> गोबू, कुठे आहे कथानक??
|
Zakasrao
| |
| Tuesday, June 12, 2007 - 11:19 am: |
|
|
गोबु लिहि कि आता.
|
Gobu
| |
| Tuesday, June 12, 2007 - 12:34 pm: |
|
|
धीरगम्भीर आवाजात मी स्पीचच्या समारोपाकडे "We should always search for new ways…" "And…" "And think how to achieve it…" "Every minute !" "Every second !" "Every time !" दीर्घ श्वास घेवुन मी समोर पहातोय, रीसर्च सोसायटीची अतिशय महत्वाची कॉन्फ़रन्स जगभरातुन सुमारे २००च्या वर रीसर्चर्स, सायन्टीस्ट्स,.. समोरचा अवाढव्य हॉल आणि कोपर्यात बसलेली माझी टीम.. माझ्या परीश्रमावर अतिशय विश्वास असणारी माझी गमतशीर सहकारी जुडी माझ्याकडे चिमुकल्या डोळ्यानी कौतुकाने पाहणारा माझा जुनिअर पीटर मन्दभाषी पण अतिशय बुध्दिमान असा माझा बॉस, मिस्टर टीम मला क्षणभर काहीच दिसत नाहीय काहीच उमजत नाहीय काहीही नाही हळु हळु टाळ्याच्या कडकडाटात मी भानावर येतोय "O! Dr. Raj, excellent!" "Wonderful, Dr. Raj, just wonderful!" "Its amazing!..." "Well, Dr. Raj, congratulations!" कितीतरी चेहरे मला घेरताहेत कितीतरी नजरा माझ्यावर खिळुन आहेत कित्येकजण माझ्याशी बोलायला इच्छुक आहेत आणि कितीजण ऐकायला माझी नजर मात्र कोणाला शोधतेय यावेळी राणी, राणी, छे बुवा! काहीतरीच काय! "Hey man, it’s time for party.." समोर माझी टीम उभी... जुडी, पीटर आणि बॉस "Its time for celebration" परत एकदा जुडीचा खट्याळ सुर "You made us proud!" पीटर ने कौतुक सुरु केलेय "Its good!" बॉस गेल्या सहा महीन्याची मेहनत अखेर फळाला आली म्हणायची जीवाचे रान केले आहे यासाठी आज अगदी यशाच्या शिखरावर आल्यासारखे वाटतेय "It's lonely on the top" "राणीशिवाय... छे! काही तरीच काय " (2) "Mr. Tim may I have a word with u?" जुडी आणि पीटर एकदम माझ्याकडे एकदम चपापुन पाहताहेत "Yes, my son" सम्पुर्ण इन्स्टिटुट मध्ये अतिशय कडक, अतिशय खडुस असणारा माझा बॉस जेव्हा मला “my son” म्हणतो तेव्हा मला बिल्कुल आश्चर्य वाटत नाही. गेले १४ वर्ष तो माझे काम अतिशय जवळुन पाहतोय तो! अतिशय जवळुन! सकाळी ८ ते रात्री १२ किन्वा कधी कधी १ वाजेपर्यन्त एकतर लैबमधील काम असो वा लिब्ररीतील ज्ञानसाधना. प्रचड विश्वास आहे माझ्यावर. समोर चुकुनही कौतुक करणार नाही, पण अतिशय प्रेमाने “my son” हेच बोलणार अगदी कुठेही! बॉस आणि मी हॉल सोडुन बाहेर कॉरीडोरकडे वळतो (३) शिकागोच्या आन्तरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचल्यावर आत जाण्यापुर्वी मी थाम्बतो सगळीकडे नजर फिरवतो १४ वर्ष! १४ वर्ष काही कमी नाहीत छे! आता पुन्हा नाही!! Bye! विमानाने टेकओफ़ घेताच मला प्रश्न पडतो "आता पुढे काय करायचे?" "दुसरे काय काम करु?" "गेली १४ वर्ष हेच तर करतोय " १४ वर्ष! १४ वर्ष म्हणजे ३३६ तास, २०१६० मिनीट, १२०९६०० सेकन्द!... राणीशिवाय!!! की राणीसोबत?! (४) "अग माझा गोबु आलाय परत " "हो हो नक्की ये" आई फोनवर बोलतेय, कुणाशी कुणास ठाउक? बाकी, इतक्या वर्षानन्तरही तिची "गोबु" म्हणायची सवय गेली नाहीय आता लहान आहे का मी? पुढच्या महीन्यात ४० सुरु होईल पण आता हे आईला कसे समजवणार दादा म्हणतोय की बाबा गेल्यापासुन तिला माझी फार काळजी लागली आहे माझे कसे होणार? आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे मी लग्न कधी करणार? "आता तरी लग्नाबद्दल समजाव ह त्याला" आईची दादाला रोजची विनवणी.. "तुम्ही फक्त हो म्हणा भावजी, ढीगभर स्थळ आणते मी..." इती वहीनी "स्थळ" हा शब्द ऐकला की माझी पुन्हा घालमेल सुरु राणी... (५) मी गेल्यापासुन दादा वहीनीना नवीन प्रोब्लेम सुरु झालाय असे वाटतेय ४ खोल्याचे घर... घरात आई, दादा, वहीनी, सचिन,प्रान्जु आणि मी अशी ६ माणसे पण गम्मत म्हणजे कोणालाच माझी सवय राहीली नाहीय गेल्या १४ वर्षात एकुण १० ते १२ वेळा आलो असेल मागच्यावेळी जास्तीत जास्त १० दिवस राहीलोय, बाबा गेले त्यावेळी दादा वहीनीना थोड ऑड वाटण स्वाभावीकच आहे मुलही मोठी झालीत आता, त्यानाही प्रायवसी हवीय "अरे गोबु तो फ़्लैट पाहुन ये आजतरी" आई आतुन किन्चाळतेय "कधीपासुन सान्गतेय तुला मी " "आई, अग पण पत्ता काय आहे, किती दिवस तिकडे गेलो नाहीय मी" "गोबु, पाटलाच्या बिल्डिन्गसमोर नवीन सोसायटी झालीय, तिथेच आहे" आई अचानक जवळ येवुन उगीचच माझ्या डोळ्यात पाहु लागलीय पाटलाची बिल्डिन्ग...टेरेस... माझ्या काळजाचे पाणी पाणी होतेय राणी.. राणी.. राणी.. (6) "B.J.Medical college road..." छे बुवा! प्रवास सुरु झाला इथुनच आणि परत तिथेच! सगळे बदललेय इथे हीच ती बस स्टॉपच्या समोर ची नवीन सोसायटी बस स्टॉप बस स्टॉप आणि राणी बस स्टॉप, राणी आणि मी "अरे हो भैया, बारीश मे कहा भीगते जा रहे हो, अन्दर तो आओ" एवढीशी चहाची टपरी, पण हा भैया एवढ्या प्रेमाने बोलावतोय, चला जाऊ या तर खर "चाय दे दु साब?" सन्ध्याकाळची वेळ, बाहेर पाऊस सुरु आहे, नुकताच अन्धार पडायला लागलाय "हा हा" रेडिओ सुरु झालाय कोई हमदम न रहा कोई सहारा न रहा हम किसी के न रहे कोई हमारा न रहा आई ग! यावेळेला हेच गाणे, अरे कोणी तरी बन्द करा रे हताश होऊन मी समोर पाहतोय समोर तिची बिल्डिन्ग दिसतेय राणी ची बिल्डिन्ग! राणी पाऊस सन्ध्याकाळची वेळ राणी.. छे! हा घाव अजुनही भरायला तयार नाही... (७) भरपावसातुन तिला सोडायला मी तिच्या बिल्डिन्गपाशी राणीची कळकळीची विनवणी "काहीतरी कर रे राजा मला पहायला येणार आहेत. तु पप्पाला चान्गला ओळखतोस...मी जीवाचे बरे वाईट... " शाम तन्हाई भी है आयेगी मन्झील लेके जो मुझे राह दिखाये वो ही सहारा न रहा इमारतीच्या गेट पाशी तिला सोडुन मी वळणार इतक्यात समोर पाटील उभे.. " ." "जोशी, काय म्हणतेय तुझी स्कॉलरशीप?" त्यान्चे कोरडे शब्द "किती शिकणार आहेस अजुन..?" त्यान्ची नजर सारखी माझ्या पावलाकडे का जातेय? अरे हो, माझी चप्पल तुटलीय काल... माझी शरमेने खाली पहातोय "आमच्या राणीला पहायला स्थळ येणार आहे उद्या. ५० एकरची नुसती बागाईत आहे. थेट खासदाराशी सोयरीक आहे..." मला वरपासुन खाली पाहुन ते निघालेत ५० एकर आणि तुटलेली चप्पल.. तुटलेली चप्पल आणि ५० एकर.. मी समोर पाहतोय फक्त स्वप्न दिसताहेत राणीची आणि माझी बाकी काही नाही काय होणार आता? मी काय करु शकतो? माझ्या हातात काय आहे? ए नजारो न हसो मिल न सकुन्गा तुमको वो मेरे हो न सके मै भी तुम्हारा न रहा (८) आई रडत रडत माझ्याकडे येतेय मला घट्ट पकडलेय आणि थोपटतेय काही बोलायला तयार नाहेय "गोबु, गोबु, अरे राणी गेली रे टेरेसवरुन उडी टाकुन आत्म.." आईचा आक्रोश... मी पुर्ण कोसळलोय विश्वास बसत नाहीय समोर काही दिसत नाहीय तोन्डातुन शब्दच फुटत नाहीय मी अचानक ओरडतो "राणी ." क्या बताऊ मै कहा यु ही चला जाता हु जो मुझे फिर से बुला ले वो इशारा न रहा "कोइ हमदम न रहा..कोई सहारा न रहा.." "We should always search for new ways…" "जो मुझे फिर से बुला ले..वो इशारा न रहा.." (9) "Hello, Mr. Tim, may I speak to you?" "Yes, my son!" "Do I have a place there?" "What?" " I want to rejoin…" "Hmmm… Certainly, my son" "Thank you".
|
Rajya
| |
| Tuesday, June 12, 2007 - 12:53 pm: |
|
|
गोबु, आपले चरण कमल कुठे आहेत? अरे काय यार, स्क्रीन धुसर झाला ना राव. खरचं गोबु अप्रतिम रे!! ---- च्यायची या शब्दांच्या नेमके शब्द सापडत नाहीत.
|
Rajya
| |
| Tuesday, June 12, 2007 - 12:57 pm: |
|
|
गोब्या, लेका तुला हाणायला हवा. office सुटायला ५ मिनीटं आहेत, सगळी पळायच्या तयारीत आणि आपण ईकडे सुन्न होऊन बसलोय. अरे होतास कुठे भो!!!
|
ग़ोबु अरे हे असले काही लिहुन सगळ्यांना रडायला लावणार तु बहुतेक्; बर्याच जुन्या आठवणी ताज्या केल्यास It's amazing Yaar. तु पहिल्यापासुन का नाही लिहिलस असे काही. आणि लिहिल असेलच तर मला परत सगळ्या पोस्ट चेक करायला लागणार आता. गुड वर्क आणि सगळे एकदम संपवलेस त्या बद्दल आभार
|
Jayavi
| |
| Tuesday, June 12, 2007 - 2:05 pm: |
|
|
गोबु......... अप्रतिम!! नि:शब्द झालेय काही व्यक्त करायला....! फ़ारच सुंदर त-हेनं राणीबद्दलच्या प्रेमाची तीव्रता व्यक्त केलीयेस. अतिशय हळुवार....! रडवलंस रे तू....! आता मात्र लिहित रहा....थांबू नकोस. ओघ आहे तुझ्या लेखणीला.
|
Lukkhi
| |
| Tuesday, June 12, 2007 - 2:29 pm: |
|
|
गोबू, खूप छान लिहिलय. राणीशिवाय!!! की राणीसोबत?! अप्रतिम...
|
Ravisha
| |
| Tuesday, June 12, 2007 - 3:32 pm: |
|
|
वेड!!!! शब्दच सापडत नाहीत....खरंतर शब्द नकोच आहेत...
|
Ramani
| |
| Tuesday, June 12, 2007 - 5:28 pm: |
|
|
बधीर झाले रे!! राणीशिवाय!!! की राणीसोबत?! तुटतय काहितरी आत.
|
Athak
| |
| Tuesday, June 12, 2007 - 6:24 pm: |
|
|
गोब्या , शब्द शोधतो , सापडल्यावर लिहील
|
Mansmi18
| |
| Tuesday, June 12, 2007 - 7:33 pm: |
|
|
गोबु, अप्रतिम. पटकथा लिहायचा प्रयत्न कर. कथा वाचताना पाहिल्याचा भास झाला.
|
Disha013
| |
| Tuesday, June 12, 2007 - 8:06 pm: |
|
|
गोबु,लिहिण्याची वेगळीच style पाहिली. keep it up!
|
कथा मनाला स्पर्शूण जातेय. गोबू... अ हं.. राजा तगमग समजतेय रे. --राणी
|
Mankya
| |
| Wednesday, June 13, 2007 - 1:44 am: |
|
|
गोबू .. कथा स्पर्शून गेली रे ! तशी कथा वाटलीच नाही; आपणच ते अनुभवतोय अस वाटलं ! आत आत काहीतरी तुटतं अस काही वाचलं की ! तामीळ चित्रपट आठवला ' १३७ वृंदावन कॉलनी ', त्यातही असाच प्रसंग ईतका सुरेख समोर ठेवलाय की पुर्ण बघूच शकलो नाही. ओघाच्या बाबतीच जया ला अनुमोदन ! लिहित रहा रे मित्रा ! माणिक !
|
Daad
| |
| Wednesday, June 13, 2007 - 2:18 am: |
|
|
गोबू, सुंदर. पहिल्यापासून स्वत्:बरोबर ओढत नेणारी कथा... इतकं साध्या शब्दात, आत आत तुटलेलं व्यक्त करणं सोप्प नाही, गोबू. लिहायला बसलं की महा भयंकर शब्दं बंबाळ होतो कागद हे असं इतकं अलगद, हळूवार भावनांचे पदर दाखवलेत... कमाल आहे तुमची त्याला संयम लागतो. तुमचं अजून खूप खूप वाचायला आवडेल, लिहित रहा, जसं जमेल तसं रियाजच तो चागल्या लिहिणार्यांचा (अनेकदा उस्तादांचा रियाजच ऐकावा असं म्हणतात).
|
Bee
| |
| Wednesday, June 13, 2007 - 2:33 am: |
|
|
गोबु, तुझी ही मायबोलिवरची पाहिलीच कथा खूप खूप आवडली.
|
Chetnaa
| |
| Wednesday, June 13, 2007 - 3:05 am: |
|
|
गोबु, अरे खुपच सुन्दर लिहीले आहेस.. तुझ्या झुळूक वरच्या चारोळ्या वाचतानाच जाणवत होते... तुझ्यात प्रतिभा आहे ते.... पण ही तुझी पहीलिच कथा आहे विश्वास बसत नाही... अगदी मोजक्या शब्दात इतका प्रचन्ड आशय मांडणे... तोही इतक्या परीणाम कारक रित्या...आप्रतिम.. सून्न करुन टाकलस गड्या.. स्क्रीन प्ले सारखे वाटतेय... म्हणजे नाटकही छान लिहु शकशील... लिहीत रहा..
|
Zakasrao
| |
| Wednesday, June 13, 2007 - 4:11 am: |
|
|
गोबु चांगल लिहितोस रे. ही तुझ्या आयुष्यातील वास्तव कथा नसावी हीच प्रार्थना. बाकि तुझ्याविषयी एकदम अंधारात असल्यासारख वाटतय बघ. तु तुझ्याकडचे एक एक पत्ते हळु हळु बाहेर काढतोयस. आधी चारोळी,आता इतकी सुंदर कथा. हम्म. अजुन तुझ्या पोतडीत काय काय भरलय काय माहित? पण सगळ बाहेर येवुदे आता वाट बघायला लावुन नकोस. आता मात्र तु भारतात येण्याची मी जास्त आतुरतेने वाट बघतोय रे.
|
|
|