Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 11, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » अधिक - ज्येष्ठ » काव्यधारा » कविता » Archive through June 11, 2007 « Previous Next »

P4pankaj123
Saturday, June 09, 2007 - 6:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

serv kavi mitranno namaskar sarvvanchha kavita vacllya kavita karnyachi ershaa kavitetun prtit hotach aahe matr aamhala hiaaplyasarkhyya kavi chi seva karnya chi sandhi dya mee gavkari la subeaditor aahe jalgone la aapan kavita dilyas tya me aavsha maazya aakat prsidhy karin aaplya sarvanchaa kavita farch sunder aahet

P4pankaj123
Saturday, June 09, 2007 - 6:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sorri mitranno tumhi serv marathi che taran har aahat mee matr english madhe tumhala messege pathvila kharach chukalch maz matr aatyachya english chya ka lat te lakshhyat rahat nahi sorri ha ...... matra tri dekhil samprkat raha pankaj pachpol subeaditor delli news paper gavkari jalgone eadishne cell no 9226529778 office 0257 223518;2235399 9370000283 me applya prtisadachhya prtishet aahe

Ganesh_kulkarni
Saturday, June 09, 2007 - 4:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी,
तुमची कवीता मला खुप आवडली!...
"तरीही आयुष्य असतेच शिल्लक
जगून घेता यावे इतके..
"


Ganesh_kulkarni
Saturday, June 09, 2007 - 4:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"माझा एकटेपणा!"

कधी कधी माझ्याशी
अगदी मोकळेपणाने बोलतो...

माझा एकटेपणा!
तिला सुध्दा बरच कांही
समजावतो,सुचवतो...

माझा एकटेपणा!
जरी सगळ्यातही मिसळलो मी
कसा नेमका दिसतो

माझा एकटेपणा!
मी जरी गुंतलो छापलेल्या
नोटांसाठी...
कसा कागदावरी शब्द छापतो...

माझा एकटेपणा!
गणेश(समीप)


Shyamli
Sunday, June 10, 2007 - 7:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जपमाळ

नाहीयेस कुठेही
सगळ्या नुसत्या कल्पना
समोर जे दिसतंय तोही केवळ भास
समजावतीये मी मनाला,
पण मग प्रत्येक श्वासाबरोबर
अपोआपच ओढल्या जाणा-या या जपमाळेच काय?
हे ही थांबवायलाच हवं...


श्यामली!!

Jayavi
Sunday, June 10, 2007 - 7:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे इतकं सुंदर घडतंय ना........पण अभिप्राय लिहायला जमत नाहीये..... :-(
आधीच्या सगळ्या कवितांना सलाम करुन श्यामलीच्या ह्या जपमाळेपासून पुन्हा एकदा कवितेच्या ह्या फ़ुललेल्या बीबीवर येतेय.

श्यामली.....फ़ार सुरेख...! अतिशय कमी शब्दात एकदम मोकळी होतेस गं तू....!! पण जपमाळ थांबायलाच हवी का गं....रहा की त्या स्वप्नात :-)

Bee
Sunday, June 10, 2007 - 9:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गणेश धन्यवाद... तुझी कविता छान आहे..

श्यामली, तुझी कविता वेगळे वळण घेत आहे ही एक चांगली गोष्ट आहे. एक सुचवू का? कवितेत हे असं करतीये, समजावतीये असे 'ये' नी संपणारे शब्द शोभत नाही. बोलीभाषेतच ते ऐकायला बरे वाटतात.

अश्वीनी देखील असा 'ये' चा उपयोग करते कवितेत. मला वाटत असा उपयोग गद्यात ठीक आहे पद्यात नाही शोभत...


Zelam
Sunday, June 10, 2007 - 2:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली जपमाळ केवळ अप्रतीम गं

Vaibhav_joshi
Sunday, June 10, 2007 - 5:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जपमाळ आवडली . समजावत्ये वगैरे मला तरी खटकलं नाही . एखाद्याला देव मानलं तर किंवा प्रत्यक्ष देवाला सखा मानलं तर कुणीही " समजावते आहे " सारखी प्लॅस्टिक भाषा वापरणार नाही असे वाटते . सौमित्रच्या कित्येक कवितेत ' बोल्लो , बोल्तो " असे शब्द येतात ... अर्थाला कसलीही बाधा न आणता , अर्थात हे सापेक्ष आहे . एक मत मांडलं इतकंच . वाद घालण्याचा मानस नाही .

Zelam
Monday, June 11, 2007 - 2:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी मी

नेहमी जमत नाहीच आताशी
पण कधीमधी अचानक भेटते मलाच माझी मी

अवचित जाग आलेल्या पहाटे
आवडत्या कवितेचं आभाळ पांघरून गुरफटलेली असताना
ती कविताच बनून हसत येते माझी मी

कधी सारं संपलेलं असतानाही
राखेतून धुगधुगी कशी काय शोधू शकते ती?
त्या उबार्‍यानेच मला जगवते माझी मी

शांत सरोवरासारख्या जीवनावर
मासळी बनून तरंग आणायची तिची सवय
त्या तरंगातूनच भेटते मला माझी मी

भेट तशी चुटपुटतीच होते क्षणभर
म्हणावसं वाटतं एकदा सवडीनं भेटूया गं पूर्वीसारखं
हे मुखवटे, ही व्यवधानं दूर सारून

पण एवढे भेटते ते तरी का कमी आहे
अजून तिर्‍हाईत नाही झाली तेच खूप आहे
कारण खरं सांगू, ती आहे म्हणून तर मी आहे

झेलम


Mankya
Monday, June 11, 2007 - 3:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली .. ' जपमाळ ' खूपच आवडली !

माणिक !


Jayavi
Monday, June 11, 2007 - 3:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झेलम... आवडलीस गं "तू" :-)

Hems
Monday, June 11, 2007 - 5:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झेलम , छान !
.....अवचित जाग आलेल्या पहाटे
आवडत्या कवितेचं आभाळ पांघरून गुरफटलेली असताना
ती कविताच बनून हसत येते माझी मी

ही कल्पना आवडली !



Bee
Monday, June 11, 2007 - 5:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झेलम, मस्तच उतरली आहे कविता..

Shyamli
Monday, June 11, 2007 - 9:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झेलम,:-)

पण एवढे भेटते ते तरी का कमी आहे
अजून तिर्‍हाईत नाही झाली तेच खूप आहे
कारण खरं सांगू, ती आहे म्हणून तर मी आह>>>हे मात्र खरं :-) हो ना?
आवडली , तुझ्यात असलेली मी :-)

Shyamli
Monday, June 11, 2007 - 9:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जयु,बी,वैभव,झेलम,माणिक धन्यवाद :-)

ये' नी संपणारे शब्द शोभत नाही. बोलीभाषेतच ते ऐकायला बरे वाटतात. >>>>वैभवनी केलेलं स्पष्टीकरण पुरेसं आहे बहुदा

धन्यवाद वैभव

Jo_s
Monday, June 11, 2007 - 10:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली जपमाळ छानच झाल्ये, त्या "तीये" ऐवजी "त्ये" ही चालल असत का.

Devdattag
Monday, June 11, 2007 - 11:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली.. जपमाळ आवडलीये आपल्याला..:-)

Giriraj
Monday, June 11, 2007 - 11:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नजरेचे उखाणे

इंद्रधनुने गुपित सांगत असल्यासारखी
बोलत राहतेस काहीबाही
काही चुकार केस वळून येतात डोळ्यांवर
तुझे नेत्रविभ्रम न्याहाळत असल्यासारखे
रागावून त्यांना मी दूर सारतांना
नजर उचलून तू हासतेस की लाजतेस?

आणि शांत निजलेली असतांना
श्यामल देहाला चुंबून घेतो मी नजरेनेच
तेव्हाही लागटपणे गालांवर झुलणारे केस दूर सारतांना
त्यांच्यात गुंतलेलं माझं मन सोडवू पाहतो... अगदी आल्लाऽऽद..
पण तेही नाही सुटत
तुझ्या नजरेच्या उखाण्यांसारखंच!

गिरीराज


Ajjuka
Monday, June 11, 2007 - 11:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आयहाय गिरी... नवीन लग्नाचा प्रभाव दिसतोय तर!! :-)




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators