Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 09, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » अधिक - ज्येष्ठ » काव्यधारा » झुळूक » Archive through June 09, 2007 « Previous Next »

Meenu
Tuesday, June 05, 2007 - 4:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरं झालं !
संपलं सगळं ..
जगापेक्षा आपणही,
उगा नको वागायला वेगळं ..


Meenu
Tuesday, June 05, 2007 - 4:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हल्ली कसलं व्यवहारी,
जमतंय मला वागायला ..!!
आठवणींचा काय उपयोग ?
मग नकोच म्हणलं ठेवायला ..


Meenu
Tuesday, June 05, 2007 - 4:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फुलांचा काय उपयोग ?
जेव्हा तू विचारलंस ..
कळलं नाही तुला तेव्हा,
काय तू गमावलंस ..


Mankya
Wednesday, June 06, 2007 - 1:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संघमित्रा .. सहीच !
मीनू .. जगापेक्षा वेगळं .. मस्त गं !

माणिक !


Bee
Wednesday, June 06, 2007 - 1:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रेमाची परिभाषा
असली जरी सापेक्ष
निस्सीम असेच राहू दे
करू नकोस मला भक्ष..



Bee
Wednesday, June 06, 2007 - 2:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राज्या, तुझी फ़क्त एकच ४ळी वाचायला मिळाली. त्यानंतर नविन काही लिहिलेस नाही तू. मोजके लिहिणे उत्तम आहे पण अरे इतका आराम बरा नव्हे..


Gobu
Wednesday, June 06, 2007 - 7:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनु,
"फुलान्चा काय उपयोग..." खुपच छान ह


Arun
Wednesday, June 06, 2007 - 8:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रेमाच्या अंकगणितात
काही मिळतं काही हरवतं
पण तिच्या गालावरील खळी पाहून
हृदयात मात्र लकाकतं


Meenu
Wednesday, June 06, 2007 - 9:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरुण u too ..!! लिखो लिखो

Mankya
Wednesday, June 06, 2007 - 9:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डोळ्यांचेच डोळ्यांवर
आरोप अन खुलासे
ओल्या पापण्यांनी वर
माफी अन दिलासे !

माणिक !


Rupali_rahul
Wednesday, June 06, 2007 - 11:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे माणिक, मी बोलत होती की अगदी मनातलं लिहिलं आहेस म्हणुन...
>>डोळ्यांचेच डोळ्यांवर
आरोप अन खुलासे
ओल्या पापण्यांनी वर
माफी अन दिलासे ! <<< अप्रतिम...
मीनु, खुप दिवसांनी आलीस आणि बहरुन टाकलस गं झुळेकेला...


Meenu
Thursday, June 07, 2007 - 8:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद रुपाली, गोबु, माणिक

Rupali_rahul
Thursday, June 07, 2007 - 10:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिटलेल्या डोळ्यांतही
अनेक दु:ख असतात
मनाची अस्वथता ते
मुके राहुनच सांगतात

रुप...


Rupali_rahul
Thursday, June 07, 2007 - 10:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्यवहारी वागायला
मी अजुन सरावलेले नाही
त्यातला निगरगट्टपणा
रक्तात अजुन भिनलेला नाही

रुप...


Gobu
Thursday, June 07, 2007 - 11:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुप्स, "मिटलेल्या..." एकदम सुरेख!
मानक्या, "डोळ्यान्चेच..." अतिशय सुन्दर!!!
प्रीती, राजा,... गायब?!


Rajya
Thursday, June 07, 2007 - 1:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे बी, गोबु, त्याचं काय आहे सध्या मी टुरवर आहे, तामिळनाडु मध्ये. ईकडे थोडं प्रोजेक्ट वर्क चालु आहे त्यामुळे वेळ मिळत नाही.
मी परत मंगळवारी पुण्याला जातोय तेव्हा नियमित भेट चालु होईलच.

मीनु, माणिक, संघमित्रा, बी, गोबु, मस्त झुळुका चालु आहेत.
तुमचं चालु द्या मी आलोच ४ ते ५ दिवसात.:-)


R_joshi
Saturday, June 09, 2007 - 10:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा!!! झुळुक चांगलीच बहरली आहे:-)
हाय गोबु:-)

एक तुझी आठवणच
जी मजबरोबर असते
मनाच्या एकांतात
ती सुगंधापरी राहते

प्रिति:-)


R_joshi
Saturday, June 09, 2007 - 10:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या डोळ्यांच्या आरशात
तुझ्या मनाच प्रतिबिंब दिसत
म्हणुनच तु काहि न सांगता
सर्वकाहि मला ऊमगत

प्रिति:-)


R_joshi
Saturday, June 09, 2007 - 11:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तु परिमलासारखी राहा
मी भ्रमर होऊन राहिन
तुझ्यात माझा जीव गुंतल्यावर
मी अजुन कोठे जाईन

प्रिति:-)


R_joshi
Saturday, June 09, 2007 - 11:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जमा-बाकिच हे जग
व्यवहार हा चालायचा
'मी हि हिशेबी झाले' म्हणुन
न पटलेला व्यवहार करायचा

मनाच्या जखमी पटलावर
व्यवहाराचा लेबल लावायचा
'मलाहि जगायचे' म्हणत
व्यवहार हा चालु ठेवायचा

प्रिति:-)





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators