|
Bee
| |
| Tuesday, May 15, 2007 - 10:39 am: |
| 
|
मी अशी एक वेल जीला आधाराचे भय कुणी वृक्ष होण्याचे नको तीला अभय आपल्याच अंगकाठीवर प्रयत्नपुर्वक सरपटते चुकुन कुठे गुंतले तर ओरबडून अलग होते..
|
Ksha
| |
| Tuesday, May 15, 2007 - 11:53 pm: |
| 
|
अज्जुका, अप्रतिम! अज्जुका अप्रतिम
|
Ajjuka
| |
| Wednesday, May 16, 2007 - 2:39 am: |
| 
|
धन्यवाद क्ष आणि धन्यवाद बी
|
Astitva
| |
| Wednesday, May 16, 2007 - 6:45 am: |
| 
|
नमस्कार बी. तुम्हाला पाहून आनंद झाला. साहिल.........
|
Mankya
| |
| Wednesday, May 16, 2007 - 7:01 am: |
| 
|
अज्जुका .. जबरदस्त .. आवडली मनापासून ! बी .. छानच रे ! माणिक !
|
अज्जुका पदर गुंतला तरीही.. काळ्या कांबीचा देह वितळताना.. सहीच झालीय. बी, अलग शब्द हिंदी आहे ना?
|
Bee
| |
| Wednesday, May 16, 2007 - 8:38 am: |
| 
|
संघमित्रा, माझ्या मते अलग हा शब्द मराठी भाषेतही वापरतात... अभिप्रयाबद्दल आभार..
|
नेहमीप्रमाणे नेहमीप्रमाणेच आलास... काळोखाची ओंजळ घेऊन डोळ्यांच्या उध्वस्त दारांसमोर... नेहमीप्रमाणेच उभा राहिलास संन्याश्याच्या मौनार्त भाषेत मागितलेस दान रातराणीच्या तुडूंब गंधसागराला दुर्लक्षाचे हजार किनारे लावून (हे देखील नेहमीप्रमाणे!) मागितलेस दान कशाचे हे कळलेच नाही मला नेहमीप्रमाणे... आयुष्यभराचा वणवा रक्ताने विझवून जे गवसले दोन काजवे फक्त... तेच तुझ्या ओंजळीत ओतले (सवयीनुसार) ...तेवढ्याश्या सूर्यांश झरोक्यांतही आपण पाहून घेतल्या एकमेकांच्या हाताला झालेल्या जखमा... केलेल्या खुणा... (जिज्ञासेच्या सातव्या मजल्यावर चोरपावलांनी पोहोचू पाहणारी निर्विकार जाणिव...) जाताना वळून मागे पाहिले नाहीस. निद्रेचा पाचोळा तुडविण्यार्या आवाजातून तुझी पावलं सांगतच राहिली मला, " हे जे दोन काजवे आहेत ना, त्यातल्या एकाचा चंद्र बनवायचा प्रयत्न करीन! आश्वासन देत नाही, पण प्रयत्न करायला काय हरकत?? मात्र, त्यांतल्याच एका काजव्याचा उद्या सूर्य होणार हे निश्चित... अगदी काळोखाची शप्पथ हं!! फक्त आजची रात्र हुंदक्यांची गस्त घालण्या-या वेदनांसोबत सावधपणे पार पडो ही सदिच्छा. उद्याची भूपाळी तुलाच गायची आहे कदाचित नेहमीप्रमाणे! " इतकं घडूनही काहीच न घडल्यासारखं तुझं विरघळून जाणं पूर्वेच्या काळोखात! -मयूर
|
Mankya
| |
| Wednesday, May 16, 2007 - 9:22 am: |
| 
|
मयुरा .. अप्रतिम ! काही उपमा अगदी जबरदस्त .. शब्दांनी दाद न देण्यासारख्या ! पण पूर्णपणे अर्थ पदरी पडत नाहिये माझ्या ! अर्थात माझ्याच चौकटी आहेत त्या ! Please एकदा सगळा घटनाक्रम समजावून सांग ना ! खूप आवडेल वाचायला अर्थ ! उतरलिये मात्र सूसाट .. अगदी वेगवान ! माणिक !
|
Vaisanty
| |
| Wednesday, May 16, 2007 - 1:54 pm: |
| 
|
ह्या ग्रीष्मातिल नि:शब्द धगीच्या राती मी देह लोटुनी देते धरणीवरती हलके हलके एकेक पिवळसर पान रचतसे फाल्गुनी शय्या अवती-भवती ही भुई निरखिते पुन्हा-पुन्हा मजवाणी अस्वस्थ चान्दवा ओढुन अंगावरती
|
Bee
| |
| Thursday, May 17, 2007 - 5:55 am: |
| 
|
वासंती, मस्त.. छान लय आहे कवितेला..
|
|
|