Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 31, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » अधिक - ज्येष्ठ » काव्यधारा » झुळूक » Archive through May 31, 2007 « Previous Next »

Mankya
Monday, May 28, 2007 - 2:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज आभाळासारखं बरसलो
अता रिक्त निरभ्र होईन वाटलं
आठवले तुझे माझे पावसाळे
त्या क्षणी पून्हा मळभ दाटलं .. पून्हा आकाश फाटलं !

माणिक !


Jagu
Monday, May 28, 2007 - 5:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोबू, रुपाली, पूजा, माणिक, राजा खुपच छान रचना झाल्या आहेत तुमच्या. बर्‍याच दिवसांनी आल्यावर खुपच छान वाचायला मिळाले.

Jagu
Monday, May 28, 2007 - 5:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आसवांच्या माझ्या अट्टाहास
आज काही अजबच होता
तुझ्याच स्पर्शाने मोक्ष मिळवण्याचा
त्यांचा पक्का इरादा होता.


Gobu
Monday, May 28, 2007 - 7:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणिक,
मेल मिळाली, धन्यवाद!
"पुन्हा आभाळ फाटल..." एकदम जबरदस्त! हे ३ शब्दच मुळी फार अर्थपुर्ण लिहीलेस!
अतिशय मोजक्या शब्दात प्रचन्ड आशय मान्डला आहेस! अशक्य लिहीतोस मित्रा!!
जगु,
सुरेख! सुरेख!! आणखी लिही.


Manogat
Monday, May 28, 2007 - 11:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गार गार वार्याने
अंग शाहरुन आले
आठवांच्या पावसाने
मज भीजवुन दिले


Manogat
Monday, May 28, 2007 - 11:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तु तुझाच राहीलास,
मझा म्हणतांनी,
मी मात्र अस्तित्वच हरवले,
तुझी होउनी.


Rajya
Tuesday, May 29, 2007 - 5:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जगु, गोबु धन्यवाद.

कायमची निघुन जाताना, एकदा
तु मागे वळुन पाहिलं
त्या एका आठवणीवर, मग
मी आयुष्य जगायचं ठरवलं


Rupali_rahul
Wednesday, May 30, 2007 - 6:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्स गोबु, जगु, माहे आणि पुढच्या चारोळ्यांसाठी नवीन आवडला तर घ्या... विषय...

तप्त तनुंच्या उद्वेगाला
आज दिलासा मिळाला
मेघधारेच्या तुषारांनी
मनी उल्हास आला

रुप...


Rupali_rahul
Wednesday, May 30, 2007 - 6:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज तो बरसला
सर्व बंधने तोडुन
याच बरसण्याने गेला
नवे नाते जोडुन

रुप...


Ajjuka
Wednesday, May 30, 2007 - 7:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणक्याचा थ्रेड पकडतेय!

फाटल्या आकाशाला
ठिगळ चंद्राचे
कोसळत्या जगाला
अडसर पाण्याचे


Gobu
Wednesday, May 30, 2007 - 10:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुप्स...
पाऊस सुरु झाला
की मी तिथेच थाम्बतो
ही म्हणते "वेन्धळाच आहेस!"
मी मात्र हळुवार हसतो!
गोबु...
(छे! छे!! मानक्याच्या "पुन्हा आकाश फाटल" नन्तर मी काही लिहीणे म्हणजे तेन्डुलकरनन्तर कुम्बळेने बैटीन्गला येण्यासारखे आहे!)


Zelam
Wednesday, May 30, 2007 - 5:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज बरेच दिवसानी आले या BB वर.
माणिक - 'वेस' आवडली.
छत्रपती आर्या छान आहे.

हा विषय कसा वाटतो पहा.

तुझं मौनही मी ओळखायला हवं
प्रेमात पडलोय म्हणे आपण
जवळ येण्यासाठीसुद्धा का मग
शोधतो आपण विवादांचे कारण


Shyamli
Wednesday, May 30, 2007 - 6:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पण ब-याच दिवसानी :-)

नाही जरुरी संवाद
मौन - किती बोलके
मन मनास स्पर्शता
वाद-संवादा सारखे!

श्यामली



Ravisha
Wednesday, May 30, 2007 - 7:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाद्-विवादाचीही असते एक वेगळीच मजा
नि:शब्द मौनापेक्षा भावतो मला विवादातील संवाद
कुणी कुणाशी न बोलणे ही असते एक वेगळीच सजा
कटू संभाषणातही गवसतो अंतर्मनातील निनाद


Shyamli
Wednesday, May 30, 2007 - 8:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असा ऐहिका पल्याड
संसार सजला अपुला
साद घालण्याआधिच
प्रतिसाद निनादला!

श्यामली!

Mankya
Thursday, May 31, 2007 - 2:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जगू, गोबू, झेलम .. खूप खूप धन्यवाद !

लोकांच्या मौनात बहुधा
भावनांना शब्द परके वाटतात
आम्हाला निःशब्द क्षणीच
शब्दांपलीकडचे अर्थ लागतात !

माणिक !


Mankya
Thursday, May 31, 2007 - 4:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओठांशी शब्दांचे पटत नाही
तेंव्हा स्पर्शही बोलू लागतात
नजराही मग पापणीआडून
स्पर्शांचे अर्थ सांगू लागतात !

माणिक !


Jagu
Thursday, May 31, 2007 - 5:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुप, अजुका, झेलम, शामली, रविशा छान आहेत चारोळ्या
गोबु छानच रचायला लागलायस
माणिक एवढ सुंदर लिहायला तुला कस सुचत? खुपच छान रचना आहेत.


Jagu
Thursday, May 31, 2007 - 5:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुला समोर पाहताच
ओठ कुजबूजू लागतात
अशा वेळी माझेच शब्द
मला परके वाटतात.


Mankya
Thursday, May 31, 2007 - 8:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जगू .... कसं सुचत वगैरे काही नाही गं; ईथलेच शब्द असतात सगळे, ईथेच द्यायचे !

शब्द जेव्हा ओठाकडून
परतीचा रस्ता धरतात
भावनाही शहाण्यासारखं
मग डोळ्यांकडे वळतात !

माणिक !





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators