दाद..खरंच... एकाहून एक अप्रतिम... 'कुणाची तरी संध्याकाळ सजते' हे वाक्यच कविता आहे!! एवढ्या रंगबेरंगी कविता वाचून मला ग्रेसच्या काही ओळी इथे द्याव्याश्या वाटताहेत.. क्षितीज जसे दिसते तशी म्हणावीत गाणी देहावरची त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोणी गाय जशी हंबरते तसेच व्याकूळ व्हावे बुडता बुडता सांजप्रवाही अलगद भरोनी यावे. मस्त लिहिताय सगळेच.... चालू देत..
|
Lampan
| |
| Wednesday, May 09, 2007 - 11:25 am: |
| 
|
निरज .. " निःशब्द सुगंधी भास<"> मस्तंच
|
मायबोली मायबोली एक असं व्यासपीठ जिथे नाते जुळतात नाही म्हणता-म्हणता मनातले गुपितं उलगडतात मायबोली एक असं व्यासपीठ जिथे जग विसरतात विसरून जगाला सार्या स्वत:चे जग घडवतात मायबोली एक असं व्यासपीठ जिथे माणसं माणसांच्या मनात राहतात निराश झालेल्या मनाला देखील सर्वजण आधार देतात मायबोली एक असं व्यासपीठ जिथे अहंकार्यांचे अहंकार पडतात मनात वसलेल्या माणसांचे संस्कार घडतात मायबोली एक असं व्यासपीठ जिथे माणूस शब्द बनून राहतो त्या "शब्दांसाठीच" शब्दांपलीकडचा ईथे खेळ चालतो मायबोली एक असं व्यासपीठ जिथे मुक्या माणसाचे शब्द बोलतात लंगड्या माणसाचे शब्द चालतात प्रत्येकाचे अस्तित्व शब्द बनून राहतात मायबोली एक असं व्यासपीठ जिथे माणूस शब्दांसाठी जगतो अन वाह!!! व्वा!!! करत शब्दांवरच मरतो मायबोली एक असं व्यासपीठ... --- श्री
|
Chinki
| |
| Thursday, May 10, 2007 - 5:42 am: |
| 
|
"भय इथले सन्पत नाही ... " हि कविता कोणी लिहिलि आहे कोणी सान्गु शकेल का?
|
चिन्के, ग्रेस अर्थात माणिक गोडघाटे यांची कविता आहे ही!
|
Shyamli
| |
| Thursday, May 10, 2007 - 6:42 am: |
| 
|
एकांताला आपण सापडू नये हे मनाशी पक्क ठरवलेल......>>> गार्गी खुपच आवडली तुझी कविता आणि शेवट तर कहर
|
Chinki
| |
| Thursday, May 10, 2007 - 6:56 am: |
| 
|
धन्यवाद भ्रमरा(रोजच्या भाषेत"भुन्ग्या").. धन्यवाद भ्रमरा(रोजच्या भाषेत"भुन्ग्या")..
|
Manogat
| |
| Thursday, May 10, 2007 - 9:07 am: |
| 
|
श्री! खुपच छान लिहिली आहे कविता.
|
Astitva
| |
| Thursday, May 10, 2007 - 12:07 pm: |
| 
|
कोणि जगु आणि बी ला पाहिल आहे का?
|
Ultima
| |
| Thursday, May 10, 2007 - 3:46 pm: |
| 
|
मी एक सिलीकाॅन व्हली नावाची कविता ऐकली होती. कुणाकडे पुर्ण आहे का?
|
Gargi
| |
| Thursday, May 10, 2007 - 4:51 pm: |
| 
|
माणिक, श्यामली धन्यवाद! अरे..कीती सुंदर कविता झाल्या आहेत सगळ्यांच्या.... नीरज,माणिक श्यामली, वैशाली.... सतीश, 'रान' मस्तच!
|
Gargi
| |
| Thursday, May 10, 2007 - 4:58 pm: |
| 
|
पून्हा आज अपुल्या अपुल्यातच चल पुन्हा गुतूंन पाहू पुन्हा एकदा हाती माझ्या हात तुझा गुफूंण पाहू ती जवळीक, ओढ अधीर...... तो सहवास, उजळून पाहू चल पुन्हा, तू मला अन् मी तुला जवळून पाहू
|
धन्यवाद मनोगत. आभारी आहे. - श्री
|
Mi_vikas
| |
| Friday, May 11, 2007 - 2:29 pm: |
| 
|
एक गीत खूप दिवसांनी.... खूप काही हरवलेलं दुख उरि धरु नको तू... खूप काही हरवलेल वादळाची रात्र शमली दवांदवांतून पहाट फ़ुलली सृश्टीचे ते रूप मनोरम नयनी तुझ्या अवतरलं खूप काही हरवलेलं... कोवळे हे एक नाते जोडता आता मनांचे घेता हाती हात तुझा मी अंग अंग मोहरलं खूप काही हरवलेलं... सांग ना मझ्या सखे ग अबोल का झाली अशी तु एइकन्यास स्वर तुझे दीवाणे रोम रोम आतुरलं खूप काही हरवलेल...
|
Menikhil
| |
| Friday, May 11, 2007 - 8:35 pm: |
| 
|
कित्येक दिवस झाले...तुझी फक्त स्वप्नच येतात प्रजक्ताचा सडा पडावा...तशी पहाटे पहाटे पडतात सोनसकाळच्या कोवळ्या उन्हात....सोनेरी होउन जातत पण कितीही वाटल तरी...तुझी स्वप्ने...स्वप्नेच रहातात कितिदा समजवावे य वेड्य मनाला? कितिदा आवर घालवे ह्या सोसट्य वार्यला? कारणे असन्ख्य काढावी तुझी स्वप्न पहायला का एकही कारण नसावे तू समोर यायला?
|
श्री, "मायबोली एक असं व्यासपीठ जिथे मुक्या माणसाचे शब्द बोलतात लंगड्या माणसाचे शब्द चालतात प्रत्येकाचे अस्तित्व शब्द बनून राहतात " खुपच छान! गणेश(समीप).
|
Ajjuka
| |
| Sunday, May 13, 2007 - 11:35 am: |
| 
|
ठरलंय माझं एकदा आकाशाला पोचायचं कसलीच कुठलीच मर्यादा आड येणार नाही असं हरपायचं.. ठरलंय माझं! कुठेच थांबायचं नाही कशात अडकायचं नाही गुंतला पदर तर पदर भिरकवायचा पण जायचं ठरलय माझं! काळ्या कांबीचा देह मेणासारखा वितळतानाही हात सोडवून घ्यायचा आणि जायचं ठरलंय माझं शहाणंसुरतंपण जपायचं नाही खरंतर काहीच जपायचं नाही ना मन ना देह वाट्टेल तितकं वाहून जायचं सगळ्याच्या पलिकडे उडून जायचं पण आकाशाला पोचायचंच.. पोचायचंच .......... खरंच! ठरलंय माझं
|
Bee
| |
| Monday, May 14, 2007 - 2:01 am: |
| 
|
निखिल, खूप छान आहे कविता. विषय जरी जुना असला तरी ही कविता वाचाविशी वाटते इतकी छान लिहिलीस तू.. अज्जुका, कविता छान आहे पण तुझ्या कविता इतक्या काही स्वकेंद्रीत नसतात त्यामुळे वाचताना आपण अज्जुकाची कविता वाचतो आहे असे मुळीच वाटले नाही..
|
Menikhil
| |
| Monday, May 14, 2007 - 12:48 pm: |
| 
|
एक दिवस अचानक.... त्या दिवशी तर बॉस कमालच झाली मी चहा पीत असताना ती समोर दिसली नजरानजर होताच वाटल ती थोडीशी हसली मग मी ही न पाहिल्यागत करून मान माझी फिरवली वाराही त्या दिवशी जरा खट्याळ झाला होता कुरळ्या बटान्ना तीच्या वर वर उडवत होता ओढणीला तिच्या वेटोळे घालत होता आणि तिला बिचारीला सावरता सावरत नव्हता "वारा काय मस्त सुटलाय?" म्हटल जाउन बोलाव कोण? कुठली? नाव काय? म्हटल जाउन पुसाव टीम लीड नी पण का ह्याच वेळी पचकाव? अन महत्वाच काम म्हणून केबिन मधे न्याव? असो.... पुन्हा ती मला केन्टीन मधे भेटली योगायोगाने ती जेवयला मझ्यच समोर बसली पण ती बसताच समोर....टीम माझी उठली अन दैवानी माझी पुन्हा अशी फिरकी घेतली पुन्हा आजच भेटेल ह्याची मला खात्री वाटली जीव ओतून वाट पहायची नको ती सवय लागली पण आजवर ती पुन्हा मल कधीहि ना दिसली अन रेशमाची का काय म्हणतात ती गाठ बान्धण्या आधीच सुटली
|
अरे रे, निखिल . बस, ट्रेन और लडकी.... हे लक्षात ठेव
|