Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 11, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » वैशाख » काव्यधारा » झुळूक » Archive through May 11, 2007 « Previous Next »

Ksha
Saturday, April 28, 2007 - 1:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तप्त तनुच्या निश्वासांचे
मोल जाणितो साजण मेघ
कवटाळून वसुधेला घेतो
प्रेमाचा वर्षत आवेग


Mankya
Monday, April 30, 2007 - 2:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुखाच्या स्पर्शानेही ना सुखी
हेच माझे दुःख आहे
दुःखाच्या धक्क्यातही मी निश्चल
हेच माझे सुख आहे !

माणिक !


Astitva
Monday, April 30, 2007 - 8:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शांत नयनांचा
तुझा तो भाव होता....
माझ्या ह्द्याला
तुझा तो घाव होता....

साहिल.......


Astitva
Monday, April 30, 2007 - 8:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शांत नयनांचा
तुझा तो भाव होता....
माझ्या ह्द्याला
तुझा तो घाव होता....

साहिल.......


R_joshi
Friday, May 04, 2007 - 8:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे बरेच जणांनी बरेच दिवे घेतलेले दिसत आहेत.:-)
गोबु:-)

सांज एक थांबली
बकुळीच्या आठवासंगे
पावल एकटिच पडत राहिली
थांबलेल्या हृदयासंगे

प्रिति:-)


R_joshi
Friday, May 04, 2007 - 8:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक वर्षाव मेघांचा होता
एक वर्षाव आसवांचा होता
वर्षाव दोघांचाहि सारखाच
एक बाहेर होता....
एक आत होता......

प्रिति:-)


Shree_tirthe
Friday, May 11, 2007 - 3:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेघांच्या वर्षावात
मी भिजलो
आसवांच्या वर्षावात
मी झिजलो

- श्री


Manogat
Friday, May 11, 2007 - 11:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कधी नुसतच रागवण होत,
कधी स्वता: वरच चिडन होत,
तु जवळ नसतांना,
आता फ़क़्त कुढुन कुढुन रडन होत.


Devdattag
Friday, May 11, 2007 - 11:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

का उसाश्यात माझ्या
ते फूलही वाहून गेले
कालच्या पावसात
जे एकटेसे राहून गेले


Shyamli
Friday, May 11, 2007 - 11:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आठवांचे खेळ
असवांची वेल
....हृदयभेदी!

श्यामली!

Shyamli
Friday, May 11, 2007 - 11:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चुकवून जात होते
रोजच्या वाटांस मी
भीत होते भेटण्या
माझ्यातल्या मलाच मी

श्यामली!

Giriraj
Friday, May 11, 2007 - 12:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रोज रोज त्याच वाटा
हरवलो तरी कसा मी?
रानवेड्या वाटेवर एकदाआ
दिसलो माझा मलाच मी!

गिरीराज


Anilbhai
Friday, May 11, 2007 - 5:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिर्‍या, हरवु नको रे बाबा असा. आणि घाबरलास नाही ना स्वताः ला बघुन ~D :-)

त्या रानवेड्या वाटेवर
दिसला मला परत तोच काजवा
मी म्हटल उदास का, धुळीन बघ
माखला हा, दिवा जरा खाजवा
म्हणाला काय फायदा, डिम झालोय
कोणीच लाईट देत नाही कितीहि सजवा





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators