Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 12, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » अधिक - ज्येष्ठ » काव्यधारा » झुळूक » Archive through June 12, 2007 « Previous Next »

Gobu
Saturday, June 09, 2007 - 2:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रीतीबेन, बर्‍याच दिवसाननतर आगमन आणि एकापेक्षा एक चारोळी! बहोत खुब! "आठवण.." तर एकदम सही बॉस!

Vaibhav_joshi
Sunday, June 10, 2007 - 5:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सन्मे .. काजळभार हा शब्द आणि त्याची लय खूप आवडलंय .. पुढे मागे एखाद्या बेसावध क्षणी कुठल्या कवितेत उतरला तर शिव्या घालू नकोस .
:-)


R_joshi
Monday, June 11, 2007 - 4:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक तुला फुलविण्यासाठी
शब्दांचा सडा मी शिंपिला
तु बहरता झुळुकेपरी
गुलमोहर हा फुलला

प्रिति:-)


Sanghamitra
Monday, June 11, 2007 - 5:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनू सही चारोळ्या आहेत हं. विशेषतः सल आणि जगापेक्षा वेगळं खूप छान.
माणिक दिलासे आवडले. :-)
वैभव अरे! खुश्शाल वापर! एकदा शब्द कवीच्या मनातून बाहेर पडला की तो वाचणार्‍याचा. आणि वैभव जोशींच्या कवितेत उतरला तर धन्य होईल तो. :-)


Giriraj
Monday, June 11, 2007 - 11:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझ्या केसांत नक्षत्रं माळायची म्हणलं...
तर सारं आकाशंच मोकळं व्हायचं,

मग चंद्राने काय बरं करायचं?


गिरीराज



Sanghamitra
Monday, June 11, 2007 - 12:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे जियो गिरी!
एक क्षीण प्रयत्न...

नक्षत्रं केसांत माळायचं नको डोक्यात घेऊ.
तो बघ रुसला मोगरा, त्याला कसं समजाऊ?


Devdattag
Monday, June 11, 2007 - 12:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिरी, सन्मी.. बहोत खुब..


Giriraj
Monday, June 11, 2007 - 12:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मोगर्‍याला म्हणावं,
"रुसायचं काय त्यांत!
नक्षत्रांनाही भुलवून
दरवळतोस तूच केसांत!


गिरीराज


Shyamli
Monday, June 11, 2007 - 12:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आहा गिरी ,सन्मी लिहा रे अजून गेल्या कित्येक दिवसात इथे छान जुगलबंदी रंगलेली नाहीये :-)

Giriraj
Monday, June 11, 2007 - 12:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तू पण ये की मैदानात!:-)

Jayavi
Monday, June 11, 2007 - 2:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्या बात है सन्मी, गिरी....वा!!
श्यामली....शुरु हो जाओ रे तुम भी :-)

Mankya
Tuesday, June 12, 2007 - 1:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रूपाली, संघमित्रा धन्यवाद !
गिरी, संघमित्रा येऊद्यात रे अजून !
मस्त लिहिलत !

माणिक !


R_joshi
Tuesday, June 12, 2007 - 4:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुप्रभात मंडळी:-)
आज सर्वांच्या चारोळ्या वाचल्या.माणिक,जगु, राजा फारच अप्रतिम लिहिल्यात चारोळ्या.:-)
मिनु, रुप्स... तुमचा हात तर कवितेमध्ये कोणी धरुच शकणार नाही. चारोळ्यातिल भावना मनाला स्पर्श करुन जातात.
गोबु कवि जागा झाला तुझ्यातलाहि. छान चारोळ्या करतोस. लिहित रहा:-)


Sanghamitra
Tuesday, June 12, 2007 - 5:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थॅंक्स श्यामली, माणिक. तुम्ही पण सुरू करा की. :-)
जयू सॉरी तुझी पोस्ट मिस केली होती मी. लिही ना तू पण


Sanghamitra
Tuesday, June 12, 2007 - 5:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंदावले बघ हसू चांदण्यांचे,
पाहून केवळ तुझी चंद्रकाया.
कुणाला हवी मोगर्‍याची मिजास?
तुझा गंध पुरतो मला मोहवाया.


Mankya
Tuesday, June 12, 2007 - 5:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संघमित्रा .. अशक्य लिहिलस !

माणिक !


Mankya
Tuesday, June 12, 2007 - 5:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संघमित्रा .. तस उत्तर अशक्य पण माझा एक अजाण प्रयत्न !

तुझ्या सहगंधाने भारलेल्या
मोगर्‍यानेही मोहून जावं
अन चांदण्याआडून चंद्रानेही
चोरून चंद्रकांतेला पहावं !

माणिक !


Ajjuka
Tuesday, June 12, 2007 - 6:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मोगर्‍याचे, चांदण्याचे
नकोत मला हे साज काही
चंद्रखुणांचे दुखरे गोंदण
देहावरती चमकत राही


Vaibhav_joshi
Tuesday, June 12, 2007 - 6:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मोगरा म्हटल्यावर राहवेना ....
:-)

उदास फिरतो नभी चांदवा
अखंड झरतो मुक्याने झरा
निशेस छळती सुनी पैंजणे
उशीस सलतो सुका मोगरा


Giriraj
Tuesday, June 12, 2007 - 6:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्या बात है :-) होऊन जाऊ द्या.. :-)




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators