Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 27, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » अधिक - ज्येष्ठ » काव्यधारा » झुळूक » Archive through May 27, 2007 « Previous Next »

Gobu
Thursday, May 24, 2007 - 7:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्पर्शाने पालवी फुटावी
हुन्काराने साद द्यावी
भान असे हरपावे की
क्षणानीही दाद द्यावी!

गोबु...


Chhatrapati
Thursday, May 24, 2007 - 9:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोबू .. झकास रे !

Mankya
Friday, May 25, 2007 - 1:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोबू .. क्या बात ! सुंदर !
स्वाती .. Thanks गं !
गोगू .. मित्रा आभार !


Mankya
Friday, May 25, 2007 - 2:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूर्णतः राक्षस नाही कूणी
पूर्णतः कोणीच महंत नाही
तहानलेला असू देत कसाही
त्याची सरीतेला खंत नाही !

माणिक !


Mankya
Friday, May 25, 2007 - 3:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकत्र राहणं म्हणजे नसतं गं
धुंडाळणं नेहमी सांधर्म्याचे पदर
राणी त्याचा खरा अर्थ असे
एकमेकातील वैविध्यांचा आदर !

माणिक !


Chhatrapati
Friday, May 25, 2007 - 3:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा माणिक .. लग्नात जर हा उखाणा म्हणुन घेतला, तर बहारच ये‍ईल !! :-)

Mankya
Friday, May 25, 2007 - 6:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छत्रपती .. मनःपुर्वक आभार !

बरसलीस केलस चिंब चिंब
कधी तू धगही देऊन गेलीस
अंगोपांगी जीवेघेणे वार वार
हसण्याचे वचनही घेऊन गेलीस !

माणिक !


Rupali_rahul
Friday, May 25, 2007 - 7:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकत्र राहुनच प्रेम
फ़ुलतं असं नाही
दोन क्षितिजांवर असुनही
दुरावा असतोच असं नाही

रुप...


Mahe
Friday, May 25, 2007 - 8:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुपाली,
खुप सही लिहिलेस, अप्रतिम!

भाग्यश्री


Gobu
Friday, May 25, 2007 - 4:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुपाली,
फारच छान! सुरेख!!
मान्क्या,
अरे बाबा हा "गोगु" कोण आहे इथे? इ हमार जुडवा है का?
छत्रपती,
सविनय दन्डवत महाराज!
धन्यवाद!


Rajya
Saturday, May 26, 2007 - 10:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझ्या आठवणीत, चुकुन एकदा
श्वास घ्यायचा राहुन गेला
तेवढ्यावरच मग मी
जगाचा निरोप घेतला


Gobu
Saturday, May 26, 2007 - 10:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राजा,
सुन्दर! बहोत खुब मित्रा!! अप्रतिम!!!
जाताना काही नकोय
खरच काही मागणार नाही
तु कशी आहेस खरी
गुपित कुणाला सान्गणार नाही!

गोबु...


Gobu
Saturday, May 26, 2007 - 11:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रहो,
असेही लिहीले तर चालेल?
जाताना काही नकोय
खरच काही मागणार नाही
आठवणीचे गाठोडे हे माझे आहे
मागितलेस तरी देणार नाही!

गोबु...
(माणिक, प्लिज कॉमेन्ट! )


Rupali_rahul
Saturday, May 26, 2007 - 12:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जाताना काही मगितल नाहीस
मान्य आहे मला
पण साथ सोडुन निघुन गेलास
हे कमी आहे का???

रुप...


Rupali_rahul
Saturday, May 26, 2007 - 12:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुर्वी एकदा पोस्टलेली चारोळी आज पुन्हा देतेय...

१) मागे वळुन पाहिल्यावर,
उफ़ाळल्या जुन्या आठवणी,
मनात भावनांचे वादळ,
डोळ्यात मात्र पाणी...

रुप...

२)तुझ्या आठवणींचा सुगंध,
मनात भरलेला आहे,
तु जवळ नसलास तरिही,
श्वासांश्वासांत धरला आहे...

रुप...


Rupali_rahul
Saturday, May 26, 2007 - 12:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझ्या आठवणींचा काळ
केव्हाच मागे सरला
आत्त फ़क्त माझ्या देहात
तुझा सुगंध उरला

रुप...


Rupali_rahul
Saturday, May 26, 2007 - 12:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझ्या आठवणींचा पाउस
काल अचानक बरसला
त्यात चिंब भिजुनही
तो तुझ्यासाठी तरसला

रुप...


Poojas
Saturday, May 26, 2007 - 8:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगं बरसायचं आसवांनी....
आठवणींना भिजू द्यायचं......
अनुभवाच्या पागोळ्यांनी.....
जगण्यासाठी रुजू व्हायचं........!!!!!


Gobu
Sunday, May 27, 2007 - 11:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुप,
अतिशय सुन्दर ह!
शेवटच्या ४ ही चारोळ्या शब्दातीत...
अभिनन्दन!
हे मान्क्या, जगु, प्रीती, राजा कुठे गेले?


Mankya
Monday, May 28, 2007 - 2:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धावून आल्या सरी .. बरसल्या
घेऊन बरोबर प्रपात आठवांचा
ना केला आग्रह, ना केली सोयरीक
तरी का वाढला मुक्काम आसवांचा ?

माणिक !





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators