Gargi
| |
| Tuesday, May 22, 2007 - 4:42 pm: |
| 
|
आता तू आलायसच तर एवढ करुन जा न विसरलेल्या आठवणींना बळेच घेउन जा काही वायदे ही असतील अडगळीत कुठे..... जुणे पुराने त्यांचे करार मोडून जा मोरपीस, दोन चार कविता, काही जीर्ण पाकळ्या असच काहीबाही कीरकोळ .... हिशेब घेउन जा मी पुर्वी होते तश्शीच मला परत देउन जा तू आलायसच...... तर एवढ करुन जा
|
गार्गी छान!! 'एवढं करून जा'... अगदी शांत आणि संयत कविता वाटली.
|
Me_anand
| |
| Wednesday, May 23, 2007 - 5:43 am: |
| 
|
वैभव, गार्गी मस्तच.... !!!! नव्यानव्या मुक्कामावर... आवडली एकदम - आनंद
|
Mankya
| |
| Wednesday, May 23, 2007 - 6:27 am: |
| 
|
गार्गी .. आशय आवडला ! मयुराला अनुमोदन .. शांत वाटतय वाचताना ! माणिक !
|
धन्यवाद मित्रांनो . गार्गी ..... मस्त कविता .. खरंतर सगळी कविता " मी पूर्वी होते तश्शीच ( श वरचा जोर आणखी विशेष ) मला परत देऊन जा " मध्ये आहे तरीही मला ज्या टोन मध्ये "वायदे" आणि " काहीबाही किरकोळ " हे दोन शब्द आले आहेत ना ते फार आवडले . resigned approach आणि संयतततेमुळे"मेरा कुछ सामान " ची प्रकर्षाने आठवण झाली
|
Gargi
| |
| Wednesday, May 23, 2007 - 10:25 am: |
| 
|
मयुर,माणिक, आनंद, वैभव धन्यवाद! वैभव,खर सांगायच तर तुमची कविता वाचुन(संवादाचा फ़ाॅर्म) मला ही कविता सुचली... आणि 'तश्शीच' आधी 'तशीच' लिहिल होत पण वाचल्यावर वाटल आपल्याला अभिप्रेत असलेल येत नाहीय, म्हणुन बदलल... नोट केल्याबद्दल छान वाटल आणि ग़ुलज़ारच्या कवितेची आठ्वण झाली म्हणालात...बाप रे! ते कुठे आणि मी.......
|
वैभव, ' आधीच' सुंदर आहे.
|
.... अन मग !!! .... अन मग एके संध्याकाळी ऊन बोलले त्रोटक त्रोटक प्रयत्नपूर्वक हसली छाया अर्थ लागता तुरळक तुरळक .... त्यावेळी त्यावेळी त्या संध्याकाळी आत आत मावळले काही संधिकाल गिळला तिमिराने स्पष्ट जाहले सर्व अचानक ... त्यानंतर त्यानंतर त्या वेशीवरती ऊन सावली विभक्त झाले त्यानंतरचे चंद्र निरर्थक त्यानंतरचे सूर्य निरर्थक
|
Mankya
| |
| Thursday, May 24, 2007 - 5:33 am: |
| 
|
वैभवा .. अप्रतिम ! अगदी शब्दांनी दाद नकोच द्यायला अशी ! प्रयत्नपुर्वक हसली .. खूपच अर्थपुर्ण ! आत आत मावळले काही .. मान गये.. आर्तता जबरदस्त ! चंद्र निरर्थक, सूर्य निरर्थक .. आपला सलाम या ओळींना ! माणिक !
|
सुभान अल्ला!!!वैभवा!!! अप्रतिम... ... आणि तरीही आणि तरीही निरर्थकाचा अर्थ शोधला रित्या हाती आभाळाला म्हणते माती 'तुझे चांदणे वेचक वेचक!'
|
वैभवा कविता वाचल्यावर शेवटच्या ओळींऐवजी एकच ओळ आठवतेय. आत आत मावळले काही
|
त्रिवेणी तुला काल अगदी सहजच म्हणालो होतो, "माणसांची पारख करणे किती अवघड!" आज साधे-सोप्पे मुखवटे लावून आलीस!
|
Shyamli
| |
| Thursday, May 24, 2007 - 9:18 am: |
| 
|
वेळ धावत पळत चालताना तुझ्याबरोबर, अचानक एका छोटयाश्या पाऊलवाटेनं खुणावलं मला मी गेले माझ्याही नकळत, तिकडे वेगळंच आकाश वाट पहात होतं माझी पूर्ण माझं असलेलं चला बरंच झालं, तसंही तुझ्याकडे अजिबात नसलेला आणि माझ्याकडे मुबलक असलेला 'वेळ', भांडणाच कारण होणार नाही आता, तो माझ्याकडेही नसणारे... गरज आहे फक्त तुझ्या शुभेच्छांची; . . . देशील ना? श्यामली!!
|
Mankya
| |
| Thursday, May 24, 2007 - 9:38 am: |
| 
|
मयुरा .. छान जमलीये त्रिवेणी ! श्यामली .. वेळ काढून वाचली ' वेळ ' , मस्त वाटली ! मस्तच जमलीये, खूप वेळा होतात नाही भांडणं या वेळेच्या कारणावरून ! माणिक !
|
Lampan
| |
| Thursday, May 24, 2007 - 12:59 pm: |
| 
|
वेळ आवडली श्यामली !!!
|
Ashwini
| |
| Thursday, May 24, 2007 - 1:53 pm: |
| 
|
आत आत मावळले काही त्यानंतरचे चंद्र निरर्थक त्यानंतरचे सूर्य निरर्थक वैभव, काय लिहिलं आहेस रे. ह्या ओळी मनातून जातच नाहीयेत.
|
Hems
| |
| Thursday, May 24, 2007 - 7:00 pm: |
| 
|
वैभव, या कवितेने फार अस्वस्थ केलं ! खूप आवडली. पण इतकी नेटकी उतरली नसती तर जास्त आवडली असती असंही वाटलं ! "ऊन सावली विभक्त झाले" ही ओळ -- स्पष्ट न येता संदर्भातून आली असती तर?
|
वैभव.. आधीच आणि अन मग दोन्ही सुंदर..
|
मझा आ गया, गार्गी,वैभव, श्यामली, मयुर... दोस्त लोक सलाम!
|
Niwedita
| |
| Friday, May 25, 2007 - 9:04 am: |
| 
|
khoop khoop divasani ekapeksha ek sundar kavita vachalya apratim. कविता हरवलीय त्या गोष्टीला आता खूप दिवस झालेयत शब्द सुद्धा हल्ली असे मुके मुके झालेयत. पूर्वी खूपदा माझ्या एकटेपणात सोबतीला यायचे तासन तास गप्पा मारत अवती- भवती बागडत रहायचे हल्ली मात्र नुसतीच पावलं वाजतात अंगणात चाहूल लागते खरी पण कुणीच नसतं दारात आणखी एक नि:शब्द दिवस येतो आणि निघून जातो शब्दांच्या येण्याचा नुसताच असा भास होतो आता वाटतं हरवलेले शब्द पुन्हा भेटणार नाहीत भेटलेच तरी पूर्वीसारखं मनमोकळं बोलणार नाहीत ओठांवर आलेली साद परतवत मीही मग मागं फिरते पापण्यांच्या कडांवर जमलेलं पाणी कुणाच्याही नकळत पुसून टाकते.
|