|
Niru_kul
| |
| Sunday, April 29, 2007 - 6:16 am: |
| 
|
भावफूल... शब्दांचे अर्थ आता, मजला उमजत नाही; मी एक कवी असला, मज कविता समजत नाही. त्या निशातळीची स्वप्नें, मजसमोर भंगून जाती; दाटते अंधूक चांदणे, सरतात उपाशी राती. मी मंद मंद हसताना, डोळ्यांत धुके साठवतो; सजवून आसवांना या, पुन्हा माघारी पाठवतो. ती समुद्रक्षितिजावरची, मी नाव नजरी माळतो; एकला बसून किनारी, रेतीस उगा चाळतो. या मंद ह्रदयस्पंदांची, मज लागते न चाहुल; अन् मलाच समजत नाही, करपले कसे भावफूल.... करपले कसे भावफूल.... - निरज कुलकर्णी.
|
Gargi
| |
| Tuesday, May 01, 2007 - 2:19 pm: |
| 
|
पहीली सर पावसाची याद तशी नेहमीच जीवघेणी त्यातच अवेळी ढग दाटुन आलेले अशावेळी एकांताला आपण सापडू नये हे मनाशी पक्क ठरवलेल...... म्हणून केवळ घराबाहेर निरर्थक भटकण मनाशी अस्स्, की हा नुसता बहाणा नाहीच बरसणार तो कीतीही आसुसलो जरी....... अन् अचानक जाणवू लागले अंगावर ओलेपण मृदगंध, थेंबच थेंब पहीली सर, शरीरभर........
|
Mankya
| |
| Friday, May 04, 2007 - 1:49 am: |
| 
|
नीरू .. भावफूल भावलं मित्रा ! गार्गी .. पहिली सर .. शरीरभर .. वाह ! मस्त लिहिलस ! माणिक !
|
Mankya
| |
| Friday, May 04, 2007 - 3:24 am: |
| 
|
विखुरलेल्या क्षणांत क्षण सुखाचे वेचू काही थोडे लुटवू .. उधळू तर मन्मनात जपू काही कधी आव्हान नयनी अव्यक्त खुणवत राही तर कसे उगा लटके बहाणे काहिबाही कसा मोहक अधरांचा किलबिलाट पाही निरखताना कशी पापणीही लवली नाही धुंद ह्या वाटा ठसलेल्या पाऊलखूणाही ज्यांची आठवणही अंगाची लाहीलाही खरंय .. हे सुख सगुणसाकाराच्याच ठायी निराकाराला ह्या सुखाचा स्पर्शही नाही ! माणिक !
|
Vaisanty
| |
| Friday, May 04, 2007 - 3:58 pm: |
| 
|
सल सलगच जेव्हा जन्म पोखरे अवघा अन सार्द्र नयन हाकारीत असता मेघा तव मायेचा कव वेढुन मज झरताना झन्कारुन ये सच्छिद्र मनाचा पावा या उभ्या सरींना आणिक खुळ्या स्वरांना बळ असे मिळे क्षण आयुष्या सामोरा
|
Niru_kul
| |
| Monday, May 07, 2007 - 1:46 am: |
| 
|
गंधाली... का शोधत मी ही जातो, सुमनांच्या पुलकित वाटा? विषाद मज का भासे, रुतला जर पायी काटा? या बकुळ मुक्त फुलांची, मज लागते अशी का आस? अन् होतात कसे हे मजला, निःशब्द सुगंधी भास? हा गंध कसा दरवळतो? हे फुल कसे उमलते? या मुग्ध ताटव्यामध्ये, धुंदता कशी ही वसते? या शंका मजला येती, पण निरसन उमजत नाही; हे रम्य गूढ गंधाचे, मजला समजत नाही. फुलपाखरे येऊन बसती, या पराग दंडांवरती; शोषून रस मुकुंदी, पंखात रंग ते भरती. मज खूळ कसे गंधाचे? हा नाद मला का जडला? का नाजुक सहवासाने, वाल्याचा वाल्मिकी घडला? मी गंधवेडा निघालो, मज चढली फुलांची ग्लानी; श्वासात रुळली माझ्या, ही मुक्तछंद गंधाली... ही मुक्तछंद गंधाली... - निरज कुलकर्णी.
|
Mankya
| |
| Monday, May 07, 2007 - 1:56 am: |
| 
|
निरज ... जबरदस्तच रे ! एक मस्त Flow आहे कवितेला ! शब्दप्रयोगही आवडेश ! निःशब्द सुगंधी भास .. आह ! आवडली रे आवडली .. अगदी मनापासून ! कवितेच्या नावावरच फिदा आपणतर ! माणिक !
|
Shyamli
| |
| Tuesday, May 08, 2007 - 6:59 am: |
| 
|
व्यसन लावून घेतलंय आम्ही दोघांनी एकमेकांच मी तरी जरा बरीच असते ते नसतात तेव्हा, पण त्यांना मात्र करमत नसावं माझी भेट घेतल्याशिवाय न चुकता येतातच डोळ्यांत रोजच.... श्यामली!!
|
Mankya
| |
| Tuesday, May 08, 2007 - 8:21 am: |
| 
|
श्यामली .. कित्येक दिवस ईथे सरीचा एक थेंब आला नव्हता, तू बरसलीस खूप छान वाटलं ! व्यसन .. सुंदरच ! लिहित रहा गं ईथे तू तरी ( बाकीच्यांना काय झालंय कुणास ठाऊक ) ! माणिक !
|
वाहवा! श्यामली असलं व्यसन भन्नाटच..एकदम सुंदर! माणिक छान आहे कविता. 'निराकाराला सुखाचा स्पर्श नाही'... लयी भारी!!! माणिक बरोबर आहे...बाकीच्यांना काय झालंय कुणास ठाऊक?? मंदीचा काळ चालू आहे बहुतेक.
|
Mavi
| |
| Tuesday, May 08, 2007 - 9:39 am: |
| 
|
सहवास.... सहवासने माणसाची ओळ्ख पट्ते नात्यातलि गोडि मात्र विटते!! सगळेच माहितिचे सगळेच expected नविन काहि नाहि मन म्हणते ह्यात मजा नाहि !! नाते नव्ह्तेच म्हनावे तर तसेहि नस्ते कारन छोटिशि वावटळ सुधा: वेगळिच हुरहुर लाउन जाते!! एकटेपनाचि भिति नसते कमीपनाचि लाज नसते फ़क्त काहितरि जवळचे हरवल्याचि हुरहुर असते!! असे कसे हे नते अशी कशी हि माणसे माज़ी मज़ी म्हनेस्तोवर शनात अनोल्खि होते !!
|
Desh_ks
| |
| Wednesday, May 09, 2007 - 4:13 am: |
| 
|
श्यामली, खूप सुंदर लिहिलं आहे. प्रकट उल्लेख न करण्यामुळे आलेली हळवेपणाची छटा फारच सुंदर! -सतीश
|
Shyamli
| |
| Wednesday, May 09, 2007 - 4:50 am: |
| 
|
माणिक,मयुर,देशपांडेजी मन:पूर्वक धन्यवाद .. .. ..
|
Desh_ks
| |
| Wednesday, May 09, 2007 - 4:51 am: |
| 
|
"रान - (काही शब्दचित्रं)" अवखळ पाण्याची बेभान उडी, अलिप्त डोंगरकडा स्वत:शीच एकतान, दवबिंदूच्या काळजीनं थरथरणारं कुठेसं एक हळवं पान. वृक्ष बेगुमान माजलेले उन्मत्त, त्यांच्या उर्मट आधारानं आपलं जगणं जपणार्या लोचट वेली, आणि तो आधार नाकारणारी काही मानी झुडुपं खुरटलेली! किर्रर्र अंधार, झाडी घनदाट, आरपार भेदून जाणारी एक एकाकी, धीट पाउलवाट! आडदांड वार्याची धसमुसळ, विखुरलेला असहाय पाचोळा अन् मुक्या कळ्या, लवलेल्या अपमानित फांद्या ओशाळ्या. शिशिरातली पानगळ, विनाशाच्या खुणा वसंतातल्या पालवीचा नित्य नवा उखाणा! -सतीश
|
श्यामले, तु जरा बरी असाविस.. आमचि भेट घेतल्याशिवाय आम्हाला मात्र करमत नाही तुझी कविता वाचल्याशिवाय.. न चुकता येतोच इथे.. रोजच.. हे देखिल व्यसनच नाही का?
|
Jo_s
| |
| Wednesday, May 09, 2007 - 5:30 am: |
| 
|
श्यामली सुंदरच आहे ही कविता. सतीशजी रान छानच आहे
|
Jo_s
| |
| Wednesday, May 09, 2007 - 6:11 am: |
| 
|
असे प्रेम देवा सहज गीत ओठी कुणी गुणगुणावे, असे प्रेम देवा नशीबी असावे जणू शिंपल्यातून मोती वसावे, असे प्रेम देवा नशीबी असावे किती छाटले झाड फुटती धुमारे, किती मेघ आले विझे सूर्य कारे ? किती, वार झेलूनही ना मिटावे, असे प्रेम देवा नशीबी असावे जशी भेटते ती नदी सागराला, जशी लाट शोधून गाठे किनारा जळावीण मासे जसे तडफडावे, असे प्रेम देवा नशीबी असावे जरी जीवनाच्या दिशा भिन्न झाल्या, कधी धुंद अथवा कधी खिन्न झाल्या तरीही मनांनी मनांतच वसावे , असे प्रेम देवा नशीबी असावे धरा सांग चंद्रा कधी भेटते का, पहाटेस संध्या कधी गाठते का तशी जाणती साथ देण्या असावे, असे प्रेम देवा नशीबी असावे कधी दक्षिणा ना धरा मागते(रे) , कधी दाम प्रेमास का माय घेते सदा प्रेम निरपेक्ष हृदयी ठसावे, असे प्रेम देवा नशीबी असावे उगा ध्यान बगळ्यास भावे कशाला, उगा मकर नेत्रात आसू कशाला अशा मृगजळा ना कधीही फसावे, असे प्रेम देवा नशीबी असावे सदा संत गाती तुझे नाम भावे, अनंता तुझे रूप कोणा न ठावे तरी आळवीता मिळावे विसावे, असे प्रेम देवा नशीबी असावे विराटा तुझे रूप गगनी दिसावे, कधी सूक्ष्म रूपी तुझे भास व्हावे न दिसता जसे गंध ते दरवळावे, असे प्रेम देवा नशीबी असावे. . . . सुधीर
|
Mankya
| |
| Wednesday, May 09, 2007 - 6:18 am: |
| 
|
तू गेल्यावर कळलच नाही मी अस काय गमवलं अताशा कळतंय मला गमवण्यासाठी स्वत्वही नाही उरलं .. मनाचा हळवा कोपरा अजूनही घेतो कानोसा त्या कंकणांच्या आवाजाचा .. परवा एकला कुठेतरी तुझ्यासारखाच आवाज शांत मनाचं गाव गजबजलं ना नेहमीच्या आगंतुक पाहुण्यांनी .. पण अता आसूसलीये वेस अधीर झालीये पाऊलवाट वाट पाहत शीणलाय उंबरा वेड्यांना वाटतय येईल तुझ्या पाऊलांची चाहूल कधीतरी .. माहीत नसणार बापड्यांना ह्या वेशीपलीकडे गेलेले कधीच परत येत नाहीत ..... माणिक !
|
Mankya
| |
| Wednesday, May 09, 2007 - 6:31 am: |
| 
|
सुधीर .. हो असंच प्रेम असावं वाटलं नशीबात ! अप्रतिम उतरलिये .. तसा फॉर्म गज़लेचा आहे पण कविता म्हणून नितांत सुंदर ! एक कल्पना आवडली म्हणून सांगणे अशक्य .. सगळ्याच कल्पना भिडल्या मनाला ! पुन्हा एकदा .. व्वाह ! सतीश .. अगदी रानात गेल्यासारखं वाटलं .. वर्णन तंतोतंत खरंय ! माणिक !
|
Daad
| |
| Wednesday, May 09, 2007 - 7:28 am: |
| 
|
अरे कसल्या मस्तं मस्तं कविता येऊन गेल्यात इथे! नीरज, गार्गी, माणिक, वैशालि, श्यमलि, मवि (माधवी), सतीश, सुधीर.... अरे काय चालवलय काय? एकाहून एक सरस कविता! असं एकगठ्ठा, घाऊक कौतुक करायला आवडत नाही. पण वेळेअभावी... "यह ही सही"! लिहित रहा रे सगळे. आपली कविता, कुणाचीतरी संध्याकाळ सजवते याची कल्पनाही नसेल तुम्हाला....
|
|
|