Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 30, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » अधिक - ज्येष्ठ » विनोदी साहित्य » निबंद - पावूस ! » Archive through May 30, 2007 « Previous Next »

Rahulphatak
Friday, May 25, 2007 - 5:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पावूस !


- आयशॉट उरफ राफा (सहावी 'ड')

पावूस हा माजा आतिशयच आवडीचा रुतु आहे. पावूसामुळेच शेतात आंबेमोर भात व कणकेचे पिठ पिकते म्हणुनच आपण सगळे जेवू शकतो. पाउसाळ्यात मुख्यतवे गळीत हंगाम असतो. पाउसाळ्यात जास्त करून पावूस पडतो, हिवाळ्यात थन्डी पडते व उन्हाळ्यात ऊन पडते. त्यामुळे वरशभर कुठला ना कुठला रुतु पडिक असतो. 'रिमजिम पडती श्रावण गारा' हे गाणे आतिशय रोमहर्शक आहे. आमचा रेडियो गेल्या वरशी भिजल्याने बिघडला आहे त्यामुळे गाणे नीट ऐकू नाही आले तरीही आतिशयच आवडले.

पाउसाची सुरुवात रोमहर्शक असते. आधी कडाक्याचा उन्हाळा पडतो. पेपरमधल्या वृत्तपत्रात बातम्या येउ लागतात. 'उन्हाळा कमी होता की काय म्हणून आता पावसाने मारलेली आहे' अशी बातमी तर नेमीच असते (‘दडी’ हे लिहायचे राहिले ते कंसात लिहिले आहे ). सबंध आसमंत वातानुकुलित झालेला असल्याने खूप धूळफेक होत असते. (‘वात’ म्हणजे वारा हे कालच कोरडे सरानी शिकवले. कधी कधी ते ‘पोरांनी वात आणलाय ह्या’ असे म्हणतात त्याचा अर्थ मात्र कळत नाही.) अशा हवामानात सर्व पक्षी कोकीलकूजन करायचे थांबवून झाडांमधे गुपत होतात. काळे ढग जमल्यामुळे आकाशात थेटरमधे उशिरा गेल्यावर असतो तसा काळाकुट्ट अंधार होतो व मधेच डोअर किपरने लखकन बॅटरी मारावी तशी वीज चमकून जाते. सगळीकडे शेतकरी आभाळाला डोळे लावून बघत असतात आणि शेतकरण्या त्यांच्याकडे बघत असतात. अशा मंगल वातावरणात वरूण राजाचे आग मन होते.

भारतात पाउस अंदमान येथे बनतो. तो वळत वळत केरळ गावात आणि तिथून वळत वळत पुणे शहरात येतो. म्हणूनच त्याला वळीव म्हणतात किंवा काहीजण वळवाचा पाउस ही म्हणतात. (आम्ही समोरच्या गोगटे काकाना त्यांच्यासमोर 'काका' आणि इतर काळी 'तात्या विनचू' म्हणतो तसेच हेही दोन सन्मानार्थी शबद आहेत)

काल पुण्याच्या शहराच्या आत पाउस पडला. पुणे हे प्राचीन व प्रेकशणीय शहर आहे. तिथे शिन्दे छत्री, शनिवारवाडा, सिटी प्राईड, पर्वती, काकडे मॉल अशी पर्यटन स्थळे आहेत. ह्यातल्या काही ठिकाणी घरचे लोक मला रविवारी पर्यटनाला नेतात.

काल पाउसाबरोबर गाराही पडल्या. गोगटे काकानी बराचश्या जमवून त्यांच्या घरच्या माठात टाकल्या. ते कुठलीही फुकट गोशट वाया घालवत नाईत.

अंत्या आतिशय बावळट आहे. तो बाबांचे हेलमेट घालून गारा वेचायला आला होता. मग मीही छतरी घेऊन गेलो. पण छतरी उलटी करुन गारा वेचल्याने ती फाटली. समोरच्या मंगूने नवीन शरटं घातला होतान तर तसाच भिजायला आला आणि चिखलात घसरून पडला. (तो घरी गेल्यावर त्याच्या कानफाट नावाच्या अवयवावर त्याच्या बाबानी निरघुण प्रहार केले ते त्याना अजिचबात शोभत नाही.) एका दिवसात मंगूला एव्हढे मोठे गालगुंड कसे झाले हा प्रश्न वर्गात दुस़ऱ्या दिवशी सर्वाना पडला.

असा हा रोमहर्शक रुतु मला आतिशयच आवडतो !


***


Ekrasik
Friday, May 25, 2007 - 6:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त रे,
६ वी मधल्या मुलाचा निबंद सही जमला आहे.


Zakasrao
Saturday, May 26, 2007 - 3:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राफ़ा मस्तच. नवीन ADDITION पण सहीच जमलीय.
आज सकाळी सकाळी आलो तर मेल वर तुझा हा निबंध होता. वाइट वाटल. मी कोणाला फ़ॉरवर्ड न करता डिलिट केला. अजुन काहि करु शकतो का ह्या बाबतीत.
त्यात तुझ नाव आहे पण राफ़ा उरफ़ आयशॉट वरुन कोणाला काय कळणार आहे. उद्या हा निबंध परत एकदा एका ढ मुलाचा निबंध म्हणुन परत मेल वर येइल असं चिन्ह दिसतय. त्याना(नुसते फ़ॉरवर्ड करणार्‍याना) काय कळणार मायबोली आणि SG road आणि तु हा निबंध कसा आणि का लिहिलाय ते.
खरच आपण काही करु शकतो का?


Indradhanushya
Saturday, May 26, 2007 - 6:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>सगळीकडे शेतकरी आभाळाला डोळे लावून बघत असतात आणि शेतकरण्या त्यांच्याकडे बघत असतात.
राहुल तू लवकरच कोट्याधीश हुनार यात काय शंका नाय...
धन्यवाद आमची विनंती लवकर अंमलात आणल्याबद्दल :-)


Bhramar_vihar
Saturday, May 26, 2007 - 8:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राफा, लय भारी!! मी ईतका हसलोय ना.

Saee
Saturday, May 26, 2007 - 9:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हणजे या निबंधाला पुढचा मागचा काही संदर्भही आहे का?

पण मजा आली राहुल:-):-) भारि खटिन गेल असेलच पण तुला? हे लिहीताना, होय. कि नाही.!


Gobu
Saturday, May 26, 2007 - 10:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राहुल,

पुढचा निबन्द कधी लिहणार, वाट बघतोय रे मी!


Sakhi_d
Saturday, May 26, 2007 - 11:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राफ़ा लय भारी...
ह. ह. पु. वा.


Rahulphatak
Saturday, May 26, 2007 - 12:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोक्स, धन्यवाद ! लिहून झिम्माड वाटले.

ज्यानी 'दम दिला होता' त्यांच्यासाठी : पोस्टला आहे 'निबंद' निमूटपणे :-)

झ, ठीक आहे रे. तुला वाटला तर फॉरवर्ड कर बिनधास्त. लिखाण व बाकीच्या कलाकृतींवर किंवा खाली आपली सही ठोकणे हा उपाय आहे जो बरेच जण करतातच. मला आयशॉटच्या भूमिकेत रहावे लागल्याने इलाज नव्हता :-) ज्याना राफा (किंवा आयशॉट) माहीत असेल त्याना कळेलच. (फक्त मेल फॉरवर्ड करणार्‍याने 'एका ढ मुलाचा निबंध' अशी कारुण्याची - वास्तववादी - झालर लावली नसती तरी चालले असते :-) )

इन्द्रा, गिराहिकांचा सनतोश हेच आमचे धेय्य :-). प्रेमाचा दबाव आल्याने (कोटी शोधू नये) टाकणारच होतो.

सई, आयशॉटला 'शुद्द' लिहायला आतिशयच सोप्पे आहे त्यामुळे खटीन गेले नाही व सहज लिता आले :-)

सर्वांचे पुनश्च आभार.

(बाप्रे. ही शाल श्रीफळ स्टाईल 'प्रतिक्रियेवरची प्रतिक्रिया' मी पहिल्यांदाच लिहीतो आहे. नाहीतर लिहून झाल्यावर मला निबंधातल्या पक्ष्यांप्रमाणे गुप्त होऊन प्रतिक्रिया फक्त वाचणे आवडते :-) )


Sayuri
Saturday, May 26, 2007 - 2:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राहुल, काय मस्त लिहिलाय 'निबन्द'
एकदमच आवड्या!


Mrudu
Sunday, May 27, 2007 - 1:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>मधेच डोअर किपरने लखकन बॅटरी मारावी तशी वीज चमकून जाते.

मस्तच! निबंध आवडला.
शेवटचे दोन परिच्छेद मात्र भरीचे वाटले.

Gharuanna
Monday, May 28, 2007 - 12:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फाटक बूवा उत्तम निबन्द लिवलय राव पैकिच्या पैकि मार्क दिलेआपन बाकी रुतुनवरही आसेच लिव सर्वच्या ज्ञानत भर हुइल

Badbadi
Monday, May 28, 2007 - 4:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राहुल, जमेश :-)
आणि हे काय नवीन? लोक तुला दम देतात????


Daad
Monday, May 28, 2007 - 10:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राहूल, भलताच जमलाय निबंद.
'पावूसामुळेच शेतात आंबेमोर भात व कणकेचे पिठ पिकते ...'
'रिमजिम पडती श्रावण गारा....'
'... शेतकरण्या?'
... पुणे हे प्राचीन व प्रेकशणीय शहर आहे.'
'ते कुठलीही फुकट गोशट वाया घालवत नाईत...'

धम्माल आली वाचताना.


Meenu
Tuesday, May 29, 2007 - 6:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रावूल मेलमधुन पावूस आला

Prajaktad
Tuesday, May 29, 2007 - 11:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राफ़ा ! निबंद सही जमेश !

Cool
Tuesday, May 29, 2007 - 6:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राहुल, फारच मस्त अजुन येउ देत

Giriraj
Wednesday, May 30, 2007 - 5:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे राहुल,इथे एक जगु आलाय.. मला वाटले तुझ जगु जिवंत होउन आला की काय... त्यला पुन्हा आण एखदे नवीन adventure घेउन!:-)

Rahulphatak
Wednesday, May 30, 2007 - 8:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्स अगेन लोक्स.

बडे, काय सांगू ? सन्मीने तर 'पोस्ट कर नाहीतर राडा होईल' अशा नि:संदिग्ध (काय संदिग्ध स्पेलिंग आहे !) शब्दात सांगतिलं होतं (आता कुठे गायबली आहे कोण जाणे ! खर्‍याची दुनिया म्हणून राहिलेली नाही)

गिरी :-). ह्या जगूत ते 'ट्रेट्स' दिसताहेत का पहायला पाहिजे :-)


Dhoomshaan
Wednesday, May 30, 2007 - 11:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वेळानं पण राहवलं नाही म्हणून पोस्टते.........
राहुल, एकदम आवडेश!!!!!





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators