Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
प्रतिमा उरी धरूनी... ...

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » अधिक - ज्येष्ठ » कथा कादंबरी » प्रतिमा उरी धरूनी... « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through June 07, 200720 06-07-07  5:56 pm

Asami
Thursday, June 07, 2007 - 7:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदम मनातले बोललास सौरभ. bee तिथे तू ज्या depth etc ची मागणी केली आहेस तेच घटक इथे दिसत नाहित. लघु कथा असली तरी त्यांच्यापासून फ़ारकत घेता येणार नाही. कदाचित तुला पात्रांच्या relationship मधे हे अध्यार्हुतही असतील असे वाटत असेल पण ते १००% लिखाणातून समोर उतरत नाहीत.

Disha013
Thursday, June 07, 2007 - 8:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कथेतुन नक्की असे काहिच व्यक्त होत नाही असे वाटते.

Bee
Friday, June 08, 2007 - 2:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गीतकार डी. व्ही. केसकरांची एक रचना आहे 'प्रतिमा उरी धरूनी.. ' जी लताबाईंनी गायलेली आहे, वसंत प्रभुंनी संगीतबद्ध केलेली आहे. मला ह्या भावगीताची पहिली ओळ नितांत आवडते. बाकी उर्वरीत गीत साधेच आहे. पण पहिली ओळ खूप काही सांगून जाते.. ह्या so called कथेचे शीर्षक मला ह्या ओळीवरून सुचले, योग्य वाटले म्हणून तेच मी दिले.

समीर, एकाच शीर्षकाच्या कथा अनेक लेखकांनी लिहिलेल्या आहे. उदा. 'घर','झोपाळा', 'अंगण' नावाच्या कथा, कविता, कादंबरी मी वाचलेल्या आहेत. तुझ्या पोष्टचा उद्देश मला समजला म्हणून हे उत्तर.

नंदीनी, अल्पना, गोबु, दिशा, असामी, सौरभ -- तुमच्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.

इथे एक सांगावेसे वाटते, शलाका ही एक खूप चांगली लिहिते म्हणून मी तिच्याकडून depth वगैरेची अपेक्षा बाळगली आहे. माझी कथा लिहिण्याची कुवत तिच्यासोबत तुलना करण्याची लायकी देखील ठेवत नाही. मी तिला depth बद्दल काही बोललो ह्याचा अर्थ मी जे काही लिहितो त्यात depth असायलाच पाहिजे असे मला तरी नाही वाटतं. मी कथेची depth सर्वच लेखकांकडून नाही अपेक्षित करत. फ़क्त त्यांच्याचकडून जे चांगले लिहू शकतात.. लिहितात. तेंव्हा इथे माझी कुणाशी तुलना.. किंवा मी दिलेल्या प्रतिक्रियेचे आलेले संदर्भ मला फ़ारसे पटले नाही.


Sanghamitra
Friday, June 08, 2007 - 4:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>> मी तिला depth बद्दल काही बोललो ह्याचा अर्थ मी जे काही लिहितो त्यात depth असायलाच पाहिजे असे मला तरी नाही वाटतं.
मान्य. त्या त्या लेखकाच्या स्केलप्रमाणे त्याच्याकडून एक वाचक म्हणून कुणीही अपेक्षा करू शकतो. त्याने स्वतः चांगले लिहील्यावरच तोंड उघडावे हे काही बरोबर नाही.
तरीही बी हे तुझे लिखाण कथा या प्रकारात मोडत नाही. काहीच नीट लिहीले नाहीयेस. इतका अश्रूंचा वापर केलाय तर तो जस्टीफाय करण्यासाठी काही प्रसंग नकोत का? परत लिहून काढून बघ ही गोष्ट छानपैकी.


Giriraj
Friday, June 08, 2007 - 4:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी,तू कुणाची पर्वा करू नकोस... तुला लिहावेसे वातले तसे लिही.. जर कथा वाटत नसेल तर ललित मध्ये हलवायला लाव नेमस्तकंना(तसेही त्यांना दुसरे काही काम नसते आणि त्यांचे सल्लेही कुणी ऐकत नसते!:-)) विवेकीकडे तू लक्ष देऊ नकोस.. पण लक्ष दिलेस तर तुझ्या लिखाणाची देप्थ कमी होऊन त्याला उंची प्राप्त होईल!असो.. तुला वाटले म्हणून तू लिहिलेस.. व्यक्त होणे हे खूप महत्वाचे असते.. मला तर वाटते की अश्या चुका करतच आपण शिकतो,मोठे होतो.. त्यामुळे तू लिहित रहा.. मीसुद्ध सुरवातिला दोन कथा अर्धवट लिहून सोडून दिल्या होत्या (आणि आता कथा लिहिणेच सोडून दिलेय.. कारण माझा कंटाळा.) पण तू मनास लावून न घेता प्रय्त्न करत रहा.. किंवा याच लिखाणाला पुढे छान विस्तारित करता येईल.. पत्रे उभि राहिली की कथाही राहीलच की.. म्हणूनच लिहित रहा!(मी सहसा इतरांना उपदेश करत नाही.पण तुला आपल्या मित्रत्वाच्या नात्याने सांगितले.. असो!)

Zakasrao
Friday, June 08, 2007 - 5:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी नन्दिनी,संघमित्रा आणि गिरि ने जे संगितलय ते लक्षात ठेव. प्रयत्न करत रहा. .
तुझ्या मनातिल भावना पुर्ण आल्या नाहित कथेमधे असच वाटल मला वाचुन. तुझ्या मनातिल भावना अजुन उतरवण्याचा प्रयत्न कर. बेस्ट लक.


Alpana
Friday, June 08, 2007 - 6:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

even i agree with giriraj and zakas प्रयत्न केला हे महत्वाचे....बाकिच्या बर्‍याच जणांनी छान सुचना दिल्यात...त्यावर विचार केला तर नक्कीच फरक पडेल... मी बर्‍याचदा कथा लिहायचा प्रयत्न अर्ध्यात सोडलाय म्हणुन परत म्हणतेय प्रयत्न केलस हे खुप महत्वाचे, सुधारणा नक्कीच होइल.... त्यामुळे उगीच disappoint होवु नकोस

Maitreyee
Friday, June 08, 2007 - 2:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिरी?? हा वरचा गिरीराज चाच आयडी आहे ना की मी काही चुकीचे वाचतेय :-O :-) ~D

Zakasrao
Saturday, June 09, 2007 - 6:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा वरचा गिरीराज चाच आयडी आहे ना की मी काही चुकीचे वाचतेय >>>....
हो ना मलाहि तसेच वाटले होते.
त्याने चक्क........


Nilima_v
Friday, June 15, 2007 - 4:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Giriraj has said it right. You should write as it comes to you.
Just write it under Vinodi- Nibandh section.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators