|
Rajya
| |
| Wednesday, May 23, 2007 - 9:22 am: |
| 
|
धन्यवाद, माणक्या!! कुणी तास काटा कुणी मिनीट काटा इथं प्रत्येक जण पळतो आहे तुझी माझी जर साथ असेल, तर मला सेकंद काटा होणं ही मान्य आहे!
|
Manogat
| |
| Wednesday, May 23, 2007 - 1:21 pm: |
| 
|
वेळेच्या तराजुत, जिवन का तोलता येत, अमुल्य वस्तुंसाठी, वजन कधीच उपलब्ध नसत.
|
Manogat
| |
| Wednesday, May 23, 2007 - 1:47 pm: |
| 
|
रिमझीम पाउस, त्या भीजलेल्या आठवनिंचा काहुर, आता पुन्हा गवसत नाही, प्रेमाचे हरवलेले सुर.
|
Manogat
| |
| Wednesday, May 23, 2007 - 1:56 pm: |
| 
|
उन संपुन पाउस ही पडला, पुन्ह एकदा रुतु बदलला, पण तुला विसरायला, हा जन्म ही अपुरा पडला.
|
Manogat
| |
| Wednesday, May 23, 2007 - 2:05 pm: |
| 
|
विषय असला तर शब्द ही सापडेल, तु एकदा बोलुन तर पाहा, कदाचीत आपले सुर ही जुळेल.
|
Zelam
| |
| Wednesday, May 23, 2007 - 5:03 pm: |
| 
|
विषयांची गार्हाणी घालून शब्दांचं प्रयोजन कशासाठी माझ्या बोलक्या मौनाच्या उकल ना सख्या रेशीमगाठी
|
मनात उपमा वसे दिसतसे ऋतू लोचनी । सुहास्य स्मरते तुझे फ़ुलविते वसंतात्मनी ॥ अयोग्य उपमा गमे मजसि मग सुभाष्या जरी । वसंत न फुले सदा स्मित तुझे आजन्मांतरी ॥
|
छत्रपती, ही आर्या आहे का? मस्तच. पण ' आजन्मांतरी' मधे गडबड झाली जरा, नाही? ' मनात उपमा वसे' म्हणजे खावासा वाटतोय का?
|
स्वातीताई, ही आर्या आहे ! बरोबर .. म्हणजे 'केकावली'ची चाल. 'अंतर' म्हणजे मन. आजन्म म्हणजे इनफानाईट या अर्थी. 'आजन्मांतरी ' म्हणजे in my mind till the end of life असा मतितार्थ आहे. गडबड झाली असे का वाटतेय ? कृपया सांगितलेत तर बरे होईल. कविता इतकी अवघड नसावी की त्यातून अर्थबोध होत नाही !! वसे म्हणजे 'निवास' या अर्थी. 'मनात उपमा वसे' म्हणजे 'मनात खाण्याचा उपमा वसे नाही' ! स्वातीताई, तुमच्यासाठी याचा अर्थ इथे लिहितो म्हणजे तुम्हाला थोडा खुलासा होईल. प्रेयसीला उद्देशून केलेले हे काव्य आहे. तिचे सुहास्य आठवल्यावर मला डोळ्यासमोर वसंत ऋतू दिसला आणि मनात आले की त्याची उपमा तिच्या हास्याला योग्य ठरेल.पण अशी उपमा करून ती सुवाच्य, सुंदर जरी चांगली वाटली, तरी ती अयोग्यच आहे, कारण वसंत वर्षातून काही काळच असतो, सदैव नसतो. तिचे हास्य मात्र माझ्या मनात आजन्म फ़ुलून राहील. I hope this helps a bit ! धन्यवाद !
|
माझ्यामते, पहिल्या दोन ओळींचा क्रम बदलल्यावर जास्त चांगला अर्थबोध होईल. पण शेवटी वाचणाऱ्याला काय वाटते तेच खरे ! सुहास्य स्मरते तुझे फ़ुलविते वसंतात्मनी । मनात उपमा वसे दिसतसे ऋतू लोचनी ।। अयोग्य उपमा गमे मजसि मग सुभाष्या जरी । वसंत न फुले सदा स्मित तुझे आजन्मांतरी ॥
|
छत्रपती, अर्थ समजला होता आधीही, पण पहिल्या दोन ओळींचा क्रम बदलल्यावर अधिक स्पष्ट झाला हे खरं. मी ' आजन्मांतरी' मधे घोटाळा म्हटलं तो अर्थाचा नव्हे, मात्रांचा. त्यातल्या ' आ'च्या जागी लघु अक्षर हवं आहे. उपमा(म्या)चा विनोद होता राजे.
|
Mankya
| |
| Thursday, May 24, 2007 - 2:51 am: |
| 
|
फुलाला बळेच कोमेजण्याची कसली तर्हा सांगून गेलीस ह्रदयापासून स्पंदनांचा हा अशक्य दूरावा मागून गेलीस ! माणिक !
|
स्वातीताई, आपण इतक्या मनापासून वाचन केलेत, धन्यवाद. आपले बरोबर आहे. आजन्मची मात्रा लघु अक्षराची हवी. हे कसे वाटते पाहा : सुहास्य स्मरते तुझे फ़ुलविते वसंतात्मनी । मनात उपमा वसे दिसतसे ऋतू लोचनी ।। अयोग्य उपमा गमे मजसि मग सुभाष्या जरी । वसंत न फुले सदा स्मित तुझे अनंतांतरी ॥ Hopefully, अर्थ बदलला नाही !
|
Mankya
| |
| Thursday, May 24, 2007 - 4:50 am: |
| 
|
तू म्हणालीस, " मी किंवा तुझे जग पर्याय अता निवडशील का ?" मला सांग जरा, वेशीला कधीतरी एका गावाचे होता येईल का ? माणिक !
|
Mankya
| |
| Thursday, May 24, 2007 - 6:50 am: |
| 
|
मी तूला का आवडते खरंच मला कळत नाही सुगंधाचं कोड कधीच फुलाला उकलत नाही ! माणिक !
|
Mankya
| |
| Thursday, May 24, 2007 - 7:03 am: |
| 
|
तू समोर असलीस की डोळ्यांनीच जगून घेतो सुसंगत एखादाच शब्द ओठांवर अवचित येतो ! माणिक !
|
Bee
| |
| Thursday, May 24, 2007 - 8:20 am: |
| 
|
तू सखी नाहीस की प्रेयसीही नाहीस कोण तू? प्रत्येक जन्मी भेटून दुरवणारी..
|
Manogat
| |
| Thursday, May 24, 2007 - 11:31 am: |
| 
|
सखी मी तुझी, मी तुझी साजणी, आज पुनरजन्म माझा, झाले मी तुझी अरधांगीनी.
|
छत्रपती, आता छान झाली. माणिक, ' वेशी'ची चारोळी छान आहे.
|
Gobu
| |
| Thursday, May 24, 2007 - 7:04 pm: |
| 
|
मान्क्या, सुगन्धाचे कोडे अतिशय सुन्दर! अभी आपुन भी लिख रहेला है, बोले तो... एकदम माणिक को कम्पीटीशन! फुलाने द्यावा सुगन्ध ना मोजावे परागकण! शहाण्यानेही हेच करावे जपावेत फक्त सुन्दर क्षण!! गोबु...
|
|
|