Mankya
| |
| Monday, May 21, 2007 - 5:07 am: |
| 
|
श्यामली .. मस्त, लिहित रहा गं ! वेगळ्या आकाशाची अशी हौस जर नव्हतीच तूजला केव्हाही का पोर्णिमेच्या रात्रीही आपल्या आकाशाच्या नशीबी चंद्र नाही ? माणिक !
|
Rajya
| |
| Monday, May 21, 2007 - 5:21 am: |
| 
|
आकाशाच्या नशीबी चंद्र नव्हता तेव्हाही जेव्हा साथ माझी हरवली, तुझ्याशिवाय जगण्याची मग सवय मला जडलेली
|
Jagu
| |
| Monday, May 21, 2007 - 6:03 am: |
| 
|
चंद्र आणि सूर्य असतील जरी भिन्न दिशेला तेच आहेत खरे साक्षी तुझ्या माझ्या प्रेमाला
|
माणिक चांदणं शुभ्र आहे.
|
Jagu
| |
| Monday, May 21, 2007 - 9:06 am: |
| 
|
सूर्य आणि चंद्र दोघांनाही लागत ग्रहण आवर घाल भावनांना नाहीतर प्रेमाला लागेल नजर.
|
Gobu
| |
| Monday, May 21, 2007 - 9:13 am: |
| 
|
स्वप्नाच्या या शहरात सुखान्ची रेलचैल आहे खर सुख मात्र हेच की सोबतीला "झुळुक" आहे! गोबु...
|
Jagu
| |
| Monday, May 21, 2007 - 9:28 am: |
| 
|
गोबु छान लिहायला लागलायस आता. असेच चालू ठेव आपोआप शब्द सुचतील तुला. मी सुधा तुझ्याच सारखी आहे. प्रयत्न चालू ठेवलाय चांगल्या कविता करण्याचा.
|
Mankya
| |
| Tuesday, May 22, 2007 - 3:34 am: |
| 
|
संघमित्रा .. Thanks गं ! माझ्या अंगणातील अबोली उदासीत खिन्न थिजली मिटले डोळे वेदना दाटली पण मिटली पापणी भिजली ! माणिक !
|
तुख्या चिंब पापणीतून हा दु:खाश्रू का ओघळला ? सहवासाला सूर्य आपल्या । चंद्र जरी हा मावळला ॥
|
Jagu
| |
| Tuesday, May 22, 2007 - 6:55 am: |
| 
|
मिटलेल्या तुझ्या पापणीला सहजच मी फुंकर मारली थरथरत्या पापणीतून पडलेल्या थेंबाने मझी पूर्ण कायाच भिजली.
|
Mankya
| |
| Tuesday, May 22, 2007 - 7:05 am: |
| 
|
माझाच एक अश्रू माझ्या डोळ्यांस बिलगून रडला तुझा दाबलेला हुंदका म्हणे त्याच्या कानी पडला ! माणिक !
|
माझाच एक अश्रू माझ्या डोळ्यांस बिलगून रडला तुझा दाबलेला हुंदका म्हणे त्याच्या कानी पडला ! माणिक अप्रतिम...
|
Gobu
| |
| Tuesday, May 22, 2007 - 10:19 am: |
| 
|
माणिक, सही रे! मानक्या लेका तु खरच ग्रेट आहेस रे! देवाशप्पथ!! मित्रहो,असामान्य प्रतिभा म्हणतात ना ती हीच! छे,मी आता इथे लिहायचेच सोडतो जगु, सुरेख ह!!! मॉड्स, कृपया या अजाण बालकाला माफ़ करा ह (आणि हो, हे ऊडवु नका ह, प्लीज...)
|
Shyamli
| |
| Tuesday, May 22, 2007 - 1:49 pm: |
| 
|
वा माणिक.. .. ..
|
माणिक, मस्त रे ! स्पर्शव्याकूल ह्रदय माझे पुसते मला मी धुंद का ? स्पंदन हे नवते सख्या रे हा प्रियेचा हुंदका ॥
|
Mankya
| |
| Wednesday, May 23, 2007 - 2:24 am: |
| 
|
खूप खूप आभार मित्रांनो .. रूपाली, गोबू, श्यामली, छत्रपती ! छत्रपती .. अप्रतिम आहे हुंदका ! व्यक्तच करावं म्हटलं तर शब्दांचीही ना उरली वाट तुझ्या हळव्या स्पर्शाने मग भरून वाहिले काजळकाठ ! माणिक !
|
Mankya
| |
| Wednesday, May 23, 2007 - 2:40 am: |
| 
|
वाटच पहायचीच म्हटलं तर हे आयुष्यही कमीच होते पण तुझे डोळे सखे जाताना परक्यासारखे बोलले होते ! माणिक !
|
Rajya
| |
| Wednesday, May 23, 2007 - 4:38 am: |
| 
|
"पण तुझे डोळे जाताना सखे" माणिक तुझ्या झुळुका छानच असतात, पण वरची ओळ वाचली आणि थोडं दचकायला झालं. "तुझे डोळे जाताना" याचा अर्थ सरळ सरळ तु आंधळी होताना असा लागला गेला, पुर्ण वाचल्यावर अर्थ कळला पण मला वाटतं ती ओळ अशी असती तर, वाटच पहायचीच म्हटलं तर हे आयुष्यही कमीच होते पण तु जाताना डोळे तुझे परक्यासारखे बोलले होते ! माणिक cbdg , आपल्या एवढी थोर प्रतिभा नाही आमची.
|
Mankya
| |
| Wednesday, May 23, 2007 - 5:21 am: |
| 
|
raajyaa.. अरे आमची, आपल्या हे काय रे ! बिनधास्त माणक्या म्हणून टाक आणि प्रतिभा वगैरे माझ्याबाबतीत तरी नाही यार ! बाकी बदल केलेला छानच रे, पटलं ! जिथे नसे केवळ तुझाच भास तिथे मज मनाचा कधीच वास नाही कवटाळल्या तुझ्या पाऊलखूणा मी पायांनी स्पर्शिली ती वाट नाही ! माणिक !
|
मानिक मस्त चारोळी आहे छान लिहलस...... तुषार.......
|