Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 07, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » अधिक - ज्येष्ठ » कथा कादंबरी » प्रतिमा उरी धरूनी... » Archive through June 07, 2007 « Previous Next »

Bee
Wednesday, June 06, 2007 - 8:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुमीचे खरे नाव होते आरती. पण तिला हे टोपण नाव तिच्या सोबत राहणार्‍या एका मैत्रीणीकडून मिळाले होते.

रुमी ही कमालीची उत्साही, खूप मेहनती आणि इतरांवर अपार माया दाखवणारी एका गरिब कुटुंबातील सहनशील व्यक्ती होती. तिला अनेक न्यूनगंडांनी घेरले होते. त्यामुळे ती सदैव आपले अस्तित्त्व लपून घेतच जीवन जगत होती.

जन्म देणार्‍या आईवडीलांकडून रुमीने फ़क्त चांगलेच गुण उचलले होते. तिला आयुष्यातील छक्केपंजे कशाला म्हणतात हे काहीच ठावूक नव्हते. त्यामुळे तिचे पाऊल जसे बाहेर पडले तिला पदोपदी कुठल्यानाकुठल्यातरी व्यवहाराचा सामनाच करावा लागला. चारचौघांप्रमाणे रुमी धक्के खात गेली, दोन गोष्टी शिकत गेली. पण मुळचा गरिब स्वभाव जशाचा तसा कायम राहिला. ती फ़क्त तिला सावरायला शिकली होती.

रुमीवर निस्सिम प्रेम करणारे जर तिला कुणी मिळाले असेल तर ती सारू. बंगालमधून मुंबईसारख्या शहरात सारू नोकरीला आली. एकेदिवशी तिची गाठ रुमीशी पडली ती त्यांच्या खानावळीत. सारू आणि रुमीचे डबे अदलाबदल झाले होते. त्या मार्फ़तच दोघींची भेट झाली. बिचारी सारू जागेच्या शोधार्थ वणवणत होती. जिथे ती राहत होती ती एक कोंदट जागा होती. तिथला शिंपी सकाळी तिथे कपडे शिवायचा. रात्री अकरा वाजेपर्यंत सारू त्याचे कपडे शिवून शटर बंद होईपर्यंत तिथे थांबे. नंतर तिथले सर्व धागे दोरे, कपड्यांचे तुकडे झाडून तिथेच आपले अंग टाके. दुकानाचा शिंपी गरिब म्हणून त्याला सारूची दया आली. दोघेही बंगाली होते म्हणून तेवढी सारूला त्याच्याकडून मदत मिळाली. सारू एक अभियंता होती पण अजून तिच्याकडे ह्या एका पदवीपेक्षा जवळ काहीच नव्हते.

झाले पहिल्याच भेटीत सारूने आपल्या जागेचा बिकट प्रश्न रुमीला सांगितला. सांगता सांगताच तिने आपल्या आयुष्याचा कमालीचा बिकट भुतकाळही रुमीला सांगून टाकला. रात्रीचे अकरा वाजले होते. रुमीच्या डोळ्यातील अश्रू काळोखात लकाकत होते. तिला सारूसारखी मैत्रीण मिळाली हे तिचे एक भाग्यच होते. कारण सारू कुठेच नाटकी नव्हती, ती देखील रुमी सारखीच एक गरिब, वास्तविकतेचे चटके सहन करून, आपल्या यशाची वाट शोधत फ़िरत होती. तिला ह्या महानगरात आपले असे कुणीच नव्हते.

दुसर्‍याच दिवशी सारू आरतीकडे रहायला आली. आरतीचे नामकरण रुमीमधे झाले. पुढे चार वर्ष दोघीजणी सोबत राहिल्यात. अधेमधे बरेच वादही निर्माण झाले पण ते वाद समंजसपणावर आधारीत होती. बहुतेकदा ते तात्विक वाद असत, कधी ते फ़सवणूक, माणूसकी, संघर्ष अशा विविश विषयांवर आणि कारणांवर आधारीत असत. ते वाद क्षुल्लक आणि स्वार्थी नसतं. नेमक्या ह्याच कारणामुळे चार वर्षाची सोबत राहू शकली.

रुमीनी सारूतले आणि सारूनी रुमीतले चांगले गुण वेचून घेतले होते. त्या साठी दोघीजणी एकमेकींच्या आभारी होत्या. सारू आपल्या चौकसपणामुळे आणि आत्मविश्वासू वृत्तीमुळे प्रत्येकाची जिवलग मैत्रीण होत असे. हे रुमीला चांगलेच ठावूक होते. त्यामुळे ती जरी कुणाची खास मैत्रीण नसली तरी सारू आपली एक मैत्रीण आहे ह्यावर ती संतुष्ट होती.

मुंबई सोडून जेंव्हा सारू बंगलोरला परत गेली आणि त्यानंतर इतर देशात भटकर राहिली त्यावेळी तिचे जग आता वेगळे होत आहे हे रुमीला कळत होते. सारूचे लग्न झाल्यानंतर रुमीला तिचे पत्र येणेही कमी झाले होते.

एके दिवशी म्हणजे तब्बल १० वर्षानंतर सारूची भेट रूमीशी झाली. कुठला तरी सेमिनार होता. रुमीने आपली जुजबी ओळख करून दिली आणि खुर्चीवर बसली. त्या गर्दीतही कितीतरी मागे असणार्‍या सारूने तिचे शब्द ऐकले आणि धावतच जवळ येऊन तिने रुमीच्या डोक्यावरून प्रेमानी हात फ़िरवत तिची विचारपूस केली. रुमीच्या डोळ्यातील आसवांचे टपोरे थेंब इतके दाटले होते की तिला समोर कोण उभे आहे हे कळत देखील नव्हते. सारूच्या नवर्‍यानी लगेच ओळखले हिच ती रुमी असावी जिच्याबद्दल सारू इतकी काही बोलते. म्हणजे सारू अगदीच काही रुमीला विसरली नव्हती पण तिला तिच्या आयुष्यातील इतर गरजाही होत्या लक्षा पुरवायला.

रुमी मात्र, कमालीची हळवी, प्रेमानीच पोट भरून घेणारी. सारू गेल्यानंतरची पोकळी ती इतर कुणाच्याच असण्यानसण्यावर भरू शकली नाही. तिला जी कुणी व्यक्ती भेटत असे तिच्या ती सारूला शोधण्याचा व्यर्थ प्रयत्न करीत असे. पण व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. सारू ही सारूतच होती, जशी रूमी तिच्यातच होती. आपला नवरा, दोन गोंडस मुले, भले मोठे घर, प्रेम लावणारे सासू सासरे हे सर्वाचे सुख सारूच्या चेहर्‍यावर झळकत होते. रुमी मात्र सारूच्या दुरावण्यावर तिची प्रतिमा उरी धरूनी.. जीवन जगत होती.


Nandini2911
Wednesday, June 06, 2007 - 9:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी... कथा संपली का की अजून आहे?

Sakhi_d
Wednesday, June 06, 2007 - 9:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी... कथा संपली का की अजून आहे?
मलाही हेच म्हणायचे आहे.... :-)

Bee
Wednesday, June 06, 2007 - 9:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला फ़क्त रुमीचे भावविश्व रेखाटायचे होते. त्यासाठी ही लघूकथा लिहिण्याचा एक फ़ुटकळ प्रयत्न केला.. कथा तिथेच संपली..

Manjud
Wednesday, June 06, 2007 - 12:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरेच काही राहून गेले असे वाटते आहे. रूमीचे भावविश्व नीट उलगडत नाहीये.

This is my personal opinion, no hard feelings please.

}

Milindaa
Wednesday, June 06, 2007 - 4:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, ही एखाद्या मुलाची कथा लिहीली आहेस का त्याला गोष्टीत मुलगी करुन :-)

Bee
Thursday, June 07, 2007 - 1:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही संपूर्ण काल्पनिक कथा आहे. त्यामुळे पात्र कुठले ठरवायचे हे सर्वस्वी मी माझ्यावर सोपविले. मुली खूप हळव्या असतात त्यामुळे वाचकांना ते सहज पटेल असे एक लिहिताना वाटले. खरीबीरी कथा नाहीये ही..

मिलिंदा हल्ली मोजकेच पोष्ट लिहितोस तू.. मला वाटलं मायबोलिवरून निवृत्ती घेतलीस की काय :-)


Arch
Thursday, June 07, 2007 - 7:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही कथा आहे? ..

Sanghamitra
Thursday, June 07, 2007 - 8:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>> बंगलोरला परत गेली
सारू बंगालची आहे की बन्गलोरची?
आणि खरंच ही कथा आहे?


Bee
Thursday, June 07, 2007 - 8:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे बाबांनो प्रतिक्रिया लिहायच्या असतील तर लिहा.. उगाच कशाला हे काय ते काय.. नस्त्या चौकशा करत आहेत..

प्रांजळपणाने नम्रपणे तुमचे मत मांडा. म्हणजे लिहिणार्‍याला कमीपणा वाटणार नाही. प्रतिक्रिया वाईट दिली तरी चालेल पण ती प्रतिक्रिया लिखाणाशी निगडीत असायला हवी.

अर्च, तुला ही कथा वाटली नाही तर मग नक्की वाटले. इथे दोन पात्र आहेत, त्यांचे नाते दाखविले आहे, एक सुरवात आहे, शेवटही आहे. अजून काय हवे असते कथेला समर्पक असे काही... कथेचे शीर्षक देखील खूप काही व्यक्त करणारे आहे..


Bee
Thursday, June 07, 2007 - 8:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संघमित्रा, ती बंगलोरला परत गेली म्हणजे नोकरीला ती तिथे गेली असे मला म्हणायचे आहे. 'परत' हा शब्द तिथे नको होता खरे तर..

Viveki
Thursday, June 07, 2007 - 9:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक वासतववादी आणि महान कथा. कथानक मस्त आहे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे कथेला खूप डेप्थ आहे.

एकावर एक तीन वाचक उभे केले तरी ते बुडतील एवढी डेप्थ आहे. बाकी लेंग्थ आणि विड्थ पण उत्तम आहे. शैलीचे म्हणाल तर मेघना पेठे आणि गौरी देशपांडे यांनी दोघींनी मिळून लिहिली आहे की काय असे वाटावे एवढी प्रभावी शैली.

एकदम महान कथा. अजून येऊ द्या. आम्ही एकदम
__/\__


Bee
Thursday, June 07, 2007 - 10:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मागे अज्जुकाच्या प्रतिक्रियावर भाष्य करताना विवेकी आढळले होते ते आज परत उगवलेत. ह्यांचे आपले दरवेळी एकच कर्तव्य असते.. कुणी तरी वार करायला मिळते का हे शोधायचे. ते करून झाले की मग काही महिने दिवस मायबोलिवर यायचे नाही. मग परत काही दिवसांनी नविन बकरा मिळतो का ते शोधत इकडे तिकडे फ़िरायचे. आपण किती विवेकी आहोत हे आपल्या खोट्या ID नी फ़ार मोठ्या आवाजात सिद्ध करायचे. मायबोलिवर फ़ुकटात यायला मिळते आणि एक काय हजार IDyaa घेता येता त्याचा पुरेपुर फ़ायदा घ्यायचा.

नेमस्तक, Admin प्लीज ह्या व्यक्तीला काहीतरी समजवून सांगा.


Alpana
Thursday, June 07, 2007 - 10:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला पण कथा नाही वाटली...तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे दोन पात्रांमधले नाते दाखवले आहे तरिपण i dont know why काहीतरी missing वाटतय.. कथेपेक्षा अनुभव किंवा अजुन काही.......
माहित नाही अजुन काय म्हणता येईल.. actually हे नाते फ़क्त लेखक सांगतो म्हणुन नाते आहे... ते वाचकाला जाणवत नाही... i dont know if i have expressed what i meant to say...



Ajai
Thursday, June 07, 2007 - 11:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



कथा नाही आवडली. लघुकथेलाही येक कथानक plot , story structure असायला हवे. these attributes are missing
सुरुवात आणि शेवट आहे म्हणायला मधे असे नक्कि काय घडते? दोघिमधले नातेही निट उलगडत नाहि. writing style is not very impressive


Gobu
Thursday, June 07, 2007 - 12:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी,
कथा ठीक आहे, पण अजुन जरा मेहनत घ्यायला हवी
आणि हो, मायबोलीवर फक्त लेखकानीच कथा लिहाव्यात असा नियम नाही. सर्वजण आपल्या भावना, विचार, साहित्य इथे लिहु शकतात (मायबोली आपली सर्वाची, आपल्या सगळ्यासाठी! )
... त्यामुळे बिनधास्त लिहा ह!


Nandini2911
Thursday, June 07, 2007 - 3:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, मी माझे मत प्रांजळपण्रे मांडत आहे कृपया राग मानू नकोस. मुळात ही लघुकथा नाही. रूमी आणि सारु ही दोन पात्रं नीट उभीच राहत नाही. Visulisation चा भाग पूर्णपणे गायब झाला आहे.

या कथेत संवाद नाही. दोन मुली एकत्र राहत असताना त्याचं जे नातं निर्माण होतं. ते इथे दिसत नाही.

रुमी एकटी जगायचा निर्णय का घेते? सारु लग्न का करते? त्याच्यातले वाद विसंवाद सर्वच गायब आहे.

मुळात ही रुमी किती चांगली. सारु किती चांगली हे सांगण्यात बराचसा वेळ जातो. त्यामुळे नक्की कय घडलं याचा अंदाज येत नाही.

इथे दोन पात्र आहेत, त्यांचे नाते दाखविले आहे, एक सुरवात आहे, शेवटही आहे. अजून काय हवे असते कथेला समर्पक असे काही... कथेचे शीर्षक देखील खूप काही व्यक्त करणारे आहे..



सॉरी बी, कथेचं शीर्षक कथेबद्दल काहीच सांगत नाही. कथेमधे घटना हव्या असतात. त्या इथे आहेत का?

तूच एकदा वाचून बघ ना की नक्की "मसाला"कुठे कमी कुठे पडला ते..



Sameerdesh
Thursday, June 07, 2007 - 4:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

याच नावाची एक कथा पूर्वी मायबोलीवर वाचली होती ... बेटीची होती वाटतं.

Lalu
Thursday, June 07, 2007 - 5:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तिच्या कथेचं नाव 'प्रतिमा उरातली...' होतं. cbdg

Saurabh
Thursday, June 07, 2007 - 5:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


बी! अरे काय हे? एरवी मी कदाचित काहीच प्रतिक्रिया दिली नसती. पण 'नक्श फ़रियादी' वरील तुझी प्रतिक्रिया आणि नंतर त्याच विभागात हे लेखन वाचुन रहावले नाही! हे लिखाण कोणत्याही दृष्टीने 'कथा' वाटत नाही. वर काही जणांनी 'का' चे उत्तर दिले आहे पण तुझे वाचन बर्‍यापैकी आहे (अनेक ठिकाणी तु योग्य / अयोग्य संदर्भ देत असतोस त्यावरुन झालेले मत), तेंव्हा ही कथा का नाही ह्याचे स्पष्टीकरण दुसर्‍यांकडुन मागायचे प्रयोजन नाही. तुझे ह्या आधिचे ललित वाचलेले आहे. त्यामुळे तु ह्यापेक्षा चांगले लिहु शकतोस असा विश्वास बाळगायला (तु) हरकत नाही...





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators