Mankya
| |
| Friday, May 25, 2007 - 9:14 am: |
| 
|
निवेदिता .. छान लिहिलस ! भावना प्रामाणिक आहेत ! माणिक !
|
Niwedita
| |
| Friday, May 25, 2007 - 10:16 am: |
| 
|
शाल्मली, गार्गी सुंदर मी पूर्वी होते तश्शीच मला परत देउन जा ... छानच!!
|
Niwedita
| |
| Friday, May 25, 2007 - 10:25 am: |
| 
|
वैभव.. आधीच... मधली चालत राहीलो एकमेकांच्या पायात येत छानच..
|
अरेच्छा वरची कविता वाचलीच नव्हती की. गार्गी छानच जमलीय कविता. भाषा आणि मांडणी सहज आणि हवा तो मेसेज व्यवस्थित पोचवणारी. श्यामली हं. मस्तच झालीय. निवेदिता आवडली आणि पटली देखील. कितीतरी दिवस असे असतात खरे. लिहीत रहा.
|
Ashwini
| |
| Friday, May 25, 2007 - 2:42 pm: |
| 
|
हेम्स, मला पण ते 'ऊन सावली विभक्त' थोडेसे खटकले होते. पण पुढच्या दोन ओळी एकदम वेगळ्याच उंचीवर घेऊन जातात या कवितेला. श्यामली, छान आहे कविता.
|
धन्यवाद मित्रांनो . हेम्स , अश्विनी ... प्रत्येक ऊन , प्रत्येक सावली आणि मधलं object ह्यांच स्वतःचं एक विश्व असतं . त्यातही प्रत्येक किरण , मधल्या object चा एक अंश ? आणि त्याची पडणारी सावली ह्यांचं आणखे एक वेगळं विश्व असावं का ? ह्या विचारातून आलेली ही कविता . वरवर पाहता दोन प्रेमी विभक्त झाले असं जरी दिसत असलं तरीही म्हणजे त्यांच्यातल कुठलं नातं संपलं ? दोन व्यक्तींना जवळ आणण्याचं मूळ कारण संपल्यावर काय उरेल ? म्हणजे असं बघा समजा दोन व्यक्तींच्या मध्ये एखादी आवड ( गाणी , पेंटिंग , कविता . कुठलाही एक ) हाच एक मुख्य दुवा आहे . the very basis of their relationship असं म्हणू . इतर गोष्टी , इतर आवडी ह्या peripheral आहेत . तर एक पूर्ण ऊन , मध्ये relationship हे object आणि त्याची सावली हे सगळं विश्व व्यवस्थित दिसत असलं तरीही त्या विश्वातील एक किरण ... मध्ये ह्या आवडीचं object आणि त्याची सावली हे विश्व आज संपलं . असा काहीसा विचार होता मग त्यानंतरचे सूर्य काय किंवा चंद्र काय . आणि मग त्यासाठी दोन वेगवेगळ्या व्यक्ती कशाला हव्यात ? माझ्यातल्या दोघांना बांधून ठेवणारा दुवाच गेला तर ? त्यासाठी ते स्वतःपासून स्वतः विभक्त होण तिथे येणं मला गरजेचं वाटलं . चू . भू . दे . घे .
|
Bee
| |
| Monday, May 28, 2007 - 1:51 am: |
| 
|
परवा डॉ. माधवी वैद्य आमच्याशी नामवंतांच्या कवितांवर खूप बोलल्यात. त्यामधे त्यांनी ग्रेस, विंदा, नाधो ह्यांच्या त्यांनी स्वतः चित्रीकरण केलेल्या मुलाखती दाखविल्यात. त्यांच्याशी गप्पा मारता मारता मारता रात्रीचे बारा झाले होते. मग मी मायबोलिचा विषय काढला त्यावेळी त्यांनी गझलच्या कार्यक्रमाची आठवण केली. त्यांना ह्या दोघांची नावे काही केल्या आठवेणा.. मग मीच सांगितली ती नावे. वैभव जोशी आणि प्रसाद शिरगावकर. त्यांनी खूप स्तुतीपर प्रतिक्रिया दिल्यात.. त्यांच्याकडून मला ग्रेस साहेबांचा फोन नंबर पण मिळाला. आता सगळे बळ एकवटून मी त्यांना फ़ोन करीन :-) मला खूप नवल वाटलं, बाईंनी इतकं थोर काम केलेलं आहे पण आम्हाला त्यांच्याविषयी कधीच कुठे ऐकायला वाचायला मिळाले नाही. नक्षत्रांचे देणे पेक्षा कविवर्यांच्या ह्या मुलाखती कितीतरी छान आहेत.
|
Mankya
| |
| Monday, May 28, 2007 - 8:32 am: |
| 
|
बी .. खरंय ! वैभव, प्रसाद .. अभिनंदन रे ! कुठवर ... कुठे सुरु झाला प्रवास मी मला बळेच न्यायचे कुठवर थांबायचं की चालायचं स्वतःला सावरायचं तरी कुठवर .. पहिले अकाली अनोळखी अश्रू आता परीचित निरंतर सल हळवा झालाय कण न कण कळेना भावनिक मनाचा कल मनाला थोपवायचे तरी कुठवर .. अवेळी सांजवेळ रोजच जीर्ण जीर्ण जाणीवांचे पाश संवेदनांची फक्त लक्तरंच दाटलं ठिगळलेलं आकाश अविरत बरसायचं तरी कुठवर .. शीणलेली शांत जड पाऊले हळूहळू सरपटणारी पाऊलवाट खुणावतात पाऊलखूणा त्याच प्रतिक्षेत आठवांची अरण्ये घनदाट निमूटपणे चालायचं तरी कुठवर .. थांबत थांबत दिशाहीन चालायचं कुठवर .. चालत चालत ध्येयहीन थांबायचं कुठवर ..... माणिक !
|
Vinni
| |
| Tuesday, May 29, 2007 - 6:21 am: |
| 
|
मैत्री कितीही एकटी असले मी तरीही हात तिचा हातात असतो. चालताना वाळवंटातही तिच्या सावलीचा भास असतो. आयुश्याची वाट वादळवाट सही तिच्या सोबतीचा नेहमी आभास असतो. लफ़ाट्याच्या घरात माज़्या तिच्या कंदिलाचा प्रकाश असतो. पायखाली तुडविताना काटे जखमावर मायेचा लेप असतो. चुका होताच हातुन फ़टकंर्र्याचा मारही असतो. कधी उन तर कधी सावली मैत्रीच्या नात्याचा असा पाठशिवणीचा खेळ चालुच असतो. वीन्नी hee kavita samarapit aahe maazya sagalyaa mitra maitrinina............
|
Jagu
| |
| Tuesday, May 29, 2007 - 6:30 am: |
| 
|
माणिक छानच आहे कुठवरचा प्रवास. विन्नी मैत्री आवडली. खुपच छान आहे.
|
Niwedita
| |
| Tuesday, May 29, 2007 - 9:25 am: |
| 
|
निनावी कुठे हरवलीय रे शोधून शोधून थकले डोळे दुखायला लागलेयत आभाळ भरलंय त्याला कसंबसं थांबवलंय पाऊस पडायच्या आत ये बाई...........
|
बी, अरे तुझ्या पोस्टवरून आठवलं. माझ्या रंगीबेरंगी मधल्या आज्जीवरच्या लेखात पुष्पौषधीवरती ज्यांनी पुस्तक लिहून ते आजीला अर्पण केलंय असा उल्लेख आहे त्या म्हणजे डॉ. माधवी वैद्य. त्यांना सगळ्या मराठी कवींबद्दल खूप कळकळ आहेच पण त्याबरोबर पुष्पौषधींबद्दल ही खूप ज्ञान आहे.
|
Shyamli
| |
| Tuesday, May 29, 2007 - 3:23 pm: |
| 
|
अरेच्चा कविता टाकली होती हे पण विसरुन गेले होते की मी, धन्यवाद दोस्तहो सन्मी हं 
|
Zelam
| |
| Wednesday, May 30, 2007 - 1:49 am: |
| 
|
अव्यक्त ऐक सांगते अव्यक्त का ही मुकी वेदना झाली नेहमीसारखीच आज तुझी पुन्हा आठव आली मी संपले परी मनातील तुझे वसणे संपत नाही उमललेले कधी गूढ मनोरम अमूर्तसे काही गूज मनीचे मनी ठेवूनी कुठे बोलले नाही अंतरीच्या ऋतू बदलांचे मग भान राहिले नाही आठवणींच्या बकुळ फुलांची गंध अत्तरे उडली आयुष्याची जीवनपाने अलवार मधुर रस जगली हळूहळू पण उमजत गेले माझेच वेड हे सारे तुझ्या तनी कधी नाहीच उठले माझ्या मनीचे शहारे एकतर्फीच स्वप्ने जरी ती गेली कोमेजून करपले वसंत उरले फक्त ग्रीष्मामधले ऊन तुटलंय बरेच काही तरी झालेय थोडी शहाणी प्रेमगीताआधीच परी गाते तुला विराणी स्वप्नकळ्यांची खोड उमलण्याची गेली नाही हरवलेसे काही मात्र पुन्हा गवसणार नाही झेलम
|
Bee
| |
| Wednesday, May 30, 2007 - 3:15 am: |
| 
|
आज इथे, उद्या तिथे असे करता करता चाकोरीबाहेरची वाट कधी? केंव्हा? गवसली हे कळलेच नाही.. प्रियजनांच्या नजरेतील वात्सल्याला विराम देऊन डगमगणारे पाय कधी? केंव्हा? कणखर स्वयंसिद्ध झाले हेही ठावूक नाही.. काही काळे, काही पांढरे त्याहूनही अधिक करडे अनुभव गोळा करता करता खरे जग समोर आले.. अनेक व्यक्ती, अनेक वल्ली येता जाता भेटत राहिले यशाचे शिखर आणखीनच उंच उंच होते गेले तशी जिवाची दमछाक वाढत गेली.. आता हवी आहे विश्रांती, आईच्या कुशीतील नीज, कुणाचा प्रेमळ स्पर्श, पण.. रे राहिले घर दूर माझे!
|
Ravisha
| |
| Wednesday, May 30, 2007 - 5:10 pm: |
| 
|
क्षण जगून झालेले,जुन्या पानात जपावे डोळ्यातील पाण्यानेच नवे पान उलटावे.......
|
Sumedhap
| |
| Thursday, May 31, 2007 - 9:13 am: |
| 
|
मला विसरता येईल... असतीलही आता आपले रस्ते समांतर झालेही असेल तुझ्या मनाचे स्थलांतर माझ्यावरचं प्रेम कधी ओझरतं होईल? खरंच तुला कधी मला विसरता येईल नसेनही आता इतर चेहर्यांत मी रस्त्यावर निनावी फुलेही येणार नाहीत त्या पत्त्यावर मनातला रिता कोपरा कधी भरला जाईल खरंच तुला कधी मला विसरता येईल संध्याकाळी सार्या दिशांचं धुंद धुंद होणं भेट संपता संपता संधीप्रकाशाचं मंद होणं इतक्या दूर आल्यावर परत मागे फिरता येईल खरंच तुला कधी मला विसरता येईल तसं आपण सारेच जगतो,आयुष्य संपत नाही मीही तसा या दूराव्याला फार कंपत नाही पण फक्त श्वास घेण्याला, जगणं म्हणता येईल खरंच तुला कधी मला विसरता येईल फार सोपं असतं म्हणणं सारं विसरुन जाईन नवी सुरुवात करुन मन कामासाठी व्हाईन नव्या सुरुवातीआधी जुन्याचा शेवट करता येईल खरंच तुला कधी मला विसरता येईल
|
Vinni
| |
| Thursday, May 31, 2007 - 11:59 am: |
| 
|
सुमेधा कविता खुपच छान आहे. खरच आपण कितिहि ठरवल तरि कुणाला केव्हाच विसरु शकत नाही. कविता अतिशय सुन्दर आहे. आणि त्यापेक्षा ती खुप सुन्दर प्रकारे मान्डलि आहे.
|
Mankya
| |
| Friday, June 01, 2007 - 1:30 am: |
| 
|
सुमेधा .. आशय सुंदर ! आवडली ! जगू .. धन्यवाद गं ! माणिक !
|
Meenu
| |
| Friday, June 01, 2007 - 7:09 am: |
| 
|
आपणच.. वेगवेगळ्या रुपात वावरणारे आपणच .. आपल्याच कुठल्या रुपाला, गोंजारणारे आपणच .. आपल्याच रुपाला पाहुन कधी, घाबरणारे आपणच .. कधी मित्र, कधी शत्रु आत मात्र आपणच .. अचानक आपलीच भेट होते गोंधळणारे आपणच ..
|