Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 05, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » अधिक - ज्येष्ठ » काव्यधारा » झुळूक » Archive through June 05, 2007 « Previous Next »

Gobu
Thursday, May 31, 2007 - 11:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रहो,
माणिक, जगु, रुप्स, प्रीती, श्यामला, मनोगत, राजा, अजुका, झेलम रविशा,....
या सार्‍या सुन्दर चारोळीचे के पुस्तक छापायचा विचार आहे
(मला खुप पैसे मिळाल्यावर! पण पैसे मिळवण्यासाठी मोठ व्हायला लागते असे ऐकलय! एकन्दरीत अवघड आहे बुवा! )


Rajya
Thursday, May 31, 2007 - 12:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणिक, जगु, रुप्स, प्रीती, श्यामला, मनोगत, राजा, अजुका, झेलम रविशा,....
या सार्‍या सुन्दर चारोळीचे के पुस्तक छापायचा विचार आहे

गोबु, आयडिया मस्तच आहे.
चला मीच सर्वांना विचारतो.
गोबु, जगु, श्यामली, रुप्स, माणिक, प्रीती, मनोगत, अज्जुका, झेलम, रविशा, गणेश, पूजा, बी, मी आपल्या चारोळ्या काॅपी करुन घेऊ का?

१५० ते २०० चारोळ्या जमल्या तर प्रकाशीत करु.
ज्यांच्या चारोळ्या असतील त्यांच्या नावाने प्रकाशीत करु, जर आपली इच्छा असेल तर.

चला तर जो या प्रोजेक्टला मान्यता देईल त्याच्या चारोळ्या आजपासुन काॅपी करायला सुरुवात करतो.

चला मंडळी आपला आपला होकार कळवा.


Ravisha
Thursday, May 31, 2007 - 1:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मंडळी,कालच मी माझे पहीले पोस्ट आणि आयुष्यातील पहीली चारोळी लिहीली..प्रतिसादामुळे हुरुप आला...प्रकाशनाचा प्रकल्प उत्तम आहे...त्या निमित्ताने अजुन काही लिहिण्याचे धाडस करेन....

Mankya
Friday, June 01, 2007 - 4:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रडायचं नाही ठरवलं की
आपूसच भरून यायला लागतं
मनही मग लगेच सोयीस्कर
त्याचं कारण शोधायला लागतं !

माणिक !


Jagu
Friday, June 01, 2007 - 4:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राजा, चांगली कल्पना आहे. माझी अनुमती आहे. पण पुस्तकात तू आमची खरी नावे टाक. नविन प्रकल्पासाठी तुला शुभेच्छा.

गोबू, तुझी इच्छा पुर्ण होईल अस वाटत आहे.


Jagu
Friday, June 01, 2007 - 5:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनातील भावना कधी कधी
डोळ्यातून बरसतात
तुझ मन त्यात चिंब व्हाव
ह्या अपेक्षेत असतात.


Jagu
Friday, June 01, 2007 - 5:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दोन पापण्यांच्या मिटण्याने
मोती रुपी अश्रू जन्म घेतो
अलंकार त्याचा बनवून
पेटीत जतन करावासा वाटतो.


Ajjuka
Friday, June 01, 2007 - 5:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या चारोळ्या छाप तू तुला आवडल्या असतील तर पण नाव नको माझे..

Rajya
Friday, June 01, 2007 - 6:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे माणक्या, तुझं मत नाही दिलं चारोळी प्रकाशनाबद्दल.

Gobu
Friday, June 01, 2007 - 5:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणिक,
तुझी मेल मिळाली
अरे चारोळीचे पुस्तकाबद्दल मी गम्मतीत लिहीले होते, मजा करत होतो मी!
राजा,
ही कल्पना तु चान्गलीच मनावर घेतली असे दिसतेय! सर्वाना विचार ह आधी!
माझ्या चारोळ्या घ्यायला माझी काहीच हरकत नाही मित्रा! उलट मी तर अतिशय अतिशय खुश होईल!!
(या मानक्याच्या चारोळी शेजारी माझ्या चारोळी म्हणजे पुन्हा तेन्डुलकर शेजारी दिनेश कार्तीक! )
जगु, मित्रा धन्यवाद!
रविश, ए भाय बिन्धास्त लिखनेका, मॉड्स क्या बोलेगा बिल्कुल सोचनेका नाय, बोले तो आपुन जैसा!


Rupali_rahul
Saturday, June 02, 2007 - 6:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>रडायचं नाही ठरवलं की
आपूसच भरून यायला लागतं
मनही मग लगेच सोयीस्कर
त्याचं कारण शोधायला लागतं ! <<< तोडलस बघ...
>>>मनातील भावना कधी कधी
डोळ्यातून बरसतात
तुझ मन त्यात चिंब व्हाव
ह्या अपेक्षेत असतात. <<<जगु मस्तच...

Rajya
Saturday, June 02, 2007 - 7:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कायमची दुर जाताना
तु, निरोप ही नाही घेतला
तोच एक सल, मग
शेवटची 'कळ' होऊन गेला


Ravisha
Saturday, June 02, 2007 - 2:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्षण जगून झालेले,जुन्या पानात जपावे
डोळ्यातील पाण्यानेच नवे पान उलटावे.......

Rajya
Monday, June 04, 2007 - 11:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तु कीतीही नाही म्हण
मी तुझ्याच साठी जगतो
अंधार कीतीही दाटला तरी
काजवा सदैव चमकत असतो


Mankya
Tuesday, June 05, 2007 - 2:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रूप .. भावना पोहोचल्या नाहीत ! काय म्हणालीस ?

रम्य धुंद निशा सरली तरी
गात्रातली धुंदी ना ओसरली
नभातून उन्हं कलंडली तरी
नयनी पहाट थोडी उरली !

माणिक !


Mankya
Tuesday, June 05, 2007 - 3:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तरल चंदेरी काळोख लेवून
दवात चिंब चिंब ती भिजली
अन पहाटेच्या उबदार कुशीत
अलगद समेटून रात्र निजली !

माणिक !


Sanghamitra
Tuesday, June 05, 2007 - 12:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


अरे पहिल्या पावसाची झुळूक नाही का टाकली अजून कुणी?

झाकोळ नभाच्या पार,
क्षितिजावर काजळभार.
मन कुंद होतसे हट्टी,
वार्‍याची बदले पट्टी.
झुळकेचा हो सोसाटा,
अन् सैरावैरा वाटा.
झाडांचे झडती मुजरे,
अन् सावध करती हुजरे.
मेघांची मिरवत माला,
सम्राट ऋतूंचा आला.


Meenu
Tuesday, June 05, 2007 - 4:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा !! सन्मे सहीच ..!!

Meenu
Tuesday, June 05, 2007 - 4:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भरुन आलेले डोळे, पुसण्याच्या नादात,
मागे वळुन पहायचं राहीलं ..
तू म्हणला असशील ..
साधं मागे वळुनही नाही पाहीलं ..?


Meenu
Tuesday, June 05, 2007 - 4:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नकोच म्हणलं वळायला,
नको पुन्हा गुंतायला ..
आणि हो ..!! बदललं असेल काही तर ?
नको उगा सलायला ..





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators