Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 21, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » अधिक - ज्येष्ठ » काव्यधारा » झुळूक » Archive through May 21, 2007 « Previous Next »

Rajya
Friday, May 18, 2007 - 4:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्ही कधी प्रेम केलं नाही,
म्हणे, प्रेमिकांचा जीव धोक्यात असतो,
त्यांचा एक पाय स्मशानात
तर दुसरा केळीच्या सालीवर असतो


Mankya
Friday, May 18, 2007 - 4:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ये परतूनी तू पुन्हा एकदा
छेडूनी जा मनाची तार तार
अश्या देऊन जा तू जखमा
कवटाळीन वारंवार ते वार वार !

माणिक !


Mankya
Friday, May 18, 2007 - 4:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तू परतशील म्हणून
वाट पाहतय दार
भिंतीही अधीर पाहण्या
तुज नयनी सोहळे हजार !

माणिक !


Jagu
Friday, May 18, 2007 - 5:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राजा मस्त आहे चारोळी.
माणिक खुपच छान.


Jagu
Friday, May 18, 2007 - 5:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझ्या वाटेवरती नजर
काळ्या ढगांप्रमाणे जमली आहे
तू येताच क्षणी तुझ्यावर
बरसण्यासाठी आतुर आहे.


Rajya
Friday, May 18, 2007 - 5:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणिक,

हजार सोहळे मस्तच!!!


Mankya
Friday, May 18, 2007 - 8:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रांनो .. मनःपूर्वक आभार !

श्वासांची लयच चुकावी
जुनेच असे काहिसे भास
पुस्तकातील जुने गुलाबही
घेतय आता अखेरचे श्वास !

माणिक !


Gobu
Friday, May 18, 2007 - 3:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मॉड्स,
माझी चारोळी का उडवली?
हा अन्याय आहे
हास्यकविता हा ही साहित्याचा एक प्रकार आहे हे तुम्ही विसरताय
मित्रहो,
कधी कधी असेही वाटते
मॉड्सला जन्गलात सोडावे
गुपचुप मायबोलिवर येवुन
ऐटीत लिहीत जावे!
गोबु...


R_joshi
Saturday, May 19, 2007 - 4:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणिक,जगु,राजा छानच लिहिल्यात चारोळ्या.
गोबु, तुला पुर्ण पाठिंबा फक्त मॉडसला तुझ्या हास्य कवितांमधुन वगळ. नाहितर मॉडस ऐवजी तुझ्यावरच जंगलात जायचि पाळी येइल:-):-):-)


R_joshi
Saturday, May 19, 2007 - 4:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुर आज गवसती मनाचे
मनातिल दुरावे मिटविण्यासाठि
आवाजातिल असंख्य पैलु
निर्माण होति याक्षणांसाठी

प्रिति:-)


R_joshi
Saturday, May 19, 2007 - 4:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक प्रेम सोडल
तर मला सर्व काहि जमत
प्रेमीयुगलांची जोडि पाहण्यात
मन माझ रमत

एक प्रेम सोडल
तर मला वाट पाहण हि जमत
तु येशिल या आशेवर
जगण मला जमत

एक प्रेम सोडल
तर विरह जगण मला जमत
प्रेम हे असच असत
हे स्वत:ला समजावण मला जमत

एक प्रेम सोडल
तर सर्वकाही मला जमत.....

प्रिति:-)


Rajya
Saturday, May 19, 2007 - 5:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोबु,
छानच रे, मजा आली :-)


Gobu
Saturday, May 19, 2007 - 9:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रीती, राजा... धन्यवाद!
काही मॉड्स असे असतात
बिनधास्तपणे लिहु देतात
अन उरलेले असेही मिळतात
"झुळुक"मध्ये येऊन बसतात!
गोबु...


Ganesh_kulkarni
Saturday, May 19, 2007 - 12:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रत्येकाच्या डोळ्यात तसा
पाऊस असतो लपलेला
आठवणींचे ढग जमा झाले की...
तो तयारच असतो बरसायला!

गणेश(समीप)


Poojas
Saturday, May 19, 2007 - 6:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केव्हा तरी व्यथेने..मनमोकळे रडावे..
हलकेच हुंदक्यांच्या.. हळव्या मुक्या स्वराने..
अगणित आठवांना..द्यावी तिलांजली अन..
बरसून आसवांना.. व्हावे रिते मनाने..!!!!


Bee
Sunday, May 20, 2007 - 7:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणाच ठावूक केंव्हा
ह्या काळजाचा जीव जडेल
कुणाच्या तरी हृदयाचा
घडा माझ्यावर आदळेल..


Mankya
Monday, May 21, 2007 - 3:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कसा झाकोळला देह
साऊलीही ओशाळली
मनाने मनापासून दूर
वाट अशी चोखाळली !

माणिक !


Mankya
Monday, May 21, 2007 - 4:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझ्यासमोर असलो
कि काय मागावं कळत नाही
म्हणूनच बहुतेक
मला पाहिजे ते मिळत नाही !

माणिक !


Mankya
Monday, May 21, 2007 - 4:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपल्या दोघांनाही तेच
चांदणं होतं ना आवडलं
पण मला कळलं नाही, तू
आकाश वेगळ का निवडलं ?

माणिक !


Shyamli
Monday, May 21, 2007 - 4:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


वेगळ्या आकाशाची हौस,
कधीच नव्हती मलाही
पण भिन्न दिशांना हा सुर्य
एकाच वेळी उगवणार नव्हताच तसाही

श्यामी!!





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators
>