Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 07, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » वैशाख » कथा कादंबरी » झाड! » Archive through May 07, 2007 « Previous Next »

Chaffa
Sunday, May 06, 2007 - 6:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झाड!
*********

नोव्हेंबर १४, २००५

मी आभिमानाने त्या रोपट्याकडे पाहीले, या वेळीच्या सह्याद्री मोहिमेत मला हा खजिना सापडला. मी तसा रहातो या महानगरात पण माझे मन मात्र कायम सह्याद्रीच्या कडेकपार्‍यांमधे गुंतलेले असते. माझ्या उद्योगाला पुरक साहीत्य नेहमीच मला तिथे सापडत आलेले आहे. मी काय करतो ते सांगायचे राहूनच गेले नाही का? मी एक आयुर्वेदीक औषधे बनवणारी छोटासा कारखाना चालवतो. त्याच बरोबर नव्यानव्या औषधी वनस्पती शोधुन त्यांच्या औषधी गुणांचा वापर करुन अनेक रोगांवर औषधे बनवतो त्यामुळे माझा कारखाना कायम तेजीतच असते, बर्‍याच अशक्य रोगांवरची औषधे माझ्याकडे उपलब्ध असतात. या सगळ्यामागे माझे आणी माझेच श्रम आहेत. या दुर्लभ वनस्पतींच्या शोधात मी अनेक दिवस सह्याद्रीच्या रांगांमध्ये फ़िरत असतो.
दोनच दिवसांपुर्वी मी सह्याद्रीतली शोधयात्रा संपवुन परत आलो या वेळी मी सह्याद्रीच्या आगदी दुर्गम भागात गेलो होतो. तिथे आजुनही बाहेरच्या जगाची माहीती नसलेले आदिवासी रहातात. विज तर सोडाच पण साधी मेणबत्तीही आजुन त्यांना माहीत नाही. मलाही नेहमी अश्याच लोकांचा शोध असतो कारण जंगलचे हे राजे, झाडे वेली आणी त्यांच्या उपयोगांशी चांगलेच माहीतगार असतात. अश्या लोकांना देण्यासाठी मी नेहमीच बरोबर कपडे, विदेशी मद्याच्या बाटल्या, शोभेचे खोटे दागीने अश्या वस्तु जवळ बाळगतो. असले काही भेट म्हणुन दिले की त्यांच्याकडून उपयुक्त वनस्पतींची माहीती आपसुक मिळतेच. यावेळी मात्र सगळ्या भेटवस्तु फ़ुकट गेल्या असे वाटत होते एकतर दिवसभर भटकुनही एकही उपयोगी वनस्पती मिळत नव्हती आणी त्यात रात्री डास झोपुन देत नव्हते तसा मी नेहमीच बरोबर हे किटक प्रतिबंधक क्रिम ठेवतो पण हे असले डास? ते कशालाच न जुमानता माझे रक्त पितच होते. त्या रात्रीही मी तसाच डासांच्या चाव्यांनी हैराण होवुन जागत बसलो होतो तेवढ्यात एका फ़ाटक्या अंगाच्या आदिवास्याने मला कसलीतरी पाने दिली आणी खुणेनेच ती चिरडून अंगाला चोळायला सांगितले मी मुकाट्याने तो सांगतो तसे केले कारण नाहीतरी दुसरा करण्यासारखा काहीच उपाय शिल्लक नव्हताच. पण त्या रात्री मला एकदम शांत झोप लागली आगदी एकही मच्छर चावला नाही. सकाळी उठल्यावर ताज्यातवान्या झालेल्या मनात पहिला प्रश्न हा उमटला ती पाने कुठल्या झाडाची? जर हे झाड सापडले तर त्याचे आणखी कोणते उपयोग होतील? पटापट सगळी आन्हीके आटोपुन मी त्या आदिवाश्याच्या शोधात बाहेर पडलो. जास्त शोधाशोध करावी लागलीच नाही कारण तोच माझ्याकडे यायला निघाला होता. काल दिलेल्या दारुच्या बाटलीचा परीणाम! मग कोण अशी संधी हातची सोडेल? त्याचा पार पिच्छा पुरवला त्या झाडासाठी. आणखी एका बाटलीचे आमिष दाखवल्यावर तो तयार झाला पण मी हे कुणाला सांगु नये अशी खुण करायला तो विसरला नाही. त्याच्या मागोमाग झाडाझुडूपातुन फ़िरत जागोजागी खरचटून घेत एकदाचा त्या झाडापाशी पोहोचलो. समोरचे झाड काही फ़ार मोठे नव्हते पण त्याची काळपटपणाकडे झुकणारी गर्द हिरवी पाने, आणी लालबुंद फ़ुले पाहून एकदम खुष झालो. आणी भर म्हणजे त्याच्या आजुबाजुला लहान लहान रोपटी सुध्दा होती म्हणजे मला आरामात घरी नेता आली असती ईतकी लहान. मी आनंदानेच त्या रोपट्यांकडे वळलो पण माझा हा नवा आदिवासी साथिदार काही मला ते रोप काढून देईना! हवेत नाना हातवारे करुन तो मला त्या रोपट्यापासुन दुर करत होता. हे काही मला नविन नाही हे आदिवासी त्यांच्याकडचे ज्ञान दुसर्‍याला सहजासहजी देत नाहीतच. पण मला आता त्या झाडाची जागा माहीत झाली होतीच आणी त्याचे रोप नेल्याखेरीज मी गप्प बसणार्‍यातला नक्कीच नाही. शांतपणे मी परत फ़िरलो आणी दुपार नंतर गुपचुप ते रोप घेउन आलो आणी ताबडतोब सह्याद्रीतला मुक्काम संपवला आणी घराकडे प्रयाण केले चक्क ते रोप चोरुन आणले मी.
दोनच दिवसांपुर्वी मी ते रोप माझ्या बंगल्याच्या आवारात लावले सुध्दा, ईथेच बंगल्याच्या मागे माझी छोटीशीच पण अद्यावत प्रयोगशाळा आहे त्यामुळे मला हे झाड ईथेच हवे होते आणी त्याच्यामुळे बागेला शोभा येणार होती ती वेगळीच. या ईवल्याशा काळात त्या रोपट्याने बर्‍यापैकी जीव धरलाय पाने जी प्रवासात थोडी फ़िक्कुटली होती ती आता रसरशीत दिसतायत. आता माझा नोकर स्वयंपाक करायला आला की त्याला त्या रोपट्या भोवती आळे करायला सांगणार आहे मला आजुन त्याचे औषधी गुणधर्म शोधायचेत.

मे २३, २००६

आज ते रोप लावल्याला सहा महीने होवुन गेले आहेत. या सहा महीन्यात माझ्या कारखान्याने त्याच्या जीवावर भरपुर कमाई केलेली आहे. बयाच उपयुक्त औषधांची आमच्या संग्रहात भर पडली आहे. आणी आयुर्वेदा बरोबरच माझ्याकडे आता बर्‍याच विषांवरच्या लसीही उपलब्ध असतात. आणी हे सगळं ज्याच्यामुळे शक्य झालय ते रोपटेही आता मोठ्या झाडात रुपांतरीत झाले आहे. फ़क्त एकच गोष्ट अशी आहे जी मी सगळ्यांपासुन लपवुन ठेवली आहे. माझ्याही तसे ते लवकर लक्षात आले नव्हतेच पण हळूहळू ते समजत गेले. त्याचं नेमकं झालं काय की ते रोप लावल्यावर दहापंधरा दिवसातच ते छान फ़ोफ़ावले पण त्याच्या आजुबाजुची हिरवळ एका ठराविक अंतराच्या बाहेरच हिरवीगार होती त्या रोपाच्या जवळची सगळी हिरवळ आगदी नाहीशी झाली होती म्हणा ना! म्हणजे एखादे हेलीकॉप्टर उतरते तेंव्हा आजुबाजुची माती उडून तिथे कसा एकच गोलाकार चांगला साफ़सुफ़ दिसतो तसेच जी काही लहानमोठी रोपे आगदी माझी लॉनसुध्दा त्या रोपापासुन ठराविक अंतरापर्यंत साफ़ होत गेली. थोडाफ़ार अंदाज बांधायचा म्हंटला तर त्या रोपाची बाकी वनस्पतींना ऍलर्जी आहे म्हंटल तरी वावगे वाटू नये. आणखीही एक गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे या झाडावर पक्षी आजीबात बसत नाहीत. निदान मी तरी पाहीले नाहीत. पुढच्या आठपंधरा दिवसात मला त्याचेही उत्तर मिळाले एका भल्या पहाटे मी उठून बाहेर आलो होतो. काही ठराविक वनस्पतींच्या वापरा बद्दल काही संकेत आहेत पहाटे सुर्य उगवण्यापुर्वीच त्यांच्यातले उपयोगी भाग काढून घ्यावे लागतात तरच त्यांचा औषधात वापर करता येतो. त्यामुळे पहाटे उठून बागेत जाण्याची माझी रोजची सवय आहे. तर मी बागेत पाउल ठेवले आणी भलाथोरला सर्प माझ्या जवळूनच सळसळत गेला स्थब्ध उभा राहून मी पहात होतो, सळसळत तो सर्प त्या झाडावर चढला आणी हवा आजीबात नसताना झाडाची हालचाल झालेली मला जाणवली. (पुर्ण उजाडल्यावर तिथे जाउन पाहीले तर तिथे सापाची कातडी आणी हाडेच फ़क्त झाडाखाली अस्ताव्यस्त पडलेली होती) म्हणजे हे झाड.............................? मला बर्‍याच प्रश्नांची उत्तरे त्याच दिवशी मिळायची होती. आर्धा तास जातोय नाही तोच शेजारच्या बंगल्यातली नोकरमंडळी धावत धावत माझ्याकडे आली त्यांच्यातल्या एकाला साप चावला होता आणी डॉक्टरकडे जायच्या ऐवजी त्यांनी माझ्याकडे धाव घेतली. मी आयुर्वेदीक औषधे बनवतो हे माहीत होतेच त्यांना त्यामुळे सापाच्या विषावरचा उताराही माझ्याकडे असायलाच हवा ही त्यांची आपेक्षा! बरेच सांगुन पाहीले की याला दवाखान्यात न्या पण छे! त्यांना माझ्याकडूनच औषध हवे होते. अखेरीस मी त्या माणसाला ताबडतोब दवाखान्यात न्यायच्या बोलीवर त्यांना औषध द्यायचे कबुल केले. समजुतच काढली म्हणा ना! कारण सर्पदंशावर माझ्याकडे काहीच औषध नव्हते. पण ज्याला साप चावला होता त्याच्या वेदना काही पहावेनात म्हणून त्याला मी सरळ त्या नविन झाडाचा पाला काढून त्याचा रस काढून त्याच्या दंश झालेल्या जागेवर लावला आणी त्याला सरळ दवाखान्यात न्यायला भाग पाडले. पुन्हा हे सगळे दुपारी माझ्याकडे येउन मला सांगताहेत की दवाखान्यात न्यायची गरजच पडली नाही मी दिलेल्या औषधानेच सगळे विष उतरले आणी माझे आभार मानुन सगळे निघुनही गेले. पण मी मात्र विचारात पडलो कारण चावलेला साप विषारी होता हे नक्की कारण ईतक्या दिवसाच्या अनुभवावरुन मला विषारी बिनविषारी सापाच्या दंश खुणा चांगल्याच ओळखता येतात. मग हा चमत्कार कसा? कदाचीत त्या झाडाच्या पानांमधे काही खास गुणधर्म तर नाहीत?................................

जुलै २७, २००६

त्या घटनेला दोन महीने उलटलेत आता मला नक्की काय घडले असावे याचा अंदाज येतोय जो साप माझ्या समोरुन त्या झाडात शिरला तोच साप त्या माणसाला चावला असावा. कारण आता मला माहीत आहे की ज्या प्राण्याचा घास हे झाड घेते त्याच्या अंगी असलेले विष पचवण्यासाठी त्या झाडाच्या जिवनरसाची जडणघडण बदलते आणी त्यातुन विषप्रतीकारक रसायने तयार होतात. हा प्रयोग मी करुन पाहीलाय आणी त्यातुनच आमच्या कारखान्यातली पहीली विषप्रतीकारक लस तयार झाली. आता माझ्याकडे जवळ जवळ सर्व प्रकारच्या विषारी प्राण्यांच्या विषावर प्रतिकारके उपलब्ध आहेत. त्या साठी अक्षरश बळी द्याव्या लागलेल्या प्राण्यांची संख्यासुध्दा अचाट आहे. पण काहीतरी मिळवण्याकरीता काहीतरी किंमत मोजाविच लागते हे माझे धोरण आहे. दुसरी गोष्ट अशी की त्या झाडाला जगवण्यासाठी त्याला सजिव पुरवावेच लागतात. साधी बाब आहे तुम्ही जर वाघ पाळला तर त्याला गवत तर खायला घालु शकत नाही ना?

सप्टेंबर ७, २००६

ज्याची भिती वाटत होती ते काल रात्री घडलेच. आता त्या झाडाला लालचुटूक रंगाची फ़ुले लागली आहेत त्यांचेच विश्लेशण करत मी रात्री माझ्या प्रयोगशळेत जागा होतो, बाहेर काहीतरी आवाज आला म्हणुन खिडकीतुन डोकावले तर कुणितरी त्या झाडाकडे लपतछपत जाताना जाताना दिसले त्याला हे माहीत नव्हते की आपण कोणत्या अनर्थाला सामोरे जात आहोत मी जोरात ओरडुन काही सांगायच्या आतच त्या व्यक्तीने झाडाच्या हद्दीत प्रवेश केला होता. आणी त्याला कदाचीत कळलेही नसेल ईतक्या वेगात फ़ांद्या खाली झुकल्या आणी...............
मी आता ठरवले आहे की त्या झाडाभोवती मजबुत कुंपण घालायचे पण ते दिवसाच्या वेळी कारण दिवसा तसा त्याच्यापासुन काही धोका नसतो हे माझे निरिक्षण आहे. दुसरी एक आणखी गोष्ट माझ्या लक्षात आली आहे ती म्हणजे मला त्या झाडापासुन काही त्रास होत नाही कदाचीत पालनकर्त्याला ते ओळखत असावे.

परवाची ती घटना घडल्यापासुन झाडावरची फ़ुले गायब होत आहेत ती नक्की कुठे जातात त्याचा शोध घ्यायलाच हवा,कारण मला त्या झाडाचे फ़ळ तपासुन पहायचे आहे.

डिसेंबर १३, २००६

गेल्या पंधरा दिवसात मी कारखान्यात गेलेलो नाही की प्रयोगशाळेत गेलो नाही धडपणे खाणेही सुचत नाही. नुसता वणवण भटकतो आहे. गेल्या पंधरा दिवसांपासुन बंगल्याच्या आजुबाजुच्या झोपडपट्टीतुन रात्रीच्यावेळी माणसे गायब होण्याचे प्रकार रोज घडायला लागलेले आहेत. जमिनीला पडलेले फ़ुट दिडफ़ुट व्यासाचे भोक, हा एवढाच माग शिल्लक रहातो. ते ही काही फ़ुटांवर बुजलेले असते त्यामुळे पुढचा काहीच तपास लागत नाही. मला जी शंका वाटते ती जर खरी असेल तर मला आता या झाडाचा कायमचा बंदोबस्त करावा लागेल.

जानेवारी ७, २००७

प्रश्नच नाही मागच्या सगळ्या घटनांमागे हे झाडच आहे. मला आजवर शंका होती पण आता खात्री झालेली आहे त्यासाठी मी दोन दिवस जागा राहुन त्या झाडावर लक्ष ठेवत होतो कालच्या रात्री त्या झाडाच्या हालण्यात काहीतरी बेचैनी जाणवत होती एखादा व्यसनाधिन माणुस जसा व्यसनाची वेळ झाली की बेचैन होतो तश्या हालचाली मला झाडाच्या जाणवत होत्या( आजकाल त्याच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवायची सवयच लागली आहे )थोड्यावेळाने त्याच्या हालचाली जरा सुस्तावल्या सारख्या दिसल्या आणि रात्रीच्या त्या अंधुक उजेडात मला जाणवले की त्याच्या मुळाशी काहीतरी सरपटत आहे. आणी सकाळीच आणखी एक माणुस गायब झाल्याचा आरडाओरडा झालेला मी ऐकला.

जानेवारी,१६,२००७

बाऽऽरे! फ़ारच भयंकर आज दुपारी मी मुद्दाम त्या झाडाखाली जमीन उकरुन पाहीली तिथे हाडे, त्वचेचे तुकडे यांचा नुसता खच सापडतो आहे म्हणजे आता ते झाड त्याचे गुन्हे लपवण्यात माहिर झालेले दिसतेय उद्या कदाचित तिथे काहीच सापडणार नाही कारण जमिनीखालची जागा पुर्णपणे त्याच्याच मालकीची आहे. पण आज आणखी एक अनुभव आला त्याच्या जवळ मी संध्याकाळी गेलो तेंव्हा त्याच्या फ़ांद्यांची सळसळ मला वेगळीच वाटली जणु त्यांच्यातच वाद चालले असावेत अशा त्या एकमेकांवर आदळत होत्या वाद? कदाचीत माझा घास घेण्याबद्दलही असेल कारण आता मला त्याच्या बर्‍याच कृष्णकृत्यांचा पत्ता लागलेला आहे. फ़कत एकाच गोष्टीचा उलगडा झाला की मी त्याचा नाश करायला मोकळा झालो. त्याची फ़ुले गेली कुठे? आणी कशी?

फ़ेब्रुवारी,११,२००७

अखेर त्याच्या फ़ुलांच्या नाहिश्या होण्याचा उलगडा आज झालाच. आणी ते भिषण सत्य समोर आल्यावर जबरदस्त धक्का बसला आगदी ईतके काही पाहुनही बसला नव्हता ईतका जबर, कदाचित त्याच झाडाकडे माझे लक्ष केंद्रीत झाल्याने असेल पण माझ्या बागेतल्या बाकिच्या झाडांकडे माझे लक्षही नव्हते, आज अचानक जे दिसले ते पाहुन माझ्या पायाखालची वाळू सरकली बागेतल्या जवळ जवळ प्रत्येक झाडाच्या भोवती आजिबात गवताचे पातेही नसलेले वर्तुळ तयार झालेले आहे. निट निरिक्षण केले तर जे पाहीले ते फ़ारच भयानक आहे. जवळ जवळ प्रत्येक झाडावर त्या नरभक्षक झाडाचे लालचुटूक फ़ुल अडकलेले आहे आणी त्यातुन निघालेल्या बारिक बारिक तंतुसारख्या मुळ्यांनी त्या त्या झाडात शिरकाव केलेला आहे. ते झाड सर्वभक्षणाला सुरुवात आपल्याच बांधवांपासुन करते हे माझ्या आधिच लक्षात यायला हवे होते ज्या दिवशी त्याच्या आसपासची हिरवळ संपलेली दिसली त्याच दिवशी, पण आता फ़ारच उशिर झालेला आहे त्या घातक झाडाने आपला प्रसार आधिच केलेला आहे. काही दिवसांनी ही उपयुक्त असणारी झाडेसुध्दा मानव भक्षी बनतील हे नक्की कारण त्यांच्यात आता 'त्या' झाडाचे गुणधर्म येणारच. हे सर्व ईथेच थांबायला हवे खरंतर या आधिच थांबवायला हवे होते पण....... आता मलातरी एकच शेवटचा मार्ग दिसतोय तो म्हणजे माझ्या बंगल्यासह हा बगिचा पेटवुन देणे बसऽऽ. त्यासाठी लागणारी ज्वालाग्रही रसायने माझ्याकडे आहेतच गाडीतले पेट्रोल सुध्दा वापरता येईल. पण आता ताबडतोब मला हे केलेच पाहीजे कोण जाणे उद्या कदाचीत त्यांचा विस्तार आणखी होईल! आधिची चुकतमाकत शिकण्याची गरज आता त्यांना नाही. नाही! आत्ताच मला हे काम केले पाहीजे, आत्ता रात्रीच! बाहेर कदाचित मला धोका आहे तरीही आत्ताच......,
मी जर त्या सर्वांचा नाश करु शकलो तर उत्तमच पण जर मी यात अयशस्वी झालो आणी त्यांनी माझाही घास घेतलाच तर तुम्हा सर्वांना ही माहीती पोहोचवता यायला हवी म्हणुन मी ही डायरी माझ्याच टपालपेटीत टाकुन ठेवत आहे कुणीतरी कधीतरी ती उघडेलच!.
फ़क्त एकच महत्वाची गोष्ट ध्यानात ठेवा जर ही डायरी कुणाच्या हाती पडलीच तर याचा अर्थ मी जिवंत नाही आणी 'त्या' झाडाचा विस्तार नक्कीच वाढलेला असेल त्यामुळे 'झाडांपासुन जपुन रहा' कदाचीत,......... तुमच्या आजुबाजुला बागेत, रस्त्याच्या बाजुला आवडीने जोपासलेली झाडेही त्या झाडाने पछाडलेली, असतिलही कुणास ठाउक? कुठले झाड कुणाचा घास घेईल! म्हणुन 'झाडांपासुन सावध रहा'


डायरीच्या शेवटच्या पानावरची ओळ वाचुअन जनार्दन पोष्टमनच्या कपाळावर धर्मबिंदु चमकले त्याने आजच ती डायरी २७ नंबरच्या बंगल्याच्या टपालपेटीतुन आणली होती. आणी आज तारीख होती २ मार्च २००७, आणी त्या घराभोवतालची बाग आजुनही भरगच्च दिसत होती.


Adm
Sunday, May 06, 2007 - 11:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

too good..!!! too frightning.. !! Awesome...

Kashi
Monday, May 07, 2007 - 4:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

caffa...bhiti vatli re.......
masta goshta..

Zakasrao
Monday, May 07, 2007 - 4:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफ़्या मस्त रे. चांगली जमली आहे.

Bhramar_vihar
Monday, May 07, 2007 - 4:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफ्फ्या, अगदी मतकरी स्टाईल! सही!

Nandini2911
Monday, May 07, 2007 - 5:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफ़्या... एकदम सही.. शेवटपर्यन्त कथा गुन्तवून ठेवते. भयकथेवर तुझा हात चांगलाच बसत चाललाय.

Sanghamitra
Monday, May 07, 2007 - 5:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हं ही चांगली जमलीय. लिहीत रहा.

Suvikask
Monday, May 07, 2007 - 6:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्तच... शेवटपर्यंत खिळवुन ठेवते.

Yogita_dear
Monday, May 07, 2007 - 6:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अक्षरश्: काटा आला अंगावर वाचुन..सगळी गोष्ट डोळ्यासमोर उभी राहिली.

Swa_26
Monday, May 07, 2007 - 7:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफा, सहीच आहे रे ही कथा... keep it up ...

Psg
Monday, May 07, 2007 - 8:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त आहे कथा चाफ़्फ़ा..

Jo_s
Monday, May 07, 2007 - 10:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफा खाल्लस की "झाड"
या कथेला, मस्त जमल्ये
सुधीर


Maitreyee
Monday, May 07, 2007 - 1:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चफ़्फ़ा, चांगली जमलिये गोष्ट!

Dineshvs
Monday, May 07, 2007 - 4:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफ़्फ़ा, छान जमलीय कथा.

Swaatee_ambole
Monday, May 07, 2007 - 4:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही छान जमली चाफ्फा.
नारायण धारपांच्या ' फायकसची अखेर'ची आठवण झाली झाडाच्या वर्णनामुळे.


Sunidhee
Monday, May 07, 2007 - 5:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

chaffa baharlaay!!!! chan jamliye!!

Disha013
Monday, May 07, 2007 - 6:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त जमलिये. झाडाचे वर्णन perfect जमलय.

Daad
Monday, May 07, 2007 - 10:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफ़ा, बेदम आहे "भयकथा", मस्तं जमलीये भट्टी!

Rimzim
Monday, May 07, 2007 - 11:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हम्म्म्म्म्म्म मस्तच........
मानलं तुला.....:-)
सहि आहे मांडणी पण आवडली.

आता एक मोठी कथा ( भयकथा ) लिही.


Sakhi_d
Tuesday, May 08, 2007 - 3:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कथेचे नाव वाचले तेव्हांच वाटले होते की ही तुझी कथा... :-)

छान जमली आहे...





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators