|
Jagu
| |
| Thursday, May 17, 2007 - 8:32 am: |
|
|
विवह सोहळा आज वळव्याचा पाउस आला आणि धरणीशी वांड्गनिश्चय करुन गेला. हिरव्या वस्त्रात तू सजणार रान फुलांचा गजरा तू माळणार इंद्र धनूचा मुकुट चढवणार लता वेलिंचे बाशिंग बांधणार अशी श्रुंगाराची चाहुल देउन गेला. कोकीळ स्वरांची मैफील रंगणार मयुर भान हरवून नाचणार काजव्यांची रोषणाइ झगमगणार विजेची आतषबाजी होणार अशी विवाह सोहळ्याच्या ओल्या स्वप्नांची कुजबुज करुन गेला नद्या तलाव ओसांडून वाहणार तहानलेल्या विहीरी तृप्त होणार उन्हाळलेली शेत पिकात डुबणार पशू, पक्षी सारेच सुखावणार अशी सुखी संसाराची स्वप्ने रंगवून गेला.
|
Ajjuka
| |
| Thursday, May 17, 2007 - 9:36 am: |
|
|
सन्मे आणि माणक्या धन्यवाद! खरंतर आधी द्यायला हवे होते. आता ते मागच्या महिन्यातल्या प्रतिक्रियेसाठी आहेत हे समजून घ्या.
|
अरेच्चा माझी लेटेस्ट पोस्ट (वैशाखातली वैसन्टी च्या कवितेनंतरची )गायबली वाटते. मॉड्स काही प्रॉब्लेम झाला का? असो. परत लिहीते. मयुरा अतिशय सुरेख आहे कविता. बर्याच दिवसांनी अशी कविता वाचली. वैसन्ती मस्तच. छोटी गोड आणि लयीत आहे कविता.
|
Swasti
| |
| Thursday, May 17, 2007 - 1:18 pm: |
|
|
mods ! तो ललीत मधला ' ली ' पहिला करा बघु शुद्धलेखनाच्या चुका ????
|
स्वस्ति हो आधी अधिक मधला धी दुसरा होता. आता ललितमधला ली. पण आपण हे ललितच्या बीबीवर न लिहिता कविता बीबीवर का बोलतोय
|
Bee
| |
| Friday, May 18, 2007 - 1:54 am: |
|
|
ललीतच्या बीबीवर न लिहिता feedback to admin मधे लिहा बघू पोरींनो :-) जगु, मस्त आहे कविता.. वर्णन आवडलं..
|
Bee
| |
| Friday, May 18, 2007 - 3:58 am: |
|
|
सातपुड्याच्या धिप्पाड पर्वत रांगा मोहोरीसारख्या दिसू लागल्यात आणि छताचे ठिबकणारे कौल भासायला लागले आभाळावाणी.. जगण्याच्या मुलभूत प्रश्नांमधे गुरफ़टून गेले सबंध जीवन दिवस रात्र झाले महाकाय..
|
Vaisanty
| |
| Friday, May 18, 2007 - 5:02 am: |
|
|
धन्यवाद बी आणि संघमित्रा...... वैशाली
|
नकळत जास्त काही मागितलं नव्हतं तुझ्या जवळ... अगदी जमल्यासच (आणि लक्षात राहिलंच तर) फक्त तुझ्या श्वासांची एक पाकळी पाठवून दे माझ्याकडे असं म्हणालो होतो माझ्याही नकळत. माझं हे 'नकळत'पणच तू इतकं मनावर घेतलंस की, समर्पणाची देठं लावलेल्या लक्षावधी फुलांची हजार वादळं घेऊन आलीस माझ्या देहाच्या देशात! जास्त काही मागितलं नव्हतं तुझ्या जवळ...
|
बी, छान. आभाळा, ' नकळत' छान आहे. मी ' समर्पणाची देठं लावलेल्या' ही ओळ 'देठं लवलेल्या फुलांची हजारो(/लक्षावधि) वादळं' अशी वाचली. ( समर्पण हा शब्द न येता अर्थ आला तर जास्त छान वाटेल असं वाटलं, तसंच लक्षावधि आणि हजार - हे दोन दोन उल्लेख गरजेचे नाहीत असं वाटलं.) तुझं काय मत?
|
Ashwini
| |
| Friday, May 18, 2007 - 2:47 pm: |
|
|
मयूर, 'नकळत' आवडली. आणि स्वातीने सुचवलेला बदल फारच सुरेख वाटतोय.
|
मयूर अगदी पुरुषप्रधान कविता आहे. पण मस्तच. समर्पणाची... मधे स्वाती म्हणतेय तोच असं नाही म्हणत पण काहीतरी बदल खरंच हवाय. फुलांना देठं लावणं म्हणजे काहीतरी दिखाऊपणा, खोटेपणा असा अर्थ होतोय जो तिथं तुला अपेक्षित नाहीये (ना?).
|
Gargi
| |
| Saturday, May 19, 2007 - 4:56 am: |
|
|
बी कविता आवडली.... मयूर 'नेहमीप्रमाणे', 'नकळ्त' .......सुरेख! जागु,'विवाह सोहळा' पाउसाची चाहुल देउन गेला...
|
Jagu
| |
| Saturday, May 19, 2007 - 5:05 am: |
|
|
धन्यवाद बी आणि गार्गी. बी आणि मयुर खुप छान लिहिल्यात तुम्ही कविता.
|
Jagu
| |
| Saturday, May 19, 2007 - 7:00 am: |
|
|
माझंपण आजकाल माझ्यावरच मला दया येते तू फक्त माझाच असावास असे सारखे वाटते! तू माझा असणं म्हणजे नक्की काय? तुझं मन की शरीर? दोन्ही माझ्या ताब्यात असू शकत नाहीत तुझ्या कर्तव्य, जबाबदाऱ्या मी अडवू शकत नाही माझ्यावरच मला आता हसावेसे वाटते! मी फक्त तुझीच व्हावे असेच सारखे वाटते! कदाचित असे घडूही शकते तुझे विचार, तुझ्या जबाबदाऱ्या काही अंशी मी पेलू शकते ! प्रत्यक्षात कुणी कुणाचे नसते प्रत्येक व्यक्ती आप-आपल्या तत्त्वानुसार जगत असते! तू माझा किंवा मी तुझी हे एकमेकांच्या सामंजस्यावर अवलंबून असते!
|
मरणा तुला यायचेच... मरणा तुला यायचेच असेल तर... तू ये... पण मी... नाही म्हणणार नाही!... पण... तू येताना.. एकच काम कर... खादी तिरंग्याला जवळ बाळग... त्याला जवळ कर!... आणी चंदणाच्या लाकडांची... आॅर्डर अगोदरच देऊन ठेव!... कारण... मी जसा आलो तसा जाणारच नाही! गणेश(समीप)
|
Poojas
| |
| Saturday, May 19, 2007 - 7:09 pm: |
|
|
"फक्त एकदा येऊन जा.." फक्त एकदा येऊन जा.. अल्लड थेंब देऊन जा.. पागोळ्यांचे अवखळ गाणे.. ओठांवरती ठेवून जा.. फक्त एकदा येऊन जा.. फक्त एकदा येऊन जा.. झिम्माड वेग देऊन जा.. भरकटलेली कागदी नाव.. काठावरती घेऊन जा.. फक्त एकदा येऊन जा.. फक्त एकदा येऊन जा.. कोवळे कोंब रोवून जा.. ओसाड शेती.. हिरवी पाती.. रुजण्यासाठी लावून जा.. फक्त एकदा येऊन जा.. फक्त एकदा येऊन जा.. सरीवर सरी वाहून जा.. घागर रिती.. भरली किती.... नुरली तहान.. पाहून जा.. फक्त एकदा येऊन जा.. फक्त एकदाच येऊन जा.. !!!!!!
|
Desh_ks
| |
| Sunday, May 20, 2007 - 6:50 am: |
|
|
पुतळे सवय होतेच तशी, दु:खाची आणि सुखाचीही. पेकाटात दगड बसल्यावरचं एखाद्या कुत्र्याचं विव्हळणं मंदावत जावं हळुहळु, किंवा भुकेनं कासावीस होऊन आक्रोश करणार्या बाळाचं रडणं ओसरावं नाईलाजानं, आईची वाट बघता बघता, दमून भागून, तशी दु:खाची धार बोथटतेच केव्हांतरी. मग, एखाद्या हातापायाशिवाय लुळेपांगळे, डोळ्यांशिवाय आंधळे, दुखावलेल्या पंखांनी दुबळे, काहीतरी हरवलेले, अपूर्णसे जीव आहे त्याच जगात, नव्या निराळ्या सुखाच्या वाटा पुन्हा शोधू लागतात, धडपडत, चाचपडत. एक दु:ख संपतं म्हणून नव्हे, तर सवयीचं होत, म्हणून! आणि सुखाचीही झळाळी फिकटतेच. लख्ख धुतलेल्या फरशीवर नकळत पण निश्चितपणे चढत जाणार्या धुळीच्या पुटांसारखी, सुखाच्या सोनेरी क्षणांवर चढत जाते सवयीची धूळ! आणि धुळीत सहज चितारलेल्या अर्थहीन आकारात फक्त दिसावी मूळची झळाळी, तसे आठवणींचे क्षण उजळून जातात क्षणभर, ती सवयीची धूळ झटकली की, तेवढ्यापुरतेच, जुने फोटो पाहावे अल्बममध्ये, तसे; आपल्याजवळ, तरी दूरस्थ, परके... आणि सवय म्हणून चाचपडताना तथाकथित सुखाच्या नवनव्या वाटांवर हरवून जातं नकळत कुठेतरी, दृष्टीतलं उत्सुकतेचं चैतन्य. पाठीवरच्या ओझ्यानं केविलवाण्या झालेल्या दुबळ्या जीवासारखे दिसायला लागतात, ते सवयीनं सुख शोधणारे, किंवा सवयीचं सुख भोगणारे अनुत्सुक, उदास डोळे. आणि सवयीनं जगत राहतात हालत्या चालत्या शरीरातून निर्जीव पुतळे!!! -सतीश
|
Shyamli
| |
| Sunday, May 20, 2007 - 7:54 am: |
|
|
वाह...!... .. .. .. ..
|
पुजा आणी सतीश, खुपच छान कवीता आहेत तुमच्या!
|
|
|