सर्वांचेच धन्यवाद... स्वाती... 'हजार वादळं' इथे 'हजार' हा शब्द भरतीचा आला आहे.काढून टाकतो. देठांविषयी... 'देठं लावलेली'... इथे 'लावणे' ही क्रिया खोटेपणाच्या अथवा कृत्रिमपणाच्या अर्थाने मुळीच आली नाही. म्हणजे 'फूल होतेच' आणि 'देठ नंतर लावले' असा अर्थ नाही. नैसर्गिकता अधोरेखित करण्याचा प्रयत्न आहे. 'देठं असलेल्या...' असं काही तरी चाललं असतं....(?) 'देठं लवलेल्या' हा बदल अतिशय सुंदर शीर्षक जरी 'नकळत' असलं तरी कवितेचा गाभाच 'समर्पण' आहे. हा शब्दच काढला तर अर्थ येऊ शकेल? की शब्द अपरिहार्य? विचार करतो आहे. गणेश छान आहे कविता. सतीश 'पुतळे' अप्रतिम आणि सत्यदर्शन घडविणारी. पूजा..क्या बात है! मस्त लयदार शब्दात गुंफलाय अर्थ.
|
Mankya
| |
| Monday, May 21, 2007 - 3:53 am: |
| 
|
मयुरा .. नकळत अगदी भन्नाट ! पूजा .. एकदम लयबद्ध .. फक्त नुरली च्या जागी न उरली कर बघू ! सतिश .. पुतळे जबरदस्तच मित्रा .. अगदी वास्तववादी अन रोकठोक .. मस्तच ! लिहित रहा रे मित्रांनो, आजकाल खूप ओसाड वाटतो हा बीबी ! माणिक !
|
Bee
| |
| Monday, May 21, 2007 - 4:04 am: |
| 
|
अभिप्रायाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार.
|
Jagu
| |
| Monday, May 21, 2007 - 5:54 am: |
| 
|
पुजा आणि सतिश छानच आहेत कविता.
|
मयूर लक्षावधी आणि हजार दोन्ही असले तरी त्याचा योग्य तो परिणाम होतोय. ते वाचताना मला डोळ्यासमोर दिसली ती वाडळं. सतीश, सकस कल्पना आणि सशक्त मांडणी. वा!
|
Rajya
| |
| Monday, May 21, 2007 - 6:07 am: |
| 
|
पेकाटात दगड बसल्यावरचं एखाद्या कुत्र्याचं विव्हळणं मंदावत जावं हळुहळु, किंवा भुकेनं कासावीस होऊन आक्रोश करणार्या बाळाचं रडणं ओसरावं नाईलाजानं, आईची वाट बघता बघता, क्या बात है सतिश, लगे रहो
|
Desh_ks
| |
| Monday, May 21, 2007 - 7:29 am: |
| 
|
सार्यांचे अभिप्रायांबद्दल आभार. मयूर, "नकळत" आवडली. "लक्षावधि फुलांची हजारो वादळं..." संघमित्रानं म्हटल्याप्रमाणे मलाही ते दोन्ही शब्द असणं परिणामाच्या दृष्टीनं योग्यच वाटलं. फक्त ते 'देहाच्या देशात' म्हटल्यामुळे 'पुरुषप्रधान' असल्यासारखं वाटतंय का? गमतीचा भाग जाऊ दे, पण समर्पणाचा अनुभव शारीर अनुभूती पलीकडेही व्यापून हवा ना (देह हे माध्यम असलं तरी)? आणि 'देश' हा शब्द ही व्यापकतेपेक्षा मर्यादा दाखवणाराच आहे असं मला वाटलं. तुमचं काय मत आहे? 'देठ लवलेल्या' हा स्वातीनं सुचवलेला बदल सुंदरच आहे (तुम्हालाही तो आवडला आहेच). त्या बदलामुळे, 'समर्पणाची' हे विशेषण आपोआपच अध्याहृत होतं. छान आहे 'नकळ्त'. पूजा, "फक्त एकदा..." छान उतरली आहे कविता तुमची. घागर रिती.. भरली किती.... नुरली तहान.. पाहून जा.. फक्त एकदा येऊन जा.. फक्त एकदाच येऊन जा.. !!!!!! " खूप सुंदर आहे हे... -सतीश
|
Jagu
| |
| Monday, May 21, 2007 - 9:22 am: |
| 
|
मन सगळ काही समजूनही मन वेड्यासारखं वागतंय नको त्याच गोष्टीचा अट्टाहास करतंय कितीही असलास जवळ तरी दूरच तुला पाहतंय कितीही केल्यास अपेक्षा पूर्ण तरी उपेक्षाच मानतंय काय करू ह्या वेड्या मनाला प्रेमातलं हे भावी संकट वाटतंय
|
आता सगळंच कसं सुटं सुटं घरातल्या भिंतींच्या पोपड्यासारखं तुझ्याच अट्टाहासातून जन्म घेतलेला तुझा नकार आणि तुझ्या नकारातून जन्मलेला माझा अट्टाहास ------------------------------------------- त्या दोघांच्या अस्तित्वाने आपलं असं अस्तित्व नाहिस केलय आता फक्त तुम्ही दोघे आणि आम्ही दोघे तू आणि तुझा नकार मी आणि माझा अट्टाहास -------------------------------------------- त्या पोपडे उडालेल्या भिंती आणि कसे बसे तग धरून राहिलेले छप्पर घराचा आव आणून प्रयत्न करतय मला सावली आणि आधार देण्याचं बाहेरच तळपतं उन वितळवतय माझा अट्टाहास आता भिंतींचा रंग काढावा म्हणतोय --------------------------------------------- मलाही कल्पना आहे तुझ्या नकारातली धार कधीच बोथट झालिये आता फक्त आहे तो हलता देखावा पुसट होत चालले आहेत.. दोन्ही तुझ्या पाठीवरची ती नकाराची उभी रेघ आणि माझ्या अट्टाहासाचा तो घर्मबिंदु
|
सतीश, तुमची कविता आवडली. पूजा, मस्त!
|
Meenu
| |
| Tuesday, May 22, 2007 - 4:41 am: |
| 
|
पूजा मस्त लय आहे कवितेत. सतीश पुतळे आवडली देवा किती दिवसांनी ..? मस्त जमलीये .. विरोध आणि नंतर समेटाची चिन्ह ..
|
Shyamli
| |
| Tuesday, May 22, 2007 - 4:52 am: |
| 
|
अरे वा, देवा मस्त
|
Mankya
| |
| Tuesday, May 22, 2007 - 5:09 am: |
| 
|
सहीच रे देवा .. मस्त ! स्वाती, मीनू .. कविता कुठे आहेत तुमच्या ? तूम्हीही फक्त वाचक झालात तर कसं होणार ? माणिक !
|
वाह मज़ा आ गया . मयूर , सतीश , देवा मस्त उतरल्यात कविता . आवडल्या
|
आधीच ... मी आधीच म्हटलं होतं ... " तुझे माझे मार्ग वेगळे आहेत " तुला पटलं नाही ... चालत राहिलो .. एकमेकांच्या पायात येत . रोज नव्या मुक्कामावर कळणारच होत्या एकमेकांच्या नवनव्या सवयी ... अजूनही आठवतोय तो शेवटचा मुक्काम , तुझ्या कुशीत पडून तुला मी लिहीत असलेली नवी कथा ऐकवायला सुरुवात केली अन ... पांढर्याफट्ट चेहेर्याने तू विचारलंस " तू प्रत्येक कथेचा शेवट आधी लिहीतोस "? मी आधीच म्हटलं होतं ...
|
Mankya
| |
| Tuesday, May 22, 2007 - 9:29 am: |
| 
|
किती दिवस वाट पहायला लावलीस वैभवा .. नेहमीप्रमाणेच एक अप्रतिम कविता घेऊन आलास तर ! आधीच .. मनापासून आवडली ! नवनव्या सवयी .. अगदी खरंय ! माणिक !
|
परत राज्यात आलास वैभवा!!!... मी आधीच म्हणणार होतो 'कविता घेऊन ये...' अप्रतिम आहे 'आधीच'... तुझ्या प्रत्येक कवितेत वेगळेपण जाणवतं.
|
Shyamli
| |
| Tuesday, May 22, 2007 - 10:29 am: |
| 
|
वाह !!!........... ... .. .. ..
|
Jo_s
| |
| Tuesday, May 22, 2007 - 10:42 am: |
| 
|
वैभव, मस्तच रे कविता "मी आधीच म्हटलं होत" सुधीर
|
Gargi
| |
| Tuesday, May 22, 2007 - 4:26 pm: |
| 
|
वैभव... छान लिहिलयस! मस्त!
|