|
वैभव.. पहिल्या वाचनात न भिडल्यांचे एक कारण म्हणजे कदाचित वृत्त असु शकेल.. डोळ्यांना लगागा, गालगागा आणि गागालगाची सवय झालीये.. हा माझाच दोष आहे म्हणा. तु म्हणतो आहेस ते बरोबर आहे की ह्यातील कुठलीही ओळ अतिरिक्त नाही. पण पहिल्या वाचनात मी शेराचा लावलेला अर्थ असा, " की आयुश्यात तस काहिच घडत नाहिये आणि हे नेहमीचच झालय" त्यामुळे शेरात मजा नाही आला.. पण मग आज जरा अजून पदर उलगडले.. आवडला मग
|
Mankya
| |
| Thursday, June 07, 2007 - 6:44 am: |
|
|
वैभवा .. धन्स ! श्वासांचा शेराबद्दलची शंकाच मिटली. असा विचार केलाच नव्हता मी ! पाऊसाच्या शेराबद्दल म्हणशील तर पाऊस पडणे अन इंद्रधनू विस्कटने याचा संदर्भ लावू शकलो नव्हतो, अर्थात तो शेवटचा पाऊस असावा हा विचार तर मनाला शिवलाच नाही, असो; आता सगळं स्पष्ट झालं ! आता शेवटच्या शेराबद्दल .. खूपच सुंदर अनुभव देवून गेला हा शेर समजल्यानंतर अर्थात तुझ्या दृष्टीकोनातून. जीवनातल्या काही गोष्टींची, घटनांची संगती कधीकधी खरच लावता येत नाही अन त्याचा अर्थही उलगडत नाही. तूझा हा शेर मला मदत करून गेला अश्याच एका प्रसंगाचा अर्थ उकलण्यासाठी. माणिक !
|
Meenu
| |
| Thursday, June 07, 2007 - 8:21 am: |
|
|
वैभव हितशत्रु मस्त रे ..
|
Nilima_v
| |
| Friday, June 08, 2007 - 2:57 pm: |
|
|
मयुर, गज़ल खुपच आवडली. ख़ाहि फ़ेर फ़ार असेच केले. प्लीज राग मानु नको. दिवे घे. इथे जीवनाचे दिवाणे हजारो, अधाशी मनाचे बहाणे हजारो कवीच्याच माथी अशी रेष वेडी, जिला वाचणारे शहाणे हजारो तुझे ओठ राणी किती लाल झाले!, कधी चुंबिले तू उखाणे हजारो? असे सर्व का पडद्यात व्हावे? नको देउ मजला बहाणे हजारो उगा माणसांची नको खूण शोधू ,गवसतील पत्थर पुराणे हजारो नसे एकटा मी...जगी एकटा जो... असावेत माझ्याप्रमाणे हजारो जरी हुंदक्यांनी कुचेष्टाच केली तरी गायले मी तराणे हजारो उपाशीच तुटल्यावरी चोच माझी कुणी टाकले व्यर्थ दाणे हजारो? सुखि माणसाच अलौकिक सद्रा, घालुनी फ़िरावा जसा काय कूत्रा भटकलो तसाच दुनियेत सार्या, सावेला एकटे कुत्रे ह्जारो
|
Daad
| |
| Tuesday, June 12, 2007 - 6:00 am: |
|
|
वैभवा, जियो. सगळीच मस्त पण तरीही.... होकार बेदम शेर. त्यातला "हलकेच" हलवून गेला. त्या "हलकेच"ची मजा घेण्यासाठी परत परत वाचला तो शेर. इंद्रधनू विस्कटले आहा! मला actually विरोधाभास दिसला. डोळ्यांच्या देशी पडलेला पाऊस दु:खाच्या आसवांचा असेल तर? हितशत्रू छ्छे. हा शेर उलटं पालटं करून गेला. आपणंच आपले शत्रू होण्याची ही अवस्था. श्वास किती दृढतेने सांगितलस... मनाचं झटणं? तनाचं श्वास घेणं क्षुल्लक होऊन गेलं मनाच्या पुढे.
|
Jo_s
| |
| Tuesday, June 12, 2007 - 7:14 am: |
|
|
वैभव, प्रश्नांना उत्तर नसते होकार तुझा हलकेच बजावून गेला अन इंद्रधनू इथले विस्कटले आहे मस्त, आवडली गझल. सुधीर
|
वैभव, ' हितशत्रू' सुंदर! सगळेच शेर खास.. मी मतल्यातच गारद झाले.
|
Pulasti
| |
| Wednesday, June 13, 2007 - 3:51 pm: |
|
|
वैभव, मस्तच गझल! हितशत्रू, होकार आणि इंद्रधनू - खूपच आवडले!! -- पुलस्ति.
|
Jo_s
| |
| Friday, June 15, 2007 - 4:51 am: |
|
|
दान देताना सदा ते झाकून दे झाक डोळे पाहणे ही सोडून दे विसर जे होऊन गेले पूर्वी कधी ती मने तू, मोडलेली जुळवून दे हट्ट रीतींचा फुका का व्हावा असा जे सुखाच्या आड येते, सोडून दे आठवांची आज का ही छळती भुते त्या भुतांना भूतकाळी गाडून दे पांघरायाही इथे ज्यां काही नसे ते निळे आकाश त्यांना ओढून दे आजवर टोचून गेले, ते कावळे कावळा नाहीस तू, ते सोडून दे का लिहावे तू ललाटी माझ्या असे राहिले भोगायचे ते खोडून दे वाहती जखमा मनांच्या त्या भळभळा बांधण्या चिंधी तयांना, फाडून दे देत असता मज विसरला दाता कसा राहिलेले तेच पडद्या आडून दे देत जा, काही कुणा तू मागू नको काय द्यावे ते उरी पण जाणून दे आजही कच्चेच हे मडके राहिले परत मातीचा घडा तो घडवून दे सुधीर
|
|
|