Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 07, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » अधिक - ज्येष्ठ » काव्यधारा » कविता » Archive through June 07, 2007 « Previous Next »

Mankya
Friday, June 01, 2007 - 7:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनू .. किती दिवसांनी आलीस येथे !
आपणच .. छानच !

माणिक !


Sumedhap
Friday, June 01, 2007 - 11:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद विन्नी आणी माणिक!!

मीनु, आपणच... छान आहे...


Yogi1987
Saturday, June 02, 2007 - 1:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विन्नी मी नवीन असलो तरी तुमचि कविता आवड्ली

Yogi1987
Sunday, June 03, 2007 - 3:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आठ्वणी

आठ्वणी या फ़ुलान्च्या पाकळ्यान्सारख्या असतात
पाकळ्यान्च्या नाजुक्पणानेच त्या जपायच्या असतात
मनाच्या एका कोपर्‍यात त्या जपुन ठेवायच्या असतात
एकान्तात हळुवारपणे हुन्गुन परत नीट ठेवून द्यायच्या असतात
कारण ऊघड्या पाकळ्या लवकर कोमेजतात


Bee
Monday, June 04, 2007 - 3:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आईच्या उबदार कुशीतून
अलगद निसटलेले बालपण..
आणि त्या पाठोपाठ हरवलेले
वसंतरुपी रसरसले तारूण्य,
वार्धक्याच्या भाराने वाकलेली
आपलीच वृद्ध... जिर्ण काया
तरीही आयुष्य असतेच शिल्लक
जगून घेता यावे इतके..


Sumedhap
Monday, June 04, 2007 - 4:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अंधार

दिन उतरता रोज होई दरबारास प्रारंभ
अंधाराच्या राज्यात सुरू होई समारंभ

अंधाराचे राज्य असे भलतेच वेगळे
डोळे मिटुनच दिसतसे त्यात विश्व सगळे

हुंदके किती त्याच्या एका मिठीत सामावले
प्रसंगी त्यात कितींनी आपले सर्वस्व गमावले

टोचतसे अंधार हा, एकटाच कोपर्‍यात रुसुन बसे
देवच जाणो रोज किती पापांचा तो साक्षीदार असे

रात्रीच्या वेशीवर मग असती लक्तरे टांगलेली
सुर्योदयाची वाट पाहत सारी जनता पांगलेली

दिवसामागच्या रात्रीचा केवळ हा अंधार नसे
प्रकाशातही डोळे मिटुनी जग कधी स्वतच फसे

राज्याची ह्या वेस सोडा, आता इथुन बाहेर पडा
माणुस्कीच्या सुर्योदयाने उजळूदे सार्‍याच कडा


Meenu
Tuesday, June 05, 2007 - 1:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भेटू यात एकदा ..

निरभ्र निळ्या आकाशाखाली,
भेटू यात एकदा ..
घटनांचं, पुर्वग्रहांचं,
मळभ दूर सारुन,
स्वच्छ सुर्यप्रकाशात,
भेटू यात एकदा ..
झाडाखालुन दिसणारं,
तुकडा तुकडा आकाश ..
छे ..! ते का आकाश असतं ..?
म्हणुन म्हणलं ..
निरभ्र निळ्या आकाशाखाली,
भेटू यात एकदा ..


Meenu
Tuesday, June 05, 2007 - 2:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आकाश

पाहीलं आहेस कधी ..?
अस्वस्थ आकाश ..?
प्रत्येकाला आपल्या छायेखाली,
सामावुन घेण्याच्या प्रयत्नात,
ताणलेलं आकाश ..
विस्कटलेला ढग अन ढग,
अन उध्वस्त आकाश ..
हळु हळु काळवंडतं,
काळज्यांनी आकाश ..
मग एकदा असह्य होतो,
सारा सारा ताण .. आणि ..
कोसळतं थेंबा थेंबातुन,
होऊन हळवं आकाश ..
पाहीलं आहेस का कधी निरखुन ..?
तुझं आकाश ..


Shyamli
Tuesday, June 05, 2007 - 3:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आयला मिनु आकाश आकाश अजुन एक आकाश :-)

Shyamli
Tuesday, June 05, 2007 - 3:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आकाश

एक आकाश कायम शांत निवांत असलेलं
दुरुनच जगाच निरीक्षण करणारं
याच्यार्यंत वादळबिदळ पोचतच नसणार बहुदा
आणि आलंच वादळ तर भीक न घालणारं
तेच बरय;
वादळाला शांत राहता येत नसतच म्हणा कधीही

आकाशानं शांतच राहायला हवं?



श्यामली!


Meenu
Tuesday, June 05, 2007 - 4:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह श्यामले क्या बात है ..!!

Dineshvs
Tuesday, June 05, 2007 - 6:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली, छान विचार. याच सन्दर्भात, सागराने कसे वागायचे ?
माझी फ़र्माईश समज.


Mankya
Wednesday, June 06, 2007 - 1:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनू .. क्या बात ! दोन्ही आकाश आवडले ! पहिलं जरा जास्त आवडलं !
श्यामली .. मस्तच ! तुझेही आकाश मस्त !
आकाशानं शांत रहायला हवं .. वा !
लिहित रहा गं दोघीही !

माणिक !


Meenu
Wednesday, June 06, 2007 - 4:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बघता बघता !!

स्वप्न 'सत्य' होऊन आलं
खुप काही घडुन गेलं ..
बघता बघता !!
आत्ता होती मुक कळी ..
वार्‍याशी मैत्री केली ..
बघ बघ फुलुन आली ..
बघता बघता !!
आत्ता होती माती काळी ..
चिंब चिंब भिजुन गेली
हिरवी हिरवी मखमल झाली
बघता बघता !!




Mankya
Wednesday, June 06, 2007 - 6:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनू .. ' बघता बघता ' जाम आवडली !
पण मला पहिल्या दोन ओळींचा आशय आणि खालच्या ओळींत त्याचा संदर्भ .. कळत नाहीये (offcourse my limitations) !
पहिल्या दोन ओळीच तश्या जास्त आवडल्या म्हणा !

माणिक !


Sumedhap
Thursday, June 07, 2007 - 4:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनु, आकाशावरच्या सर्व कविता खास.....खुप आवडल्या...बघता बघता ही सुंदर आहे...छान मांडणी...मस्तच!!!!!

Niwedita
Thursday, June 07, 2007 - 6:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनू भेटुया एकदा.... आणि आकाश मस्तच त्यातल्या त्यात आकाश जास्तच मस्त

आणि

झाडाखालुन दिसणारं,
तुकडा तुकडा आकाश ..
छे ..! ते का आकाश असतं ..?
म्हणुन म्हणलं ..
निरभ्र निळ्या आकाशाखाली,
भेटू यात एकदा ..

देखील छान








Niwedita
Thursday, June 07, 2007 - 6:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शाल्मली तू तर ग्रेटच आहेस ग... आकाश सहीच

Meenu
Thursday, June 07, 2007 - 8:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रतिक्रीयांबद्दल धन्यवाद ..
हं बघता बघता थोडी गडबडली खरी


Shyamli
Thursday, June 07, 2007 - 5:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी फ़र्माईश समज.>>>>
दिनेशदा, अहो मी वैभव किंवा स्वाती सारखी शब्दप्रभु नाही हो!
चारोळ्या करता करता चुकत माकत चाराच्या आठ ओळी लीहायला लागले.
तरीही तुमच्या म्हणण्यावर विचार करतीये, जमलच तर पोस्टेन इथेच:-)

प्रतिक्रीयांबद्दल धन्यवाद दोस्तहो :-)







 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators