Me_anand
| |
| Monday, May 21, 2007 - 8:40 am: |
|
|
साधारण महिन्याभरपुर्वी ही गज़ल टाकली होती आणि वैभवने त्यावर कही सुधारणा सुचवल्या होत्या... त्या करुन पुन्हा टाकतो आहे... काही कारणामुळे हे लगेच शक्य झाल नाही.. त्याबद्दल क्षमस्व..!! त्रुतू येत होते, त्रुतू जात होते जुने तेच गाणे, नवे गात होते फुलावीत गाणी जिथे माणसांची तिथे वासनांचे कळी आंत होते इथे स्वार्थसिध्दी उभा जन्म झाला इथे कोण निस्वार्थ प्रेमांत होते? लकाकून गेले क्षणी म्लान डोळे पुन्हा आसवांचे थवे त्यांत होते विषाने विषाला कशी मात द्यावी विषाचेच नाते जिथे आंत होते घुमावेत वारे तुझ्या वादळांचे तुझे शब्द तेव्हाच मौनात होते मुक्याने तरीही नवे बाळ ओठी नव्यानेच गाणे पुन्हा गात होते
|
आनंद...छान आहे गझल. लकाकून गेले क्षणी म्लान डोळे पुन्हा आसवांचे थवे त्यांत होते वा!सुंदर.
|
Mankya
| |
| Monday, May 21, 2007 - 9:04 am: |
|
|
me_aanand... मस्त झालीये रे आता .. मस्तच ! स्वार्थसिद्धि .. खणखणीत शेर ! विषाने विषाला .. क्या बात ! अगदी वैभव स्टाईल शेर ! मक्ता .. अर्थ पोहोचला नाही मित्रा ! सांगशील समजावून ! वैभवने सुधारणा केल्या म्हणजे परीसस्पर्श झालाय .. अर्थात सोनं होणारच त्या काव्याचं ! सुंदर कल्पना अन आशयघनता यांचा मिलाप साधून अगदी सहज उतरलिये ही गजल ! माणिक !
|
Me_anand
| |
| Monday, May 21, 2007 - 12:11 pm: |
|
|
माणिक, मयूर, प्रतिसादाबद्दल धन्यवाद ही गज़ल लिहीताना एकंदर भौतिक जगात होणार्या सुधारणांबरोबर माणूस म्हणून अपेक्षीत असणारे बदल आणि ते होत नसल्यामुळे मनात येणारे विचार मांडायचा प्रयत्न केला आहे. भौतिक क्षेत्रात आपण खुप वेगाने प्रगती करतोय पण एक माणूस म्हणून आपल्या जाणिवा मात्र तितक्या वेगाने परिपक्व होताना दिसत नाहीत. माझ्या पहिल्या शेरात मी हे जडत्व मांडायचा प्रयत्न केलाय. पुढच्या प्रत्येक शेरांतून सामाजीक वैयक्तीक उणीवा वेगवेगळ्या कोनांतून मांडायचा प्रयत्न आहे. अशा परिस्थितींत सामान्य माणसाला शेवटचा आधार वाटतो तो देवाचा. तिथे वाट्याला येणारी निरशा, आगतिकता शेवटून दुसर्या शेरात मांडण्याचा प्रयत्न आहे. अशा सर्व परिस्थितींतही काही माणसं नव्या दमाने, नव्या विचाराने नवीन सुंदर जगाचं स्वप्नं पहात असतात (नव्याने जन्मलेल्या लहान बाळासारखी, कोर्या पटीने), त्यांच्यासठी मुक्याने तरीही नवे बाळ ओठी नव्यानेच गाणे पुन्हा गात होते - आनंद
|
Shyamli
| |
| Monday, May 21, 2007 - 12:27 pm: |
|
|
आनंद छान झालीये गझल.. पण मला फुलावीत गाणी जिथे माणसांची तिथे वासनांचे कळी आंत होते >>> या शेराचा अर्थ नीट कळत नाहीये तिथे वासनांचे बळी आत होते>> अस वाचलं जातय माझ्याकडुन अर्थात माझी गझलेची जाण तुम्हा सगळ्यांना ठाउक आहेच म्हणा पण गझल आवडली म्हणुन विचारायच धाडस केल. जरा सांगणार का?
|
श्यामलीप्रमाणेच मलाही Confusion आहे त्या शेरात. तिथे वासनांचे कळी आंत होते म्हणजे काय? 'तिथे वासनांचे बळी आत होते' म्हणजे काय? 'बळी जात होते' असं हवंय का? आनंद...तुमचं काय म्हणणंय..??
|
व्यर्थ इथे जीवनाचे दिवाणे हजारो अधाशी मनाचे बहाणे हजारो कवीच्याच माथी अशी रेष वेडी जिला वाचणारे शहाणे हजारो तुझे ओठ पोरी किती लाल झाले! कधी चुंबिले तू उखाणे हजारो? उगा माणसांची नको खूण शोधू गवसतील पत्थर पुराणे हजारो जरी हुंदक्यांनी कुचेष्टाच केली तरी गायले मी तराणे हजारो नसे एकटा मी...जगी एकटा जो... असावेत माझ्याप्रमाणे हजारो उपाशीच तुटल्यावरी चोच माझी कुणी टाकले व्यर्थ दाणे हजारो? - मयूर
|
Me_anand
| |
| Tuesday, May 22, 2007 - 7:39 am: |
|
|
मयूर, श्यामली, कळी म्हणजे वासना, वाईट प्रव्रूत्तींचा जनक... जसा कलीयुगातला कली... त्यालाच कळी अस पण म्हणतात.. विशेषत: मी हे कोकणात ऐकलय... तेव्हा तो शब्द कली असा वाचा... शेर लिहिण्यामगचा विचार असा, वास्तवीक पहाता होणार्या प्रगतीबरोबर माणूसकीची जाणिव विकसीत होणं अपेक्षीत होतं. पण यात सगळ्यात मोठा अडसर कोणता असेल तर मनातली ईर्षा, लोभ, वासना इ. दुर्गुण होत. एकंदरीतच जितकी सुख-साधनं वाढत चालली आहेत, त्याच वेगाने किंबहूना जास्तच असेल, सुखाची हाव वाढत चालली आहे. त्यातूनच हे दुर्गुणांनाही खतपाणी मिळतय आणि मधल्यामधे माणूसकी जीव तोडते आहे हे आपल्याला जाणवेनासच झालय.... याउप्पर काही चूक वाटत असेल तर जरूर स्पष्ट सांगा... मला आवडेल. आनंद
|
Me_anand
| |
| Tuesday, May 22, 2007 - 7:44 am: |
|
|
माझ्या गज़ल मधले रहीलेले दोन शेर कुठे आज गेले अभागी दिवाणे खरे हास्य त्यांच्याच वेडात होते तुझ्या पूजनाला इथे कोण गर्दी इथे चोर सार्याच रंगात होते मला वाटतं हे शेवटून दुसर्या शेराच्या आधी यायला हवेत... - आनंद
|
Me_anand
| |
| Tuesday, May 22, 2007 - 7:47 am: |
|
|
व्वा मयूर क्या बात है... जरी हुंदक्यांनी कुचेष्टाच केली तरी गायले मी तराणे हजारो अवडला एकदम.... छू गया
|
Mankya
| |
| Tuesday, May 22, 2007 - 8:00 am: |
|
|
वाह .. मयुरा .. Simply great ! मतला .. दमदार आहे रे ! तुझे ओठ .. हा शेर भरीचा वाटतो मलातरी .. चु. भु. दे. घे. ! पत्थर .. क्या बात ! मोहेंजदडो, हडप्पा आठवलं एकदम ! हुंदक्यांनी .. मस्त रे ! नसे एकटा .. शब्दरचना खासच रे मित्रा ! मक्ता .. वास्तव रे पुर्णपणे वास्तववाद .. नियतीला कुठला अघोरी आनंद मिळतो असे अमृताचे प्याले ओठाशी आलेले उधळताना कोण जाणे ! आवडली रे मित्रा .. मनापासून आवडली ! तुझे श्रम ' व्यर्थ ' नाही गेले ! माणिक !
|
धन्यवाद आनंद, गझलेमधले नंतर समाविष्ट केलेले शेर चांगले आहेत. 'अभागी' शेर मस्त जमला आहे. तुझ्या पूजनाला इथे कोण गर्दी इथे चोर सार्याच रंगात होते. उला मिसरा आवडला. पण सानी मिसरा तितकासा Effective वाटत नाहीये. 'सार्याच रंगात' चोर होते म्हणजे वेगवेगळ्या मानसिकतेमध्ये चोरांचे अनेक 'नमुने' होते असं काय? मला सुचलं ते असं काहीतरी... 'इथे चोर कित्येक भक्तात होते' माणिक धन्यवाद. 'ओठ' शेर भरतीचा का वाटला ते कळले नाही.. विचार करतोय.
|
Mankya
| |
| Tuesday, May 22, 2007 - 8:51 am: |
|
|
मयुरा .. Its just my thinking, आणि तूला माहितीये मी एकच गजल लिहायचा फक्त प्रयत्न केलाय तोही पुर्णपणे यशस्वी नाही, जर वैभव नसता तर ती गजल वृत्तात बसवताना वर्षानूवर्षे गेली असती ! गजलेचं शीर्षक आणि जमीन याला तो शेर धरून जात नाही किंवा त्या ओघात तो बसत नाही अस मला वाटलं ईतकच ! माणिक !
|
वाह लकाकून गेले पुन्हा क्षणी डोळे पुन्हा आसवांचे थवे त्यात होते मस्त उतरलाय . बाकी बोललो आहोतच . मयूरा खणखणीत गज़ल आहे . अगदी चुंबिले उखाणे सकट . थेट आणि मस्त लिहीलायस शेर . " हजारो " रदीफ़ मुळे कदचित गोंधळ होवू शकतो just kidding शेवटच्या शेर मध्ये ( ह्यापुढे माझ्यासकट सर्वांना विनंती आहे की गज़लकाराचे नाव गुंफले नसेल तर त्याला मक्ता न म्हणता शेवटचा शेर म्हणावे . हे मला अलिकडे शिकायला मिळालेली नवी गोष्ट ) कुणी मध्ये व्य्रथता येत नाही असे वाटते . म्हणजे कशाला असा भाव येत नाहीये ( तो अपेक्षित असल्यास ) बाकी उत्तम
|
धन्यवाद वैभवा... शेवटच्या शेरात ' उपाशी तडफडलो चोच तुटली... आणि आता कशाला दाणे टाकले?' असंच म्हणायचं होतं खरं तर.... मला वाटतेय 'व्यर्थ' ह्या शब्दाला सानी मिसर्यात न्याय मिळाला नाहीये... तो 'कुणी' मुळेच आहे काय ह्याबाबतीत माझा गोंधळ चालू आहे. सर्वांना विनंती: 'उखाणे' मध्ये एकच 'नाव' गुंफलेले 'उखाणे चुंबिले' अश्या भावनेने वाचावे. नाहीतर 'गोंधळ' होईल!!
|
Shyamli
| |
| Tuesday, May 22, 2007 - 11:56 am: |
|
|
मयुर मस्त गझल बर बर ,आम्ही नाही करुन घेणार 'गोधळ' तुझे ओठ पोरी किती लाल झाले! कधी चुंबिले तू उखाणे हजारो? तुझे ओठ राणी कसे लाल झाले! हे आपलं सहज सुचल म्हणुन हं, तुझा शेरही छानच आहे, एक हळुवारपणा आल्या सारखा वाटतो न या बदलामुळे? आणि त्या शेवटच्या शेराला कुणी च्या ऐवजी जरी घेउन बघ, साधतोय का तो परिणाम? आनंद, मग कलीच म्हण ना. नाही पटत ते 'कळी 'आत अजिबात अर्थात मला न पटुन न पटुन फारसा फरक नाही पडणारे म्हणा, पण ते ऐकायलाच विचित्र वाटतय काही तरी नंतरचे दोन्ही शेर पण आवडले
|
Jo_s
| |
| Wednesday, May 23, 2007 - 9:53 am: |
|
|
मयूर,मस्त जमल्ये गझल, श्यामलीने सांगीतलेला बदल "जरी" योग्य वाटतोय. सुधीर
|
" जरी " किंवा " उगा " वापरला तर त्या मिसर्यात पुढे येणारा " व्यर्थ " हा शब्द व्यर्थ होईल असे वाटते .
|
Shyamli
| |
| Wednesday, May 23, 2007 - 2:57 pm: |
|
|
"व्यर्थ" चा "व्यर्थ" सल्ला दिल्याबद्दल दिलगीर आहे मयुरेश वैभवा, का व्यर्थ होतोय ते स्पष्ट करुन सांगितलस ते बरं झालं , धन्यवाद
|
Pulasti
| |
| Wednesday, May 23, 2007 - 4:00 pm: |
|
|
आनंद - छान गझल! थवे मलाही खूप आवडला.. मयूर - पुन्हा एकदा दाद! गझल मस्तच आहे!! -- पुस्ति
|